पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेगान्साठी, व्हाइट पेट्रोलीयाम जेली वापरा. जनावराच्या मेडिकल स्टोअरमधे मिळ्ते.

सिवुड्स पुर्वेला स्टॅशन रोडवर आहे. प्रितिका हॉटेलच्या समोरच्या बाजुला.

जनावराच्या मेडिकल स्टोअरमधे मिळ्ते

आमच्याइकडे जनावरांची वेगळी मेडिकल स्टोअर्स नाहियेत. माणसांच्या मेडिकल स्टोअर्स मध्ये जनावरांचीही औषधे मि़ळतात.

आजच्या इंडियन एक्स्प्रेसचे संपूर्ण मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ भरून पतंजली जाहिरात आहे. ती पाहून इथे वाचलेले "पतंजलीची जाहिरात कुठे दिसली नाही" हे आठवले.

पतंजलीच्या दुकानातून बदाम वगैरे असलेलं हेअर कंडिशनर आणलं आणि लावलं. केस माणसाळल्यासारखे दिसतायत Happy

अपर्णा,

पतंजलीचं इबोला वर पण औषध आहे--

दिलेल्या लिंकने "रामदेव मेडीसीन" ची साईट उघडत आहे !! त्यात ईबोलाबद्दल मला का हीही सापडल नाही

बाय द वे ही रामदेव बाबा ची वेब साईट नाहीय !! खाली डिस्क्लेमर टाकलाय तसा !!

मिश्र दलिया हा जो काही प्रकार आहे ना त्यांचा लय बेस्ट आहे....
माझ्या सारख्या जाड्यांना रात्री च्या जेवणा ऐवजी खाण्यासाठी उत्तम !!! >>>>>> PAAKAKRUTI TANKANE PLEASE

मिश्र दलियाचा माझा अनुभव म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लईच वाईट. ओव्याचं आणि इतर धान्य याचं मिश्रण १:१ या प्रमाणात... फक्त अन्न फेकून देऊ नये म्हणून वर्षभरातही खाणार नाही ईतका ओवा एक वेळच्या जेवणात खाल्ला होता. असो. नशिब आपले म्हणायचे...आणि काय.

मिश्र दलिया इतका वाईट नाहीय. ओवा १:१ या प्रमाणात नाहीय. तरीही मला आवडला नाही तो प्रकार. मला धुतल्याशिवाय दलिया वापरायचे मन होईना आणि धुवायला गेल्यावर ओवा आणि तिळ वर तरंगुन वाहुन जायला लागले. शेवटी तो दलिया तसाच पडुन राहिला. अर्थात घरीही करता येईल तो. बाजरी, तांदुळ कणी, लापशी गहु इ. गोष्टी मिक्स करुन घेतल्या की झाले.

मला तरी त्या दलियाचा उपमा/ खिचडी प्रचंड आवडली होती.
कुठलाही दलिया प्रकार कढतकढतच खावा हे मात्र खरे.

मिश्र दलिया इतका वाईट नाहीय. ओवा १:१ या प्रमाणात नाहीय>>> वाटलेच मला मी घेतलेल्या पॅक मधेच काहितरी गडबड असणार. म्हणूनच 'नशिब आपले म्हणायचे...आणि काय.' असं लिहिलं.

पतंजली बाम मस्त.

पतंजली टूथपेस्ट फार काही विशेष वाटत नाहीये.

पतंजली साबण मस्त.

पतंजलीचा आयुर्वेदिक चहा मात्र काही घशाखाली उतरत नाहीये.

बिस्कीटे गव्हाची म्हणून फक्त तीच आणली जाताहेत घरात. छान आहेत.

तूप पण चांगले वाटतेय.

गुलाबजलचा अनुभव चांगला आहे असे सौंकडून कळतेय.

अनारदाना, आवळा कँडी, गुलकंद छान आहेत.

पतंजलीच्या मिश्र दलिया मधे पत्र्याचा तुकडा सापडला होता. तेव्हा वापरणार्‍यांनी तो काळजीपूर्वक निवडून घेऊनच वापरावा.

वायला गेल्यावर ओवा आणि तिळ वर तरंगुन वाहुन जायला लागले. >>>>यावर उपाय म्हणून मी चक्क बारीक गाळणीत घेऊन धुते

पतंजलीच्या बेल कॅन्डीज छान आहेत. विशेषतः मला जेवणानंतर गोड खायचं क्रेविंग येतं कधी कधी त्यावर बेलाच्या गराच्या कॅन्डीज बेस्ट वाटल्या.

पतंजलीचा शिकेकाई शाम्पूही चांगला आहे. केशतेलाचा वास डोक्यात जातो, रेग्युलर वापरलं नाही त्यामुळे परिणाम सांगता येत नाही.

पतंजलीच्या अलोव्हेरा जेलपेक्षा उर्जिता जैनचं अलोव्हेरा जेल चांगलं आहे. कदाचित मला परफ्यूम्ड जेल आवडत नाही म्हणून वाटतं असेल.

पतंजलीच्या बेल कॅन्डीज छान आहेत. विशेषतः मला जेवणानंतर गोड खायचं क्रेविंग येतं कधी कधी त्यावर बेलाच्या गराच्या कॅन्डीज बेस्ट वाटल्या.>>> same here Happy

धाग्याचं शीर्षक "पतंजलीची उत्पादने" असे बदलणार का?

तसेच, मजकुरात पुढीलप्रमाणे बदल करणार का?

रामदेव बाबा यांची पतंजलीची उत्पादने आंतरजालावरुन मागवता येतात का? असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजलीची कुठली उत्पादने चांगली आहेत? तुम्ही वापरता का? आणि आपला अनुभव काय आहे?

पतंजलीचा मल्टी-ग्रेन दलिया आणि काही बिस्किट्स आणली आहेत नवऱ्याने.

मला ते पीडांतक ointment आवडलं. पाठ दुखत होती आणि हात पाय तर आराम वाटला. दोनदाच वापरले.

"पतंजलीच्या मिश्र दलिया मधे पत्र्याचा तुकडा सापडला होता. तेव्हा वापरणार्‍यांनी तो काळजीपूर्वक निवडून घेऊनच वापरावा." -- शक्य आहे. एकदाच करून पाहिला दलिया पाकिटावर दिलेल्या पद्धतीनुसार पण खाताना चार पाच वेळा तरी कच आली.. ( पांढरे खडे होते चक्क !) त्यामुळे पुन्हा करायचं मन काही होत नाहीए.:( बाकी चवीबद्दल काही तक्रार नाही माझी..
बिस्किट्स मारी बरी वाटली.. खार्‍या चवीची बिस्किट्स खूप खारट वाटली.

पेस्ट खूप चांगली वाटते. बिस्किटेही खाल्ली होती आवडली होती.
शांपू ने केस कोरडे होतात असे वाटले जरा.
हंडवॉश चांगला आहे.

यांची मेदोहर वटी कोणी वापरली आहे का? साबांनी आणली आहे. पण डायरेक्ट दुकानातून आणून वापरले तर चालते का हे औषध?

मी पीडांतक वापरले. एकदम बरे वाटले पाठीला आणि मग मला. भूकही लागली.

मग बघितले की लसूण तेल वगैरे आहे. ज्याने अर्थातच रक्ताभिसरण होते.

पाय, पाठी साठी उत्तम आहे.

खायच्या गोष्टी अजून मुद्दाम तरी नाही वापरल्या.

दंतपंती सुद्धा छान वाटले

क्रॅकहिल सुद्धा मस्तच.

Pages