आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

  1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
  3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
  4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
  6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
  7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
  8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
  9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
  10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
  11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
  12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
  13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
  14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
  15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
  16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
  17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
  19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
  20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
  22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

  1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
  2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
  3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
  4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
  5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंगूर मधला छेदीलाल म्हणजे खलनायक सी. एस, दुबे.

अनेक पिक्चरमध्ये तो बहुतेकदा मुनीम किंवा लुबाडणारा सावकार अशा खलभूमिकांतच असे. कन्हैयालालनंतर जर कोणी पक्का मुनीम वाटला तर दुबेजीच!

आर्या बब्बरचा अमृता रावबरोबर एक पिक्चर आलेलाबकब के बरस नाव. काहीतरी पुनर्जन्माच्यी स्टोरी होती. गाणी चांगली होती. तो राज बब्बरचा मुलगा आहे. जुही बब्बरचा भाऊ. जुहीनं पण एक दोन सिनेमामध्ये काम केलंय सध्या ती आईसोबत थिएटर करते आहे. प्रतीक बब्बर राज आणि स्मिताचा मुलगा.

आर्या गुरूमध्ये पण होता.

हमलोग मधला इंस्पेक्टर आठवतोय कुणाला? मंझलीचे लग्न होते त्याच्याशी शेवटी. त्याचे कॅरेक्टर मराठी दाखवलेले. हमलोगमध्ये तो स्वतःला जंजीरमधला अमिताभ समजुन वावरायचा Happy नंतर एका मालिकेत दिसलेला पण तेवढेच.

चिनुक्स धन्यवाद. मी नंतर पाहिले गुगलवर आराधना. काल कच्ची धुपचा एक भाग पाहिला, त्यातली पोर्णिमा पटवर्धन आणि मासुममधली आराधना यांच्या चेह-यात खुप साम्य आहे, कच्ची धुप तेव्हा खुप भारी वाटायची. काल परत पाहताना खुप कृत्रिम वाटली. पण असुदे. काळाचा फरक पडणारच.

@ महेश,

पपीहात विनीच होती. हे पाहा.
https://www.youtube.com/watch?v=4fPmxaenHX0

http://www.ovguide.com/papeeha-9202a8c04000641f800000001e7d8c2b

http://movies.bollysite.com/movie/papeeha-1993.html

कुठे पाह्यला मिळेल हे सांगता येणं अवघड आहे. अशा चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग फारच कमी असतो.

@ स्पार्टाकस

दुबेला रेपिस्ट दुबे म्हणायचे, इतक्या चित्रपटांतून त्याने बलात्कारी व्यक्तिची भूमिका साकारली.

विनी मला खुप आवडायची. सईच्या बहुतेक सगळ्या मालिकांमध्ये तिच्या मुख्य भुमिका होत्या. सईची एक मालिका ज्यात एका कुटूंबात अ, ब्,क, ड ई अशी मुलांची नावे असलेले मोठ्ठे कुटूंब शेजारी होते त्यात तिचा नायिकेचा रोल होता.

अर्थात तिच्या चित्रपटात मात्र तिला लहान भुमिकेवरच समाधान मानावे लागले. Happy पपिहा मी पाहिला नाही.

दुबेला रेपिस्ट दुबे म्हणायचे, इतक्या चित्रपटांतून त्याने बलात्कारी व्यक्तिची भूमिका साकारली. >>>

हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच त्याच्या सकारात्मक भूमिका होत्या.

प्रत्यक्ष जीवनात दुबेजी अत्यंत चरित्रवान होते. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. पडद्यामागच्या कलाकारांना मदत करण्यात ओमप्रकाशच्या जोडीने दुबेजी तत्पर असत.

अजय वढावकर मध्यंतरी पवित्र रिश्ता ("देवा रे!!") दिसले होते.. खूपच खराब झालेत तब्येतीने.. ती हिंदी शिरेल होती भौतेक आणि त्यात जास्तीत जास्त मराठी कलाकार होते.. त्यामध्ये बायकोच्या वाईट वागण्याने घर सोडुन गेलेला अथवा बायकोने हाकलुन लावलेला नवरा असा काहीतरी रोल होता...

हो ते दुबे जी म्हणजे मौसम सिनेमात शर्मिलाच्या मुलीची इज्जत लुटून तिला धंद्याला लावणारे. इ Sad
इतकी किळसवाणी नजर की बघुनच भीती वाटावी. तो सीन अगदी घाबरत बघितला होता.

आलेलाबकब के बरस >>>> नंदिनी, हे असं कसं नाव म्हणून किती विचार केला.

गूगल क्रोमाची गंमत झाली वाटतं. Lol

बरं, हा शिनुमा अखंड पाह्यलेली मीच एकटी आहे का?

या बीबीवर अँकीला हळदीकु़ंकू देऊन आमंत्रण द्यायला पाहिजे!

<< बरं, हा शिनुमा अखंड पाह्यलेली मीच एकटी आहे का? >>

माझ्या भावाने देखील पाहिला होता. थेटरात जाऊन, तेव्हापासून अमृता रावचा पंखा आहे तो.

>>सईची एक मालिका ज्यात एका कुटूंबात अ, ब्,क, ड ई अशी मुलांची नावे असलेले मोठ्ठे कुटूंब शेजारी होते

ती मालिका अडोस-पडोस. अ, ब, क, ड, ई.. 'मामे की पलटन'. शेवटल्या बाळाचं नाव 'ग'... गलती. Lol सई परांजप्याचा एक्सनवरा अरूण जोगळेकर पलटणीचे म्होरके मामा होते बहुतेक.

अमोल पालेकर ची मुलगी पण होती ना कोणत्या तरी सिरिअल मध्ये .
गोट्या सिरिअल मधला जॉय घाणेकर पण मस्त काम करायचा . तो पण नंतर गायब झाला .

सास भी कभी बहु थी मधील गायब कलाकार
१. गौतम - मिहिर विरानीचा मोठा मुलगा
२. शोभा - मिहीर विरानीची मुलगी
३. या दांपत्याला तिसरा मुलगा होता.. नाव विसरले...
४. साहील - प्राची शहाचा मुलगा.. प्राचीच मालिकेतल नाव विसरले.
५. गंगा - साहील विरानीची बायको
६. अंश गुजराल
७. अमन वर्माही होता या मालिकेत.. त्याची बायको जी तुलसीची बहीण असते ती नंतर पक पक पकाकमध्ये साळुच्या रोलमध्ये दिसली
८. हार्पिकच्या जाहीरातीत काम करणार्‍या हुसेनची या मालिकेतली बायको आणि तिच्या दोन मुली...
९. तुलसीची सासु, चुलत सासु.. अरारा फेम दक्षाच काम करणारी पण दिसत नाही आजकाल कुठे.. आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपय्या या सिनेमात तिने जॉनी लीव्हरच्या बायकोच काम केल होत...
१०. गौतम विरानीची बायको - टिशा..
या मालिकेतली बरीच मंडळी नंतर दिसलीच नाहीयेत... मला येवढीच नाव आठवली

अपरा मेहता दिसते की. सजन रे झूठ मत बोलो. कोणतातरी लाफ्टर शो.
केतकी दवे सध्या १७६० सासूबाईवर आधारित गुजराती मालिका करतेय.
अंश गुजराल म्हणजे व्हीलन का? तो बिग बॉसमध्ये राडा करायला आला होता. आकाशदीप नाव आहे तर स्काय लावायचा.
मी एकाच टाइम लीपपर्यंत पाहिलंय.
गंगा = शिल्पा सकलानी का? तिला तिच्या नवर्‍यामुळे अपूर्व अग्निहोत्री जस्सीत एक रोल मिळाला होत कॅन्सर झालेल्या कुमारी मातेचा.

अपरा मेहता दिसते की. सजन रे झूठ मत बोलो. कोणतातरी लाफ्टर शो. >>> सब वरचा ना? हो हो विसरलेच होते.. मी बघत नाही त्यामुळे लक्षात नाही...

अंश गुजराल म्हणजे व्हीलन का? तो बिग बॉसमध्ये राडा करायला आला होता. आकाशदीप नाव आहे तर स्काय लावायचा. >>> मी ते ही बघत नाही.. मला बिग बॉस या कार्यक्रमाचा उद्देशच कळला नाहिये...

गंगा = शिल्पा सकलानी का? तिला तिच्या नवर्‍यामुळे अपूर्व अग्निहोत्री जस्सीत एक रोल मिळाला होत कॅन्सर झालेल्या कुमारी मातेचा >>> हे नाही आठवत..

तुलसीची एक चुलत सासु असते कथ्थक डान्सर ती पण दिसत नाही कुठे..

<<<स्वप्नांच्या पलिकडले मधली वैदेही अजून कुठे दिसली का? छान होती/आहे(मालिका चालू अहे का माहित नाही)>>>

स्टार प्रवाह वरील नवीन मालिका रुंजी मधे तीच आहे कदाचित , अ‍ॅड पहिलीये वर वर म्हणुन नक्की सांगता येत नाही.

<<तुलसीची सासु, अपरा मेहता>>> हीची सुद्धा एक सीरीयल सुरु आहे सध्या असं ऐकलंय, कोणती ते माहीत नाही.

कविता वर मयेकरांनी सांगितलय... ती सध्या सबवरच्या "सजन रे झुठ मत बोलो" या मालिकेत आहे..

मला हवीय तुलसीची चुलत सासु म्हणजे प्राची शहाच्या सख्ख्या सासुचा रोल केलेली.. ती कथ्थक डान्सर असते... तिला थोडा साउथैंडीयन लुक दिला होता शिरेलीत..

अंगूर (जुना) हा असा एक चित्रपट आहे की त्यातले सगळेच लोक भारी आहेत>> अनुमोदन. एक अंगूर गटग तो बनता है. " बस आ रही है बस आ रही है. इत्ना फुटेज क्यू खा रही है असल्या वाक्यातून हसवणारा एकच तो आपला संजीव कुमार. और बीस साल तो जिंदा रहना था इन्हे. रिअली मिस हिम.>>>>>> ओह्ह माय फेवरिट अ‍ॅक्टर

मी लहानपनी एक सिनेमा का टेलीफील्म पाहीला होता त्यात दोन बहीनी आसतात्.एका बहीनीला काहितरी वरदान असते बहुधा तीने अंगावर पानी ओतले की ती झाड बनायची मग दुसरी बहिन ती फुले वेचुन विकायची बहुतेक..एक दिवस ती झाड बनते आणि मुले त्या झाडावर चढुन फांद्या मोडतात नंतर दुसरी बहीन घाईघाईने तीच्यावर पानी ओतते..नक्की काय झाले शेवटी ते आठवत नाही पन एका बैलगाडितुन एक झाडाचे खोड नेताना दाखवलेले आठवते...
आठवतय का कोनाला?

शिल्पा सकलानीबद्दल मध्यंतरी फार उलटासुलट ऐकलं होतं. सध्या काय करते माहित नाही पण लवकरच एखाद्या सीरीयलमध्ये दिसेल.

केतकी दवे उर्फ दक्षा चाची गुजराती सीरीअल आणि नाटकांमध्ये असते

ते एडान्सर चाची कमालिका, काय करते माहित नाही.

चिराग (हुसेनची) बायको सुहासी (बहुतेक पूजा रावळ कन्फर्म माहित नाही)

अनुपम कपाडीयाची बायको केसर कपाडीया का? ती नारायणी शास्त्री. ती सीरीयलमध्ये असते अधूनमधून.

गौतम, शोभा आणी तिसरा मुलगा हर्ष विरानी. तो सरस्वतीचंद्र मध्ये होता (की अजून आहे??)

आकाशदीप (फराह खानचा एक्स बॉयफ्रेण्ड!!!!) हल्ली तमिळमध्ये दिसतो.

आठवतय का कोनाला?<<<, चेलुवी. गिरीश कर्नाडचा अविस्मरणीय सिनेमा आहे. त्यात सोकुल होती. (बहुतेक तिचा पहिलाच सिनेमा!!) कानडी लोककथेवर आधारित कथा होती.

अजय वढावकरला डायबेटीस आहे. वर्षा- दोन वर्षापूर्वी तो भर पावसात शुटिन्गला जात असताना, त्याचा पाय पाण्याने भरलेल्या खड्ड्यात गेला. त्यात नेमका पत्रा पडला होता, त्याने त्याचा पाय कापला गेला. नेमके गॅन्गरीन झाले, त्यामुळे पाय कापावा लागला. परिस्थिती बिकट होती, पण सेटवरच्या इतर लोकानी बरीच आर्थिक मदत केली आणी बायको पाठिशी खम्बीरपणे उभी आहे. असे सर्व त्याने लोकसत्ताला मुलाखत देताना सान्गीतले होते.

<<<< मुग्धटली | 16 October, 2014 - 12:06

कविता वर मयेकरांनी सांगितलय... ती सध्या सबवरच्या "सजन रे झुठ मत बोलो" या मालिकेत आहे..

मुग्धटली - सजन रे झुठ मत बोलो ही जुनी सीरीयल आहे आधी सोनीवर लागायची त्यात तर ती होतीच पण आताशा नवीन सीरीयल मधे आहे कदाचित जी वरच्या जमाईराजा मधल्या सासुबाई अचिंत कौर ची आई आहे.

<<<मला हवीय तुलसीची चुलत सासु म्हणजे प्राची शहाच्या सख्ख्या सासुचा रोल केलेली.. ती कथ्थक डान्सर असते... तिला थोडा साउथैंडीयन लुक दिला होता शिरेलीत..>>>>>

ती मधेच २-४ सीरीयल्स मधे छोट्या रोल्स मधे होती नाव नाही माहीत पण तिचा साउथैंडीयन लुक नॅचरलच आहे तशीच दिसते ती.

Kamalika Guha Thakurta : कमालिका गुहा ठाकुर्ता : तुलसीची चुलत सासू गायत्री जमनादास विरानी हीच ना?

Pages