पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी त्यांचे बरेच प्रॉडक्ट्स वापरलेत.
पेस्ट, शांपू, च्यवनप्राश, बिस्किटे यातले मला बिस्किटं (गव्हाची) आणी केशकांती नावाचा शांपू आवडले. केशकांती वापरायला लागल्यावर केसगळती थोडी कमी झाली असं वाटतेय. दंतकांतीत सुद्धा वाईट म्हणावे असं काही नाहीये. Happy
ऑनलाईनचे मला माहित नाही. पण कोथरूड मधे त्यांच्या प्रॉडक्ट चे दुकानच आहे तिथून हे सगळे घेतले होते. पण आता मला इथे न्यू जर्सीतही हे प्रॉडक्ट मिळतात.

दंतकांती मी सध्या वापरतोय. कोणत्याही ब्रॅडच्या पेस्ट पेक्षा याच्या वापराने हिरड्यांची पकड मजबुत होते आहे.

पतंजली चे सगळेच उत्पादनं मस्त आहेत. बाकी ब्रॅन्डसपेक्षा स्वस्त अन चांगली क्वालिटी.
मी वापरलेले प्रॉडक्ट्स -
शांपू
साबणं साधी आणि क्लिअर सोप्स
हॅन्ड्वॉश
फेसवॉश
मॉईश्चरायझर (हे अप्रतीम आहे!)
कपडे धुवायची साबण पावडर
भांडी घासायचा साबण
फिनाईल
टूथपेस्ट साधी अन जेल
दंतमंजन
उदबत्त्या
मध
चण्याच्या डाळीचं पीठ
मीठ
दलिया साधा अन मिश्र सुद्धा
हळद, तिखट, मसाले, हिंग (हे मात्र जरा एन्फिरिअर क्वालिटीचे आहेत)
बिस्किटं
साखर (ही खरंतर गूळच आहे, चहात नाही वापरता येत; घालायची असेल तर चहा कपात ओतल्यावर थोडी घालता येते; जास्त झाली तर लगेच चहा/दूध/कॉफी नासतं. पण भाज्या, आमटीमध्ये चव म्हणून घालायला उत्तम)
तूप
तयार सरबतं (गुलाब, खस विशेष आवडले)
जॅम
डोकेदुखीवरचं रोल-ऑन

आता ऑनलाईन मागवता येतात >> http://patanjaliayurved.net/

मी टेंभी नाक्यावरच्या पतंजलीच्या दुकानातून नेहमी बिस्किट्स, आवळा कँडी, बेल कँडी, जिरं गोळ्या, हिंगोली घेते. फेस वॉश आणि शँपू एकदा आणला होता. बाकीचं सगळं ग्राहक संघातून किंमत आणि क्वालिटीने उत्तम मिळत असल्यामुळे ट्राय नाही केलं.

कोरफड रस माझा फेव. इतर कोरफड रसांपेक्षा बराच स्वस्त आहे.
आंघोळीचा ओजस साबण जो मोगर्‍याच्या वासाचा आहे तो फार मस्त.
सध्या अ‍ॅलो-नीम फेसवॉश आणलाय. आवडलाय.
मिश्र दलिया उत्तम आहे.
टेट्रापॅक ज्यूसेस ट्रॉपिकानाच्याच किमतीचे आणि त्याच चवीचे आहेत (जास्तीची साखर घालून गोड केल्यासारखे!)
टूथपेस्ट साधी वापरलीये. छान आहे.
तेजस तेल ह्याने केस मस्त मऊ होतात.

ऑन्लाइन नाही घेतलं कधी. आता पार्ल्यात हाकेच्या अंतरावर दुकान आहे त्यामुळे तीही गरज नाही.

पण अ‍ॅलोव्हेरा जेल आणि जास्वंद जेल(हे पतंजलीचं आहे का नाही लक्षात नाही) साठी आजही उर्जिता जैनला तोड नाही. वर्षोनुवर्षे उर्जिता जैनच्या एकदम प्युअर अ‍ॅलोव्हेरा जेलची सवय असल्याने असेल पण पतंजलीचं अ‍ॅलोव्हेरा जेल अजिबात आवडलं नाही.

तेजस तेल ह्याने केस मस्त मऊ होतात. >>> हो का? आणतेच आता. माझ्या तंगूससारख्या राठ केसांना जरा मऊपणा आला तर जाम खुश होईन मी. न्हायल्यावर वाळण्यासाठी केस मोकळे ठेवले की फुल्ल पिसारा होतो.

मी एकदा पतंजलीचं अ‍ॅलोवेरा जेल आणलं आणि साधनाला कसं वापरायचं ते विचारुन २ वेळाच आतापर्यंत तोंडाला लावलं होतं. नंतर असं काही जेल आपल्याकडे आहे हेच विसरुन गेले. सुट्टीत वेळ मिळतो तेव्हा आपल्याकडे काय काय जमा केलं आहे ते बघून वापरुन टाकायला हवं.

हो गं. फक्त ते वापरुन संपवायला हवंय मी आठवणीने. आणलेल्या अश्या वस्तू वापरण्याचाच आनंदी आनंद आहे.

आत्ता आठवलं की एकदा तो मुलतानी मातीचा साबण पण आणला होता पतंजलीकडून. बरा होता. माझ्या तेल विहिरी असलेल्या चेहर्‍यासाठी मात्रं मी दुसर्‍याच कंपनीचा एकदम इफेक्टिव्ह फेस वॉश आता मिळवल्यामुळे पतंजलीचा परत घेतला नाही.

अश्विनि ते टेंभी नाक्यावर दुकान अजुन आहे का? मागच्या वर्षी ते बंद होते जुलै मधे, मग मला B cabin जवळ चे दिसले पण त्यात काहिच खास नवह्ते.

हो. ते दुकान परत सुरु झालं. दुसर्‍या कुणीतरी घेतलंय. आधीच्या माणसाचं नविन दुकान होली क्रॉसच्या समोर कॅसल मीलच्या आधी सुरु केलं आहे. टेंभी नाक्यावरचं काही दिवसं बंद होतं तेव्हा मी तिथून आणत होते.

मला टेंभी नाक्याच्या दुकानात सीतोपलादिचा पाउच पण मिळाला. प्रवासात न्यायला बरा आहे क्रोसिन, अ‍ॅनासिन, रॅन्टॅक, स्टिमेटिल, बी-क्विनॉल, अमृतांजन, आयोडेक्सच्या जोडीला :डोमा:. हे सगळं मला सटीसमाशी लागतं पण प्रवासात जवळ ठेवते.

साखर (ही खरंतर गूळच आहे, चहात नाही वापरता येत; घालायची असेल तर चहा कपात ओतल्यावर थोडी घालता येते; जास्त झाली तर लगेच चहा/दूध/कॉफी नासतं. पण भाज्या, आमटीमध्ये चव म्हणून घालायला उत्तम)

रामदेवबाबाची चॉकलेटी रंगाची साखरेची पुड म्हणताय का तुम्ही? शर्करम का काहीतरी नाव आहे. मी ती सगळ्यात घालते, अग केकमध्ये सुद्धा. माझ्याकडे दुधात घालुन दुध उकळवले तरी कधी फाटले नाही. यावेळी गु़ळाची ढेप आणलेली (त्याच्या दुकानातुन पण कंपनी वेगळी आहे) हे गुळसुद्ध दुधात्/खिरीत घालुन उकळले तर दुध फाटले नाही. बाजारी पिवळ्या गुळाने दुध फाटते.

मला त्याची टुथपेस्त अजिबात आवडली नाही. थोडी घट्ट वाटली. कदाचित ती बॅच नीट नसेल. परत आणुन पाहिन. बाकी त्याचे सगळे प्रॉडक्ट चांगले आहेत. मी शक्य तितके त्याचे प्रॉडक्ट वापरते.

सीवुड्स्ला त्याच्या दुकानात युसुफ मेहरअली सेंटरचे घाणीवर गाळलेले खोबरे, तिळ, राई, शेंगदाणे तेलही उपलब्ध आहे. तुमच्याइथल्या दुकानात असेल तर बाजारातले रिफाईंड तेल वापरण्यापेक्षा हे वापरा. शेंगदाणे तेल जरा महाग आहे. रु. २२५ किलो. पण मी मुळ सेंटरला जाऊन आलेय, हे तेल जरी महाग असले तरी अतिशय उच्च प्रतीचे आहे हे तिथे प्रत्यक्ष पाहुन आलेय. (१ किलो शेंगदाण्यातुन जास्तित ४५० मिली तेल निघते, शेंगदाण्याच्या प्रतीनुसार यापेक्षा कमी, त्यामुळे २२५ रुपये दर वाजवी आहे. बाजारात रिफाईंड मिळते त्यात एकतर भेसळ असते (म्हणुन यापेक्षा स्वस्त) आणि त्यातली जिवनसत्वे नाश पावलेली असतात)

रामदेवबाबाची चॉकलेटी रंगाची साखरेची पुड म्हणताय का तुम्ही? शर्करम का काहीतरी नाव आहे. मी ती सगळ्यात घालते, <<
हे वापरले नाहीये. गुळाऐवजी वापरून पहायला हवे.

मी तेलाचं पहातो... महाग असलं तरी शुद्ध तेल तर मिळेल! हा आता माझ्या तेल घालण्यावर मात्र कंट्रोल ठेवावा लागेल. Wink

अगं नॉर्मल गूळ आणायलाच झालाय. पर्वा ना भा करायचे अचानक ठरवले त्यात होता नव्हता तो घातला आणि कमी पडला तो चक्क माडाचा गूळ घातला म्हापश्याहून मागवलेला.. Happy

योकु, यु.मे चे खोब-याचे तेल रामदेवबाबाकडे आधी मिळत होते. ते ३०० रुपये किलो. पण एवढे महाग कोणी घेत नाही म्हणुन त्यांनी बंद केले ठेवायचे. मी दोनदा यु.मे. सेंटरवरुन आणले. अप्रतिम चव.. एवढेच म्हणु शकते. त्यात एकदाच भज्यांचे तळण केलेले. काय ऑसम लागलेली त्या दिवशीची कांदा भजी Happy सध्या आणक्लेले तेल संपले की परत यु.मे. सेंटरला जावे लागणार मला. आता बाजारु तेले नाही खाऊ शकत.

नाचणीच्या भाकर्‍यांमधे गूळ? साधना??
नाभा = नारळी भात.
दोदोलमधे माडाचा गूळच वापरतात. त्यासाठीच आणून ठेवला होता.

नारळी भात होय... .. मी खुप्प ताण दिला गं, पण मेलं ते भाताचं लक्षातच आलं नाही (मेंदूला रग मात्र लागली.. Wink

मला दोदोलची कृती आवडलेली, त्यामुळे लक्षात राहिला.

मिश्र दलिया हा जो काही प्रकार आहे ना त्यांचा लय बेस्ट आहे....
माझ्या सारख्या जाड्यांना रात्री च्या जेवणा ऐवजी खाण्यासाठी उत्तम !!! Lol

मस्त आहेत वापरलेले सर्व प्रोडक्ट्स. फक्त फ्रुटीसारख्या पण त्रिकोनी पॅक मधलं आवळ्याचा रस मात्र जाता जाईना.

हो. खरं आहे. ५ रु. सुटे नव्हते म्हणून मी आवळ्याचा रस घेऊन बघितला. संपतच नव्हता. बाकी वापरलेले सगळे प्रोडक्ट्स चांगले वाटले.

पातान्जालीची एवढी प्रोडक्स आहेत. मग आमच्या जवळच्या दुकानात ठेवत नाहीत सगळी. मी पण जवळच्या दुकानातून बिस्किट्स, आवळा कँडी, बेल कँडी, जिरं गोळ्या घेते Happy

हो मस्त प्रॉडक्ट्स आहेत. मी पाठदुखी अथवा सायटीका टाईप चे पायाचे दुखणे आहे ( नॉर्मल दुखणे, सिव्हीअर वेदनावाले नाही) त्यासाठी पीडान्तक मलम आणी पायाच्या भेन्गाकरता एक क्रीम आणलेय. खूप छान परीणाम आहे. रोज रात्री लावले की भेगा बर्‍याच कमी होतात. इतर क्रॅक वगैरे पेक्षा लवकर काम होते.

मस्त असतात त्यांचे प्रॉडक्ट्स..
मोगर्‍याचा सुवास असलेला ओजस साबण तर खूपच छान आहे..
वस्तुंच्या किंमती स्वस्त नाही, पण योग्य वाटतात.

ह्या सगळ्या पोस्ट्स वाचून गेलंच पाहिजे आता पतंजलीच्या दुकानात !
थोडंफार ऐकलंय रामदेवबाबांच्या उत्पादनांबाबत पण एक गहू-नाचणी-मध बिस्कीटं सोडून काही खाल्ले नाही कधी ( ती फार आवडली नव्हती चवीला. )

एक भाप्र, ही सगळी प्रोडक्ट्स खरंच इतकी शुद्ध असतात का ? आणि मग बर्‍यापैकी स्वस्त कशी असतात ? आपल्याकडे स्वस्त आणि उत्तम क्वालिटी ह्यांचे प्रमाण जरा व्यस्तच आहे. त्यातून नॅचरल, ऑरगॅनिक काही म्हटले की डबल किंमत.

अगो, या उत्पादनांची कुठेही जाहिरात केली जात नाही. हे एक कारण असावे त्यांचा खर्च कमी असण्याचे आणि पर्यायाने किंमतही कमी असण्याचे.

Pages