अ‍ॅक्टींग तोडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15

..
अ‍ॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..

त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअ‍ॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अ‍ॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात मी माझ्या एका अत्यंत आवडत्या अ‍ॅक्टींग तोडली सीन पासून करतो..

खरे तर हा माझ्या आयुष्यातील पहिला सीन ज्याच्या अभिनयाला मी दाद दिली.. जेव्हा मी पहिल्यांदा वडीलांची नक्कल मारायला नाही तर मनापासून बोल्लो.. अ‍ॅक्टींग तोडली !

चित्रपट - कुछ कुछ होता है ..!

चित्रपटाच्या दुसर्‍या भागात राणी मुखर्जीचे परलोकगमन झाल्यावर शाहरूखची मुलगी अंजली आपल्या वडीलांची त्यांची बालमैत्रीण काजोलशी गट्टी जमवायचा प्रयत्न करते. त्या प्लान अंतर्गत ती स्वत: आधी शिमल्याला कुठल्या तरी स्टुपिडश्या समर कॅंपला जाते जी काजोल चालवत असते. आणि त्यानंतर सर्दी झाल्याचा बहाणा करत आपल्या वडीलांना म्हणजे शाहरूखलाही तिथे बोलावते. पोरीवर प्रचंड प्रेम करणारा शाहरूख आपली सारे कामे छोड छाड के तिथे येतो आणि ‘रघुपती राघव राजा राम’ भजनाच्या तालावर तिथे एंट्री मारत मोठ्याने आपल्या मुलीला हाक मारतो...

अंजलीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ........

बस्स त्यानंतर त्याची जुनी मैत्रीण अंजली म्हणजेच काजोल मागे वळून बघते.. तो अनपेक्षित सुखद धक्का.. त्याही पलीकड्डच्या भावना.. ज्या शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य.. अश्या त्या भावना शाहरूख आणि काजोल दोघेही पडद्यावर ज्या प्रकारे साकारतात, आपली मनस्थिती ज्या हावभावातून उतरवतात, त्याचेही वर्णन करणे निव्वळ अशक्क्यच!.. म्हणून मी देखील त्या भानगडीत न पडता सरळ लिंकच देतो त्या सीनची.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=IAAhi9z9OWE

मला खात्री आहे की तुम्ही दहावेळा, नाही तर किमान तीन वेळा तरी आताच्या आताच बघालच..
एकदा तो सीन म्हणून, एकदा फक्त काजोलसाठी, तर एकदा फक्त शाहरूखसाठी..
काजोल यात थोडी उजवी वाटण्याची शक्यता जास्त आहे, पण माझ्यामते पुरुष कलाकारासाठी असा अभिनय करने हेच मुळात प्रचंड मोठे आव्हान असल्याने मी शाहरूखला त्याचा एक गुण जास्त देईन. Happy

तो सीन जेव्हा कुकुहोहै बघितला होता तेव्हा खूप आवडला होता. शाहरूख 'हाय' म्हणतो तो भाग जमला आहे. मला समहाउ कुकुहोहै पहिल्यांदा आवडला होता. तो सरदार - १२ वाजेल वगैरे भाग सोडून. बरीच अचाटगिरी होती पण पिक्चर फ्रेश होता व तिघांची कामे चांगली होती.

(मात्र जुनी मैत्रिण दिसल्यावर पोरीला विसरला असे आता जाणवते Happy ). थोडी करणजोहरगिरीही आहे. एकूण बराच धार्मिक कॅम्प दिसतो (धर्मा प्रॉडक्शन असल्याने असेल Happy )

मात्र टायटलच्या दृष्टीने चपखल सीन.

शाहरुख खानचेच सीन्स लिहायचेत का इथे? Happy

डीडीएलजेमध्ये यूरोप ट्रिप संपल्यावर स्टेशनवर काजोल त्याला 'शादी में तो आओगे ना?' म्हणते तेव्हा तो 'नहीं, मैं नहीं आउंगा' म्हणताना जो एक लुक देतो तो भारी होता.

'कुछ कुछ्..'मध्ये काजोलचा पदर वार्‍याने उडतो तेव्हाचीही त्याची एक्स्प्रेशन्स मस्त होती.

तसा बरा आहे शा.खा. Proud

महानदीमधे कमल हस्सन त्याच्या हरवलेल्या/पळवलेल्या पोरीला शोधत शोधत कलकत्त्यातल्या (बहुतेक कलकत्ताच आहे) रेड लाईट एरियामधे पोहोचतो. इथे पोरगी सापडली तर कशा अवस्थेमधे असणार हे आधीच ठाउक असल्यामूळे आधीच खल्लास झालेला आहे. कुठल्या तरी कोठ्यामधे एका पाठमोर्‍या मुलीला पाठून बघतो. त्याची चाहूल लागून ती मुलगी 'सुबह हो गया, अब तो बस करो' अशा अर्थाचे काहितरी म्हणते तेंव्हा कमल हस्सन ने दिलेले expressions निव्वळ priceless आहेत. ती त्याचीच मुलगी निघते नि तो तिला तिथून उचलून घेऊन जाताना त्याचा चेहरा जे expressions देतो ते शब्दांमधे मांडणे निव्वळ अशक्य आहे.

https://www.youtube.com/watch?v=N9fuIALfMKs

'नहीं, मैं नहीं आउंगा' म्हणताना जो एक लुक देतो तो भारी होता.
कुछ कुछ्..'मध्ये काजोलचा पदर वार्‍याने उडतो तेव्हाचीही त्याची एक्स्प्रेशन्स मस्त होती.
>>>>
सहमत स्वाती, ते एक्स्प्रेशन लक्षात राहतात..
असंतोष, असमाधान, असूया, या भावना तर हलक्याश्या एक्सप्रेशन मधून अचूक उचलतो शाहरूख,

इथे याप्रकारचीही `एक्कच एक्स्प्रेशन' वा `एक्कच डायलॉग' टाईप उदाहरणे येणे अपेक्षित,

वरच्या आपल्या उदाहरणावरून सहज आठवलेला बाजीगरमधील एक सीन, जेव्हा काजोलचा इनस्पेक्टर मित्र (सिद्धार्थ) सारखा चौकश्या करत असतो आणि शाहरूख त्याच्यावर वैतागलेला असतो. अश्यातच तो एकदा चौकशीनिमित्त येतो आणि जाताना शाहरूखसमोर हस्तांदोलनासाठी हात पुढे करतो तेव्हा शाहरूख हात न मिळवता त्याला एक जबरी लूक देतो.

जिद्दी पिक्चरमधे सनी देवलला त्याचा पर्सनल बदला घ्यायचा असतो. तर पर्सनल कामात बाकीच्यांना उगाच त्रास कशाला, असा विचार करुन तो बाकी गँग मेंबरांना वाईट धंदे सोडून कानूनी धंदे करुन सुखाने आयुष्य जगण्याचा सल्ला देतो. हे ऐकून गँग मेंबर भयंकरच दु:खी होतात. पिक्चरभर ज्या सनी देवलने सांभाळले, अन ज्याच्या एका इशार्‍यानुसार अनेक माणसांना सहज चिरडले, त्याला संकटसमयी एकटं सोडून जायच्या कल्पनेनेही त्यांना रडू कोसळतं. पोलादासारख्या माणसांनी धाय मोकलून रडताना अ‍ॅक्टींग अक्षरशः तोडलीय!
हा ह्रुद्यद्रावक प्रसंग इथे पहायला मिळेल.

औजार चित्रपटात सलमान खान, संजय कपूर (कहा कहा से ले आते है) आणि परेश रावल यांनी या गोळीबार प्रसंगामध्ये काय तोडली आहे ते पाहून प्रेक्षकांना भरून येते. इतकी वर्ष ज्यानी व्हील चेअर वर बसून आपल्याला उल्लू बनवले हे कळल्यावर संजय कपूर (ककसेलेआहै) काय अ‍ॅक्टिंग करतो ती पाहून दगडालाही पाझर फुटेल.

पहा: औजार

>>असंतोष, असमाधान, असूया, या भावना तर हलक्याश्या एक्सप्रेशन मधून अचूक उचलतो शाहरूख,>> वेडसरपणा राहिला (भावना नसली तरी) Proud

कुछ कुछ होता है एक अचाट मूवी आहे.
त्यात ती आगाउ मुलगी ब्लँक कॉल देवून कँपची माहिती काढते.
आणि बापाला कसे अडकवते काजोल मध्ये अगदी अचाटपण आहे.

"त्या" वयात सुद्धा आम्ही थेटरात चेष्टा करत पाहिलेला.... शाहरुख तेव्हा बराच बरा होता. आता सहत होत नाही. Proud

अ‍ॅक्टींग तोडली ? Uhoh
शाखाबद्दलच हवं असंल आणि याच चीप भाषेत लिहायचं असेल तर या अ‍ॅक्टींग तोडली सीनमधली शाखाची कामगिरी चांगली आहे.

https://www.youtube.com/watch?v=Qa0CdYXsNZU

या सीनमधे शाखा कुठेय असा चीप आणि आचरट प्रश्न विचारू नका. शाखाला ओळखा बघू आधी.

आणखी एक "अ‍ॅक्टींग तोडली"
बंगाली डायनोसोर

https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=Xz--tf1TR4I

भास्कराचार्य वर लिंक टाकली आहे त्या सिनेमाच्या त्या सीनची. एकही तमिळ शब्द न कळता बघितलेला सिनेमा नि एव्हढ्या भडक सिनेमामधेही तो सीन जाणवला होता.

सागरसंगमम नावाचा एक तमिळ सिनेमा पाहीला होता कमल हसन जयाप्रदाचा. संपूर्ण सिनेमात अभिनय कशाला म्हणतात याचा वस्तुपाठ कमलने घालून दिलेला आहे. पूर्ण नशेत असताना विहीरीवरच्या एका अरुंद पाईपवर नृत्य करताना त्याने दिलेले एक्स्प्रेशन्स तर कमाल आहेत.

( कमर्शियल सिनेमाच्या बंधनात राहूनही के विश्वनाथ ने कलेला समर्पित सिनेमा बनवलाय. अर्थात शंकराभरणम सारखे अनेक सिनेमे साऊथ मधे बनत असतात.)

https://www.youtube.com/watch?v=cS2n93wsyNwusg=AFQjCNH4k1_7L8gz0WWewm8gl...

परिचयमधला एक प्रसंग लिहिणार होते पण मग लक्षात आलं की सगळा सिनेमाच तोडलाय! तरी, माझे आवडते तीन प्रसंग!
१. जेव्हा रमा (जया बच्चन) दादाजीना (प्राण) मेथी का साग बनवून वाढते (http://youtu.be/K74OT9xWvUo?t=1h59m20s),
२. दादाजींच्या बेडरूममध्ये सगळी मुलं गोष्ट ऐकायला येतात तेव्हा कित्येक वर्षांनी दादाजींना हसताना पाहून नारायणला (असरानी) रडू फुटतं (http://youtu.be/K74OT9xWvUo?t=2h23s)
३. आणि शेवटी दादाजी रमाला विचारतात की रवी भेटला की नाही (http://youtu.be/K74OT9xWvUo?t=2h14m1s)!
हा सिनेमा मी अगणित वेळा पाहिला आहे तरी दर वेळी काहीतरी नवीन सापडतं! Hats off to गुलजारसाहेब!

क्लर्क सिनुम्यात कदम कदम बढाये जा ऐकताच हार्ट अ‍ॅटॅकमधून उठून मार्चिंग करण्याची जी अ‍ॅक्टिंग अशोक कुमार यांनी केली होती त्याला तोड नाही. असला भन्नाट नमुना अजून कुणीही दाखवू शकलेले नाही.

नी :D. सचिन ला जसा शेवटी शेवटी वर्ल्ड कप मिळाला तसे इतकी वर्षे काम करून दादामुनींनी क्लर्क केला नसता तर आपल्यालाच चुकल्याचुकल्यासारखे झाले असते.

मेंहदी लगा के रखना गाण्यानंतर काजोल शाहरूखचा फोटो जेव्हा अमरीश पुरीच्या हातात पडतो तेव्हा अक्षरश: एका क्षणात पृथ्वी फिरायची थांबली का काय असा पोटात गोळा येतो. अॉल टाईम फेवरिट मुलीचा बाप. (कायम व्हीलन रोल करणार्या अमरीश पुरीला पहिल्यांदाच इतकी सुंदर भूमिका मिळाली बहुतेक, आणि ती गाजली देखील.)

क्लर्कची आठवण काढल्याब्द्दल धन्यवाद पण असल्या सर्व अ‍ॅक्टिंगसाठी अचाट आणि अतर्क्य सीन असा बीबी आहेच की. इथं जेन्युइनली चांगले सीन लिहूया.

१, दीवानामधला दिव्या आणी शाहरूखचा सीन "हमने ऐसा तो नही कहा था" "जान बक्शने के लिये शुक्रिया" शाहरूखचा वन ऑफ द बेस्ट सीन.

२. जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये कल्की आणि अभयमध्ये वादावादी चालू असताना जेवणाच्या टेबलवर ह्रितिक अभयला "काय?" असं विचारतो आणी अभ्य केवळ हलकेच मान हलवून उत्तर देतो. त्या सीनमध्ये दोघांचेही एक्स्प्रेशन लाजवाब आहेत (अख्खा सिनेमाच सुंदर आहे तरीही या सीनसाठी अभयचं खास कौतुक)

३. तलपतीमध्ये रजनीकांत आईच्या मागे फिरत राहतो तो सीन (परवा लिटफेस्टमध्ये अमिशने हाच त्याचा फेवरेट सीन असल्याचं सांगितल्यावर चेन्नईमधलं प्बलिक त्याच्यावर कंप्लीट फिदा)

४. त्रिशुलमधेय संजीव कुमार आणि अमिताभचा सीन "मुझे लगा ये मेराही खून है" वाला. अप्रतिम संवाद आणि अभिनय.

५. रजनीकांतच चालबाझमधे. कुणीतरी त्याला "तिला भुतानं पछाडलंय" म्हटल्यावर त्यानं जे काय एक्स्प्रेशन दिलेत ते लाजवाब आहेत.

६. बागीमधला नगमाच्या खोलीत सलमान पहिल्यांदा जातो तो वाला सीन माझा फार आवडता आहे.

७. तारे जमीनपर मध्ये आई त्या मुलाला सोडून परत निघते आणि तो मुलगा तिच्याकडे बघत राहतो तो सीन (कितीही वेळा बघितलं तरी मला या सीननंतर कायम रडू येतंच)

कायम व्हीलन रोल करणार्या अमरीश पुरीला पहिल्यांदाच इतकी सुंदर भूमिका मिळाली बहुतेक, आणि ती गाजली देखील<<< मुस्कुराहट बघ. त्यामधला अमरिशचा रोल अफलातून होता.

कमल हसन चे अनेक सीन्स आहेत.. (काही काही अख्खे सिनेमेच, जसे सागर, पुष्पक, एक दुजे के लिये...म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही होणार!) तूर्तास आठवणारे..

सदमा..श्रीदेवी बरी होऊन परत चालली असताना, डोंगरावरुन पळत, धडपडत, गाडीला धडकून पाय खरडत खरडत रेल्वेस्टेशनवर तिला भेटायला तो पोचतो. तिला शोधून आपली ओळख पटवून द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याला वेडा-भिकारी समजल्याने आलेली आगतीकता....खांबाला धडकून पडणे...हे शेवटच्या अर्ध्या तासातले सगळे सीन्स लाजवाब !

अप्पूराजा..छोट्या अप्पू कडे बघून त्याच्या आईने '...निदान माझ्या मुलासारखा बुटका तरी नाही ना' म्हटल्यावर, आपल्या आईनेच आपल्या बद्दल असं म्हणल्या मुळे दु:खी झालेला अप्पू. काही सेकंदाचा हा सीन, कमल हसन परत लाजवाब!

सागर... सच मेरे यार है.. सबंध गाणंच !

दुर्दैवाने त्याचे फक्त हिंदी सिनेमेच पाहिलेत.

अ‍ॅक्टींग तोडली...असा सीन हवा असेल तर हरीभाई, जयाजींचा कोशीश बघावा !!!

संजीव कुमार आणि जयाजी दोघे ही मुकबधीर असतात....अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ही नेटाने आपला संसार करतात, एक बाळ जातं त्यांचे, नंतर एक मुलगा होतो..त्याला वाढवतात, सुदैवाने तो फीट अँड फाईन असतो, पण संसारचा गाडा ओढता ओढता जया जी ह्या जगाचा निरोप घेतात, संजीव कुमार ज्या कंपनी त काम करत असतो त्या कंपनी च्या बॉस ची मुलगी ही मुकबधीर असते, आपल्या अश्या कन्येला हाच माणुस योग्य प्रकारे समजावुन घेउ शकतो असे वाटल्याने बॉस आपल्या मुली शी संजीव कुमार ह्यांच्या मुलानी लग्न करावे अशी विनंती करतो...संजीव कुमार ह्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो, ते मुलाला घेउन बॉस च्या घरी जातात, तिथे मुलाला कळते की मुलगी मुकबधीर आहे, तो वडिलांवर रागवतो आणि लग्न नाही करणार म्हणुन घरी निघुन येतो...त्या नंतर चा अक्खा सीन म्हणजे संजीव कुमार काय अ‍ॅक्टींग करायचे ह्या साठी अभ्यासक्रमात सामविष्ट करता येईल !! एक ही डायलॉग नसताना केवळ मुद्रा-अभिनय्/काञिक अभिनयाने हरीभाईंनी एक व्यथित झालेला बाप उभा केलाय. पोराच्या कानाखाली पेटवुन ते त्याला आई च्या फोटो पुढे उभे करतात, आणि जाब विचारतात की आम्ही दोघे ही मुकबधीर असुन तुला लहानाचे मोठे केले, शिकवले...पण फक्त पुस्तकी ज्ञान च तुला प्राप्त झाले, तु सुशिक्षित झालस पण सुसंस्कृत मात्र झाल नाहीस....
One of the finest scenes of the film !!

नंदिनी, क्लर्कमधला सीन त्याच्या मांडणीमुळे अ आणि अ आहे पण इतक्या अ आणि अ सीनला कन्व्हिन्सिंग करणे हे अभिनेत्याचे कसब आहे. इथे अभिनयाबद्दल चाललंय ना.
आपण तो सीन बघताना खिदळतो कारण ती संकल्पनाच विनोदी आहे पण अशोक कुमारांच्या चेहर्‍यावरची इंटेग्रिटी बघ.
अप्रतिम लिहिलेला/ मांडणी असलेला आणि अभिनेत्याच्या क्षमतेला न्याय देणारा सीन चांगल्या अभिनेत्याने उत्तम करणे ही नवलाईची गोष्ट नाही.

इतक्या अतर्क्य सीनमधे कन्व्हिन्सिंग अभिनय करणे ही माझ्यामते नवलाईची गोष्ट आहे.

मला नाही वाटत त्या सीनमधे अशोक कुमार यांनी जे केलेय ते अचाट आणि अतर्क्य कॅटेगरीत येते.

ओह, क्लर्क अख्खा सिनेमाच अचाट आहे (आणि म्हनून माझा अत्यंत आवडता आहे.) पण तुझा हा व्ह्युदेखील बरोबर आहे. असल्या सीनमध्ये पण अशोक कुमारचा "अभिनय" चांगलाच आहे. अ‍ॅग्रीड!

अशोक कुमारचे अजून एक दोन सीन्स आठवले की लिहेन, पण तूर्तास किशोर कुमारचा पडोसनमधला इंड्रोडक्टरी सीन. ती पान खात खात बोलायची स्टाईल नंतर कितीही जणांनी केली तरीही जमलेले नाही.

अजून एक आवडता सीनः जब वी मेटमध्ये आदित्य हॉस्टेलच्या पायरीवर गीतची वाट बघत बसलेला असतो. त्यानंतर बोलता बोलता अचानक गीत त्याला "तुम्हे क्या लगता है अब तुम्हारा चान्स है" ओरडते तेव्हा अख्खं गीतचं कॅरेक्टर कन्विन्सिंग वाटतं.

अ‍ॅक्टींग तोडली...असा सीन हवा असेल तर हरीभाई, जयाजींचा कोशीश बघावा !!!>>>>माझ्या आईचा हा खूपच आवडता पिक्चर.

कमल बद्दल काय बोलणार? वीणा मी पाहीलाय सागरसन्गमम.:स्मित: म्हणल ना, कमल जबरी आहे, तो आहे. सन्जीवकुमार, कमल हसन, नसीरुद्दीन, अमिताभ काय काय लिहीणार यान्च्या बाबत?

शक्ती मध्ये आई ( राखी ) गेल्यावर बापाला ( दिलीपकुमार) भेटायला मुलगा ( अमिताभ ) येतो, तो सीन जबरी आहे. मी अमिताभची जबरदस्त फॅन असुनही, त्या सीनमध्ये दिलीपकुमारने अमिताभवर मात केल्याचे जाणवले.

शक्ती, अमिताभ आणी दिलीपकुमार मधल्या अभिनयाच्या जुगलबन्दीकरताच जास्त गाजला.

१. तारे जमी पर मधे आई बाबा आणि योहान हॉस्टेल वर भेटायला आल्यावर ईशान ज्या आवेशाने मैदानावर चिडून चकरा मारत असतो तो सीन.
२. जब वी मेट मधे डिसेंट हॉटेलवाल्याचा करिनाबद्दल झालेला गैरसमज त्यावेळी दूर करायला काही करायचे नसल्याने शेवटी उगीच खोलीत जाताना 'चार घंटे......' म्हणून त्याला डोळे मोठे करुन जळवणारा/उचकवणारा शाहीद कपूर.
३. जब वी मेट मधे 'मेरे साथ ये सब हुवा उसका मतलब ये नही की अब तुम्हारा चान्स है' वाला सीन.
४. जिंदगी ना मिलेगी दोबारा मधे कल्की ने कार मधे 'आय मीन, शादी के साथ तुम कहां दोस्तो के साथ अकेले ऐसा ट्रिप लेना चाहोगे' म्हटल्यानंतर मागे ह्रितिक आणि फरहान्चे एकमेकाकडे बघून एक्स्प्रेशन्स.
५. अप्पू राजा मधे आधी वेगळा समज होऊन मग नायिकेच्या आणि तिच्या प्रेमिकाच्या लग्ना मधे विटनेस म्हणून सही करणारा बुटका कमल हासन

बर्फी मधला तो प्रसन्ग, जेव्हा रणबीर आपला लग्नाचा प्रस्ताव कागदावर लिहुन इलियानाच्या घरी जातो आणि तिचा भावी, त्याच्यापेक्शा सुयोग्य जोडीदार पाहुन घराबाहेर पडताना इलियाना समोर जे भाव शब्दान्शिवाय व्यक्त करतो, केवळ अप्रतिम.. नन्तर इलियाना गाव सोडुन जात असताना तो सायकलने पाठ्लाग करतो तो प्रसन्गदेखील हेलावुन टाकणारा आहे..

आपण तो सीन बघताना खिदळतो कारण ती संकल्पनाच विनोदी आहे पण अशोक कुमारांच्या चेहर्‍यावरची इंटेग्रिटी बघ. >>> नी, मलाही आधी वाटले की त्या सीन चा उल्लेख तू विनोदानेच केलेला आहेस. आता पुन्हा पाहतो. पहिल्यांदा पाहताना त्याचा अभिनय वगैरे डोक्यात शिरणे अवघड होते Happy

Pages