Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15
..
अॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..
त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अॅक्टींग तोडली !
पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अॅक्टींग तोडली !
पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंकु, चोखेर बाली एक सशक्त
अंकु,
चोखेर बाली एक सशक्त अनुभव होता अॅक्टींग च्या बाबतीत तरी....
मुळात टागोरांची कथा त्या काळाच्या मानाने खुपच फॉरवर्ड होती, आणि अॅश्वर्या नी त्या बिनोदिनी ला चांगला न्याय दिलाय.
"अॅक्टींग तोडली" म्हणजे
"अॅक्टींग तोडली" म्हणजे नेमके काय केले?
)
माझ्या डोळ्यासमोर आजवर पाहिलेले तमाम अॅक्शनपटातील ब्रुसली/जॅकीचॅन/जेम्सबॉन्ड इत्यादीक ज्युडो/कराटे/कुस्तीपटू हिरो आले, नि विचार करू लागलो की हे हिरो जशी सामान अन व्यक्तिंची तोडफोड करतात, त्याला "अॅक्टिंग तोडली" असे म्हणताहेत की काय.... तसे असेल तर नक्कीच तो अर्थ बरोबर लागू पडतो.
आता अधिक उणे ऋन्मेषच सांगू शकेल, नै का? तर चेंडू ऋन्मेषच्या कोर्टात..... (प्रतिसाद नै दिला तर फाऊल धरायचा
लिंबूजी, अॅक्टींग तोडली
लिंबूजी, अॅक्टींग तोडली म्हणजे अॅक्टींगचा रेकॉर्ड तोडला वा उच्च अभिनयाचा बेंचमार्क गाठला, पार केला वगैरे वगैरे
ओहोहो ऋन्मेष, म्हणजे "तोडलस
ओहोहो ऋन्मेष, म्हणजे "तोडलस मित्राऽऽ" च्या धर्तीवर तोडलीस अॅक्टिंग, तोडलीस बॅटिंग/बॉलिंग, तोडलिस मैत्री, तोडलेस प्रेम...
असे कित्येक ठिकाणी म्हणता येईल, म्हणतही असतील, नै?
<< कित्येक ठिकाणी म्हणता
<< कित्येक ठिकाणी म्हणता येईल, म्हणतही असतील, नै? >>
एक उदाहरण -
"तोडलास विश्वास"
आता बोला याचा काय अर्थ घ्यायचा?
ल मिझरेबल.. बघितला का ?
ल मिझरेबल.. बघितला का ? त्यातही सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. आणि जीव तोडून गायलेतही !
चेतन ... अगदी
चेतन ... अगदी अगदी.
दिनेशभाउ... आत्ता कळले, की हे "तोडलस्" प्रकरण "जीव तोडून" काही एक करणे यातून उचलेगिरी करुन निर्माण झालेले आहे जे महाभयानकरित्या अर्थाचे अनर्थ करीत जाते. जीव तोडून हा वाक्प्रचार सुयोग्य ठरतो कारण शब्दश: जीवाच्या आकांताने, जीवाची पर्वा न करता एखादे कार्य केले तर "जीव तोडून" जीवाचा आत्यांतीक वापर करीत केलेले कार्य असा अर्थ लागतो.
पण त्यातिल निव्वळ "तोडणे" हे क्रियापद कसेही कुठेही वापरून मात्र अर्थाचे अनर्थच होतात म्हणुनच मी इथे उपहासात्मक लिहू पाहिले. सूज्ञ वाचकांना ते नक्कीच कळले असेल, बरोबर ना चेतन?
सहमत limbutimbu.
सहमत limbutimbu.
अंशतः असहमत, जीव तोडून हा
अंशतः असहमत,
जीव तोडून हा देखील वाक्यप्रचारच आहे, त्याचाही शब्दशा अर्थ घेतल्यास जीव कोणी तोडत नाही, तोडलाच जीव तर अनर्थ होईल.
असो, तर मग मी वर नमूद केल्याप्रमाणे तोडणे हा वाक्यप्रचार प्रचलित झाला तर त्यात अनर्थ असे घडू नये.
पुन्हा एकदा, असो, कारण हा धागा व्याकरणाचा नाही, तसा धागा असल्याच हि चर्चा तिथे घेऊन जाऊया, मजा येईल. इथे माझ्यातर्फे फुल्लस्टॉप
ऋन्मेष, धागा व्याकरणाचा नाही
ऋन्मेष, धागा व्याकरणाचा नाही हे नक्की ! तरीही, आमच्या उण्यापुर्या पन्नास वर्शाच्या आयुष्यातील सुरवातीची चाळीस वर्षे असले धेडगुजरी अर्थहीन वा अर्थाचा अनर्थ करणारे वाक्प्रचार चूकूनही प्रचलीत होत नसताना, गेल्या दहा वर्षातच असे काय घडतय की सर्रास चूकीचे शब्दप्रयोग/वाक्यरचना/वाक्प्रचार जाणूनबुजून रूढ होऊ पहाताहेत असे जाणवले, म्हणून (पुणेरी पेठी वागणुकीप्रमाणे जिथल्यातिथे) टोकले, इतकेच. बाकी तुमचे चालूद्यात.
पण नाही कसे? आमच्या वेळेसही एखादी सुंदर मुलगी दिसली तर काय "कंडा" पोरगी आहे असा उच्चार/उल्लेख व्हायचा, आता हा "कंडा" शब्द अन त्याची उत्पत्ती/व्युत्पत्ती कोण शोधणार? असे अनेक शब्द कावळ्याच्या छत्रीप्रमाणे उगवले असतील अन नाहिसे झाले असतील.
अन तसेही, रस्त्यावरुन जाताना हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसाशी हुज्जत घालत पोलिसांकडून मग "नियमांचा क्लास" करवुन घेणे तसेही कुणाला जसे आवडत नाही, तसेच इथे व्याकरणाचा क्लास नको असणार हे नक्की! नै का? असोच.
>>>> तोडणे हा वाक्यप्रचार
>>>> तोडणे हा वाक्यप्रचार प्रचलित झाला तर त्यात अनर्थ असे घडू नये <<<<< नुस्ता तोडणे हा शब्द क्रियापद ठरतो, व तो जीव व्यतिरिक्त वरील उदाहरणांपैकी कोणत्याही अन्य शब्दामागेपुढे लावल्यास अर्थाचा अनर्थ होतो हेच मान्य नसेल तर बोलणेच खुंटले.
तोडणे हे क्रियापद घेऊन नविन वाक्प्रचार (अर्थात शब्दसमुह) तयार करण्यास कोणतीच हरकत नाही, मात्र त्यातुन जोडीच्या मूळ शब्दांच्या अर्थास/भावार्थास समूळ धक्का बसेल असे होऊ नये इतकी किमान अपेक्षा कुणाच्याही "भाषेमार्फत" करणे योग्य ठरेल ना?
लिम्बराज महाराज कि जय...
लिम्बराज महाराज कि जय...
परिचयमधला एक प्रसंग लिहिणार
परिचयमधला एक प्रसंग लिहिणार होते पण मग लक्षात आलं की सगळा सिनेमाच तोडलाय! तरी, माझे आवडते तीन प्रसंग!
१. जेव्हा रमा (जया बच्चन) दादाजीना (प्राण) मेथी का साग बनवून वाढते
२. दादाजींच्या बेडरूममध्ये सगळी मुलं गोष्ट ऐकायला येतात तेव्हा कित्येक वर्षांनी दादाजींना हसताना पाहून नारायणला (असरानी) रडू फुटतं
३. आणि शेवटी दादाजी रमाला विचारतात की रवी भेटला की नाही
हा सिनेमा मी अगणित वेळा पाहिला आहे तरी दर वेळी काहीतरी नवीन सापडतं! Hats off to गुलजारसाहेब!>>> सर्व पोस्टला १०० टक्के अनुमोदन.. अतिशय आवडता चित्रपट..
तसेच इथे व्याकरणाचा क्लास नको
तसेच इथे व्याकरणाचा क्लास नको असणार हे नक्की!
)
>>>>
असे नाही, व्याकरणाच्या क्लासमध्ये मी काहीतरी शिकेलच पण इथे चर्चा त्यावरच रेंगाळत होती म्हणून म्हटले. (ते सुद्धा फार कमी धागे आहेत माझे जे सुसंगतपणे चालू असतात, हा त्यातील एक म्हणून
तोडणे हे क्रियापद घेऊन नविन वाक्प्रचार (अर्थात शब्दसमुह) तयार करण्यास कोणतीच हरकत नाही,
>>>>
एक्झॅक्टली हेच !
मात्र त्यातुन जोडीच्या मूळ शब्दांच्या अर्थास/भावार्थास समूळ धक्का बसेल असे होऊ नये,
>>>
यावर मात्र पुन्हा अंशतः असहमत म्हटल्यास (जे मी आहे, आणि का ते ही सांगू शकतो, पण) चर्चा वाढतच राहील म्हणून तो वरचा फुल्ल स्टॉप होता.. आणि आता फायनल
जिंनामिदो मधे: कल्की "मै नही
जिंनामिदो मधे: कल्की "मै नही चाहती की तुम्हारे दोस्त मुझे चुडैल समझे" आणि त्यानंतर फरहानचे ह्रितिक कॅटरिना असलेल्या खोलीच्या दारात आल्याआल्या "चुडैल अॅलर्ट..हमारी ट्रिप खतरे मे है" म्हणणे.
धूम ३मध्ये दोन आमिर खानांचे नंतर "तू जाऊ नकोस, आपण आधी आपले मिशन करु" आणि "मी जाणारच" वाले सीन्स.
शेवटचा दोघे मरतात तो सीन पण खूप आवडला. (म्हणजे वाईट वाटले पण अॅक्टिंग साठी आवडला.) धूम३ कॉपी असला, कितीही अ आणि अ असला तरी त्यातल्या भावांच्या दाखवलेल्या नात्यासाठी मी तो परत परत पाहू शकते.
रंग दे बसंती मध्ये डिजे पिऊन डिम लख लख की असे काहीतरी गुणगुणत असतो तो सीन. "दुनिया की भीड मे अच्छे अच्छे डिजे पीस गये".
अफाट आहे धागा. प्रतिसाद
अफाट आहे धागा. प्रतिसाद मस्त.
दिलीपजी, नासीर, कमल हसन हे सगळे आवडते. अजून आहेत बरेच..
पैल्याच प्रतिसादातील सीनचा
पैल्याच प्रतिसादातील सीनचा विषय निघाल्याने धागा वर काढतोय.
येऊद्या नवा माल
हल्ली बरेच चांगले अभितेने आलेय म्हणतात मार्केटमध्ये
भाग मिल्खा भाग.
भाग मिल्खा भाग.
जेव्हा मिल्खा त्याच्या बहीणीला भेटायला येतो, तिला कोट घालतो आणि खिशात हात घातल्यावर तिला तिचे कानातले सापडतात. अक्खा सीन जबर्दस्त.
>>>
१०१ % पूर्ण सहमत ! अभिनय तर आहेच पण हा सिन लिहिलंय सुद्धा छान ...
कुकुहोहै : मधला धागा सुरु करताना लिहिलेला सिन आवर्जून पहिला मात्र खूपच निराश झालो (मुळात मला हा चित्रपट सुद्धा एवढा आवडला नव्हता)
त्यापेक्षा स्वदेस , चक दे , डिअर जिंदगी मधला SRK खूप चांगला आहे किंवा अगदी आधीच्या काळात फौजी , राजू बन गया गेंटलेमन , कभी हा कभी ना मधला अभिनय सुद्धा चांगला आहे , पण कुकुहोहै ? नाही पटले. No offence intended for those who liked it , just sharing my views.
सत्या मध्ये भिकू म्हात्रे
सत्या मध्ये भिकू म्हात्रे खूप निराश होऊन बीचवर जाऊन स्वतःवरचा आणि त्याच्या बॉस/नेत्या वरचा राग/frustation व्यक्त करत असतो. तो खूप बोलल्यावर सत्या फक्त एकाच वाक्य बोलतो कि मग त्याचे ऐकायची गरज काय आहे ? आणि भिकू (मनोज बाजपेयी) त्याच्या कडे पाहतो तो सिन !
>> पूर्ण picture च्या context मध्ये हा सिन पहा
No offence intended for those
No offence intended for those who liked it , just sharing my views.
+७८६
प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि असलीच पाहिजे. कुछ कुछ हा चित्रपट बहुतांश लोकांना आवडला आहे म्हणूनच सुपरहिट आहे.
राजू बन गया जंटलमॅन वा चक दे, स्वदेससारखे चित्रपट माझ्याही कमालीच्या आवडीचे. त्यातला शाहरूखही तितकाच आवडीचा.
पण रोमांटीक चित्रपट ही शाहरूखची ओळख आहे. त्यांनी शाहरूखला सुपर्रस्टार बनवला. यश चोप्रांनी त्याच्यातला हा एक्स फॅक्टर हेरून त्याला सल्ला दिला होता की सुपर्रस्टार बनायचे असेल तर असे चित्रपट कर. आता आपला अमिताभच घ्या. हेच अमिताभ आणि ॲक्शन चित्रपटांबद्दल लागू. पण त्याचे दिवार त्रिशूल डॉन वगैरे न आवडणारी जनता असेलच..
त्यामुळे ईथे बिनधास्त आपापले आवडते सीन लिहा. ते बाकीच्यांना आवडतील की नाही याची पर्वा करू नका.
https://youtu.be/rrH90zd9uco
https://youtu.be/rrH90zd9uco
चक दे चा विषय निघाला तर हा त्यातील एक मस्त सीन.. And I am the coach of Indian women's hockey team .. कडक !
Pages