मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

धन्यवाद. सोपं होतं. आम्हा सीनियर्सना काँप्यूटरच्या सगळ्याच गोष्टी विनाकारण अवघड वाटतात.

हे नक्की कुठे लिहावे हे शोधुन शोधुन शेवटी इथे लिहीत आहे.

गेले ४-५ दिवस मुख्यपान वा नविन लेखन वा कोणतेही पान ज्यात अनुक्रमणिका दिसते ते पान उघडताना तब्बल २ मिनिटे लागत आहेत त्यामुळे अतिशय त्रासदायक होत आहे. वायरस नाही. desktop खुप जलद आहे, आधी पाव सेकंदात पाने उघडायची.
काय करावे? connecting to pagead2.googlesyndication.com हे दिसते कोणतेही पान उघडताना.
मायबोलीला रामराम ठोकायची इच्छा होण्याआधी प्लिज मदत करा.
virus नाही, history clean केले तरी फरक नाही.

@सुनिधी ,ब्राउजर अॅड्रेस मध्ये ही लिंक पेस्ट करूनhttp://www.maayboli.com/new4me_all बुकमार्क करा. नंतर मायबोली विँडो बंद करून ह्याच बुकमार्कवर क्लिक करून पान लवकर उघडते का ते पाहा.

गेले दोन दिवस धाग्यांवरच्या न वाचलेल्या पोस्ट्स वाचल्यावर back बटनने मागे गेल्यास पुन्हा न वाचलेल्या म्हणून दिसत राहतात. If I see 10 unread posts on a thread and click on it to read, after hitting the back button to go to home page I find those 10 posts as unread. This did not happen before. Is this a browser issue?

ब्राउजरच्या फ्लोटिंग मेमरीमधले (cache)पेज तेच दिसणार अनरेडमधले. आता तुमचा ब्राउजर पुर्वीसारखा BACK बटन क्लिक केल्यावर cache मेमरी क्लीअर करून पेज रिफ्रेश करत नसेल. हीच गोष्ट इमेल पाहतानाही दिसेल. आताची cache मेमरी जास्ती असल्यास ब्राउजर बरीच पेजिझ धरून ठेवत असणार. पूर्वी ती क्षमता कमी असल्यामुळे जुने पेज काढले जात असावे . back बटन प्रेस केले की स्टेटस विंडोत तुम्हाला समजेल नवीन पेज येते आहे का नाही ते.

srd
तुम्ही ४ नोव्हें ला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर - pdf मध्ये उघडत नाही.

तुम्ही divshare.com ची एक लिंक पाठवली होती. त्यावर जाऊन पाहिलं. ते paid स्टोरेज दिसत आहे. त्यापेक्षा mediafire फुकट आहे.

स्वीट टॉकर, 1) http://www.office-converter.com/Convert-to-Doc येथे तुमची फाइल वर्ड (DOC)मध्ये कन्वर्ट करून नंतर कॉपीपेस्ट होते का पाहा.
2)divshare साईट पेड नाही इथे अकाउंट बनवून तुमच्या फाईल अपलोड करून लिंक्स कोणालाही पाठवता येतात मी तुमची फाईल वर्डमध्ये अपलोड केलीय त्याचे डाउनलोड होत नसावे.

सुनिधी ,अजुनही googlepage2.ad.syndicate वगैरे मायबोलीच्या अॅड्रेसला चिकटले असेल तर

हे करून पाहा:
१)-a)Clear all Cookies करा म्हणजे त्याला चिकटलेले पान निघेल नंतर,
b)accept cookies करा आणि पुन्हा लॉगिन केल्यावर ते बुकमार्क करा.

१-a केल्यावर तुमच्या सर्वच मेल ,फेसबुक इ॰चे लॉगीन (=remember password)निघून जाते आणि पुन्हा करावे लागते इतकेच.

२]दुसरा एक तात्पुरता उपाय:
settings मध्ये keep images off/select bandwidth minimum केल्यावर फोटो लोड होत नाहीत आणि वेबसाइटचा डेटा ७०टक्के कमी होतो फक्त मजकूर येतो.

मी दिलेली लिंक दुसऱ्या मोबाइल/कम्प्यु॰ मध्ये उघडून खात्री करा.

ऑफलाइन लिखाण करून कॉपी पेस्ट करण्यात बर्‍याच अडचणी येत आहेत.
इथेच करावं असं ठरवलं पण 'अपूर्ण' ठेवण्याचा चॉइस येत नाही. काय करावे?

गुलमोहरमध्ये ललित लेखांत ( अंध)श्रद्धेची ऐसी की तैसी नावाचा एक लेख लिहिला आहे. तो 'विनोदी लेख' या ग्रुपमध्ये टाकायला विसरलो. आता टाकायचा आहे. काय करावे लागेल? पुन्हा कॉपी पेस्ट का दुसरी कोठली पद्धत आहे?

नमस्कार,मी मायबोलीची नवीन सभासद आहे.माझी कविता आणि बालकथा मी लॉग इन केल्याशिवाय दिसत नाही.इंतर लेखकांच लेखन मायबोली पान उघडल्यावर हवे ते सदर उघडल्यावर लगेच दिसते.माझे तसे दिसत नाही.का? कृपया माझी ही अडचण निवारण्यात यावी. धन्यवाद.

अ‍ॅडमिन, माबोवर काही धागे हे नेहमीच वादग्रस्त आणि युद्धसदृश असतात, तसेच काही धागे निरर्थक असतात.
असे धागे बंद करून पुर्णपणे काढले जावेत ही विनंती.

http://www.maayboli.com/node/42776
http://www.maayboli.com/node/51918
http://www.maayboli.com/node/52016

अ‍ॅडमिन माझी संपर्क-सुविधा २०१५ च्या नविन वर्षांत चालु होईल का ? कृपया योग्य कार्यवाही करावी.किमानपक्षी काहीतरी उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे.धन्यवाद.

सुलेखा यांच्याप्रमाणे माझी देखील संपर्क सुविधा खुप काळ झाला चालू नाहीये. Sad
लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, धन्यवाद !

अ‍ॅडमिन, माझाही संपर्क कित्येक महिने दिसत नाहिये. काही करता येईल का प्लीज?
सेटिंगमधे अ‍ॅक्टिव्हेटेड आहे सुविधा.

सुलेखा आणि महेश, तुमच्या दोघांची संपर्क सुविधा चालू आहे. तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसते आहे. संपर्क टॅब तुम्हाला दिसणार नाही, इतरांना दिसेल.
संपर्कातून ईमेल मिळत नसतील तर वेबमास्तरच काय तो उपाय करतील.

सई., अवलोकन पुन्हा एकदा तपासशील का?

मंजूडी, अहो आमच्या स्वतःच्या संपर्क टॅब बद्द्ल नाही हो, आम्ही स्वतःलाच कशाला मेल पाठवू ? Sad
मी जर कोणाच्या प्रोफाईल मधे जाऊन त्या व्यक्तीला संपर्कातुन मेल केले तर त्या व्यक्तीला ते मिळत नाहीये.
अन्य कोणी माझ्या प्रोफाईल मधे येऊन मला संपर्क केला तर मला त्यांचे मेल मिळत आहे.

महेश, तुम्ही लिहिलं आहे की <<माझी देखील संपर्क सुविधा खुप काळ झाला चालू नाहीये.>> आणि आता तुम्ही लिहिताय की <<अन्य कोणी माझ्या प्रोफाईल मधे येऊन मला संपर्क केला तर मला त्यांचे मेल मिळत आहे.>>

मी जर कोणाच्या प्रोफाईल मधे जाऊन त्या व्यक्तीला संपर्कातुन मेल केले तर त्या व्यक्तीला ते मिळत नाहीये.>> यासंदर्भात मी आधीच लिहिलं आहे की << संपर्कातून ईमेल मिळत नसतील तर वेबमास्तरच काय तो उपाय करतील. >>

Pages