पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< बेलफळाचा मुरंबापण आणलाय. त्यात मोठे मोठे तुकडे आहेत बेलफळाचे>>
अन्जु, मी कोरडी सुरी, कोरडी प्लेट वापरून त्याचे छोटे तुकडे करुन परत त्याच पाकात घालुन काचेच्या बरणीमधे ठेवते. दीड वर्ष टिकला आहे.

<< मध चक्क गोठला (साखर झाली त्याची), त्यामुळे तो आणत नाही, कोणाला रेकमेन्डही करत नाही. >>
पुनम, चान्गला मध गोठतो खुप वेळा...
मध फ्रिज मधे ठेउ नये आणि उन पडेल अश्या जागी पण ठेउ नये.

Borivli madhey bharpur dukane aahet. Vazira naka, sai baba nagar, Chandarvarkar Road, Borivali East station jawal. Ajun mahit nahi pun ajunhi astil.

दातदुखीने त्रासलो होतो मागचे काही आठवडे.
पाणी सुद्धा सहन होत नव्हते, गरम करून पीत होतो.
गोड वगैरे तर बघायचीपण इच्छा नव्हती.

लगेच दंतवैद्याची भेटही मिळाली नाही.
पतंजलीचे दिव्य दंतमंजन मिळाले
रात्री दाताला लाउन दोन तिन दिवस झोपलो आणि अक्षरश: चमत्कार झाल्यासारखी दातदुखी गायब झाली आहे.
मी ते दातांवर पसरवून तसेच झोपतो आहे. म्हणजे रात्रभर मंजन दातावर राहते आहे.

प्रचंड फरक पडला आहे वेदना आणि सेन्सेशन्स गायब झाल्या आहेत.
आज गोड कॉफी प्यायलो - नो प्रॉब्लेम.

आता हा फरक टिकावा अशी आशा आहे.

पुण्यात पतंजलीच गोडाऊन सापडलं Wink
खूपच रेंज आहे आता. ओट्स, कॉर्नफ्लेक्स, आटा सगळंच मिळतंय.

फेसवॉश नवीन आलेत. टोटल रेंज मध्ये आता १२ फ्लेवर्स तरी असतील. तीच गोष्ट साबणांचीही.

विसरलो... Uhoh

भर विश्रांतवाडी चौकात एक सौदिंअन मंदीर आहे. त्याच्या पाठच्या बाजूलाच हे दुकान आहे. Happy

इथुन वाचुन मी पण पतंजली दुकानाला भेट दिली. दन्तकांती आणि मुलतानी मिट्टी फेसपॅक आणलेत. दोन्ही छान वाटतायत वापरायला. शॅम्पु मला सुट नाही झाले. एक कोकोनट हेअर वॉश म्हणुन काहीतरी दिसत होतं दुकानात. काय आहे ते?? शॅम्पु आही का??

Kordya, ruksh, kharkharit, dry kesana Shampoo "soft" karu shakel ka? without using conditioner? tase asel tar I want to try it.....

Belfalacha muramba kasa lagto? aavlyachya murambya sarakhich aste ka chav?

    Belfal and aavla are different fruits so their muramba tastes different.

    Ok. Actually, I have no idea how belfal tests....

    Waiting for reply on query regarding shampoo from anyone who is using the same...

    कंडिशनर न वापरता तो शांपू वापरलात तर केस अजुन कोरडे होतील.. त्यांचाच कंडिशनर वापरा म्हणजे चांगला इफेक्ट मिळेल

    पतंजलीचा शिकाकाई शाम्पू मी बरेचदा वापरलाय. मला आवडतोच तो. यावेळी अ‍ॅलो व्हेरा हेअर वॉश वापरला. तो जास्त सौम्य आहे. पण केस फार छान मोकळे होतात. यावेळी त्यांचा जैतुन बादाम कंडिशनरही आणला आहे. छान वाटला.

    Ok. It means, Shampoo sobat Conditioner vaparlach pahije, kes korde asnarane.......
    & off course, thanks to all of you for sharing your experience.

    मधही चांगलं आहे. सितोपलादी/ तालीसादी चूर्णांसोबत घ्यायला आणलं होतं. पण मोठी बाटली मिळते का ते पाहायला हवं...

    अंजली, बघेन आणुन ह्या वेळी मी.

    मी छोटे सॅशे आणले होते शॅम्पुचे बहुतेक मिल्क आणि एक आठवत नाही आता. त्या दुकानात बरीच गर्दी असते त्यामुळे बाकी काही बघायला मिळत नाही.

    बापरे.. पतंजलीचे एवढे प्रॉडक्ट्स आहेत हे माहितही नव्हतं.
    मी हँडवॉश वापरलाय, टुथपेस्ट, रोज (गुलाब) साबण, मँगो जॅम, फेसवॉश, कपड्यांची पावडर, भांड्यांचा साबण (वडी), शँपु बस्स..

    बिबवेवाडीच्या महेश सोसा. चौकात आम्रपाली पेट्रोल पंपाजवळ प्रशांत नावाचं एक मेडीकल स्टोर आहे. तिथे बरीच आयुर्वेदीक औषधे मिळतात. तिथुन आणतात साबु.

    अवांतरः साबुंनी तिथुनच रसायनी का काहीतरी कंपनीची आयुर्वेदीक टुथपेस्ट आणली आहे. 'दंत शोधक' का काहीतरी नावाची. ती सुद्धा दंतकांती सारखीच आहे. पण पातळ आहे. (वर कोणीतरी दंतकांती खुप घट्ट वाटली असं लिहिलंय त्यांच्यासाठी).

    Ek sangayche rahile. Aawala juice baddal. Mala hi to aawala juice pyayla nahi gela. Mag me tyat1:3 ya pramanat paani misalun ghetle & 2 chamche sakhar & pav chamcha meeth ghalun sarbat banavale. Tyachi chav aawadli.

    कपड्याची पावडर, भांड्यांचे साबण ह्याबद्दल रिव्यु कसे आहेत?? मी विचार करतेय घ्यायचा पण चांगले नाही निघाले तर वैताग नको. मशीनला वापरु शकतो का पावडर???

    भांड्याचा साबण उत्तम आहे.
    पुण्याला घरी कपड्याची पावडर मशीनमधे वापरतात बाबा आणि अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये.

    मला एका इमेलवर ह्या लिंक्स आल्या होत्या ज्यात पतंजली प्रॉडक्ट्स वर टीका केली होती. म्हणून कधी विकत घेण्याचे धाडस केले नाही.

    List FDA Rejected Ramdev Products

    http://xa.yimg.com/kq/groups/3136285/404928064/name/List+FDA+Rejected+Ra...

    Case lodged against Ramdev's Patanjali products

    http://archive.indianexpress.com/news/case-lodged-against-ramdevs-patanj...

    Bad quality products by patanjali, baba ramdev co

    http://www.consumercourt.in/product-services/92956-bad-quality-products-...

    Pages