हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल्मेटची उपयुक्तता मान्य असूनही त्याच्या सक्तीला मनाई करणारे लोक चारचाकी वाहनातील सीटबेल्टच्या सक्तीला जोरदार पाठिंबा देत आहेत हे पाहून आश्चर्य वाटले.

हेल्मेट सक्ती निदान सीटबेल्ट सक्ती पेक्षा जास्त आवश्यक आहे असे मला वाटते. हेल्मेट न वापरल्याने होणारे अपघाती मृत्यू हे सीटबेल्ट न वापरल्याने होणार्‍या अपघाती मृत्यूंपेक्षा खुपच जास्त आहेत. शिवाय ज्या ओम्नी सारख्या वाहनात सीटबेल्टमुळे प्रचंड गैरसोय होत असल्याचा माझा प्रदीर्घ अनुभव आहे (एक वेळ सीट बेल्ट बदलूनही झाला, नवा सीटबेल्ट काही दिवस ठीक होता पुन्हा त्यानंतर मात्र तसाच त्रास जाणवू लागला) त्या वाहनात सीटबेल्ट वापरला तरी फारसा उपयोग होत नाही कारण इतर वाहनांत जसे स्टीअरिंग चालकाला इजा घडवू शकते तसा प्रकार ओम्नीत होत नाही. ओम्नीची जर समोरून कुठल्याही इतर वाहनाशी / वस्तूशी धडक झाली तर तसेही वाचणे अशक्यच. अपघात / समोरासमोरीची धडक टाळणे हाच एक उपाय असतो अशा वाहनांकरिता.

तात्पर्यः- आधी सीट बेल्ट सक्तीला विरोध दर्शवा मगच हेल्मेट सक्तीच्या विरोधात पाठिंबा देऊ. तसेही पीएमपीएमेल / बेस्ट मध्ये बसणारे / उभे राहणारे प्रवासी कुठे सीट बेल्ट लावतात? वेगात असलेल्या बसने करकचून ब्रेक दाबला की उभे प्रवासी समोरच्या प्रवाशाच्या अंगावर आणि बसलेले पुढच्या आसनाच्या पाठीवर कोसळतात आणि बरेचदा दंतवैद्याची धन करतातच की.

लहान असताना टीव्ही वर एक जाहिरात यायची. नारळ एक हेल्मेट मध्ये आणि एक बाहेर. " सर आपका, मर्जी आपकी" Happy

पण काहि प्रतिसाद वाचुन ज्याम मजा आली.

जोपर्यंत वीमा कंपन्या फुल्ल जोर लावुन या भानगडीत पडत नाहीत तोपर्यंत हे असेच चालायचे. सरकार नाही पण विमा कं जरुर कंपल्शन करु शकेल, नसेल हेल्मेट नो क्लेम. नो सिट बेल्ट नो क्लेम. पुढच्या २ -३ वर्षात युएस स्टाइल होउन जाइल सगळे.

चेतन गुगळे,

ज्या दिवशी सीट बेल्टचे वजन माणसाला पेलावे लागेल, गाडी बंद करून निघताना सीट बेल्ट बरोबर घ्यावा लागेल, सीट बेल्ट वाहनाबरोबर न येता मागाहून विकत घ्यावा लागेल, जेव्हा सीट बेल्ट्स चोरीला जायला लागतील, सीट बेल्टमुळे मागचे हॉर्न्स ऐकू येणे कमी होईल आणि जेव्हा ओम्नी ही एकमेव चारचाकी अस्तित्वात राहील, त्यादिवशी सीट बेल्टच्या सक्तीला विरोध करणार्‍यांत सर्वात पुढे मी असेन.

Light 1

चेतन, तुमच्या पोस्टीचा पूर्वार्ध वाचून मला वाटले तुमचे मतपरीवर्तन झाले वाटते. तर तुमचे आपले..... Proud

आपापल्या मापाची टोपरी ....कुंचीसारखं पाठीवर कापड असल्यास अजूनच ट्रेन्डी दिसेल.>> कसलं धमाल चित्र डोळ्यांसमोर येत आहे . Lol
बेफिकीर>> तुम्ही केलेले वर्णन तर Smiley

चेतनजी माझ्यामते तुम्ही गाडी बदलावी, मस्त पैकी चांगली कंफर्ट सीट्बेल्ट असलेली गाडी ,जमत असेल तर घ्या. हा एकच उपाय दिसत आहे सध्या Happy

<< ज्या दिवशी सीट बेल्टचे वजन माणसाला पेलावे लागेल, गाडी बंद करून निघताना सीट बेल्ट बरोबर घ्यावा लागेल, सीट बेल्ट वाहनाबरोबर न येता मागाहून विकत घ्यावा लागेल, जेव्हा सीट बेल्ट्स चोरीला जायला लागतील, सीट बेल्टमुळे मागचे हॉर्न्स ऐकू येणे कमी होईल >>

अशी कुठलीही समस्या नसताना सीटबेल्ट ला मी विरोध करतोय याचा अर्थ त्यात काही तरी तथ्य असेलच ना? आता मला जो त्रास होतोय तो म्हणजे डावी व उजवीकडची चाके थोडीही विषम पातळीत गेली (जे आपल्याकडील रस्त्यांवर नेहमीच घडते) की सीटबेल्ट लगेच वरच्या बाजूला खेचला जाऊन अतिघट्ट होतो. खांद्यांना काचतो. वाहनाचे स्टीअरिंग फिरविणे, मान वळवून बघणे या सर्वांना प्रचंड त्रास होतो. म्हणजे सीटबेल्ट मुळेच अधिक अपघात होऊ शकतात. आता या समस्येला "बायपास" करण्याचा सोपा उपाय आहे जो अनुभवी व्यावसायिक ओम्नीचालक आणि गॅरेज मधले फिटर सांगतात. तो म्हणजे जिथे सीटबेल्ट आत खेचला जातो तिथे तो आधीच थोडा जास्त बाहेर काढून तिथे थोडासा दुमडावा आणि त्याला सेफ्टी पिन लावावी म्हणजे तो जास्त आत खेचला जाऊन घट्ट होत नाही. परंतु हा उपाय करणे म्हणजे सीटबेल्टचे उद्दिष्टच नाहीसे करणे आहे. मग असा देखाव्याकरिता लावलेला सीटबेल्ट काय कामाचा?

आता हेल्मेट वरील आक्षेपांकरिता:-

मी दुचाकी वाहन १९९६ पासून चालवित आहे. १ डिसेंबर २००१ ला पुण्यात हेल्मेट सक्ती झाली होती तेव्हापासून मला हेल्मेट वापरायची सवय लागली. रुपये साडेचारशे पर्यंत चांगल्या दर्जाचे आयएसआय प्रमाणित हेल्मेट मिळते. डोक्याला व्यवस्थित बसते, दृष्टिमर्यादेचा काहीच त्रास होत नाही, वजनाचाही त्रास होत नाही.

सर्वांच्या माहिती करिता - ज्यांना मणक्याचा त्रास आहे अशांना डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेतले आणि तसे रस्त्यावर पोलिसांना दाखविले तर हेल्मेट न घातल्यास अथवा सीटबेल्ट न लावल्यास कारवाई होत नाही.

अर्थातच मला अशा प्रकारे सीटबेल्ट न लावण्यापासून मुक्तता नकोय कारण इतर कुठल्याही वाहनाच्या नाही तर फक्त ओम्नीच्या सीटबेल्ट मुळे समस्या जाणवते. त्यामुळे खोटे प्रमाणपत्र घेऊन कारवाई टाळणे मला उचित वाटत नाही तर ही सवलत मला रास्त मार्गाने हवी आहे.

सिनि,
तो एक त्रास सोडला तर ओम्नीची साथ सोडवत नाही इतके ते वाहन छान आहे. मुख्य म्हणजे सीएनजी वर २५ किमी / किग्रॅ कार्यक्षमता आणि आठ प्रवासी घेऊन जाऊ शकणारे तरीही साडेतीन लाख रुपयांत मिळणारे दुसरे कुठले वाहन भारतात उपलब्ध आहे?

चेतन,

मी दिवा त्याचसाठी दिला होता. Happy

तुमचे ओम्नीच्या बेल्टबाबतचे म्हणणे रास्त असणार ह्याची खात्री होतीच. निव्वळ गंमत म्हणून तसे लिहिले होते.

मात्र, ह्या गोष्टीला विरोध दर्शवलात तर आम्ही त्या गोष्टीला पाठिंबा देऊ, अशी समीकरणे मांडणे मात्र पटले नाही. हा धागा हेल्मेटसक्तीचा आहे म्हंटल्यावर (फक्त ओम्नीच्या बेल्टमध्येच तांत्रिक अडचण असताना) बेल्टच्या सक्तीला विरोध केल्याशिवाय हेल्मेटसक्तीला विरोध करणार नाही ही भूमिका पटली नाही.

हेल्मेटची सक्ती आजकालची असेल. पण पुण्यातले पोलीस सीटबेल्ट लावलेला नसला तर ताबडतोब पावती फाडतात हा अनुभव आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचे अभिनंदन.

पुण्यातले पोलिस हेल्मेट न वापरता बाईकवरून जातात. त्याहीबद्दल अभिनंदन!

त्यांना बहुतेक 'कोणी हेल्मेट घातलेले नाही' हे हेल्मेट घालून दिसत नसावे.

बेफि, पुणे पोलीसांचं काय घेऊन बसलात? आपले मुमं देखिल जातात की विदाऊट हेल्मेट. शिवाय मी तरी हेल्मेटशिवाय टूव्हीलर चालवत नाही. अगदी पिलियन रायडरलाही हेल्मेट असतंच. त्याशिवाय इतर प्रॉपर रायडिंग गियर घातला नाही तर स्ट्रीट७५० वर बसण्यात मजा नसते.

पण सीटबेल्टसाठी मात्र पुणे पोलीसांचं स्पेशल अभिनंदन पुन्हा एकदा.

>>> इब्लिस | 14 November, 2014 - 20:42 नवीन

बेफि, पुणे पोलीसांचं काय घेऊन बसलात? आपले मुमं देखिल जातात की विदाऊट हेल्मेट. शिवाय मी तरी हेल्मेटशिवाय टूव्हीलर चालवत नाही. अगदी पिलियन रायडरलाही हेल्मेट असतंच. त्याशिवाय इतर प्रॉपर रायडिंग गियर घातला नाही तर स्ट्रीट७५० वर बसण्यात मजा नसते.

पण सीटबेल्टसाठी मात्र पुणे पोलीसांचं स्पेशल अभिनंदन पुन्हा एकदा.
<<<

इब्लिस,

एक वेळ स्वयंचलीत दुचाकी हवी तिथे वळवता येणार नाही (पुण्यातसुद्धा), पण कुठलाही धागा राजकारणाकडे (विदाऊट हेल्मेट) वळवण्याचे तुमचे कसब अफाट आहे. Light 1

>>>हेल्मेट घातलं तर १लिटर पेट्रोल फुकट आहे.<<<

आम्ही दहा लिटर पेट्रोल गरजूंना फुकट दिले तर हेल्मेटसक्ती रद्द होईल का?

राजकारणावर धागा गेलाच आहे... तर आगीत पेट्रोल.
ते मोदीराज्यात फुकट आहे. आता महाराष्ट्रपण मोदिराज्य झालंय.... Light 1

<<< An old saying goes something like this: If you've got a $20 head, buy yourself a $20 helmet. >>>

चेसुगु,
ऑम्नी इतकी आवडते, तर तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत.
१. मारूती कंपनीच्या पाठी लागून चांगला सीटबेल्ट बसवायला भाग पाडणे.
२. चांगला सीटबेल्ट स्वतः इन्स्टॉल करून घेणे. आपल्याला हव्या त्या कंपनीचा सीटबेल्ट बसवून घेता येईल २-३ हजारात.

>>>२. चांगला सीटबेल्ट स्वतः इन्स्टॉल करून घेणे. आपल्याला हव्या त्या कंपनीचा सीटबेल्ट बसवून घेता येईल २-३ हजारात.<<<

असे होऊ शकत नाही. बेसिक डिझाईन असे असते की कोणताही सीट बेल्ट तसेच बिहेव करेल. पुढे पोट सुटेल म्हणून स्ट्रेचेबल कापडाचा टी शर्ट घेण्यासारखे नाही आहे ते! कसाही टी शर्ट घेतला तरी ढेकर येईल असे डिझाईन आहे ते!

कृपया असंबद्ध लिंका डकवू नयेत.

(तुमच्या क्लिनीकप्रमाणे येथेही पाटी लावायला हवी. जे लिंका डकवून मुद्दा प्रस्थापित करू पाहतील त्यांना सर्व्हर स्पेस इतक्या इतक्या वाढीव किंमतीला मिळेल) Light 1

सीट बेल्ट्स हे त्यांच्या लोड लीमिटर कॉन्फिगरेशन प्रमाणे काम करतात. प्रत्येक गाडीच्या structural performance प्रमाणे हे लोड लीमिटर design/tune केलेले असतात.
थोडक्यात

बेसिक डिझाईन असे असते की कोणताही सीट बेल्ट तसेच बिहेव करेल>> हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे.

फार पूर्वी युरोपात एका व्हॅनच्या मागे काही मुले खेळत होती. व्हॅनच्या ड्रायव्हरने पॅनेलवरील बटन दाबून व्हॅनचे मागचे दार उघडले. ते खाडकन उघडले गेले आणि त्याचा धक्का बसून एक मुलगा मेला. त्याच्या पालकांनी ऑटो मॅन्युफॅक्चररवर केस केली व त्यात त्यांना प्रचंड नुकसान भरपाई मिळाली व सर्व गाड्या रिकॉल करण्यात आल्या.

४८ तासांपूर्वी टोयोटाने सव्वा लाख कॅमरी रिकॉल करण्याचे प्रयत्न केले व त्यातील ११९ परत आल्या.

डिझाईन प्रॉब्लेम्स असताना 'नवा सीट बेल्ट कसा लावावा' ह्या लिंक्स सुसंगत ठरत नाहीत.

>>>प्रत्येक गाडीच्या structural performance प्रमाणे हे लोड लीमिटर design/tune केलेले असतात.<<<

तिथेच चूक झालेली असू शकते व ती डिझाईनची चूक आहे.

(तुमच्या प्रतिसादात तुम्ही डिझाईन हा शब्द वापरल्याबद्दल धन्यवाद)

बेफि,
तुमचे डिझाइन प्रॉब्लेमॅटिक आहे असा चर्चाप्रस्ताव मांडतो, व त्यावर चर्चा व्हावी असे सुचवितो.

एक फोरेन्सिक मेडीसिन नामक प्रकार असतो. त्यात मानवाला कोणत्या परिस्थितीत, कोणत्या हत्याराने, वा वस्तूमुळे कोणत्या ईजा कुठे, कशा होऊ शकतात व त्या कश्या टाळाव्यात, व झाल्याच त्यांचे उपचार कसे करावेत? अन उपचार न करण्याच्या परिस्थितीत मृत्यू आलाच, किंवा अपंगत्व आलेच, तर ते का आले असावे हे कसे शोधावे? इ. बाबींचा अभ्यास (शाळेत असतानाच) असतो. तात्पर्य, सीटबेल्ट, त्यांचे डिझाईन, वापर, इ. बाबींचा अभ्यास करून मग मी "असंबद्ध" लिंका डकवीत आहे.

समझे कुछ? पण ते डीझाईन प्रॉब्लेमच्या चर्चेत येईलच Wink

वैयक्तीक रोख असलेला प्रतिसाद!

असो!

चेतन सुभाष गुगळे ह्यांच्यामते पर्टिक्युलरली ओम्नीचा सीट बेल्ट त्रास देतो. ह्याचा अर्थ तो डिझाईन प्रॉब्लेम असणार! अन्यथा मारुतीच्या सर्वच मॉडेल्सना हा प्रॉब्लेम झाला असता. जर हा प्रॉब्लेम फक्त चेतन गुगळे ह्यांनाच भेडसावत असेल तर माहीत नाही, पण सर्वांना भेडसावत असेल तर तो डिझाईन प्रॉब्लेम आहे. मी ओम्नी चालवली आहे (एक्स्प्रेस हायवेवर), पण मला सीट बेल्टमुळे त्रास झाला नव्हता. पण मी एकदाच, एकच दिवस चालवली आहे. गुगळेंचा अनुभव बराच दीर्घ आहे, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यावर विसंबून लिहीत आहे.

मारुतीच्या इतर मॉडेल्समध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. ह्याचे कारण बहुधा दुर्योधन म्हणतात त्याप्रमाणे असेल व नंतर रीसर्च झालेला असेल.

मी जेव्हा मारुतीला सप्लाय करायचो तेव्हा मारुती जस्ट जॅपनीज अधिपत्यातून भारतीय होऊ पाहात होती व असे प्रॉब्लेम्स अनेक काँपोनन्ट्समध्येही जाणवत होते.

बाय द वे, चारचाकीचा सीट बेल्ट प्रॉब्लेमॅटिक असण्याचा माझा स्वतःचा एकही अनुभव नाही हे येथे नोंदवणे आवश्यक मानतो.

>>> इब्लिस | 14 November, 2014 - 21:17 नवीन

पहा, किती खुबीने तुम्ही चर्चा राजकारणावरून डिझाईनवर वळवली आहे. शाब्बास. अन शुभरात्री.
<<<

नव्हे इब्लिस!

चर्चा हेल्मेट (डोक्याचे संरक्षण) वरून सीट बेल्ट (हृदयाचे संरक्षण प्रामुख्याने) वर वळली आहे.

ह्याचे कारण ह्या क्षणी मेंदूपेक्षा मनाप्रमाणे वागणार्‍यांची येथील संख्या अधिक असावी.

Light 1

Pages