Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07
रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधना, हा मुद्दा बरोबर वाटतोय
साधना, हा मुद्दा बरोबर वाटतोय
पतंजलीचे शांपू आणि दंतकांती
पतंजलीचे शांपू आणि दंतकांती उत्तम आहेत. दंतकांती ने फरक फार लवकर जाणवला. विकोच्या पेस्टपेक्षा जवळपास निम्मी किंमत!
मीसुद्धा कोरफड रस आणि आवळा रस
मीसुद्धा कोरफड रस आणि आवळा रस घेतलाय..आवळा रसाचा खूप चांगला परिणाम दिसला. अॅसिडिटी बर्याच प्रमाणात कमी होती. लेक लहान असल्याने त्याच्या तालावर नाचत बर्याच वेळेला जेवायच्या माझ्या वेळेवर परिणाम व्हायचा. त्यामुळे उद्भवणारी अॅसिडिटी सुद्धा कमी जाणवली.. अजून घेइन ते कायम
नी, उर्जिता जैन चे पार्ल्यात दुकान होतं स्टेशन बाहेर दिनानाथ समोरच्या लायनीत पण ते बंद झालं.. आता कुठे आहे ?
आणि पतंजलि पण कधी पाहिले होते पार्ल्यात ते आठवत नाही. हल्ली मी रहात नाही म्हटल्यावर सहाजिक आहे
रश्मी, पायांच्या भेगांसाठीचं औषध कोणतं नाव सांगशील ? मला बेळगावातल्या थंडीत पायालाच काय पण हाताच्या बोटाला टोकांना (टिप्स्ना) पण खूप खरखरीत होते. वापरून बघेन. इतर वेळेस व्हॅसलीन आणि खोबरेल किंवा जेजे वाटेल ते चोपडत असते..
उर्जिता जैन चे पार्ल्यातले
उर्जिता जैन चे पार्ल्यातले ऑफिस / दुकान "क्याफे कोफी डे " च्याच बिल्डींग मध्ये आहे. दिनानाथ च्या लायनीत तोसा ची गल्ली गेली कि लगेच क्याफे कोफी डे .त्याच्या शेजारी
पातांजालीचे पार्ल्यातले दुकान हनुमान रोड वर आहे. डे केयर च्या समोर ( चितळ्यांच्या बंगल्याशेजारी डे केयर )किव्वा कोसमोस ब्यान्केच्या लायनीत.
सोनचाफा, मी अतुल मेडिकलकडून
सोनचाफा, मी अतुल मेडिकलकडून घ्यायचे त्यांची उत्पादने. पण गेल्यावेळेला त्यांच्याकडे स्टॉक येत नाहीये उर्जिता जैनच्या वस्तूंचा असं म्हणाले ते. उर्जिता जैनचं पार्ल्यातलं दुकान मला पण आत्ताच कळतय वरच्या मेसेजमधे. आता मारेन चक्कर अॅलोव्हेरा संपलं की.
पतंजलीचं इबोला वर पण औषध
पतंजलीचं इबोला वर पण औषध आहे--
http://www.ramdevmedicine.com/ebola-virus-prevention-and-cure-through-ay...
पतंजलीचं इबोला वर पण औषध आहे
पतंजलीचं इबोला वर पण औषध आहे <<
अरे यांनी संशोधन केलं कधी, ते अप्रूव्ह कधी झालं आणि औषध बाजारात आलं पण?
बर ते इबोलावर परिणामकारक आहे हे नक्की व्हायला त्या औषधाने इबोला बरा झालेले लोक नकोत? किंवा एकुणातच इबोला बरा झालेले लोक नकोत?
काहीही असो, मला कौतुक वाटतय..
काहीही असो, मला कौतुक वाटतय..
अमेरिकन शास्त्रज्ञ पण टेस्ट न करताच वापरताहेत नविन औषध २ डॉक्टरांवर, अजून रिझल्ट नाहीये ..त्यांच संशोधन पण अपूर्णच आहे. नायजेरियात भारतीय डॉक्टर्स त्यांच्यावर पेशंट्सवर उपचार करण्यासाठी दबाव आणलाय असा आरोप करताय्त..
पण पतंजलीवाल्यांनी नीट जाहिरात करणं आवश्यक आहे, खरच असेल तर निदान बाकीचे डॉक्टर टेस्ट तरी करतील..
सुजा, धन्यवाद लगेच माहिती
सुजा, धन्यवाद लगेच माहिती दिल्याबद्दल
दोन्ही दुकानं माझ्या माहेरापासून पाच मिनिटांहून दूर नाहीत आणि दोन्हीही मला माहित नव्हती.. पार्ल्याला वरचेवर जायची गरज आहे मला 
अमेरीकन डॉक्टर्सना
अमेरीकन डॉक्टर्सना एक्सपरीमेंटल ड्रग ट्रिटमेंट दिली गेली हे खरे असले तरी त्यांना तसे स्पष्ट केले होते की माणसांवर क्लिनिकल ट्रायल्स केल्या नाहियेत. माकडांवर केल्या आहेत. अशा प्रकारच्या ट्रिटमेंट मधली रिस्क समजून उमजुन दोन्ही डॉक्टर्सनी कंसेंट दिली आणि मगच त्यांना हे सेरम दिले गेले.
पतंजलीचे तसे नाही. प्रतिकार शक्ती वाढवून हा आजार पसरणे कमी करता येइल असा ढोबळ क्लेम आहे. तसे तर प्रिवेंशन साठी योग्य गाईडलाईन्स पाळणेही पुरेसे आहे. बरे दिलेली औषधे काही नविन नाहीत. हे म्हणजे लोकांच्या मनातील भीतीचा फायदा घेणे झाले.
पतंजली प्रॉड्क्ट्स ची कुठेही
पतंजली प्रॉड्क्ट्स ची कुठेही जाहिरात नाहीये, हा धागा वाचून कुतुहल निर्माण झाल्यामुळे मी त्यांच्या वेबसाइट वर जाउन अजून काय काय त्यांची उत्पादनं आहेत हे पाहता पाहता 'इबोला' वरच औषध दिसलं. हे औषध वेबसाइट वर आधीपासूनच होतं की नविन अॅडिशन आहे मला माहित नाही. ज्या व्यक्ती हे औषध विकत घेतील त्या कंसेंट असेल म्हणूनच घेतील.
'लोकांच्या भीतीचा / अज्ञानाचा' फायदा घेउन साध्या साध्या गोष्टींसाठी बर्याच टेस्ट्स करायला लावणारे बरेच डॉक्टर्स माहित आहेत. पतंजली कंपनी अशी आहे का नाही याची कल्पना नाही.
आत्तपर्यंत त्यांच्या वापरलेल्या सगळ्या उत्पादनांचा खूप चांगला अनुभव आहे.
टेस्टस नाहीत पण जीवघेणे आजार
टेस्टस नाहीत पण जीवघेणे आजार बरे होतात हे क्लेम्स बोलबच्चन आहेत.
इम्युनिटी बिल्डींग म्हणजे जीवघेणे आजार बरे होणे नव्हे. पण आपल्याला हे क्लेम्स चुकीचे वाटायच्या ऐवजी कौतुक वाटतं यात त्या स्पेसिफिक वस्तूच्या खपाचे गणित दडलेले आहे.
पतंजलीच्या अनेक वस्तू उत्तम आहेत. आयुर्वेदिक औषधे झंडु वाल्यांपेक्षा शुद्ध आहेत असे कळते.
कॅन्सर, एडस, इबोला ते अजून अनेक असाध्य मोठे मोठे आजार या औषधांनी बरे होतात असे असते तर मोठ्य मोठ्या हॉस्पिटल्समधून ती औषधे मोठ्या प्रमाणावर रेकमेंड केली गेली असती. जागतिक पातळीवर शास्त्रीय जर्नल्समधून आणि मग जनसामान्यांच्यापर्यंत पोचणार्या वृत्तपत्रांमधून त्याची बातमी झाली असती.
पतंजली ला मी सपोर्ट करत
पतंजली ला मी सपोर्ट करत नाहीये पण मोठमोठ्या हॉस्पिटल मधून रेकमेंड केलेलं सगळच खरं / शास्त्रशुद्ध असतं असं अजिबात नाही.
आवांतर : गेले काही दिवस मी बरीच आजारी असते, सारखं नैराश्य / फटिग इ. इ. द्रुश्य कारण काही नाही. बर्याचदा डॉक्टर कडे गेले; मला प्रत्येक वेळेस अँटि-डिप्रेसंट सुचविण्यात आली ... , रक्त-बिक्त तपासून झालं. इंटर्नेट वर साइडइफेट्स बघून प्रश्न विचारले तरी १-२ वेळेस अगदी गळी उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला (वर स्वाती२ यांनी म्हटल्याप्रमाणे भीती घालून). मी जवळजवळ मनात तयार झाले अँटे-डिप्रेसंट घ्यायला .
घरी एका मित्राचे मेहुणे ४ आठवड्यांपूर्वी आले होते मी आजारी दिसत होते म्हणून त्यांविचारपूस केल्यावर मला पत्रिका विचारली. मी नाही म्हटल्यावर जन्मतारीख / स्थान विचारलं आणि १५ मि. तातडीनं आयर्न चेक करून घे असं सांगितलं. एनीवेज मी ३ दिवसांनी अँटीडिप्रेसंट घेण्यासाठी जाणारच होते आणि त्या मित्रांन २-३ दा तगादा लावल्यामुळे मी केली परत टेस्ट; मी परत परत आयर्न बद्दल विचारल्यामुळे डॉ़टरनं 'अरे हो, बरच कमी आहे आयर्न' असं अगदी कॅज्युअली म्हट्लं. माझं आयर्न ३ आहे जे २२-३२ च्या मधे हवं असं तोच डॉक्टर म्हटला. आता मी जोरदार आयर्न सप्लीमेंट्वर आहे.
मी आजिबातच कोणत्याही अशास्त्रिय औषध /उपचारपध्द्ती/ ज्योतिष समर्थन करत नाहीये, पण जर मी त्या मित्राच्या मेहुण्यांकडे फक्त 'ज्योतिषी' म्हणून दुर्लक्ष केलं असतं तर आज मी अँटीडिस्प्रेसंट च्या डोस वर असते..., प्रश्न ती औषधं घेण्याचा नाहीये पण ती घेउनही मूळ प्रश्न आयर्नचा असल्याना सुटलाच नसता आणि कदाचित डोस वाढवला गेला असता,..
अपर्णा, तुझ्या डॉकनी
अपर्णा,
तुझ्या डॉकनी कॅज्युअली अॅन्टीडिप्रेसंट घ्यायला सुचवले असेल तर ते ही चुकीचेच. मुळात तुला ब्लड टेस्ट केल्यावर त्याचे व्यवस्थित रिपोर्ट्स द्यायला हवे होते. त्यात प्रत्येक गोष्टीची नॉर्मल रेंज आणि तुमचे रिडिंग हवे. जे काही नॉर्मल रेंजाच्या बाहेर आहे ते हाय/लो प्रमाणे लिहून हायलाईट केलेले हवे. बॉर्डर्लाईन असेल तर तेही नमुद केलेले हवे. जोडीला साध्या सोप्या भाषेत निकाला बाबत डॉक्टरचे भाष्य हवे, साधारण कुठल्या प्रकारच्या ट्रिटमेंटची गरज आहे ते लिहून खाली डॉकची इनिशिअल्स हवी होती. तुमच्या डॉक्टरने योग्य बिझनेस प्रॅक्टिस वापरली नाही. बाकी मित्राच्या मेहुण्याकडे ज्योतिषी म्हणून दुर्लक्ष करायचे की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न.
माझा आक्षेप चुकीच्या बिझनेस प्रॅक्टिसला आहे. मग ते अॅलोपॅथीच्या नावाखाली असो किंवा आयुर्वेदाच्या.
पतंजली प्रॉड्क्ट्स ची कुठेही
पतंजली प्रॉड्क्ट्स ची कुठेही जाहिरात नाहीये > बहुधा करतात जाहिरात. एका न्युज चॅनल वर पाहिल्यासारखी वाटते.
सोनचाफा त्याचे नाव क्रेक (
सोनचाफा त्याचे नाव क्रेक ( क्रेकच ) हिल आहे. बाकी नन्तर लिहीते.
खोकल्यावर पतंजलीचं
खोकल्यावर पतंजलीचं "लवंगादीवटी" चघळत होतो. विक्सपेक्षा बरं वाटलं
सगळे प्रतिसाद वाचून एकदा
सगळे प्रतिसाद वाचून एकदा पतंजलीच्या दुकानास भेट द्यावीच म्हणतो.
अगोसारखाच मलाही प्रश्न पडलाय खरा.. पण कमी जाहिरात हे कमी किमतीचं कारण असू शकतं हेही कुठे तरी पटतंय.
असो, एकदा वापरून बघावे म्हणतो.
पुण्यात- नळस्टॉपजवळ आहे म्हणे त्यांचे दुकान. अजून कुठे आहे का? कुणाला माहिती आहे का?
सिंहगड रस्त्यावर माणिकबागेजवळ
सिंहगड रस्त्यावर माणिकबागेजवळ एक दुकान बघितल्यासारखं वाटतंय.
नळस्टॉपजवळचं माहित नाही. पण
नळस्टॉपजवळचं माहित नाही. पण एक मृत्युंजयाच्या अलिकडच्या सिग्नलच्या इथे आहे. एक आप्पाबळवंत चौकात आहे कुठेतरी. एक अरण्येश्वरला आहे.
आप्पाबळवंत चौकात दक्षिणमुखी
आप्पाबळवंत चौकात दक्षिणमुखी मारूतीजवळ आहे एक दुकान, प्रभात टॉकीजच्या समोरच्या लाईनीत.
सोनचाफा, जर उष्ण पडत नसेल तर
सोनचाफा, जर उष्ण पडत नसेल तर तीळ तेल आणी खोबरेल तेल एकत्र करुन हाता पायाना लावत जा. कारण तीळ तेल हे एकमेव असे तेल आहे की जे हाडापर्यन्त मुरते. पण ते जरा उष्ण असल्याने दुसरे मिक्स करावे. आणी नुसतीच थन्डीच कारण नाहीये भेगान्साठी, तर घरातली धूळ पण तेवढीच त्रास देते. तुझे घर रोडच्या आसपास आहे का? किन्वा घरात कितीही साफ केले धूळ येतेच का याकडे लक्ष दे. मला थन्डीत त्रास नाही होत, पण उन्हाळ्यात जाम त्रास होतो भेगान्चा.
सतत स्लिपर्स घालणे, झोपताना पाय गरम्/कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन मग हे क्रीम लावावे, मग चान्गलाच परीणाम होतो.
नळस्टॉपजवळ सीडच्या समांतर
नळस्टॉपजवळ सीडच्या समांतर पहिल्या किंवा दुसर्या गल्लीत आहे.आदित्य का कायसं रेस्टो. च्या समोरच्या गल्लीत आहे.
रश्मी, धन्यवाद ! अगं मुंबईला
रश्मी, धन्यवाद ! अगं मुंबईला महिनाभर राहिले तर या भेगा एवढ्या कमी होतात की हे भेगा पडणं मी बेळगावच्या हवेशी जोडून टाकलाय. मी कुठेतरी वाचलं होतं की वजन जास्त असणार्यांना जास्त भेगा पडतात. तसंच जे जास्त वेळ उभं राहून काम करतात त्यांना भेगा पडतात.. ह्या दोन्ही गोष्टी माझ्या बाबतीत खर्या असल्याने भेगा जास्त पडत असतील असं मी म्हणते आता.
सोनचाफा जर उष्ण पडत नसेल तर
सोनचाफा जर उष्ण पडत नसेल तर >>>> रश्मीबेन, जरा कॉमा बिमा टाक. मी क्षणभर विचार केला की सोनचाफा उष्ण असतो?
अर्र! सॉरी. घाईत राहीलेच,
अर्र! सॉरी. घाईत राहीलेच, दुरुस्त करते. थॅन्क्स अश्विनी.:स्मित: ( मागे मी विज्ञानदासना म्हणले होते, आज माझी वेळ.:फिदी:)
माझी मलाच गंमत वाटली, म्हणून
माझी मलाच गंमत वाटली, म्हणून सांगितलं गं. त्यात चुका बिका काढायचा हेतू नाही
हे माझ्याही हातून होतंच.
मागे मी विज्ञानदासना म्हणले होते, आज माझी वेळ.फिदीफिदी>>>> आता मलाही कुणीतरी असंच सांगेल.
मी परवाच "बार्ली" आणले.
मी परवाच "बार्ली" आणले. आवडले मला तरी. मिक्स ग्रेन जास्त छान आहे म्हणे त्यापेक्षा. संपले होते. आता मिळाले की आणेल
अश्विनी उलट चूका दाखवाव्यात,
अश्विनी उलट चूका दाखवाव्यात, त्याने सुधारणेला वाव मिळतो. हे माझे स्वानुभवाने बनलेले स्पष्ट मत आहे.:स्मित: आणी उत्तम सहृदयी समिक्षक आणी वात्रट टिकाकार कोण आहे ते अनूभवाने कळत ग.:फिदी:
तू मात्र आधीच्या म्हणजे उत्तम समिक्षक गटातली आहेस.:स्मित: मला दुसर्या गटातले लोक माहीत आहेत, आणी ते बाकी बाफान्वर असतात.:खोखो:
सोनचाफा, मुम्बईची हवा दमट आहे ना, त्यामुळे फरक पडतो. पुण्याची हवा उलट कोरडी ( फार नाही, पण थन्डीमुळे ) त्याने भेगा वाढतात. बेळगावची हवा तशीच आहे का ग?
आणी जास्त वेळ उभे राहुन काम करण्यापेक्षा काही गोष्टी ( नोकरी करत नसशील तर ) खाली बसुन केलेल्या बर्या. माझी पण बराच वेळ उभे राहुन काम करण्याची सवय होती, उदा. स्वयम्पाक, इस्त्री वगैरे. उलट यामुळे माझे खाली जमिनीवर बसणे कमी झाले आणी खाली वाकता येईना की वाकुन गुढघ्यावर पण बसता येईना. कम्बर पण दुखायची.
सॉरी खूप अवान्तर लिहीतेय, पण या सर्वान्चा अन्गाच्या लवचीकतेवर पण परीणाम होतोय असे दिसले म्हणून लिहीले.
साधना सीवुड्स्ला त्याच्या
साधना
सीवुड्स्ला त्याच्या दुकानात युसुफ मेहरअली सेंटरचे घाणीवर गाळलेले खोबरे, तिळ, राई, शेंगदाणे तेलही उपलब्ध आहे.
हे दुकान नेमके कुथे आहे.पत्ता फोन नम्बर मिलेल का?
Pages