अ‍ॅक्टींग तोडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15

..
अ‍ॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..

त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअ‍ॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अ‍ॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंपलिस्टिक अभिनयाचे ऊत्तम प्रदर्शन "मॉन्सुन वेडींग", मम्मो, अनबे सिवम (कमल हसनचा हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या ऑल टाईम ग्रेट्स यादीत हवा)

And My all time favourite 'पथेर पांचाली'. Especially दुर्गाचा (उमा दासगुप्ता) अभिनय.
Actuallyत्या सिनेमाला सिनेमा कसा म्हणायचा हाच प्रश्न पडतो. असे वाटते की सत्यजित रेनी actual लोकेशन वर जाऊन तिथे जे काही चाललय ते शुट करून दाखवलय(Of course सर्वांच्या अभिनयामुळेच).
So must watch film, standard example of film, acting, music, direction, editing and camera >>>>

त्यातल्या दुर्गाच्या मृत्यूनंतर अपूचे अचानक मोठे होणे अतिशय सुरेख दाखवले आहे..काळजाला चटका लावून जाते.

ब्लॅक नावाचा संजय लिला भन्साळी चा एक उत्तम चित्रपट येवुन गेला. बर्याच लोकांना तो अजिबात आवडला नाही, बर्याच जणांना तो फार डिप्रेसींग वाटला, पण अभिनयाच्या बाबतीत म्हण्टले तर अत्यंत तोड काम होते सर्वांचेच...कैक सीन आहेत ह्या चित्रपटामधले, जिथे आपल्याला वाटेल की अ‍ॅक्टींग तोडली. माझा आवडता सीन आहे, जेव्हा मिशेल आपले ग्रॅज्युएशन फायनली पुर्ण करुन आपल्या असायलम मधील शिक्षकाला देवराज सहाय ला भेटायला येते, त्या वेळी स्मृतीभ्रंश झालेला तो देवराज सहाय तील अजिबात ओळखत नाही, परंतु तिचा तो ग्रॅज्युएशन रोब पाहुन त्याला काही तरी थोडे आठवल्या सारखे होते, तो आपल्या हातानी तिला, तिच्या ड्रेस ला चाचपुन बघतो, काही तरि ओळख पटल्या सारखा थोडासा हसतो, आणि हाताने let's party, let's celebrate ची अ‍ॅक्शन करतो, जी स्मृतीभ्रंशाच्या आधी पण त्याने आपल्या ह्या विद्यार्थीनीसाठी केलेली असते.....बच्चन असो की राणी मुखर्जी...दोघांनी ही ह्या चित्रपटात उच्च काम केलेय !

अमिताभच्या बहुतांश चित्रपटातील अभिनय हा जबरदस्त होता. काला पत्थर चित्रपटात अमिताभचा रोल हा कमी बोलणार्या शांत व्यक्तीचा होता . परंतु त्याने डोळ्यातून नि देहबोलीतून जो अभिनय केला, अस्वस्थपणाची भावना केवळ डोळ्यातून व्यक्त केली ते कुणालाही जमणे शक्य वाटत नाही अगदी दिलीप कुमारला सुद्धा. प्रत्येक काळाचा एक सुपर स्टार असतो दिलीपकुमारही होता. त्याची संवादफेक जबरदस्त होती तो सर्वोत्कृष्ठ नट होता परंतु तो जे काही अभिनयाच्या बाबतीत करू शकतो त्याहून अमिताभ हा दोन पावले पुढेच होता . अमिताभच्या उभे राहण्यात, चालण्यात, पळण्यात जी स्टाईल होती नि आहे त्याच्या आसपास एकही नट फिरू शकत नाही अगदी दिलीप कुमार सुद्धा.....

त्यातल्या दुर्गाच्या मृत्यूनंतर अपूचे अचानक मोठे होणे अतिशय सुरेख दाखवले आहे..काळजाला चटका लावून जाते>>>>

दुर्गाच्या मृत्यूनंतर जेव्हा ते कुटुंब गाव सोडुन जाऊ लागते तेव्हा लहानपणीच मोठा झालेला अपु दुर्गाने चोरलेला हार डबक्यात टाकतो त्या सीनमध्ये, इतक्या लहान वयात त्याच्या निरागस चेहऱ्यावर जी समजता दिसते, समाजाच्या नियमात न बसणारी एक गोष्ट मोठ्या बहिणीने केली आहे, आणि आता ती या जगात नसताना तिच्यावर कोणी आळ घेऊ नये म्हणून त्याची चाललेली धड्पड पाहून असे वाटते की सरळ जाउन त्या लेकराला छातिशि कवटाळावे.

सिनेमाचे theme music, म्हणजे रवि शंकर यांची सितार, ती ऐकताना इतके मुग्ध होउन जातो की, कधी डोळ्यातून अश्रु वाहु लागतात ते समजच नाही.

फक्त त्या सितारसाठी मी पथेर पांचाली कैक वेळा पहिला आहे.

नीधप,

>> इजाजतमधे असे सीन्स प्रचंड आहेत.

चित्रपटाच्या शेवटी महेंदरला कळतं की विद्याने लग्न केलंय. तेव्हा प्रतीक्षालयात पूर्ण रात्र किंचित अधिकारयुक्त सलगीने वावरणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासाची जागा प्रथम आश्चर्य आणि नंतर अविश्वासाने व्यापली जाते. हे संक्रमण नसिरुद्दीन शाहने लीलया पेललं आहे. पूर्ण इजाजत हाच मोठा सीन आहे.

आ.न.,
-गा.पै.

कॅबेरे नावाचे म्युझिकल आहे. त्यावर बनवलेला चित्रपट आहे कॅबेरे याच नावाचा. दोन महायुद्धांच्या मधल्या काळातले जर्मनीतली वातावरण, नाझीझम हा उद्याचा आसरा आहे असे आशायुक्त वातावरण तयार होतेय आणि वंशवादाचे टोक गाठण्याची सुरूवात आहे. मनाला पटत नसताना हे देशासाठी बरोबर असावे अश्या मानसिकतेतून हिटलरला पाठिंबा देणारे जनमत आहे. आणि या सगळ्याचे पडसाद झेलणारा एक कॅबेरे(ही एक जागा म्हणून नाही तर ऑलमोस्ट एक व्यक्तिरेखा म्हणूनच येतो असे म्हणायला हरकत नाही), तिथली एक डान्सर, ती जिथे पेइंगगेस्ट म्हणून रहात असते त्याच घरात पे गे म्हणून रहाणारा अजून एक त्याच्याकडे इंग्रजी शिकायला येणारा एक जर्मन उमराव, त्या सगळ्यांची लॅण्डलेडी वगैरे वगैरे अशी पात्रे आहेत.

एखादादुसरा सीन नाही संपूर्ण फिल्ममधे लायझा मिनेलीने (ज्यूडी गार्लंडची मुलगी) तोड तोड तोडलीये अ‍ॅक्टिंग. तिला बहुतेक ऑस्करची बाहुली पण मिळाली होती त्यासाठी.

या काही गायिका-अभिनेत्री आहेत हॉलिवूड किंवा पाश्चात्य रंगमंचावरच्याही ज्यांच्या उंचीला जाऊ शकतील अश्या अभिनेत्री आपल्या पडद्यांवर हिरॉइन म्हणून क्वचित आहेत किंवा नाहीतच. आपल्याकडे हिरविणींना शोभेची बाहुली बनून सिंदूर भरत बसणे, पुजा करणे किंवा मग डायरेक्ट डॅन्स करणे यापलिकडे फारसा स्कोप नसतोच.

असो कॅबेरे ही एक मस्ट वॉच फिल्म आहे.

उद्या एका अप्रतिम फ्रेंच नाटकावरून बनवलेल्या फ्रेंच फिल्मविषयी ज्याचे भयाण व्हर्जन हिंदीत आले होते....

विद्या नाही हो गापै. सुधा सुधा

शशी कपूर तिला घ्यायला येण्याचा सीन म्हणताय ना? अफलातून केलाय नसीरजींनी.

वरच्या पोस्ट्स मधे उल्लेखलेले अनेक चित्रपट बघायचे राहिलेत...

माझे काही आवडते सीन्स..

१ ) मन मधे आमिर खान मनिषा कोईरालासाठी पैंजण घेऊन येतो तो सीन.. दोघांनी फार सुंदर अभिनय केलाय.

२ ) उधार कि जिंदगी मधे आपल्या आईवडीलांच्या मृत्यूची बातमी आपल्या आजी आजोबांना, कमीत कमी त्रास होईल, अश्या प्रसंगी देण्याचे वचन दिलेले असताना, तसा प्रसंग शोधताना काजोलला तो ताण असह्य होतो तो प्रसंग.

३) रेश्मा और शेरा मधे राखीचा नवरा मारला गेल्यावर तिचा आक्रोश

४) मदर इंडीया मधे नर्गिस, सुनील दत्त वर गोळी झाडते त्या आधीचा प्रसंग

५) नया दिन नयी रात मधे जया भादुरी ने वेड्याच्या हॉस्पिटल मधे घातलेला हैदोस

६) अनुराग मधे मौशुमीच्या डोळ्याच्या ऑपरेशन नंतर नूतन तिच्या डोळ्यात बघते तो प्रसंग

७) बंदीनी मधे नूतन, अशोक कुमारच्या बायकोवर हल्ला करते तो प्रसंग

८) गुजारिश मधला त्या दोघांच्या लग्नाचा प्रसंग

९) बर्फीमधे झिलमिल ने मारलेली हाक फक्त इलियानालाच ऐकू येते तो प्रसंग

१०) रेनकोट मधले सर्वच ....

दिनेश.....

"...१०) रेनकोट मधले सर्वच ....." ~ हे फार फार आवडले. खरंच, एकही प्रसंग डावाउजवा करता येण्यासारखा नाही. नायकनायिकेचे तर सारे उजवेच, शिवाय अजय देवगण आणि अन्नू कपूर यांची मीटिंग तर नेमका कुणाला सलाम करावा अशीच.... ऋतुपर्ण घोष...एक खोली...आणि ते वातावरण...बस्स.

हो, अकेले हम अकेले तुम, फर्स्ट हाल्फ बोअर आहे, पण सेकंड हाल्फ बरेच द्रुष्यात डोळ्यातून पाणी काढतो.

तो त्याचा किराणावाला की कोण जो उधारीमुळे सारखा आमीरशी भांडत असतो, पण कोर्टात मात्र डायलॉग मारतो की अरे वो बच्चे के लिये अपनी जान दे सकता है, तो सीन पण खूप आवडतो.

२ ) उधार कि जिंदगी >>> वाह, आज कित्येक दिवसांनी या चित्रपटाची आठवण झाली. Happy

९) बर्फीमधे >> बर्फीमध्ये रणबीर हिरोईनला प्रपोज करतो तो सीन पण मस्त आहे. रणबीरने एकंदरीतच त्या चित्रपटात अ‍ॅक्टींग तोडली म्हणू शकतो. प्रियांका तर बेस्ट आहेच.

रणबीरचा, अजब प्रेम की गजब कहानीमधील निरागस अभिनय सुद्धा आवडतो. त्याचे ते टेंशनमध्ये असताना अडखळत बोलणे. तेच जेव्हा कतरीना करते तेव्हा दोघांच्या अभिनयक्षमतेतील फरक स्पष्ट होतो. त्याला जेव्हा कळते तिचे दुसर्‍यावर प्रेम आहे, आपल्यालाही त्याच्याकडे बघून वाईट वाटते. मग बाल्कनीतून पडतो, आपटतो, लागते, आणि तरीही खालून आय अ‍ॅम ओके बोलतो.. मस्त जमलय ते..

यावरूनच कुछकुछ होता है ची काजोल आठवते... शाहरूख धावत येऊन बोलतो, आय लव्ह यू...... आय होप मै उससे ये कह पाऊंगा.. किससे?.. टीनासे.. तो किती कॅज्युअली बोलतो आणि समोर काजोलचे पाणीपाणी होते.

तो किती कॅज्युअली बोलतो आणि समोर काजोलचे पाणीपाणी होते.<<< नाही होत. किंबहुना त्या दृश्यात अभिनयाच्या मर्यादा स्पष्ट जाणवू नयेत म्हणून "पाऊस" पाडला जातो. डोळ्यांत पाणी न आणता दिल तुटल्याचा अभिनय फार कमी जणांना जमतो. तुमचा शाहरूख असा सीन उत्तम रीत्या करू शकतो. देवदासमध्ये पारोच्या डोलीला तो खांदा देतो तो एकमेव शॉट मला त्या सिनेमामध्ये आवडलेला. संजय भन्साळीनं मातेरं केलं त्या सिनेमाचं.

अजब प्रेममध्ये रणबीरचं काम खरंच चांगलं होतं. त्याचे बापासोबतचे सीन कमाल झाले होते.

किंबहुना त्या दृश्यात अभिनयाच्या मर्यादा स्पष्ट जाणवू नयेत म्हणून "पाऊस" पाडला जातो.
>>>>
नाही हो, काजोलच्या अभिनयाच्या मर्यादा कश्याला लपवतील..
ते तर ती रडतेय हे एकट्या समोरच्या शाहरूखला समजू नये आणि प्रेक्षकांनी मात्र रडणे एंजॉय करावे यासाठी होते.... असे मला वाटते.

डोळ्यांत पाणी न आणता दिल तुटल्याचा अभिनय फार कमी जणांना जमतो. तुमचा शाहरूख असा सीन उत्तम रीत्या करू शकतो.
>>>>
याच्याशी मात्र १०१ टक्का सहमत, अगदी त्यातील तुमचा शाहरूखपासून .. Happy
आधीही मी लिहिले होतेच, असमाधान असंतोष असूया वगैरे दाखवणे त्याला छान जमते.. हे ही साधारण त्याच पठडीतले..

असमाधान असंतोष असूया वगैरे दाखवणे त्याला छान जमते<<<< हे दाखवायला एकच बापमाणूस राज कपूर. केवळ नजरेमध्ये त्याला हे भाव आणणं जमायचं.

बलराज सहानीला विसरला का रे बाबानो? हा माणुस मजूराच्या कपड्यापासुन श्रीमन्त माणसाच्या कपड्यापर्यन्त कुठेही फिट बसला. सीमा मला भयन्कर आवडला होता. माणसाने किती कुणाचा आधार बनाव? काय सीन आहे तो सीमा मधला जेव्हा सन्तापलेल्या नूतन ला बलराज सहानी सान्गतो की तू चोर नाहीस, तू चोरी केली नाहीस यावर माझा विश्वास आहे.

वक्त मधला सेठ ( सॉरी नाव नाही आठवत), ए मेरी जोहराजबी म्हणणारा रोमॅन्टीक पती, तीन मुलान्चा अभिमानी बाप, नन्तर सर्वस्व गेल्यावर कष्ट करणारा मजूर. काय भूमिकेचे एकेक रन्ग दाखवले होते त्याने.

डिंपल पण एक चांगली अभिनेत्री आहे ह्यात शंकाच नाही...ह्या गुणी अभिनेत्री कडे काही काही अत्यंत टुकार चित्रपट आलेत, तर काही फारच चांगले, त्या चांगल्या मधला एक चित्रपट म्हणजे रुदाली !! मुळात मारवाडात-राजस्थानात असलेली ही रुदाली ची परंपराच विचित्र "मोले घातले रडाया..नाही आसु नाही माया" पैसे घेउन उच्चवर्णियांच्या, जमिनदारांच्या मृत्युला ढसाढसा रडुन मातम करणे हे किती विचित्र आहे....डिंपल ही भुमिका अक्षरशः जगली आहे.
पुर्ण चित्रपटा मधे एका पेक्षा एक मोठे आघात पचवुन डिंपल ची शनीचरी उभी असते, आपली कर्मकहाणी एका तिर्‍हाईत रुदाली ला सांगतानाही त्रयस्थ पणे सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करते, आणि सरतेशेवटी ती तिर्‍हाईत रुदाली दुसरी तिसरी कुणी नसुन आपली च जन्मदात्री आई भिकनी होती आणि ती आता मेलीये हे कळल्यावर ती स्वतः रुदाली चा पेशा स्विकारते आणि जो काही हंबरडा फोडते...OMG...सर्वतोपरी ग्रेट !!

हो नीधप, तो शेवटचाच सीन इजाजतमधला. केवळ त्या एका सीनसाठी परत पहावासा वाटतो आख्खा सिनेमा.
आणि हो, रेखाचं नाव विद्या नसून सुधा आहे. दुरुस्तीबद्दल धन्यवाद! Happy
आ.न.,
-गा.पै.

Prasann Harankhedkar,

>> डिंपल पण एक चांगली अभिनेत्री आहे ह्यात शंकाच नाही.

अगदी शंभर टक्के सहमत. तिचा अभिनयगुण तितकासा पुढे आला नाही. मुळात तिला प्रवेश मिळाला तो मादक सौंदर्याचा अणुबॉम्ब म्हणून. त्यामुळे तिच्यातली अभिनेत्री झाकोळली गेली.

बाकी रुदाली म्हणाल तर त्यात तिचा अभिनय अफलातून असल्याचं ऐकून आहे. बघितला नाहीये आजून, पण कल्पना करता येते. Happy

आ.न.,
-गा.पै.

वरच्या इजाजत सीन्स ला किती अनुमोदन द्यावं , उच्च !!

शशी कपूर तिला घ्यायला येण्याचा सीन म्हणताय ना? अफलातून केलाय नसीरजींनी.
<< या शेवटच्या सीन मधे चक्क शशी कपुरचाही अभिनय खूप आवडला, एकच नजरानजर .....अप्रतिम !

नंदिनी Happy
नव्या देवदासचा डोली उचलायचा सीन, जेंव्हा सासरी जायच्या आधी धावत पारो देवदास कडे जाते , खूप मस्तं जमलीयेत सेंटीमेन्ट्स शहारुख अ‍ॅश दोघांचे !
सॉलिड केमिस्ट्री जमलीये ..
इस्माइल दरबारचं ते गाणं ' हमेशा तुमको चाहा' कसलं soulful आहे !

गा.पै.,

असले हटके पिक्चर आवडत असतील तर बघाच एकदा रुदाली !! अंगावर सर्र्कन काटा येतो पहिल्यांदा....थोडा रटाळ होतो मधे मधे पण अभिनय भारीये बाईंचा + भुपेन जींचे संगीत आणि गुलजारांचे शब्द आणि पटकथा-संवाद.. गाणी फारच अप्रतिम आहेत. डिंपल चा अजुन एक आवडलेला चित्रपट म्हणजे लेकीन

- प्रसन्न

रश्मी तै
बलराज सहानींबद्दल लिहीलंय ना आधीच्या पोस्ट्स मधे.

इजाजत संपूर्ण सिनेमाच हाईट आहे. नसीर लाजवाब. कथा मधेही फारुख - नसीर दोघांचाही अभिनय ए १.

डर्टी रॉटन स्काउंड्रल्स. स्टीव्ह मार्टीन आणि मायकेल केन. या दोघांनीही धमाल केलीय. यावरून राकेश रोशनने एक हिंदी वर्जन बनवलेला. मख्खी टू मख्खी म्हणतात तसा. स्टीव्ह मार्टीन पांगळा असल्याची बतावणी करत असतो तेव्हां मायकेल केन थेरपीच्या नावाखाली त्याच्या पायावर काठीने जोरजोरात आघात करतो तेव्हां स्टीव्ह मार्टीन जे काही एक्स्प्रेशन्स देतो त्याचं वर्णन करूच शकत नाही जस्ट लोल !

मणीजींचा गुरु पण असाच पुर्णपणे भावलेला चित्रपट. अभिषेक पण योग्य आणि कडक शिस्तीचा मास्तर मिळाला तर चांगला अभिनय करु शकतो हे गुरु पाहुन कळतं.
त्या चित्रपटात पण असे अगदी अ‍ॅक्टींग तोडली ! म्हणण्याजोगे सीन्स नसलेत तरी काही काही सीन्स मधे मजा आलीये एकदम, मध्यंतराआधीचा च सीन, ज्या मधे गुरुभाई आपल्या मेन्टोर-आदर्श, पित्यासमान असलेल्या नानाजींसाठी जुनागढ वरुन मेथी लाडु घेउन येतो, तिथेच गुरु ला confront करण्यासाठी नानाजींनी शाम सक्सेना ला बोलावलेले असते. हलके-फुलके असलेले वातावरण हळु हळु गंभीर होत जाते. नानाजींना गुरु विचारतो "डंडे से मारने के लिये बुलाया है नानाजी?" त्या वर तितक्याच थंडपणे नानाजी उत्तर देतात "अभी तो शुरु भी नहि किया" शाम ला विचारण्यात येतं "क्या इस आदमी को तुम सारे लोगो के सामने नंगा कर सकते हो, रोक सकते हो?" ज्या वर गुरु पण रागने पण तितक्याच थंडपणे म्हणतो "नही, ना ये, ना आप, ना ये अखबार, ना आपकी खादी की सोच!!" आणि या वर कडी म्हणजे शाम सक्सेना म्हणतो "मै रोकुंगा !!" हा सीन प्रत्येकाने लय जबरी केलाय.
शाम ने असे म्हण्टल्यावर गुरु हतबल पण क्रोधाने नानाजींकडे पाहतो, ते खाली पहात असतात, आणि तित्क्याच प्रेमळ नजरेने तो मनु कडे बघतो जी आपल्या व्हिल चेअर वर बसुन हताश पणे ह्या सगळ्या प्रसंगाला सामोरी जातेय... विद्या बालन चे हे पात्र माझ्या मते तरी ह्या कथे त नसतं तरी चाललं असतं, पण तीनी हा सीन आणि तीची होणारी घालमेल उत्तम दाखविली आहे.
शेवटी गुरु उठतो, खाली वाकुन नानाजींना नमस्कार करतो, आणि जाता जाता शाम सक्सेना ला सांगतो "ये कपडे और ये वजन दोनो भी मेहनत से आये है, तुम भी मेनत से काम करना...गुरु भाई से लडना तो गुरुभाई बन कर लडना..पर गुरुभाई एक ही है !! लय जमलिये भट्टी ह्या सीन मधे Wink

गुरू पिक्चरमध्ये मणिरत्नमनं वापरलेले ओरि जिनल आयडी कुठले आहेत ते जर माहित असेल तर तो पिक्चर बघायला अजून धमाल येते.

नंदिनी,

हो हो अगदीच !! गुरु रिलीज झाला नेमका त्याच वेळी मी Prince of Polymer वाचत होतो...त्या मुळे लगेच को-रिलेट करता आले सगळे. Happy

Pages