आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

  1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
  3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
  4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
  6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
  7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
  8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
  9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
  10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
  11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
  12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
  13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
  14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
  15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
  16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
  17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
  19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
  20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
  22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

  1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
  2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
  3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
  4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
  5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंदिया गोस्वामी.....??>>> मॅरीड टू जे पी दत्ता/ तिने रेफ्युजीचं कॉस्च्युम डीझाईनिंग केलेलं.

तिची मुलगी लवकरच सिनेमामध्ये येत आहे.

जुन्या चित्रपटांमधले त्रिपाठी, मल्होत्रा, शर्मा, शंभूकाका, हरीकाका, रॉड्रीग्ज, मिसेस ब्रिगँझा ही नावं असलेली पात्रं हमखास दिसायची.
आता ही नावं कोणी घेत नाहीत सिनेमांमधे. कुठे गेले सगळे? Proud

बिंदिया गोस्वामी या छान दिसायच्या मला परवीन बाबी पेक्षा तीचा अभिनय गोड वाटतो .मी तीला फक्त (जुना)गोलमाल आणि शान मधे पाहिलय ,शान मधले डबलडेकर बस मधलं गाणं फक्त आठवतं .अमिताभ ,शशी कपूर आणि त्या दोघी चोर असतात असं काहीसं आहे त्यात.

महेश -- मा राजू मोठा झाल्यावर मी अजुन गोविंदाच्या 'खुद्दार' मधे पाहीलाय ,निगेटिव रोल केलाय त्याने. अंध झालेल्या करीश्माला मारण्याचा प्रयत्न करत असतो तो तीचा दीर असुनही.

मौसमी चॅटर्जी यांचा अंगुर मस्त होता. आ अब लौट चले , डोली सजाके रखना ,हे शेवटचे दोनच चितपट ज्यात योगायोगाने त्या अक्षय खन्नाच्या आई झाल्या आहेत.त्यातला 'डोली सजाके रखना' फक्त बघण्यासारखा आहे .दुसरयाकडे डुंकुनही पाहु नका . Happy .

बिंदिया गोस्वामी ही हेमा मालिनीची लूक अलाईक म्हणून इन्ट्रोड्यूस झाली होती.प्रसन्न व्यक्तिमत्व वगळता अभिनयात बोम्ब असल्याने फारशी चालली नाही.

images_5.jpg

शोमा आनंद. ती बरेच हिंदी पिक्चरमध्ये असते,

तसवीरीतली गेलेली आई- प्रिया तेंडुलकर. काय ब्रिलियंट कन्सेप्ट होती.

हेमा मालीनीची लुक अलाईक होती हे माहीत नव्ह्तं तसंही मी वर सांगितल्याप्रमाणे मी तीला फक्त (जुना)गोलमाल आणि शान मधे पाहिलय .ज्यातला गोलमाल च्या गोष्टीमधे तिचा वावर मस्त वाटलेला आणि गाण्यातही. हेमा मालीनी आवडत जरी असल्या तरी तीचे "नही...." कण्ह्ल्यासारखे आवाज कधीकधी सहन होत नाहीत.

खुबसुरत मधला राकेश रोशनचा भाऊ रणजित चौधरी- यांना टीना मुनीमच्या एका जुन्या गाण्यात पाहीलेलं .चित्रपट पाहीला नाही तो. त्यात पारशी की ख्रिश्चन दाखवले आहे.'फायर' नंदिता दास वाला मधेही नोकराच्या भुमिकेत होते .आणखिन एक इंडोइंग्लिश चित्रपट आला होता 'बॉलीवूड हॉलीवूड' त्यात अक्षय खन्नाचा भाउ राहुल आणि लीजा रे होती .त्यातही ते होते असे गुगल दाखवते आहे .मी चित्रपट नाही पाहीला फक्त मला त्यातलं सोनु निगम आणि अलीशा चिनॉय चे गाणं आवडलेलं .ते हे ' रंग रंग मेरे रंगरंगमे --संग संग मेरे संगसंगमे संग आएगा तु संग'
http://www.youtube.com/watch?v=vH1qfK2n_nE .
त्यातही मौसमी चॅटर्जी एका वयस्क भुमिकेत आहे.

शोमा आनंद नंतर परेश रावल बरोबर हंगामामध्ये होती.. धमाल आणली होती या जोडीने.. त्यातही परेश रावलचे डायलॉग्ज फक्त त्याच्यासाठीच लिहीले गेल्यासारखे होते.. टोटल Rofl

<< शान मधे तो एक अपंग खबरी असतो, तो कोण ? अजुन कोणत्या चित्रपटात होता, तसेच आता काय परिस्थिती ? >>

मजहर खान. बुनियाद मध्ये आलोक नाथचा क्रमांक २ चा मुलगा होता. भवानी जंक्शन चित्रपटात खलनायक. गँग नावाच्या चित्रपटाचा निर्माता. झीनत अमानला छळणारा प्रत्यक्ष आयुष्यातला तिचा नवरा. आता या जगात नाही.

ओह, आठवले मजहरखान, निवर्तल्याचे माहित नव्हते. Sad

एफआयआर मालिकेतली सर्व धमाल पात्रे आता काय करत आहेत ?

<<झीनत अमानला (प्रत्यक्षात ) छळणारा बहुतेक कुर्बानीतला हिरो होता ना ?>>

तो तर फिरोझ खान. त्याच्याविषयी असे काही ऐकले नाही. उलट तो छंदी फंदी असला तरी दिलदार होता अशीच 'ऐकीव' माहिती आहे.

जुन्या झी टिव्हीवर "हिप हिप हुर्रे" नावाची मालिका होती.. त्यातले कलाकार आजकाल काही ठिकाणी सपोर्टिंग रोल्समध्ये दिसतात.. मला त्यांची नाव कळु शकतील का? त्यामधली एक मुलगी सुश्मिता सेनच्या वास्तुशास्त्र या हॉरर मुव्हीमध्ये पण होती..

@ अनु - हो हो तोच देवांग पटेल.

शादी के लिये मै तो बच्चा हु, सौ साल का छोटा बच्चा हु.
दारासिंग मेरा चेला है
मैने एव्हरेस्ट पे फुटबॉल खेला है.

भारी गाणं होतं. Lol

मुग्धटली..हो आठवते हिप हिप हुर्रे.
त्यातली आनखी एक मुलगी सध्या सुरु असलेल्या "एक हसीना थी" मध्ये आहे. त्यात सिमॉन सिंग च्या नवर्‍याचं अफेअर जिच्याशी असतं ती. नाव आठवत नाही.

मूळ धाग्यात १७ व्या स्थानावर उल्लेख असलेली पल्लवी कुलकर्णी ही अभिनेत्री आता पुन्हा सोनी वाहिनीवरील इतना करो ना मुझसे प्यार या मालिकेद्वारे येत आहे.

कोहिनूर मालिकेचं टाय्टल साँग फारच आवडायच ( अजुनही आवडतं http://www.youtube.com/watch?v=URJyQ_-Ao_E ) . त्यातल्या कलाकारांबद्दल काही माहिती आहे का कोणाला. ( मालिका पाहिली नव्हती तेव्हापण ) .

<< दक्षिणा | 28 October, 2014 - 14:03

माझी अशी इच्छा आहे की या धाग्यावर मी लवकरच यो यो हनी सिंग बद्दल लिहावं.
तो का गायब होत नाही :रागः
>>

दक्षिणा, तुमच्या प्रमाणेच अनेकांना या गायकाविषयी प्रचंड राग आहे. हे वाचा:-

हनी सिंगचा अपघातात मृत्यू झाल्याची अफवा

यो यो हनी सिंह की किडनैपिंग की साजिश

अब यो यो हनी सिंह की ट्विटर पर उड़ी खिल्लियां

यो यो हनी सिंह को शाहरूख ने नही मारा थप्पड़

किसने मारा हनी सिंह को थप्पड़?

हनी सिंगच्या निधनाची बातमीने सोशल मीडियात खळबळ

बदनामीचा कट्टा

सोनाली बेंद्रेची एक मालिका आली आहे : अजेब दास्तां है ये. त्यात फिरदौस दादी सोनालीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. अस्तित्व एक प्रेम कहानीमध्येही ती नायिकेची बहीण झाली होती.

गेल्या आठवड्यात स्वरूप संपत एका गुजराती कुकरी शोमध्ये दिसली. पी एचडी इन एज्युकेशन करून आता ती गुजरातमधल्या शिक्षकांसाठी काही प्रोग्राम्स चालवते. परेश रावलशी तिचे लग्न झाले हे तर माहीत असेलच.

हेमा सरदेसाइची काही चांगले गाणे ऐकली होती.
अल्बम देखील होता.
नंतर ती अचानकच गायब झाली.

आवारा भवरे ची गायिका.

ती हेमा सरदेसाई आणि जसपिंदर नरूला. दोघीही जिथे जातील तिथे आपलं आपलं एकच गाणं गायच्या.
हेमा आवारा भंवरे आणि जसपिंदर प्यार तो होना ही था.... नंतर नंतर बोर व्हायला लागलं. Sad

अरे अजून एक सिरियल होती. त्यात तो वरूण बडोला होता, त्याचं लग्न त्याच्यापेक्षा मोठ्या बाईशी झालेलं असतं. ती डॉक्टर असते आणि दिसायला माधुरी सारखी होती. आणि तो बहुतेक फोटो ग्राफर असतो. आणी नंतर त्याला असिस्टंट म्हणून एक मुलगी येते. त्या दोघी परत कधी दिसल्याच नाहित.

तीच ती अस्तित्व एक प्रेमकहानी. सिमरनचं काम करणारी लंडनला सेटल झालीय.

कोणीतरी मागच्या पानांवर कहानी घर घर मधल्या पल्लवीबद्दल लिहिलंय. ती श्वेता क्वात्रा. मानव गोहिलशी लग्न केलं. ते दोघे एकदा खिचडीवाल्यांना मॅनर्स, एटिकेट्स शिकवायला आले होते.

एफआयआर मालिकेतली सर्व धमाल पात्रे आता काय करत आहेत ?
<<<<< एफआयआर मालिकेतच काम करत आहेत. चालू आहे ती मालिका अजून.

Pages