पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक महत्वाची गोष्ट शेअर करायची इच्छा आहे, पण या धाग्यावर लिहु की नको या संभ्रमात होते. कारण थोडं अवांतर आहे. आज वेळ आहे तर लिहिणार,
पंतजली मध्ये हरिद्वारला कोरफडीच्या उत्पादनाची संपुर्ण आशिया खंडातील सगळ्यात मोठी आणि अद्ययावत मशिनरी आहे. जी आमच्या (म्हणजे मी ज्या कंपनी मध्ये काम करते) कंपनीने दिली आहे. आणखीही बर्‍याच मशीन दिल्या आहेत. त्यांचे फ़ॉर्मुलेशन्स सुध्दा आम्ही दिले आहेत. पण नंतर त्यांनी हवी तशी मॅनीपुलेशन करुन क्वालीटी घसरली.

माझी आवळा कॅण्डी रेसिपी पण म्हणुनच तशीच आहे जशी बाहेर विकत मिळते.

आमच्या कंपनीमधले जे साईट इंजीनीयर्स तेथे जाउन आले आहेत ते म्हणतात खाद्यपदार्थ घेउ नका. अजुनही बर्‍याच गोष्टी आहेत, इथे लिहीणे योग्य नाही. कोणाला उत्सुकता असेल तर सांगा मेल करते.
माझे सर ( Our MD ) रामदेव बाबांच्या चांगले परिचयातले आहेत. ते म्हणतात की स्वत: रामदेव बाबा खुप चांगले आहेत, बाकी...

ओके मुग्धा बरे झाले शेअर केलेस.वापरकर्त्यांकडे सर्व डेटा असलेला केव्हाही बरा.
आपण प्रॉडक्ट वापरुन आपल्या अनुभवांनी खात्री करुन वापरायचे की नाही ठरवू शकतोच.
बाकी क्वालिटी इश्यूज सर्व ब्रँड चे थोडे थोडे आहेतच. (मॅगी,जॉन्सन जॉन्सन्,लिज्जत्,इ.इ.)
मला पतंजली ची पेस्ट आणि पीडांतक हे सर्वात आवडलेली उत्पादने आहेत. बाकी कधीकधी वापरतो.

मुग्धा जी,

मल वाटते आपण इथे शेअर करावे.
जेणे करुन लोकांना कळेल आणि विचार करता येइल कि उत्पादने घ्यावीत का नाही ते... हेमावैम !!

-प्रसन्न

गायीचे सुद्द पतंजली तूप = तूप पिवळे दिसण्याकरता अ‍ॅसिड यलो नामक पिवळा रंग + वनस्पती तूप ( डालडा ) Lol

गायीचं शुद्ध तूप बनवण्याचं प्राचीन भारतीय विज्ञान किती पुढे गेलंय ते यावरून लक्षात यावे.

वरील तपासणीचे हे खोटे चित्र आहे असे रामदेव बाबांनी दाखवून दिले आहे. खरे चित्र आणि खोटे चित्र शेजारी शेजारी त्यांच्या फेबु पानावर दिले आहेत.

पतंजली पेस्ट जबरदस्त आहे.हँड वॉश पण आम्ही खूप वापरतो. पतंजली (मारी) मेरी घेतली होती, त्याचा एकंदर जाडी वगैरे क्वालिटी चांगली आहे पण एक वेगळाच गोड वास आहे, पौष्टिक बिस्किटांना मधाचा वास आहे. कदाचित आधीची टेस्ट ब्रिटानिया ची वगैरे डेव्हलप झाल्याने चवी आवडत नसाव्यात मला.पतंजलीची मोनॅको मात्र एकदम मस्त.

Anti Dandruff shampoo आमच्या टीन एजर मध्ये फेमस झालाय. Dandruff नसणारेच वापरतायत . केस मस्त मऊ मऊ होतायत म्हणून खुश आहेत.
Dandruff वाल्याचा dandruff पण गेला. ( पण त्यांना डॉकनी पण shampoo दिला होता) त्यामुळे नक्की कशाचा effect ते सांगता येत नाहीत .

बिस्किटे आवडली मला. बाकीपण बरेच प्रोडक्ट वापरतो आम्ही त्यांचे. टूथपेस्ट वगैरे.
न्युडल्स खाल्ली का कोणी त्यांची.?

मी एकदा खाल्लिय नूड्ल्स त्यान्ची. ( मला मेगी पण फ़ारशी आवडत नाही) पन हे पतन्जलीचे नूडल्स चवीला बरे वाटले

मॅगी खाल्ली का कोणी त्यांची.?>>>>>>>>>>> पतांजली ची मॅगी?? ऑ? Lol
मग पतांजलीचं कोलगेट पण असेल ना. Light 1

मी खाल्लेत न्युडल्स. बरे आहेत चवीला. थोडे आंबट लागतात.

मागे कोणीतरी लिहिले आहे तसा माझा पण अनुभव आहे. मी मिल्क प्रोटीन शॅम्पु लागोपठ ४-५ वेळा वापरुन बघितला तर मला पण कोंडा झाला होता.

मागे कोणीतरी लिहिले आहे तसा माझा पण अनुभव आहे. मी मिल्क प्रोटीन शॅम्पु लागोपठ ४-५ वेळा वापरुन बघितला तर मला पण कोंडा झाला होता.

>> Sad

मला ऑलरेडी खुप कोंडा आहे. मी काय वापरु?

पियू, चुकीचा बीबी आहे, तरी लिहिते. मी medical मधुन Selsun shampoo(medicated) आणून वापरते. मागे डॉक्टरांनी prescribe केला होता. कसा वापरायचा त्याचे instructions आहेत त्याच्यावर

मी कोंडा असताना पंतजली चा अँटीड्न्ड्रेफ चा शॅम्पु वापरला होता .तिसर्या वापरात फरक जाणवला.केस थोडे अजुन मॅनेजबल पण होतात. त्यानंतर साधा रीठे,शिकेकाई चा पण वापरुन पाहिला.तोही चांगला होता.

कोंड्यात कंडीशनर शांपू वापरुन केसात अजूनच कोंडा होतो. आणि हल्ली जास्तीत जास्त शाम्पू कंडीशनर वालेच असतात. (गल्ली चुकलेली आहे.) मी बायोटिक वॉलनट बार्क वापरते.त्याने कोंडा झालेला नाही.

मी कोंडा असताना पंतजली चा अँटीड्न्ड्रेफ चा शॅम्पु वापरला होता .तिसर्या वापरात फरक जाणवला.केस थोडे अजुन मॅनेजबल पण होतात. त्यानंतर साधा रीठे,शिकेकाई चा पण वापरुन पाहिला.तोही चांगला होता.>>++११

डीश बार मस्तच आहे ..

Selsun shampoo च वापरला कोंड्यासाठी
पण केस मऊ झाले हा फायदा इतर मेम्बरना झाला .

<<मागे कोणीतरी लिहिले आहे तसा माझा पण अनुभव आहे. मी मिल्क प्रोटीन शॅम्पु लागोपठ ४-५ वेळा वापरुन बघितला तर मला पण कोंडा झाला होता. >>
मला पण हा अनुभव आला होता.

मग पंतजलीचाच अँटीड्न्ड्रेफ चा शॅम्पु वापरला . लगेच फरक जाणवला.. आता नेहमी तोच वापरते..
मिल्क प्रोटीन शॅम्पु तसाच पडुन आहे..

पतंजलीची प्रॉडक्ट्स ११/११/२०१५ ला मागवली होती.अध्याप आली नाहीत.मेल्,कस्टमर केअर्कडे तक्रारी करून झाल्या.फोन उचलत नाहीत.स्पीड्पोस्ट्ने पाठवलेल्या पत्राला उत्तर नाही. ग्राहक मंचाकडे तक्रार करू की काय याविचारात आहे.

बाबाची सर्वच उत्पादनें दर्जेदार आहेत. त्यातही दलिया, नम्कीन बिस्कीटें ,दंतमंजन, टुथपेस्ट , पीडंतक, मोगरा साबण , हँड वॉश आम्हाला जास्त आवडले,

पापड ही बरे वाटले.

कोरफडीच्या उत्पादनांबाबतीत इतर ब्रॅन्ड्स जास्त उजवे आहेत , बाबा कू ये कोरफड्वाली बात जम्या नहीं !

तूपा बद्दल इथे काही लिहले गेले आहे , म्हणुन एक लहान प्यॅक आणला , पण तूप उत्तम आहे. नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा बाबाचे तूप गोठले नव्हते (बाकी ब्रॅन्ड ची तुपें या थंडीत डालड्या सारखी घट्ट गोठून गेली आहेत,... आता हे चांगले का वाईट माहीती नाही , जाणकारांनी प्रकाश टाकावा) ,

आटा आणला होता पण चपात्या काही खास झाल्या नाहीत, आमचा नेहमीचा क्षक्षक्ष ब्रॅन्ड अधिक चांगला आहे.

नुडल्स चांगल्या आहेत , चव जरा वेगळी आहे पण 'मॅगी' पर्याय म्हणून निश्चितच विचार व्हावा. उदबत्ती खास नाही (पंढरपूर च्या लाडांच्या 'डेक्क्न क्विन' ला पर्याय नाही )

जय बाबा रामदेव ! जय स्वदेशी !!

नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा बाबाचे तूप गोठले नव्हते (बाकी ब्रॅन्ड ची तुपें या थंडीत डालड्या सारखी घट्ट गोठून गेली आहेत,... आता हे चांगले का वाईट माहीती नाही , जाणकारांनी प्रकाश टाकावा) , >>>
काय पण म्हणता राव, बाबांनी त्यात केमिकल टाकल्य म्हनुन ते गोठत नाय.. Wink
बाकी बाबा मधात पण काहीतरी घातक केमिकल लोच्या करत असणार कारण त्यांचा मधबी गोठत नाय फ्रिजमध्ये, नाहीतर एका सुप्रसिद्धा कुंपनीचा मध सुद्धा गोठतो (साखर असल्यावर मध गोठतो असं आमच्या आज्जीबाय म्हणायच्या). Wink
शॅंपु च म्हणसाल तर तो बी केस मस्त मउ करतो पण एमेन्सी वाल्यांपेक्षा किंमत कमी आहे म्हणजे त्यात पण काहितरी काळंबेरं असणार.. Wink
फेसवॉश बी कमि घेउन पण छान फेस होतो, आणि लवकर निघतो पण, म्हणजे कुछ तो गडबडा है दया Light 1

Pages