पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही तोपर्यन्त रामदेव एका विशिष्ठ पक्षाच्या बाजूने नव्ह्ते . नावडतीचे मीठही अळणी अस्ते ना ! ::फिदी:

मी सुद्धा कित्येक वर्षे पतंजलीची उत्पादने म्हणजे फालतु अशा गैर समजात होते. पण जेव्हा वापरण्यात आली तेव्हा दर्जा कळला.

मला माहीतीच नव्हतं की पतंजलीची इतकी भरमसाठ उत्पादनं आहेत हे. वापरायला लागल्यापासुन एकदम फॅन झालेय मी पतंजलीची. ढिगाने क्रिम्स, लोशन्स लावुनही चेहर्‍यावर पिम्पल्स, मार्क्स जात नव्हते ते मुलतानी मिट्टी फेसपॅकने बर्‍यापैकी आटोक्यात आल्याचं जाणवतंय. शॅम्पुचंही तेच. केस चांगलेच मऊ होतात. त्यामुळे मी पतंजली प्रॉडक्ट्सच्या प्रेमात...

कोणताही अनुभव नसतांना आपण बर्‍याचदा चुकीचे समज करून घेत असतो....सर्वसाधारणपणे हाच माणसाचा खरा स्वभाव आहे...म्हणूनच संत सोयरोबांनी म्हटलं....अनुभवाविण मान डोलवू नको रे!

गुलकंद तर महा बेक्कार. तोंडावर मारून परत आलो.
खाताना सगळा गुळच लागत होता ते ही खड्यांच्या स्वरुपात. महाबकवास प्रोडक्ट

हो बरोबर आहे अंजली, ब्युटी क्रिम खुप छान आहे. तेजस anti-wrinkle क्रिम वापरतो आम्ही दोघही.
आटा खुपच बेकार असं आत्याने सांगितलं. आम्ही सध्या तेवढं तेजस ब्युटी क्रीम आणतो.

तूप - एकदा आणले पण काहीच फारसा फरक जाणवला नाही नेहमीच्या गोवर्धन तुपात अन् या तुपात (किमतीत जबरदस्त फरक आहे)>>> कालच आणले आहे.डायनॅमिक्सच्या ,गाईच्या तूपासारखाच वास येतोय.

मला पतंजली शेविंग फोम आणि मध आवडला.
मुलतानी माती एकदाच वापरली आहे, तेलकट त्वचा असल्याने माहिती नाही पण त्वचा स्मूथच झाली होती, Lol

मिल्क प्रोटीन शांपू नाही आवडला, डँड्रफ लगेच झाला. "हेड अँड शोल्डर" वापरताना हा त्रास नव्हता.
नीम फेस वॉश पण ओके ओके.

वॉशिंग पाऊडर पण नाही आवडली. प्रिमिअम पाउडर आणली, पण कपडे एवढे स्वच्छ नाही निघाले आणि डीटर्जंटचा नीमवाला वास पण नाही येत. सर्फ/एरिअल बरे वाटतात.

एकदा प्रोटीन शांपू वापरला आणि खुपच आवडला, माझी गाडी एकदम चक्क झाली. क्लिनिक पेक्षा स्वस्त पड्तय.
त्वचेसोबत उगाच काहिपण प्रयोग करायला भिती वाटते Sad

पतंजलि गुलकंद सारखी आपली उत्पादने गावातील लोकांकडून बनवून घेते. त्यावर त्यांची क्वलिटी कंट्रोल ची प्रोसेस चालते.
आणि मग ती बाजारात येतात. त्यामुळे मला एकाच प्रॉडक्ट मध्ये काही काळाने वेगळ्या चवी आढळतात.
बहुदा प्रदेशानुसार तेथील पदार्थांची चवही बदलत असावी.

इथे कुणी पतंजलीची प्रॉडक्ट्स ऑनलाईन ऑर्डर केलियेत का? कसा अनुभव आहे?
मी २६ तारखेला इथे वाचुन बरिचशी ऑर्डर केलीत पण पुढे काहीही झाले नाही. फक्त मला रिसिट मिळाली. नंतर कस्टमर केअर नंबर नुसता वाजत राहतो, इमेलला रिप्लाय नाही. ७ दिवस होऊनही ऑर्डर स्टेटस पेंडिंग दाखवतेय साईट.

इथे कुणी पतंजलीची प्रॉडक्ट्स ऑनलाईन ऑर्डर केलियेत का? कसा अनुभव आहे?>>>> मी केली आहे.
७/१०/२०१५ ला ऑनलाईन ऑर्डर केली.माझे पैसे अकाउंटमधून कट झाले.पण मला ऑर्डर नंबर वगैरे नाही मिळाला. त्यांच्या साईटवर याबाबत लिहिल्यावर
"Dear Customer,

Your Bank Transaction is confirmed.

Kindly share your fresh order listing Items name, MRP and quantity because your order item is not captured in our website.
Also share your complete address with alternate contact number." अशी मेल १०/१०/२०१५ ला आली.

मी त्यांच्या फोनवरही याबाबत बोलले.तो अनुभव छान होता.मात्र नंतर कधीही फोन लागला नाही.वाजायचा पण कोणी उचलायचे नाही.नवीन लिस्ट पाठवूनही मला जे त्यांचे मेल आले ते वाचू शकत नव्हते.शेवटी २० तारखेला नवीन लिस्टप्रमाणे वस्तू आल्या.अगदी जितके पैसे अगोदर कट झाले होते तितक्याच रकमेच्या वस्तू आल्या.(माझ्या नवीन लिस्टमधे थोड्या कमी किंमतीच्या वस्तू होत्या.)

मी पतंजली चा मिल्क प्रोटीन शाम्पू वापरते. केस खूप छान सिल्की होतात >> + १०
दूसरा एक शाम्पू आहे त्यान्चा , नाव नाही आठवत , मे सॅशे आणली आहेत .
मिप्रो ३ रु. आणि तो दूसरा २ रू. आहे .
त्या दूसर्या शाम्पूने डॅन्द्रफ्र्ट झाल्यासरखा वाटल्ल .

हो, मी हि आधी वापरलाय,(purple कलर च पाकीट असत ) मलाही तोच अनुभव आलाय मग तो शाम्पू वापरण सोडून मी मिल्क प्रोटीन वापरायला लागले

अंजली, मुग्धा-केदार, ब्युटी क्रीमचे तपशील लिहाल का प्लीज? मला दुकानात फक्त मॉईश्चरायजर मिळाले. तेच का हे?

पतन्जली दन्तकान्ति टूथपेस्ट आत्ताच आठवड्यापूर्वी वापरायला सुरुवात केली. बरी वाटली...

लिची बागेतला मध पण छान आहे ...

नॉर्मल मध ५/६वर्षा पूर्वी घेत होतो, त्यावेळी आवडला नव्हता

धन्स देवकी.
मी बघते फोन करुन पुन्हा. मला काहीही रिप्लाय नाहिये त्यांच्या साईटवर टाकलेल्या कमेंटला आणि इमेलला पण. असो. वाट बघावी कदाचित दिवाळीची गडबड असेल त्यांना. Happy

@सहेली.... तेजस ब्युटी क्रीम म्हणुन मिळत. त्यामध्ये २ प्रकार आहेत. त्यात तेजस ANTI-WRINKLE क्रीम अस एक आहे (किं.१७०/-) ते आम्ही दोघं, माझी बहीण, आई, मावशी, वहिनी सगळ्यांना आवडलं. अजुन एक आहे बहुतेक तेजस FAIRNESS क्रीम असं नाव आहे. त्याची किंमत जवळपास निम्मी आहे. ते पण तस चांगल आहे.

@Swara@1 & स्वस्ति..... तो पर्पल कलरचा शॅम्पू आहे. पण मला विशेष फ़रक नाही वाटला उलट केस कोरडे झाले आता सध्या पतंजली शॅम्पू नाही वापरत.

Pages