निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन भागाच्या हार्दिक शुभेच्छा!

Copy of DSCN5892_0.jpg

फोटो अतिशय सुंदर आणि लिहिलेयही अतिशय सुरेख>>>>>> +१ Happy

वा, नवीन भाग आला सुद्धा.
बी खूप छान मनोगन आणि फोटो ही.
जो़_एस रताळ्याच फुल प्रथमच पाहिल.
नवीन भागाबद्दल माझ्याकडुन ही शुभेच्छा !!!

From mayboli

नविन भाग!! बी छान फोटो आणि लिखाण...
सर्वांचे फोटो सुंदर!
मनीमोहर, निळी पांढरी फुलं कोणती? इंद्रनीलाची फुलं आहेत का? मी कधी बघितली नाहीयेत, पण निळी फुलं बघून इंद्रनीलाच्या फुलाचा फोटो आठवला. आणि ही फुलं तुम्ही कुठे बघितली ? लोकेशन सांगू शकाल का? फारच गोड फुलं आहेत.. आणि ते कॉम्बिनेशन सुद्धा कित्ती सुंदर दिसतंय!! Happy

अरे वा!!
नवीन भाग आला तोच मुळी मस्त फोटो अन भावस्पर्शी मनोगताने.
सरत्या वर्षाला निरोप देता देता नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आपल्या नवीन भागाने होतेय हि गोष्टच कसली भारी आहे.
रताळ्याच फूल फारा दिवसांनी पाहील.
हेमाताई, मस्त फोटो.

बी, चांगलं लिहिलं आहे स्फुट.

मिलिंद गुणभजी <<< मिलिंद गुणाजी ना?

मनीमोहोर, मस्त फोटो!

फोटो आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
शांकली , ती फुलं कसली आहेत ते नाही माहित मला.
तुम्हीच सांगु शकाल खर तर. कारण तुम्हाला खूप माहिती आहे झाडापानांची.
मी मध्यंतरी लंडन ला गेले होते तिथे रस्त्याच्या दुशीकडे ह्या फुलांचे ताटवे फुलवले होते.
ते तर खुपच सुंदर दिसत होते.

आजच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत जागूचा 'पोपटी' वरचा लेख आहे. मस्त लिहिलाय. सर्वांनी जरूर वाचा..:स्मित:
जागुडे.. पा कृ आणि आहारशास्त्र मधे दे ना ही भाजी... फोटोंसकट.. अगदी मस्त रेसिपी आहे ही!

सायली, ह्याची फारशी काहीच काळजी घ्यावी लागत नाही. नुसतं कुंडीत खोचून द्या आणि नंतर दर ३-४ दिवसांनीच थोडं थोडं पाणी घाला. हे पानफुटी असल्याने फार पाणी, खतं, निगराणी लागत नाही. खूप गुणी रोप आहे हे. अल्पसंतुष्टही आहे! Happy फक्त लावल्यावर वीतभर उंची ठेवून वरचा भाग कापून टाका किंवा तोही शेजारीच खोचा..

आभार शान्क ली.. अगदि निट स म जा उन सान्गो त ल त...
रताळ्या चे फुल लै भारी...

हेमा ताई जrbera खुप गोड फोटो.....

वाह, नवीन भागाची जोरदार सुरुवात आहे - "बी" रॉक्स ..... Happy

सर्वांचे फोटो सुंदरच आहेत ... मनीमोहर यांनी टाकलेले निळ्या-पांढर्‍या फुलांचे काँबिनेशन केवळ अप्रतिम ... Happy

बी छान फोटो आणि लेखनही.. तसे सर्वांचेच फोटो छान आहेत.

शांकली, इंद्रनील नावाचा एक खडा ( सेमी प्रेशियस स्टोन ) सुद्धा असतो. माझ्या अंगठीत ३ आहेत. थायलंडहून आणले होते.

इंद्रनील नावाचा एक खडा ( सेमी प्रेशियस स्टोन ) सुद्धा असतो.>>> Happy दा, मला वाटतं जशी अनेक इयररिंग्जची डिझाइन्स ह्या फुलांच्या आकारावरून घेतली आहेत तशीच काही रत्नांची नावं पण फुलांवरून घेतली असावीत.
मनीमोहर, ती फुलं इंद्रनीलाची नाहीयेत पण प्रिम्यूला व्हल्गॅरिस - Primula vulgaris असावीत. इंद्रनील - Anagallis arvensis ह्या नावाने सर्च केल्यावर वेगळी फुलं दिसतात. पण त्या दोन्हींची फॅमिली सेम आहे - Primulaceae.

नविन भागाची छान सुरुवात झालीये. लोकसत्तेत जागूच्या लेखाचे ( इथे वाचल्याचं आठवतं होतं)पुनर्वाचन झाले. आवळी भोजन, पोपटी, हुर्डा पार्टी निमीत्त्याने निसर्गाजवळ जाण्याची संधी. सगळे फोटो मस्त!

सर्वांचे अभिनंदन! आला नवा भाग.
बी छान मनोगत आणि फोटोही! जो एस..रताळ्याचे फूल पहिल्यांदाच पहाते. गौरी फोटो मस्त.
आणि झरबेरा..........अप्रतीम फोटो!

परवा पाहुणे(घरचेच) होते. हा सीझन आमच्याकडे पाहुणे असतात. हवा छान असते. फळं भाज्या भरपूर! आणि हुरडा. पण पाहुणे नगरच्या थंडीत काकडले. मग अंगणात रात्री शेकोटी केली. नारळाचं खूप जळण होतंच. जावेकडचे आणि माझ्याकडचे मिळून ९/१० लोक होतो. मग मस्तपैकी हुरडा पाकिटं आणली. मायक्रोव्हमधे गरम केली. दही ,चटण्या असतातच घरात.
रात्री मस्त हुरडा पार्टी झाली घरातच. सध्या इथे गूळभेंडी हुरडा मस्त मिळतो.

जागू अभिनंदन.

मानुषीताई मस्त. तिथे हुरडा पाकिटे मिळतात? मस्तच.

आज हा बाफ शोधायला लागला. सगळे सेलिब्रेशनसाठी बाहेर गेलेत का?

Pages