फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फटाके न उडवण्याचा आणि "हिंदू धर्म खतरे मे है" याचा काय संबंध?

पैसे उधळायला किती मार्ग आहेत, फटाके फोडून दुसर्‍यांना त्रास देऊन काय मजा मिळते?

>>>>>>> फटाके लाऊ नका प्रदूषण होतं
दिवे लाऊ नका > तेल/तूप यांचा नाश होतो
आकाशकंदील लाऊ नका > वीजेचा अपव्यय होतो
फराळ बनवू नका > पुन्हा, तेल/तूप यांचा नाश होतो आणि अतिरिक्त साखर पोटात जाते
नारळ फोडू नका > अंधश्रद्धा आहे. शिवाय नारळ फुकट जातात
उदबत्ती/धूप लाऊ नका > कित्ती कित्ती प्रदूषण होतं
फुले वाहू नका > निसर्गाची हानी होते
रोषणाई करु नका > प्रकाशप्रदूषण होतं, वीजेचा अपव्यय होतो
घंटा वाजवू नका > ध्वनीप्रदूषण होतं <<<<<<<<< लक्ष्य.... Lol Lol Lol

मला वेगळीच शन्का येत्ये, ते नै का? कोब्रांच्या काटकसरीच्या अतिरंजित गोष्टींमधे एकाची गोष्ट सांगतात की गरज नसताना दिवा मालवणे, व दिवा मालवल्यावर अंगावरील पंचा काढून घडी करुन ठेवणे, तर तशा प्रकारचा काही "मानसिक गंड" या प्रकारच्या सूचना करणार्‍यान्ना झाला असावा, किंवा एखादा "कोब्रा" चावला असावा. काही नक्कोच!

लिंटिं, तुम्हाला दम्याचा त्रास आहे, असे वाचल्याचे आठवते. तुम्ही दिवाळीच्या चारही पहाटे आणि रात्री....नको नको....तेवढेच नको...थेट तुळशीच्या लग्नापर्यंत रोजच फटाके फोडायला नक्की जा. फटाके फोडतानाचे, (पेटत्या)अनार -भुईचक्राच्या शेजारी उभे राहून आनंद घेतानाचे फोटो नक्की टाका हं. मोठ्ठा आवाज करणार्‍या फटाक्यांची गंमत नात्यातल्या अगदी रांगत्या किंवा त्याहून लहान मुलांना नक्की दाखवा. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही.

मी नताशा, भरत-

माझ्या मुलांना सांगीतलेले, (अजून लहान असल्याने वय वर्षे ८ आणि ६) आई-बाबा सांगताहेत म्हणजे बरोबरच असणार असे वाटून तत्वतः पटते पण बाकीचे उडवायला लागल्यावर पहिले पाढे पंच्चावन्न होतात. Sad हा मागच्या वर्षीचा अनुभव आहे. मागच्या वर्षी आम्ही फटाके (आधी पासून न आणता) दिवाळीच्या दिवशीच आणले.

आणि खरेतर त्यांचे, विशेषतः धाकट्याचा फूलबाज्या उडवताना नुसत्याच प्रकाशाने नव्हे तर आनंदाने उजळलेला चेहरा पाहीला की बाकी सर्व झूठ असेच वाटते.

मी सध्या "मुलांना फटाके आणूयात असे आपणच सांगून प्रोत्साहन अजीबात न देणे; त्यांनी मागितल्यावर समजावण्याचा प्रयत्न करणे; आणि अगदीच, सगळे मित्र उडवताहेत आणि माझी मुले त्यांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे बघताहेत असे दिसण्याच्या आत थोडे फटाके आणणे" या मोड मधे आहे. बहुतेक करून मी अजून दोनेक वर्षे थोडेतरी फटाके आणून देईन असेच वाटते. (ही माझी कमजोरी असू शकते)

फटाक्यांचे दुष्परिणाम, फटाक्यांच्या कारखान्यांतली बालमजुरी यांच्याबद्दल माहिती सांगता येईल>> हे नुसते तोंडी सांगण्याऐवजी यु टयुबवर काही मिळते आहे का ते बघायला हवे. अर्थात दीर्घ मुदतीच्या वापराकरता Happy

बहुतेक करून मी अजून दोनेक वर्षे थोडेतरी फटाके आणून देईन असेच वाटते. (ही माझी कमजोरी असू शकते)>>> काहीच हरकत नाही हर्पेन. मी आधी पण लिहीले होते की माझी मुलगी अपराधी भावनेने फटाके मागायची. आम्ही तिला थोडे फटाके जरूर आणून द्यायचो. लहानपणी मोह हा होणारच फक्त त्याचा अतीरेक होत नाही हे पहाणे हे आपले कांम.

हो हर्पेन. मुलांसाठी ज्यांत ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण ठळकपणे नाही असे फटाके आणा की. तुमची मुले लहान आहेत, म्हणजे त्यांना आवाजाच्या फटाक्यांचे आकर्षण अजूनतरी नसेल.

>>>> एरवी टवाळी सुरू असते. आता बरं सनातनची साईट दिसली. <<<<< Lol
तर तर, दिसणारच! वादाकरता वावदुकांन्ना कायबी चालते.
अन सनातनमधे असे आले असले तरी मला माझ्या पोस्ट मधील एकही शब्द बदलायची गरज वाटत नाही. उलट माझी पोस्टच सनातनवाल्यान्ना का पाठवित नाही तुम्ही मयेकरजी? Wink

सनातन वाल्यांचा फटाक्यांबाबतचा लेख आवडलाच. जी बाब पटली ती पटली म्हणाव मग ती कोणी का मांडेना!

फटाके न लावल्याने हिंदू धर्म / भारतीय संस्कृती यांना कसा काय धक्का पोचणार आहे? फटाक्यांचा शोध चीनमधे लागला ना? भग्वद्गीतेत कुठे श्रीकृष्णाने 'मामनुस्मर फटाक्यंच' किंवा 'फटाक्यांनां लवंगी अहं' असं म्हटलेलं दिसत नाही.

लहान मुलांना कळेलशा भाषेत पर्यावरणाबद्दल वगैरे सांगता येईल असं वाटतं. 'बाकीचे लोक करतात' याला "they don't know better" हे उत्तर देता येतं. आपण अनेक वेळा ते देतो. ('मग तो कसा बीफ खातो' या प्रश्नाला द्याल की नाही?)

अमेरिकेत सगळ्या राज्यांत घराघरांत फटाके लावणं अलाउड नाहीये. न्यू जर्सीत नाहीये. आम्ही आप्तेष्टांच्या सहवासात, यथाशक्ती रोषणाई आणि आवडीचे पदार्थ करून आनंदात दिवाळी साजरी करतोच की.

जिथे आपल्या प्रत्येक पूजाविधीतसुद्धा स्थलकालानुसारच सामुग्री वापरायची सूचना असते आणि आप्तेष्टांसह सुखाने काल व्यतीत करावा असं आवर्जून सांगितलेलं असतं तिथे आपण अमुकशिवाय दिवाळी कसली आणि तमुकशिवाय दसरा म्हणजे कैत्तरीच असं का धरून बसतो?

बाकी मोठी माणसं मोठ्या प्रमाणावर जे लावतात त्याला कायद्याच्या बडग्याशिवाय तरणोपाय नसावा.

फटाक्यांचे उत्पादन (कारखाने) आणि बालमजुरीचे भारतातील मोठे स्थान असलेल्या तमिळनाडूमधील शिवकाशी येथील फटाक्यांच्या कारखान्यातील बालमजुरीबद्दल हा माहितीपट :

Child Labour in the Sivakasi Fireworks Factories

हर्पेन,
भरतजीनी लिहिल्याप्रमाणे थोडेसे फटाके आणा. काही वर्षात मुलेच समजुतदार होतील. आजकाल मुले बरीच समजुतदार आहेत. रंगपंचमीला इको फ्रेंडली रंग, फटाके कमी ई ई.

चीन मधे शोधलेले फटाके हिंदु धर्माच्या अस्मितेचे प्रतिक झालेले पाहून डेव्ह चॅपेल चे एक प्रहसन आठवले.

अकुंनी लिंक केलेला माहितीपट पूर्ण बघू शकलो नाही. इतक्या लहान मुली आपला जीव धोकयात घालून फटाक्याच्या माळा बनवता आणी आपण केवळ पैसे आहेत म्हणून दहा सेकंदात ती माळ उडवून देतो Sad

>>>>

फटाके लाऊ नका प्रदूषण होतं > १००% खरे.. चीनमध्ये होतं.. युरोपात होतं.. भारतातही होतंच

दिवे लाऊ नका > तेल/तूप यांचा नाश होतो > लावा, पण अखंड दीप वै. तुम्ही पूर्वी करत नसलेल्या गोष्टी फॅड म्हणून करू नका, अपव्यय होतो.

आकाशकंदील लाऊ नका > वीजेचा अपव्यय होतो > रात्रभर सुरू राहीला तर होतो. आपल्याकडे असही दिवा संध्याकाळी लावण्याची पद्धत आहे, रात्रभर नव्हेच.

फराळ बनवू नका > पुन्हा, तेल/तूप यांचा नाश होतो आणि अतिरिक्त साखर पोटात जाते > हा वै. प्रश्ण आहे, तुम्हाला साखर चालत असेल तर खा की.. ज्यांना नको त्यांनी खाऊ नये. ह्याचा फराळाशी काय संबंध?

नारळ फोडू नका > अंधश्रद्धा आहे. शिवाय नारळ फुकट जातात > आम्ही फोडलेला, प्रसादात मिळालेला नारळ जेवणात वापरतो.. म्हणजे गोडाच्या जेफोडत, त्यामुळे वाया जात नाही. स्वतःहून नारळ चढवलाच पाहिजे अशी काही अट मी कुठे वाचली नाहिये.

उदबत्ती/धूप लाऊ नका > कित्ती कित्ती प्रदूषण होतं > होतं प्रदुषण .. कारण इको फ्रेंडली उद्बत्त्या नाही मिळत नेहमी. कापूर ठेवा की नुसता देवासमोर किंवा अत्तराचा फाया.. देवाला सुवासिक वाटण्याशी कारण.

फुले वाहू नका > निसर्गाची हानी होते > नाही का होत?

रोषणाई करु नका > प्रकाशप्रदूषण होतं, वीजेचा अपव्यय होतो > होतोच.. आकाशकंदील असताना रोषणाई कशाला लागते?

घंटा वाजवू नका > ध्वनीप्रदूषण होतं > घरातल्या घंटेने होत नसेल.. पण सार्वजनिक ठिकाणी होतचं.. शीतलादेवी मंदिराच्या बाजूला रहाणार्‍यांना विचारा.

<<<<

काहिही मुद्दे घ्यायचे.. वरच्या बर्‍याच श्रद्धांसाठी "मानसपूजा" सारखा सोपा उपचार आहे... हिंदु धर्म कधी कट्टरपणे प्रथा पाळा असे सांगत नाही. व्रते असली तर गोष्ट वेगळी, पण व्रतं वैयक्तिक असतात, सार्वजनिक नाही. ज्या गोष्टींनी समाजा ला त्रास होतो.. मग ती कुठच्याही धर्मातली असो, त्याज्यच आहे.

फटाक्यांबद्दल अनुमोदन कारण मला, लेकीला, दोघींनाही फटाक्याच्या धुराने खूप त्रास होतो.. गेली पाच वर्षे प्रत्येक दिवाळी जबरदस्ती शहरांपासून, माझ्या घरापासून मला दूर जाऊनच करावी लागते. दोन दिवस नाही तर वसु बरस ते देव दिवाळी कधीही, कुठच्याही प्रकारचे फटाके लागत असतात, सगळी कडे धूर असतो. तिसरा मजला असल्याने सगळा धूर घरात येतो.. संध्याकाळी ७ नंतर रात्री १२ पर्यंत एसी लावून दारे खिडक्या बंद करून बसावे लागते. गेल्या पाच वर्षात भाऊबीज त्यादिवशी साजरी करता आलेली नाही. बाळाच्या पहिल्या दिवाळीची खरेदी म्हणून नेब्युलायझर आणला होता, कारण गावाहून परत आलो तेंव्हापण देवदिवाळी पर्यंत फटाके वाजतच होते आणि तिला त्रास झाला :(.

आपल्या मुलाचा आनंद साजरा करताना इतर कोणाला त्रास होत आहे का ह्याचा जमल्यास विचार करा.

लेकीला स्वतःला त्रास होत असल्याने ती बिचारी असा हट्टच करत नाही. Uhoh पहिल्यांदा जेंव्हा तिने मागितले तेंव्हा एक साधा प्रयूग केला. ग्लासच्या बरणीत २-३ कापराचे जळते तुकडे टाकले नि झाकण बंद केले. मग बरणीला धरलेली काजळी दाखवली आणि समजावले की "असाच धूर तिच्या श्वसनातून छातीत जातो फटाक्यांमुळे. आम्हालाही अशी दिवाळीची शोभा आवडते पण आमच्या लाडूबाईला त्रास झालेला आवडणार नाही म्हणून आम्ही फटाके लावत नाही. ती पण इतरांसाठी असं वागू शकते" गेली दोन वर्षे शाळेनेही सांगितले आहे, त्यामुळे ह्यावर्षी तिने मागणी केलीच नाहीये. आता ती ६ वर्षांची आहे.

कदाचित नताशा म्हणते तसे मुलगी असल्याने माझे काम सोप्पे झाले असेल किंवा तिच्या आजारपणामुळे असेल.

आक्षेपांना उत्तर विचित्र आहे. पण तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल अत्यंत वाईट वाटले.

पण सगळेच काही फटाके तुमच्या घराजवळ फोडत नाहीत. इथे सर्वव्यापी विचार चाललाय. असो. Happy

आणखी एकः
मी फटाके फोडले तर मोकळ्या मैदानात जाऊन फोडतो आणि त्रास होणार्‍या व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याइतकी समज माझ्यासकट अनेकांना आहे. मागल्या दिवाळीत सोसायटीत लहान बाळ होते म्हणून आम्ही लांब जाऊन फटाके फोडले.

हिंदु धर्म कधी कट्टरपणे प्रथा पाळा असे सांगत नाही. व्रते असली तर गोष्ट वेगळी, पण व्रतं वैयक्तिक असतात, सार्वजनिक नाही>>> अहो हा हिंदू धर्माचा दोष आहे.
हिंदू 'भेडचाल' करीत नाहीत,
त्यांना एकगठठा मुर्ख बनवता येत नाही,
ते स्वतःचे डोके वापरतात, धर्ममार्तंडांना एका पातळीबाहेर महत्व देत नाहीत,
हिंदू धर्म हा त्यातल्या प्रत्येकाला स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची निदान शक्यता असलेला (संधी असेलच असे नाही), एकाचवेळी सर्वात जुना आणि सर्वात आधुनिक धर्म आहे.
हे सगळे त्यातले दोष आहेत
अर्थात झुंडशाही आणि एकगठ्ठा मताचे राजकारण करताना हे 'दोष' फार आड येतात.

लक्ष्य२०१४, माझे उत्तर एवढे साधे आहे की अजुन कोणाचे काही आक्षेप असले आपल्या श्रद्धेवर तर हिंदू धर्मात तरी वेगवेगळ्या तर्‍हांनी दुसर्‍याला त्रास न देता आपली श्रद्धा पालन करता येते. Happy घंटा वाजवली नाही म्हणून देव माझ्याकडे पहाणार नाही असा कद्रू देव माझ्या धर्मात नाही. की उद्बत्ती लावली नाही म्हणून मला मोक्ष मिळणार नाही अशी भिती माझा धर्म घालत नाही.

आणि फटाके खरच त्रासदायक होतात. ठाण्यात आणि गोरेगावात तरी बर्‍याच सोसायट्यांमध्ये कधीही फटाके वाजत असतात. आम्ही ४ सोसायट्या आजूबाजूला आहोत.. इतके फटाके वाजतात की विचारता सोय नाही. ह्या वर्षी मैत्रिणीला सांगून नंतरच्या कचर्‍याचा फोटो काढून ठेवेन.. मग कल्पना येईल.

सुदैवाने इथे तमिळनाडूमधे फटाक्यांचा एवढा काही त्रास होत नाही. रत्नागिरीमधे असतानादेखील "त्रास" कधीच झाला नाही. पुण्ञामुंबईत जिथे लोकवस्ती अतिदाट आहे तिथे फटाक्यांच्या धुराचा त्रास जाणवत असवा.

आमच्याकडे नरक चतुर्दशीला फटाके आधी कोण फोडणार अशी शर्यत असायची उलट. घरचं लक्ष्मीपूजन झालं की हजाराची माळ उडवायचीच. इतर सर्व फटाके आतिषबाजीचे. रॉकेट अथवा बॉम्ब कधीच लावला नाही. पण फुलबाज्या, अनार, भुईचक्रं ((ही भुईचक्रं नीट फिरावीत म्हणून आम्ही वर्गणी काढून रस्ता शेणाने सारवून घ्यायचो!!!) हवी तितकी. प्रत्येकाच्या अंगणात फटाके कधीच उडवले नाहीत. सर्व मुलं मुली मिळून रस्त्यावरच फटाके. (आमच्याकडे रहदारी कमी अंतर्गत रस्ता असल्याने) पंढरा वीस वर्षापूर्वी फटाक्यांना कसलं विकृत स्वरूप मात्र नव्हतं.

यावर्षी मी सुनिधीसाठी फुलबाज्या, अनार असली आतिषबाजीची फटाके थोडे का होइना आणणार आहे. आवाजी फटाके इतर मुलं उडवतात तेव्हा ऐकू येतातच की.

यावेळी पहिल्यांदाच ९९% फटाकेमुक्त दिवाळी झाली आमच्या गावाकडे. दरवर्षी दिर मंडळी हजारोंचे फटाके घेवून येत असतात. मी स्वतः जरी उडवले नाहीत फटाके तरी घरात फटाके यायचेच. पण यावेळी दिवाळीच्या आदल्या दिवशी पोरांनी च्युइंगगम /चॉकलेटांबरोबर ५-६ आपटीबार (तिकडे पंजाबात कंदपटाखा म्हणतात) आणले होते, त्यानंतर एकही फटाका घरात आणला नाही /उडवला नाही. नेहेमी लक्ष्मीपुजनाची पुजा झाली की घरातले सगळे अंगणात बसून आतिषबाजी बघतात. पण यावेळी मिठाई खात गप्पा मारत्/गाणी म्हणत / नाच-नकला करत बसले होते. मज्जा आली.

खरोखर यावर्षी एरवी पेक्षा कमीच फटाके फुटले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जवळजवळ तासभर तरी लोक हजारच्या माळा फोडत असत. यावेळी १-२ च माळा फोडल्या गेल्या.
देव करो नि हे प्रमाण असच कमी होत जावो.:)

आमच्याकडेही कमी फटाक्यांची दिवाळी होती. लक्ष्मीपूजनाची एकच रात्र खिडक्या बंद करून घेतल्या. आमच्या शेजारच्या मुलांनीही लवंगी फटाके तेही दोन दिवस वाजवले. दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत सकाळी रस्त्यावर फटाके, भुईचक्रे, अनार यांचा खच दिसायचा, तो यंदा नव्हता.

इथे लिहिण्यास आनंद वाटतो की यंदा खरोखर खूप कमी फटाके 'ऐकू' आले. नरकचतुर्दशीच्या पहाटे साडेतीन वाजल्यापासून ते सकाळी सहा पर्यंत दर अर्ध्या तासाने लक्ष्मी फटाके, अ‍ॅटम बाँबचे दणके घराजवळ ऐकू येत होते आणि परिसर हादरवत होते. त्यावेळी वाटले की आताच जर ही स्थिती तर लक्ष्मीपूजनापर्यंत काय होणार!! पण आश्चर्यकारक रीतीने लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी जेमतेम तासभर दणकून फटाके उडले. बाकी वेळांना तुरळक फटाके. नेहमीच्या मानाने हे प्रमाण खूपच कमी आहे. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी एरवी फटाक्यांच्या धुराने श्वास घ्यायलाही त्रास होतो. रस्त्यावर सकाळ-सायंकाळ फटाक्याच्या कागदांचा खच असतो. तसा प्रकार ह्यावेळी अजिबात झाला नाही. माहितीतल्या उत्साही शाळकरी मुलामुलींनी दोन-चार शोभेच्या फुलबाज्या, भुईनळ्यांवर समाधान मानलेले पाहून बरे वाटले.

यंदा फटाके खरेच कमी फुटले.
माझा एक बाळमित्र दर वर्षी फटाके विकत असे. यंदा त्याने तो जोडधंदा केला नाही. 'यार, ४० रुपयांचा आयटम १२० ला विकावा लागतोय. कुणी घेणार नाही' हे त्याचे भाकित खरे होते.
येत्या मनपा निवडणुकीत उभे रहाणार्‍या मूर्खांनी केलेली काळ्यापैशाची होळी या व्यतिरिक्त आमच्या एरियात तरी आतिषबाजी झाली नाही.
हे मात्र खरेच, की,
यंदा फटाके खरेच कमी फुटले.
याला अंनिस पेक्षा, खिसापाकीट जास्त जबाबदार होते असे वाटते..

(ता.क. यंदा माझ्या घरात ५ पैसे किमतीचेही फटाके आणले गेले नाहीत.)

हुश्श................. संपले फटाके

आता ही चर्चा वाचायला हरकत नाही ..................................

फटाके बंदसाठी आम्ही गेली काही वर्ष मुलांबरोबर एक प्रयोग करत होतो. तो दोन वर्षांपासून यशस्वी झाला आहे.
मुलांना फटाक्यांचे कारखाने, तिथे काम करणारी मुलं यांची चित्र दाखवत होतोच.
पण त्याबरोबर आम्ही एक गोष्ट केली. फटाक्यांचं जेवढं बजेट असायचं. ते मुलांना सांगायचो. त्यात त्यांना आवडणार्‍या गोष्टी घ्यायला सांगायचो. सुुरुवातीला मुलांना पटलं नाही. पण नंतर नंतर मुलं थोड्या पैशांचे फटाके आणि काही आवडीच्या गोष्टी घ्यायला लागली. हळूहळू आवडीच्या गोष्टींचा टक्का वाढू लागला. कधी पुस्तकं, कधी धमाल सिनेमाच्या सिडीज यांचा समावेश होऊ लागला. फटाक्यांची संख्या कमी होऊ लागली. नंतर नंतर त्या पैशांमध्ये आम्ही त्यांना शेअरिंगचा आनंद शिकवला. म्हणजे काय तर नाही रे मित्रांसाठी काही गोष्टी शेअर करायला शिकवल्या.
गेली दोन वर्ष आमची मुलं एकही फटाका वाजवत नाहीत.

मयुरा, बहुसंख्य विवेकी पालक लोक याच मार्गाचा वापर करतात.बहुसंख्य मुले जिज्ञासू असतात त्यांना या मार्गाने हळु हळू पटते. पण पालकांनाच मुळात जेव्हा हे पटत नाही तेव्हा काही करता येत नाही. जगात सगळेच लोक कसे सुसंस्कृत असतील?

Pages