अ‍ॅक्टींग तोडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15

..
अ‍ॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..

त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअ‍ॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अ‍ॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिंदा मधला जॅकीचा 'नहीं चाहिए था ये सबकुछ तो वापस कर मेरी जवानी' हा सीन त्याचा अत्युच्च अभिनय आहे, फार कमी वेळा अनिल कपूर समोरच्या कलाकारापुढे फिका पडलाय त्यातला हा एक.>>> +१

आज दीवार रीलीज होऊन चाळीस वर्षे झाली असे आताच फेबुवर वाचले. चाळीस वर्षे? तरीदेखील त्यामधले संवाद न सम्वाद पाठ असणारी लोक आहेत. माझा जन्मसुद्धा झाला नवता तेव्हा हा सिनेमा रीलीज होऊनसुद्धा माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे.

एकदम आखीवरेखीव स्क्रीप्ट, तासून काढल्यासारखे कॅरेक्टरायझेशन आणि चपखल संवाद. दीवार. कितीजणांणी याची कॉपी केली, कितीजणांनी स्पूफ केली तरी ओरिजिनल अजूनही अबाधितच आहे. एका कास्टिंग डिरेक्टरनं एकदा बोलताना सांगितलं ह्होतं की ऑडिशनला येणारं निम्म्याहून जास्त पब्लिक दीवारचेच संवाद म्हणवून दाखवतं.

आवडता शॉट असा एकही नाही. सगळेच आवडते!!!

जिज्ञासा....

~ "बहार"... मला का कोण जाणे तशी बहार अगदी ट्रॅडिशनल वा टिपिकल पातळीवरील खलनायिका वाटली नाही. अनेकवेळा चित्रपट पाहूनही माझे असे मत झाले आहे की...तिलाही सलिम हवा असतोच ना !! शिवाय राणी जोधाबाईंची तिच्यावर मर्जी असतेही....किंबहुना राजघराण्यातील ती युवती असल्याने त्या वेळेच्या शिरस्त्यानुसार तिने राजकुमारावर आपला जीव लावावा यात वावगे काहीच नसते....खुद्द राजघराण्यातील मंडळीही तिच्या विरोधात कधी गेल्याचे दाखविले नाही....

बहार आणि नादिरा ह्या जरी मैत्रिणी असल्या तरीही शेवटी बहारला आपण राजकुमारीच्या दर्जाची आहोत हा प्रबळ दाव्याचा भाग आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत एक दासी (कनिज) प्रेमाच्या नावाखाली जर आपल्या स्वप्नातील राजकुमार हिसकावून घेत आहे असे दिसल्यावर तो आपल्याला परत मिळावा यासाठी तिने तिला पटतील अशा क्लृप्त्या लढविणे नैसर्गिकच मानले जावे.

के३जीमधला आवडता सीन घ्यायचाच झाला तर - जेव्हा करीना रीतीकला गेस्ट म्हणून आणते तेव्हा रीतीकची एन्ट्री. त्याचं बॅग पडल्याचा बहाणा करुन डोळे पुसणे. मस्त सीन. रडु येतं मला.
बाकी कखुकग हा सिनेमा अचाट होता ह्याबद्दल दुमत नाहीच.

गुंडा!

असा अभिनय कलाकारांकडून करुन घेणं कोणाला जमणार नाही आणि कोणाला करणंही!
आणि डायलॉग तर निव्वळ अप्रतिम!

तोडलंस कांती शाह! तोडलंस!

ये सफर बहोत है कठीन मगर ........

शिवाजी चट्टोपाध्याय.... सगळे बंगाली गायक हेमन्तकुमारच्या प्राभावाखाली का असतात कुणाला ठाऊक? हाही त्यातलाच.

'प्रहार'मधे गौतम जोगळेकरच्या मृत्यूनंतर माधुरी आणि डिंपल नाना पाटेकरला भेटायला जातात, त्या सीनमधे माधुरीनं अ‍ॅक्टिंग तोडली आहे.

वर प्रत्येक जण के३जी मधील आपला आवडता सीन सांगतोय आणि त्यानंतर सिनेमा अचाट आहे अशी टिप्पणीही करतोय. गंमतचह आहे. पण येस्स, त्या सिनेमात कित्येक मस्त मस्त सीन आहेत आणि त्यामुळेच आमच्याकडे सोनी-सेटमॅकसवर तो लागतच असतो. चित्रपटात कलाकारांनी अभिनय उत्तम जमवल्याशिवाय कोणताही चित्रपट पुन्हा पुन्हा बघणे होत नाही. Happy

ऋन्मेष, किमान या धाग्यावर तरी तुझं मत तुझ्या पुर्तं के३जी आवडतो Proud
रून्मेषने लिहिलेले सगळे सीन आवडतात. अनेकांना हा सिनेमा आवडत नाही हे खरं आणि मान्य Happy

वर प्रत्येक जण के३जी मधील आपला आवडता सीन सांगतोय आणि त्यानंतर सिनेमा अचाट आहे अशी टिप्पणीही करतोय >>> नाही प्रत्येक जण नाही. मी फक्त तो अचाट आहे एवढेच म्हणतोय Happy

प्रत्येक जण के३जी मधील आपला आवडता सीन सांगतोय आणि त्यानंतर सिनेमा अचाट आहे अशी टिप्पणीही करतोय >>>>> अरे अ‍ॅक्टींग कोणत्या सीनमधे तोडलीये त्यासाठी तो सीन. पण सिनेमा अचाटच ना. Happy

स्पार्टाकस, गुंडा (कानाला हात लावून प्रणाम करत) एकमेवाद्वितीय आहे. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

त्यामुळेच आमच्याकडे सोनी-सेटमॅकसवर तो लागतच असतो.>>> तुमच्याकडे वेगळं सोनी सेटमॅक्स दिसतं का? आमच्याकडे मेले सारखा सूर्यवंशम लावत असतात. त्याही चित्रपटात उत्तम अभिनय जमवलेला दिसतोय.

वरती नसीरूद्दीनचा कुणीतरी उल्लेख केलाय त्यावरूनआठवलां जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये नसिर जेव्हा "अभयला "गलतीया हर किसीसे होती है" म्हणतो तेव्हा ह्रितिक हळूच फरहानला "डूड, तू बिल्कुल उनकी कॉपी है" म्हणतो तो शॉट फक्त आणि फक्त फरहानसाठी बघावा.सुंदर एक्स्पेशन्स. अर्थत या शॉटनंतर बॅटींग नसीरकडे जाते आणि तो अख्खा सीन त्याचाच होतो. केवळ एका सीनसाठी सिनेमामध्ये येऊनसुद्धा त्याचं काम कसलं झालंय त्याला तोड नाही. कमर्शीअलच्या परीघामध्ये राहून नसीरूद्दीननं कधी अ‍ॅक्टिंग वाईट केली असं झालं नाही.

जे दुर्दैवानं अनुपम खेरच्या बाबतीत झालं. सारांशमधलं त्याचं काम केवळ अप्रतिम होतं. त्याच वाटेवर चालत राहिला असता तर कितीतरी मोठा अभिनेता झाला असता. पण त्याला डेविड धवन टाईप कॉमेडी कराय्ची दुर्बुद्धी झाली आणि सगळंच फिसकटलं. तरी मला त्याचा डीडीएलजेमधला "मेरा बेटा मेरा गुरूर है" वाला शॉट फार आवडतो.

स्पार्टाकस, गुंडा (कानाला हात लावून प्रणाम करत) एकमेवाद्वितीय आहे. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

त्यामुळेच आमच्याकडे सोनी-सेटमॅकसवर तो लागतच असतो.>>> तुमच्याकडे वेगळं सोनी सेटमॅक्स दिसतं का? आमच्याकडे मेले सारखा सूर्यवंशम लावत असतात. त्याही चित्रपटात उत्तम अभिनय जमवलेला दिसतोय.

वरती नसीरूद्दीनचा कुणीतरी उल्लेख केलाय त्यावरूनआठवलां जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये नसिर जेव्हा "अभयला "गलतीया हर किसीसे होती है" म्हणतो तेव्हा ह्रितिक हळूच फरहानला "डूड, तू बिल्कुल उनकी कॉपी है" म्हणतो तो शॉट फक्त आणि फक्त फरहानसाठी बघावा.सुंदर एक्स्पेशन्स. अर्थत या शॉटनंतर बॅटींग नसीरकडे जाते आणि तो अख्खा सीन त्याचाच होतो. केवळ एका सीनसाठी सिनेमामध्ये येऊनसुद्धा त्याचं काम कसलं झालंय त्याला तोड नाही. कमर्शीअलच्या परीघामध्ये राहून नसीरूद्दीननं कधी अ‍ॅक्टिंग वाईट केली असं झालं नाही.

जे दुर्दैवानं अनुपम खेरच्या बाबतीत झालं. सारांशमधलं त्याचं काम केवळ अप्रतिम होतं. त्याच वाटेवर चालत राहिला असता तर कितीतरी मोठा अभिनेता झाला असता. पण त्याला डेविड धवन टाईप कॉमेडी कराय्ची दुर्बुद्धी झाली आणि सगळंच फिसकटलं. तरी मला त्याचा डीडीएलजेमधला "मेरा बेटा मेरा गुरूर है" वाला शॉट फार आवडतो.

दिल चाहता है मधले दोन सीन (त्यात फ़रहान अख्तरचाही वाटा आहे! :))
१) ’तनहाई’ गाण्यानंतर आत्यंतिक निराशेने आमीर भारतात फोन करतो मित्राकडे मन मोकळं करायला- त्याला फोन करायचा असतो सैफला, पण ’लागतो’ अक्षय खन्नाचा नंबर! त्यानंतर आमीरने स्वतःला सांभाळायचा जो अभिनय केला आहे तो खास. नंतर तो कोलॅप्स होतो. त्याच्या जस्ट आधी, बॅले बघून आल्यानंतर आपण प्रीतीवर प्रेम करतो हे लक्षात आल्यानंतरचा त्या दोघांचा सीनही भारी.

२) शेवटी हॉस्पिटलमध्ये फोनवरच बोलत बोलत आमीर अक्षयला भेटायला येतो, अक्षय गर्रकन मागे वळून बघतो, आमीर मागेच असतो, सर्व मळभ दूर झालेलं असतं आणि दोघे मिठी मारतात. त्या मिठीच्या आधी एकच क्षण आहे त्यात आमीर आणि अक्षयची एक्स्प्रेशन्स कमाल- वेदना, दु:ख, आनंद सगळंच त्यांच्या डोळ्यातून दिसतं.

दिल चाहता है- अत्यंत अत्यंत आवडता सिनेमा.

वर लिहिलेला बर्फीमधला रणबीर- इलियानाचा सीनही रणबीर खाऊन टाकतो.

कमल हासनचे सागर, अप्पूराजाचा उल्लेख केलेले सीन्सही मस्त.

अमिताभच्या सीन्सचा वेगळा धागाच काढायला लागेल!

>>'सुबह हो गया, अब तो बस करो' अशा अर्थाचे काहितरी म्हणते
...
नाही रे मित्रा ती म्हणते 'सकाळी सकाळी काय /कोण आहे रे?'..
[तू जे भाषांतर लिहीलं आहेस त्यामूळे तो सीन ऊगाच जास्ती सेंटी वाटतोय..] Wink
बाकी कमल हासन च्या अभिनययाबद्दल काय लिहावे: 'हे राम' अख्खा चित्रपटच त्याने अभिनयाने तोडलाय..!

एक वेगळा बाफ च काढावा लागेल कमल साठी..

सगळ्यांचेच वेगवेगळे धागे काढा मग. दिलिपकुमार अमिताभ संजीवकुमार कमलहसन शाहरुख आमिर फरहान अक्षय रणवीर रणबीर Wink

अगदी सलमानवर काढला तरी चालेल Rofl

बरेच वेळा मुख्य हिरो भाव खाअऊन जातात पण परिक्षीत सहानी या गुणी अभिनेत्याने खालील दोन दृष्यांमध्ये अभिनय तोडलायः
१. 3 idiots: आमिर ला दिलेल्या वचना नुसार माधवन फोटोग्राफर बनायचे आहे हे त्याला (परिक्षीत त्याचा बाप आहे) सांगतो तेव्हा,esp. towards end, after madhavan says he won't threaten with suicide:

https://www.youtube.com/watch?v=n_hDOcPuiV8

२. लगे रहो मुन्नाभाई: पुन्हा एकदा विक्टर डिसूजा (जिमी शेरगील)चा बाप म्हणून.. विक्टर त्याला सर्व पैसे जुगारात हरलो हे सांगतो तेव्हाचा सीन:
https://www.youtube.com/watch?v=pLwALs6g2RM

[वरील दोन्ही दृष्यांमध्ये बाकी पात्रांचा अभिनय देखिल मस्त, त्यातही दिया मिर्झा स्पेशल टच अधिक उल्लेखनिय..!.] Wink

>>सगळ्यांचेच वेगवेगळे धागे काढा मग. दिलिपकुमार अमिताभ संजीवकुमार कमलहसन शाहरुख आमिर फरहान अक्षय रणवीर रणबीर

छे.!. शाहरूख व नंतरच्या सर्वांसाठी धागा पुरे आहे.
आधीच्या सर्वांसाठी नवीन वेबसाईट काढावी लागेल... Happy

['आचरट चाळे' या धाग्यात सलमान ला तोड नाही..] Happy

रच्याकाने: सुनिल शेट्टी च्या अभिनयासाठी ईथे कुणि धागा काढला तर तो माबो चा एकदम हार्ड्कोअर फॅन म्हणावा लागेल. [मी ईथे का येतो?/आपण ईथे असण्याची कारणे] Wink

'आचरट चाळे' या धाग्यात सलमान ला तोड नाही>>>>>.तरी पण परवडला हो तो.:फिदी: लोकान्च्या निदान डोक्यात तरी जात नाही तो.

अशोक सराफ यांचा भस्म्या हा पिक्चर कोणी पाहीला आहे का?

खानावळीतल्या एकाही प्राणिमात्राला जमेल काय तो रोल?

अशोक सराफ यांचा भस्म्या हा पिक्चर कोणी पाहीला आहे का?
खानावळीतल्या एकाही प्राणिमात्राला जमेल काय तो रोल?
>>>>
अशी तुलना होऊ नये, ईमॅजिन करा डीडीएलजेमध्ये अशोक सराफ... फसतेय ना.. प्रत्येकाचे आपले एक नैसर्गिक क्षेत्र असते.

ईमॅजिन करा डीडीएलजेमध्ये अशोक सराफ... फसतेय ना.. प्रत्येकाचे आपले एक नैसर्गिक क्षेत्र असते.
>>>>

अर्थात अशोक सराफांचे क्षेत्र अभिनयाचे आहे!

रच्याकने

बनवाबनवी मध्ये शाहरूख खान?

नको!
कल्पनेतही भीषण स्वप्न पडेल!

अशोक सराफ यांचा भस्म्या हा पिक्चर कोणी पाहीला आहे का?>>> भस्म्या नाही हो... भस्म. अघोरी साधूंवर आहे हा. Happy
मला उगाच अशोकमामा खा खा खाणार्‍या एखाद्या कॅरेक्टर मधे दिसले Happy

Pages