आग्रा धर्मांतरण

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00

मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडी आता योग्य गंतव्य स्थलाकडे निघाली आहे>>>>> थाम्बा, थाम्बा, अरे थाम्बा म्हणतीय ना,:राग: चढु पण देत नाय.:फिदी: लगेच बेल मारत्यात. सगळी सीट भी भरली न्हाय अजून.

गाडीच्या मालकाला त्याची जाणीव होतीच.

त्यामुळे चार आठ प्रतिसादांच्या आधीच्या प्रतिसादातच आभार प्रदर्शन करुन ते गाडीतुन उडी मारुन पसार झालेत.

Rofl

रामायण लिहिणारे वाल्याचा वाल्मिकी झालेले ते कायसेसे कोण होते हो?>> जाती दाखवा जाती!
रामायणात मराठा, कुणबी, माळी.... अशा जाती कुठे आहेत ते दाखवा.

जाती निर्मीतीचे काम ब्राह्मणांचे नाही, म्हणून ते शास्त्रातही सापडत नाही.

ज्यानी जाती निर्माण केल्या तेच आज ओरडताहेत.

एकाही धर्मग्रंथात जातीचा उल्लेख सापडत नाही.

एवढामोठा पुरावा असताना हिंदू धर्मात जाती आहेत म्हण्ने (धर्मग्रंथीय आधारावर) मुर्खपणाचे आहे.

१९७७ मध्ये जनता पक्ष सत्तेवर आल्यावर त्यांनी ४२ व्या घटनादुरुस्तीतील अनेक कलमे ४३व्या व ४४व्या घटनादुरुस्त्यांनी रद्दबातल ठरवली. त्यांना सोशलिस्ट-सेक्युलर हे शब्द हटवावेसे वाटले नाहीत की तसे करणे शक्य नव्हते? >>>> याचं कारण जनता पक्षात समाजवादी पण होते आणि त्यांचा त्यावेळी आणि नंतरसुद्धा सोशलिस्ट-सेक्युलर स्टेट संकल्पनेला पाठिंबा होता.

येथे जरा अवांतर होईल, पण आश्चर्य म्हणजे भारताचा "सोशालिस्टपणा" हा तो शब्द घटनेमधे आल्यापासून कमी होत गेला Happy

भारताची सेक्युलर ची व्याख्या परदेशात जी वापरली जाते त्यापेक्षा चांगली आहे. त्याला विरोध करणार्‍यांकडून कधीतरी त्याचे कारण समजून घ्यायचे आहे Happy

मूळ विषयाबद्दलः
मुळात हिंदू धर्म स्वीकारणे म्हणजे नक्की काय? इतर हिंदू लोक करतात त्यातील काहीही न करता तरीही मी हिंदू आहे असे म्हणणारेही अनेक असतील. त्यामुळे हे फक्त कागदोपत्री धर्म लिहीण्यापुरते असावे काय?

फारएन्डचे प्रश्न आवडले. सुरेख, मनु स्मृती मनु राजाने लिहीली किन्वा त्याच्या काळात लिहीली गेली. मला जास्त माहीत नाही, मनु क्षत्रिय होता. बहुतेक ते पुराण काळात जसे नोहाची नौका ( ख्रिश्चन लोकान्च्या गोष्टीत आहे ) तशी मनुची पण नौका अशी गोष्ट आहे.

हतोडावाला: सहमत..
पुरातनकाळी समाजव्यवस्था लवचिक होती.
कोणताही समाजघटक दुसर्‍या समाजात प्रवेश करू शकत होता.
विश्वामित्र मुनी, वाल्मीकि ॠषी, रावण इ. अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
ब्रह्मम् जानति य: स: ब्राह्मण:।
आज स्वत:ला ब्राह्मण म्हणवणारे कितीजण ब्रह्मवेत्ते आहेत?

तथाकथित, स्वयंघोषित तत्कालीन वजनदार समाजांनी जातीव्यवस्था स्वत:च्या स्वार्थासाठी निर्माण केली होती / आहे.

त्यामुृळे धर्मांतरितांच्या जातीवरून कावरेबावरे होण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना वाटेल त्या जातीत त्यांनी जावे. या गोष्टीचा आनंद मानावा की कसाही का होईना आपला धर्म वाढतो आहे.

त्यांना वाटेल त्या जातीत जायचे स्वातंत्र्य नाही. त्यांच्या किंवा त्यांच्या पूर्वजांची जी जात होतीच तीच त्यांना धर्मांतरानंतर मिळेल. (वर विवेकानंदांच्या ज्या मुलाखतीचा हवाला दिला गेलाय, त्याच मुलाखतीतून). धर्मांर्तरितांना जर जात बदलायची सोय असती, तर जे धर्मात आहेत त्यांनी काय घोडे मारलेय? अजूनही जातीवरून ऑनर किलिंग होतात, लग्नाच्या जाहिरातींत 'एस सी ,एस टी क्षमस्व, स्वजातीय-उच्चांतर्जातीय चालेल' असे मजकूर असतात. नुसती संख्या वाढल्याने धर्म वाढणार आहे?

चर्चा धर्मांतर किंवा धर्मात पुन्हा प्रवेश कायदेशीर आहे का ? राज्यघटनेला धरुन आहे का असा आहे ? समधर्मसमभाव मध्ये हिंदुंचे मुस्लीम धर्म प्रवेश चालतात, समाजसेवेच्या नावाखाली बाप्तीस्मा चालतात तर त्यांना परत हिंदु धर्मात प्रवेश करायला काय अडचण असावी ?

कुठल्या धर्मात प्रवेश असावा किंवा नसावा हे कायदा ठरवत नाही.

मुसलमान व ख्रिस्चन धर्मत इतराना आपल्या धर्मात घ्यायची प्रथा होती.. हिंदु धर्मात असी सोय नव्हती..

आज केवळ गणसंख्या कमी पडायचा धोका निर्माण झाल्याने हिंदुनाधर्मांतराचा पुळक आलेला आहे.

आत्ता ग बया! गणसन्ख्या कशी कमी झाली?:अओ: सगळ्या धर्मात सध्या छापा काटा चालूच आहे की. सगळेच तराजूत बसलेत. कधी कोण वर तर कधी कोण खाली.

आतापर्यंत दाम, दण्ड, आणी भेदाचा उपयोग करुन हिंदू लोकांना धर्मांतरित व्हायला लावित होते तेव्हा नव्हते हे सर्वधर्मसमभावाचे कैवारी आले आक्षेप घ्यायला? आता उलटी गंगा सुरू झाल्यावर चोरांच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या.

|| कालाय तस्मै नमः ||

समस्त भारतवर्षात स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. +कृण्वंतो विश्वम आर्यम+ अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी +अष्टपूत्र सौभाग्यवती भव+ असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. +आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायताम् + असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.

ब्राम्हणान्चे वर्चस्व लोकसन्ख्येने कमी असले तरी शैक्षणीक सन्ख्येने जास्त आहे याचाच खेद आहे.:फिदी:

अहो रश्मी त्या शब्दात म्हशीतला म्ह नाही वापरायचा. तो शब्द ब्राह्मण असा लिहा हो.

असल्या विषयांवरच्या धाग्यांचे पुढे जाऊन काय होणार हे चांगलेच माहित असतानाही आधी धागा काढायचा आणि नंतर "मूळ लेख काढुन टाकलाय" हे लिहायचे असेल तर मुळात असले धागे काढावेच कशाला? आता मूळ धागा कशावर होता हे केवळ धाग्याच्या नावामुळे कळतेय. बाकी प्रतिसाद इतर कुठल्याही धाग्यावर चालुन जातील. प्रतिसादकही तेच आणि प्रतिसादही तेच.

हेच वर्चस्व हिंदुत्वाच्या पडद्याआड राहुन टिकवायची कोशिश चालु आहे.हिंदुत्वाच्या बुरख्या आड लपता येते म्ह्नुन
च धर्मातराचा घाट.

अहो कोकम की बोर्ड वर हे अक्षर विचीत्र पद्धतीने उमटतेय. उलट सुलट कसेही केले तरी प्रश्न आहे. आणी नीट येत नाही. वरुन कॉपी करतेय.

सुरेख,

>> स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता.

ही माहिती कुठे सापडली तुम्हाला? चौथा मुलगा प्रसवण्यासंबंधी कुंतीने पांडूराजाची केलेली नकारप्रार्थना इथे आहे :

kuntichi_paandoos_prarthana.jpg

स्रोत : मराठी महाभारत आदिपर्व अध्याय ६५ ते १६४ पान क्रमांक १२० व १२१

आ.न.,
-गा.पै.

गामापैलवान, कुठुन कुठुन शोधुन काढता हो तुम्ही... लै भारी !
बाकीच्यांचे चालूदे, सरते शेवटी नेहेमीप्रमाणेच, आग्र्याचे धर्मांतर हा देखिल एक बामणी कावा आहे या नि:ष्कर्षाप्रत काहीजण आले की या धाग्याचि इतीश्री होईल. Proud

लिंबूकाका Lol Proud

गामा, इथे अनेकांना केवळ संदर्भ माहित नसल्याने अशांचे फावते. धन्यवाद इथे हे डकवल्याबद्दल.

सुरेख, काहीही थापा ठोकून देता का हो?

ही माहिती कुठे सापडली तुम्हाला? ही माहितीhttp://anita-patil.blogspot.in/2011/11/blog-post_03.html इथे
सापड्ली मला.
मराठी महाभारत आदिपर्व अध्याय ६५ ते १६४ पान क्रमांक १२० व १२१ या स्रोत वर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसे आम्हीhttp://anita-patil.blogspot.in/2011/11/blog-post_03.html या स्रोत वर विश्वास ठेवतो....

गामा, जौद्या. उद्या सूर्य पश्चिमेला उगवतो असं त्या ब्लॉगवर लिहीलेलं सापडलं तरी त्यावर "विश्वास ठेवतो" होईल Rofl

Pages