अ‍ॅक्टींग तोडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15

..
अ‍ॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..

त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअ‍ॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अ‍ॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिचाहै मध्ये डिम्पल पेंटींगसाठी तयार होताच तो ज्या अशक्य इंटेन्सिटीने पळत जातो, तुम्हाला त्याची अस्वस्थ उर्जा, आनंद अगदी पडदा फाडून जाणवते.

आणि अर्थातच अभिनयाचे बादशाहः नासिर साहब: [संवाद ऊत्तमच... निव्वळ चेहेर्‍यावरचा अभिनय नाही तर देहबोली चा ही कळस आहे.]

'Wednesday': stupid common man scene:
https://www.youtube.com/watch?v=snhgW2vtuuI

अपुनको यहा पे तोड दिया इनोंने
जैसा याद आया , वैसा लिखेला है..

दिचाहै : आमिर आणि अक्षय- बरेचसे सीन्स
सागरः कमल हसन -डिंपल आपले प्रेम राजावर आहे सांगते तो
दिवारः अमिताभ बच्चन
कोशिशः हरीभाई
नवीन कोशिशः नाना पाटेकर
कूली: अमिताभ बच्चन
परींदा - जॅकी
मोहोब्बते: अ‍ॅशला बाप येवून शाखाला हाकललं सांगतो तेव्हा. नंतर रेन्कोट मध्ये पैसे नसतात तेव्हा अजय देवगणला सांगते.. हदिदेचुस मध्ये झोपाळ्यावर बसून आईला सांगते माझं प्रेम आहे समीरवर. इतकाच छान. मग काही अ‍ॅश अभिनयच करत बसली ... सगळ्या मूवीत. खोटा खोटा.

परिचय मध्ये संजीवकुमार एक पत्र लिहून ते मुलाकडे पोस्ट करायला देतो. त्याच्या मुलीला( जया भादुरी) वाटतं की त्याने प्राणला( आजोबांना) मदतीसाठी पत्र पाठवलं. तिने तसं विचारल्यावर तो 'नही बेटी' असं म्हणत तिच्याकडे पाहतो. संजीवकुमारच्या डोळ्यांमधील भाव लाजवाब!

वर उल्लेख झालेला महानदीमधला सीन पाहिला. कमल हासन ग्रेट.

अंदाज अपना अपना मधली शेवटच्या हाणामारीचे सगळे प्रसंग..कितीही वेळा पाहिले तरी कंटाळा येत नाही.
झक्कास म्हणत दोरीवरुन उडी टाकण,सलमान - शक्ती ची मुक फाईट्,इ इ,,निव्वळ करमणुक.

सवत माझी लाडकी मधले अनेक प्रसंग
नीना कुलकर्णी मोहन जोशीला त्रास देतानाचे प्रसंग - द्राक्षाचा घड खाताना, ३५ रुपयांच्या कानातल्यासाठी इतक चिडायचं इत्यादी Lol

नीना कुलकर्णी वर्षा उसगावकला तिच्या कुटुंबाबद्दल आणि मुलींबद्दल सांगताना

नीना कुलकर्णी वर्षा उसगावकरला शेवटी डोक्याला तेल लावताना सांगते तुला धाकट्या बहीणीसारखी जपत होते तो प्रसंग

अंकु,
अंदाज अपना अपना छान आठवण, बरेचदा विनोदी अभिनय अ‍ॅक्टींग तोडली प्रकरणात दुर्लक्षिला जातो.

काला पत्थर सिनेमातले अमिताभचे सर्व प्रसंग. पश्चातापाच्या अग्नित होरपळतानाचे भाव पदोपदी आपल्याला अस्वस्थ करून जातात. त्याचा एक पाय पुर्ण सोलवटला जातो तेव्हा राखीकडून उपचार करून घेतानाचा प्रसंगही फार काही सांगून जातो.

कौन कंबख्त बर्दाश्त होने के लिये पीता है. ह्या लायनीचे बेस्ट रेंडिशन अमिताभ ने केले आहे. अभिमान मध्ये. तो बिंदू च्या घरी दारू पीत बसतो तेव्हा. त्या मानाने देवदासमध्ये शारुक अगदी फ्लॅट डायलॉग डिलिव्हरी.

रच्याकने धाग्याचे नाव अ‍ॅक्टिंग तोंडली असेच वाचले जात आहे. ख्या ख्या ख्या. ....

अभिमान! शेवटचे स्टेजवरचे गाणे.. आणि अमिताभ जयाचे एक्स्प्रेशन्स वा.
दिल चाहता है, जिंनामिदो मधले वर उल्लेखलेले सर्व सीन.
तेजाब मधला अनिल कपूर माधुरीची सुटका करतो तो सीन व नंतरचे सो गया ये जहां गाणे.
रिमझिम गिरे सावन मधला अमिताभ, मौसमी चा सहज सुंदर रोमान्स.
खामोशी मधला मनीषा कोईराला आई वडीलांबद्दल सांगते तो सीन. सलमानच्या घरच्यांना जेवायला बोलवतात तो सीन.
बॉम्बे चा क्लायमेक्स.
....
आपली माणसं मधला स्वतःचंच बाहेर श्राद्ध चालू असताना लपून बसलेला अशोक सराफ व रीमा.
कळत नकळत मधला मुलांना चोरून बाबाला भेटवणारा अशोक सराफ व विक्रम गोखले
अनुमती मधे अनेक दिवसांनी घरचं गरम जेवण घेणारा विक्रम गोखले व रीमा
तू तिथं मी मधे फोनवर बोलण्यासाठी तळमळणारे सुहास व मोहन जोशी

सर्वच्या सर्व कलाकारांचा कसदार अभिनय पहायचा तर
एक रूका हुआ फैसला पहावा. पंकज कपूरने कमाल केलीय.

वर भस्म्या या आजाराचा उल्लेख झालाय , भुजंग या सिनेमात निळू फुलेंना हा आजार असतो.

आणखी एक अभिनेता आहे. बंगाली सुपरस्टार उत्तमकुमार. शर्मिला ठाकूर आणि त्यांचा एक बंगाली मूव्ही पाहीला होता. नाव आठवल्यावर अपडेट करते. अप्रतिम मुद्राभिनय.

उत्पल दत्त - पण खूप सहज अभिनय.

निळू फुलेंचं नाव घेऊन सुद्धा त्यांच्या अभिनयाचा उल्लेख करण्याचं विसरले. पाप लागेल मला.

पिंजरा मधला मास्तरला खिजवणारा एक संवाद आहे. त्यातला इरसाल अभिनय एकीकडे, सामना मधला सुरुवातीचा मस्तवाल असलेला आणि नंतर खचत गेलेला सहकार सम्राट ते पुढचं पाऊल मधला लाचार बाप आणि सिंहासन मधला पत्रकार.

केव्हढी रेंज होती या माणसाची !

अमिताभचा मोठ्ठा फॅन असुनहि अभिमान मधला "कौन कंबक्थ है जो बर्दाश..." हा डायलॉग आठवत नाहि. दिलिपसाबनी देवदास मधे साकारलेल्या, उध्वस्त देवदासच्या भुमिकेला तोड नाहि. दिलिपसाब नंतर कोणि ऐर्‍यागैर्‍यांनी देवदास करण्यापेक्षा बच्चन साहेबांनी करावा हि इच्छा आता अपुरीच रहाणार...

गापै. आता लक बाय चान्स लिहायलाच इथं आले होते.

बोमन इराणी आणि डिंपल ऋषी कपूरला पिक्चरसाठी फायनान्स करायचं सांगतात तेव्हा ऋषी फक्त "क्या बात है" एवढंच म्हणतो, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. जुहीचा रोल पण अफलातून. ती सिनेमाहॉलमध्ये जाते आणि नाचणारे प्रेक्षक बघून रडत रडत टाळ्या वाजवते तो शॉट फक्त आणि फक्त जुहीला जमू शकतो.

साच्यात अडकलेल्या भूमिकाच केल्यामुळे ऋषीसारख्या अभिनेत्यांचं तरूणपणात फार नुकसान झालंय. वेग्ळं काही करण्याची ताकद असतानासुद्धा त्यानं चॉकलेटी भूमिकाच केल्या. (एक चादर मैलीसी) वगैरे अपवादच) त्यामानानं सेकंड इनिंगमध्ये त्याला खूप चांगले रोल मिळालेत. अग्नीपथमध्ये जर रौफलाला नसता तर विजय चौहान पूर्ण फ्लॅट वाटला असता. कांचाचीनापेक्षाही व्हिलन म्हणून रौफलाला जास्त हलकट वाटतो. Happy

अग्नीपथ (नवीन) मधला माझा आवडता सीनः ह्रितिक दारावर केक ठेवून जात अस्ताना त्याची बहिण बाहेर येते (कुठल्या चढवगानं तिचं नाव शिक्षा ठेवलंञ?) आणि त्याला "भैय्या ये किसने भेजा" विचारते तो शॉट. त्यावर ह्रितिक आणि झरीना वहाब चे एक्स्प्रेशन सुंदर. त्या छोट्या मुलीचं अख्ख्या चित्रपटातच काम सुंदर आहे.

कांचाचीनापेक्षाही व्हिलन म्हणून रौफलाला जास्त हलकट वाटतो >> +१

वर अमरिश पुरीबद्दल लिहिताना गर्दिशमधला जॅकीला फटकावताना सीन लिहायला हवे होते असे वाटले.

योग, महानदी मी बाबा आदमच्या जमान्यात subtitles वर बघितलेला त्यार आठवलेले लिहिलेले. पण प्रामाणिकपणे त्या वाक्याने कमल हसनने जे केलेय त्याला काडीमात्र फरक पडत नाही असे वाटते.

हिरोची एण्ट्री - दामिनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहीला होता. त्यातल्या सनी देवलच्या एण्ट्रीला तोड नाही.

सनीला संतोषी ने अभिनय शिकवला असं वाटतं. मध्यांतरानंतर सनीची एण्ट्री होते. त्यातही मोजून सहा की सात सीन्स. पण ऋषी कपूर सारख्या अभिनेत्याने जीव तोडून अभिनय करूनही सनी भाव खाऊन जातो, तो त्याच्या रोलमधला ड्रामा आणि खटकेबाज संवादांमुळे. त्याने तो रोल निभावलाय हे खरेच.. पण त्याच्यासाठीच लिहीलेला रोल आहे म्हणा तो.

रच्याकाने: सुनिल शेट्टी च्या अभिनयासाठी ईथे कुणि धागा काढला तर तो माबो चा एकदम हार्ड्कोअर फॅन म्हणावा लागेल. [मी ईथे का येतो?/आपण ईथे असण्याची कारणे]

------ सुनिल शेट्टी म्हटल्यावर हे लोकप्रिय गाणे आठवते,
http://m.youtube.com/watch?v=h6xpqJT74BU

सुनिल शेट्टी म्हटले की त्याचा गोपीकिशन आठवतो आणि त्यातील हाय हुक्कू हाय हुक्कू हाय हाय हे गाणे आणि त्या गाण्यावरचा त्याचा डॅन्स ..
त्याचा त्या चित्रपटातील अभिनय आवडलेला.. अर्थात, गोपीच्या भुमिकेतील..

तसेच क्या अदा क्या जलवे तेरे पारो हे गाणे पण सुनिल शेट्टीच्या नावापुढेच आठवते..

आणि हो, सुनिल शेट्टी बोलल्यावर त्याचा धडकन मधील फुल्ल दर्दे जिगर डायलॉग पण आठवतो..
मै तुम्हे भूल जाऊ ये हो नही सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दूंगा ...

सुनील शेट्टी आणि अभिनय? "विरुद्धार्थी शब्द सांगा" मधील जोडी जणू.
त्या "सुंदरा सुंदरा" गाण्यामधे त्याच्यात आणि मागच्या खडकात काहीच फरक वाटत नाही.

घायलमधे ओम पुरीने पण मस्त काम केलंय. मीनाक्षी शेषाद्रीबरोबरचा प्रसंग, अमरीश पुरीचा पीए म्हात्रे खिडक्या दारं बंद करत असतानाचा त्याचा चेहरा कोरा असूनही सूक्ष्म हसल्याचा अभिनय लाजवाब. कमिशनर खरबांदा ला तो सुनावतो की ऐसे नपुंसक सिस्टम का हिस्सा बनने से अच्छा है की यह वर्दी उतारकर अजय का साथ दिया जाये. या वेळी कोल्हापूरच्या पब्लीकने थिएटर डोक्यावर घेतलं होतं. मूव्हीतल्या "अशा" जागा माहीत करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्यासाठी पद्मा टॉकीज, सरस्वती ला सिनेमा पहायला हवा. खरं तर या सीनमधे भावखाऊ संवाद आहेत आणि सिनेमाभर संयत अभिनय दर्शवणा-या ओम पुरीला एकदम भाषणबाजी करायला लावलीय. राजकुमार संतोषीला अशा जागा कुठे टाकाव्यात हे चांगलं कळतंय.

"अशा" म्हणजे टाळ्या, शिट्ट्यांच्या, ज्याला पब्लीक अभिनय समजतंय (अ‍ॅक्टींग तोडली )

The Pursuit of Happiness या चित्रपटातील ही दोन दृश्ये प्रचंड प्रभावित करतात. दुसऱ्या दृश्यातील विल स्मिथच्या चेहऱ्यावरचे भाव निव्वळ अप्रतिम.
इंटरव्हू चा सीन
https://www.youtube.com/watch?v=8ioBmnoto1o
शेवटचा सीन
https://www.youtube.com/watch?v=pCq7eGKcs-w

अर्धसत्य सिनेमात ओम पुरी दारू पिऊन येतो रात्री उशीरा आणि त्याचा बाप अमरिश पुरी त्याची वाट बघत बसलेला असतो तो सीनदेखील अचाट आहे.

अमरीश पुरी वरून राहवलं नाही अगदी

गर्दीश मधला जॅकी श्रॉफ बरोबरचा सीन कधीही विसरू शकणार नाही. रडवलंय अक्षरशः. मोठ्या ताकदीचे अभिनेते.

जो जीता वही सिकंदर मधे सुरुवातीच्या सायकल रेसमधे आपला मुलगा जिंकेल या आशेने डोळ्यात प्राण आणून रेस पाहणारे त्याचे वडील कुलभूषण खरबंदा. जेव्हां तो थोडक्यासाठी रेस हरतो तेव्हांचे त्यांचे क्लोज अप एक्स्प्रेशन्स लाजवाब ! मै कभी नही भूल सकती.

कवा कवा आमच्या हितं असले पिक्चर बी चालत्यात !

Pages