फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहाण मुलांना फटाके आवडतात, अन लहान मुले फटाके वाजवणारच, असे सुलु म्हटल्यात ना? मग हट्ट काये परत? कुणाला फटाके वाजवायला आवडतात. आम्हाला वाजवायला आवडते Wink आम्हीही "वाजवणार"च!

<<मी गेली 2 वर्ष फटाके न वाजवता त्याऐवजी गरीब मुलांना मदत करणार्या संस्थांना मदत करतो.>>
फटाके उडवून पण करता येते मदत!

इब्लिस,
बजाओ!

प्रथम म्हात्रे, तुम्ही फार छान उपक्रम सुरु केला आहेत. तुम्ही प्रदुषण कमी करायला मदत तर केली आहेच आणि शिवाय गरीब मुलांनाही मदत करता आहात. त्या वरच्या कुत्सीत कॉमेंट्वरुन त्यांना हा double benefit दिसला नाही. पण अशाकडे दुर्लक्ष करण चांगलं म्हणा.

Hahaha

इथल्या बहुसंख्य समंजस लोकांना फटाके वाजवल्यामुळे ध्वनी व वायुप्रदुषण होउन पर्यावरणाची हानी होते हे मान्य आहे.परंतु ते स्वतःला व मुलांना फटाके वाजवण्यापासून रोखू शकत नाहीत. गंमत म्हणजे पर्यावरणप्रेमी म्ह्णुन हेच लोक स्वतःला मानतात. त्यांच्या लेखी पर्यावरण म्हणजे झाडे लावणे, निसर्गसौंदर्य पहाणे, जमल तर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात सहभागी होणे वगैरे...
इथली माणसे ही काही सर्वसाधारण समाजापेक्षा वेगळी नाहीत. दिवाळी व फटाके यांचे मेंदुतील असोसिएशन हे काही पिढ्यांचे आहे. ते एकदम जाणार नाही. त्यामुळे पर्यारणाची हानी होते आहे हे कळत असूनही ते आपल्या फटाके वाजवण्याचे समर्थन देत राहतात. एखादा व्यसनी जसे व्यसनापासून होणारे तोटे माहित असुनही आपल्या व्यसनाचे समर्थन देत राहतो. तसेच काहीसे. याला एक प्रकारचा कॉग्निटिव्ह डिझोनन्स म्हणतात.
काही वैज्ञानिक दृष्टीकोन पटलेली मुले व माणसे मात्र आपल्यात हळू हळू बदल घडवून आणतात. फटाके वाजवणे कमी कमी करत बंद करतात. समाजात बदल घडण्याची प्रक्रिया इथूनच चालू होते. सकारात्मक बदलाचा वेग कूर्मगतीने असतो. एखादी गोष्ट बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला मात्र वेळ लागतो.

Petrol aani diesel var chaalnari vahane vaparne pan band karuya. Air conditioner aani fridge pan nako. Haha.

प्रदूषणाची तीव्रता, प्रदुषणाचे प्राधान्य व प्रदुषणाची अपरिहार्यता याही बाबी महत्वाच्या आहेत.

काल आम्ही मुलांबरोबर खूप फटाके उडवले. खूप प्रदूषण केले. बाजुच्या घरातले एक काका जे पर्यावरण बचाओ आन्दोलनात नेहेमी सक्रीय असतात ते रात्रीचा सुट्टा मारायला घराबाहेर आले होते. आम्ही प्रदूषण करतो म्हणून आम्हाला खूप ओरडले. धाकट्या बन्डू ने त्यान्च्या दिशेने एक अनार लावला. ते घरी पळून गेले.

या धाग्याला चार वर्ष झाली. आता या चार वर्षात विचारश्रेणीत काय काय बदल झालेत? किमान आपल्यात काय बदल झालेत याचे आत्मपरिक्षण या निमित्त करावे. अनेक प्रथितयश व्यक्तींनी फटाके मुक्त दिवाळीसाठी आवाहन केले आहे.

मुंबईत दिवाळीची सुट्टी पडली की मुले फटाके वाजवायला सुरुवात करतात. अजुनतरी कुठे फटाक्यांचा विशेष असा आवाज ऐकू आला नाही.

विचार श्रेणीत बदल झाल्याचे जाणवले नाही पण आज हा धागा पहिल्यापासून वाचला तेव्हा मंजो च्या आयडी नामात अनेक बदल झाल्याचे जाणवले Happy
लक्ष्य काय, चायवाला काय, कोकणस्थ काय
बहार उडवून दिलीये

........आज हा धागा पहिल्यापासून वाचला तेव्हा मंजो च्या आयडी नामात अनेक बदल झाल्याचे जाणवले>>>>
एक भाबडा प्रश्न
जर एखाद्या युजरने आपला आयडी बदलला तर त्याच्या आधीच्या प्रतिक्रियांना जुना आयडी दिसतो की नवीन (बदललेला)???

युजरने आपला आयडी बदलला म्हणजे नवा आयडी काढला. आता त्या नव्या आयडीच्या नव्या कपड्या मागची व्यक्ती हीच जुन्या कुठल्या आयडीचा आत्मा आहे का? त्याची जीर्ण झालेली वसनं कुठे गेली का नाही हे प्रुव्ह करायचा कुठलाही मार्ग बरमदेवालाही माहित नाही.

नाही काही, मायबोलीवरील लोकांना बराब्बर कळतंय. Happy १७वा आयडी आला तरी पहिल्या आयडीनेच प्रेमळ साद घालतात. Proud Proud

एक सरदारजी वेगवेगळे वेष घेउन दुकानात जाउन एका वस्तूची चौकशी करतो. तो दुकानदार ते ओळखून त्याला नेहमी हाकलून देतो. असा काहीतरी जोक पुसट आठवतो.

हो तसेच पण आम्ही मंजो ला घालवून देत नाही, त्यांच्याच कर्माने ते शहीद होतात आणि पुन्हा हिरिरीने नवा आयडी ने अवतार घेतात.
सांप्रद अवतार कितवा हे त्यांनाही सांगणे शक्य होणार नाही कदाचित.

आणि कुठल्याही नावाने आले तरी कुठे ना कुठे त्यांचा पुराण पुरुष डोकावतोच त्यामुळे कळतेच की आलेले आहेत Happy

या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ दिली हे महत्वाचे आहे. अंनिस ने केलेल्या फटाके मुक्त दिवाली या आवाहनाला दर वर्षी प्रतिसाद वाढतो आहे.

या वर्षी लक्ष्मी पूजन सोडता फटाके खूपच कमी होते,
पुण्यात कोठल्याही सक्तीशीवाय हे झालेले आहे. केवळ आणि केवळ प्रबोधनांने हा परिणाम साधला आहे.
या वरून खालील पैकी काय म्हणता येईल?

1) अनिर्बंध फटाके उडवणे गैर आहे, थोड्या प्रमाणात फटाके उडवून सणाचा आनंद घेता येतो हे बहुसंख्य लोकांना पटले.

2) कमी/शून्य फटाके फोडणे म्हणजे संस्कृती/धर्माशी प्रतारणा करणे नव्हे हे बहुसंख्य लोकांना मान्य आहे

3) वरील दोन्ही करणे नाहीत, लोकांना तितकेच फटाके उडवायचे होते ,पण मंदी मुळे हातात पैसे नाहीत म्हणून लोकांना फटाके विकत घेता आले नाहीत

पूर्वी लहान मुले विरंगुळ्यासाठी मैदानी खेळ खेळत. विरंगुळ्याची साधने कमी होती त्यामुळे फटाके वाजवणे त्यांना दिवाळीचा अत्यावश्यक भाग वाटे. आता घरबसल्या फोन, गेम बॉक्सवर तासनतास घालवता येतात. त्यामुळे फटाके न वाजवणे त्यांच्या साठी काही फार विशेष नाही.

या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ दिली हे महत्वाचे आहे.
>>>

फेसबूकवर त्यांचा आपल्या कुटुंबियांसह फटाके वाजवतानाचा फोटो फिरत होता आणि त्यांना याच शपथेची आठवण करून दिली जात होती.
अर्थात तो फोटो खरा कि खोटा की गेल्यावर्षीचा याची कल्पना नाही.

vt220 मुद्दा योग्य आहे.
फटाके वाजवणे हा एक मैदानी खेळ आहे आणि या पिढीत मैदानी खेळ मुळातच कमी होत आहेत.
मला वाटते उद्या मला माझ्या मुलांना सांगावे लागेल, काय रे नुसता घरात फराळ चिवडत त्या मोबाईलमध्ये शुभेच्छा शुभेच्छा खेळत असतोस. जरा बाहेर पड, फटाके उडव, धूर काढ, माहौल बनव Happy

फटाक्याच्या वाढलेल्या किंमती हेच एक महत्वाचे कारण होते.
बाकी वर कोणतरी उल्लेख केल्याप्रमाणे लहान मुले जास्त उडवत नाहीत तर दुकानदार जास्त, अतिप्रचंड प्रमाणात फटाके उडवतात.
आणि त्यांचे प्रबोधन होणे अशक्यप्राय आहे. चार दिवसांपैकी फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रचंड फटाके उडाले, पार अगदी श्वास कोंडून टाकला

सिंबा आपण दिलेल्या पर्यायापैकी खालील दोन पटतात

1) अनिर्बंध फटाके उडवणे गैर आहे, थोड्या प्रमाणात फटाके उडवून सणाचा आनंद घेता येतो हे बहुसंख्य लोकांना पटले.

2) कमी/शून्य फटाके फोडणे म्हणजे संस्कृती/धर्माशी प्रतारणा करणे नव्हे हे बहुसंख्य लोकांना मान्य आहे

Pages