आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीनाक्षी शेषाद्री इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न करुन प्लेनो, टेक्सस इथे राहते आणि तिथे नृत्य शिकवते >> दोन-तीन वेळा गाठ पडली आहे तिच्याशी. वागायला आणि बोलायला कमालिची साधी आहे!

फारएण्ड....

सॉरी.....यू आर राईट, नीलिमा अजीम बरोबर. पंकज कपूरची प्रथम पत्नी....आणि आजचा एक आघाडीचा नायक शाहिद कपूर याची आई. खूप खेळकरपणाने हिने पूनम रेहानीसोबत काम केले होते "फिर वही तलाश" मध्ये. कथेमध्ये कुणालाही न सांगता ज्यावेळी पद्मा नाईलाजाने दुसर्‍या समवेत लग्न करून लंडनला निघून जाते.....तेव्हा इकडे नायकाचे जीवन जवळपास उद्ध्वस्त होते, त्याचे शबनमला खूप वाईट वाटते. वर्षभराने जेव्हा पद्मा दिल्लीला माहेरी परतते आणि शबनमला सायंकाळी भेटायला जाते, त्यावेळी शबनमचा (म्हणजेच नीलिमा अजीमचा) संतापाने फुलून गेलेला अभिनय ज्यानी पाहिला असेल त्याना पटेल की किती क्षमतेची ही नायिका होती.....हाकलून लावते आपल्या घरातून ती पद्माला.

सॉरी काय त्यात अशोकजी. मला फिर वही तलाश पाहिल्याचे आठवत नाही, पण तिला दुसर्‍या कोणत्यातरी सिरीज मधे पाहिले आहे.

नीलिमाला तुम्ही कदाचित जमीन आसमान या मालिकेत पाहिले असेल. दूरदर्शनपेक्षा तिने मोठ्या पडद्यावर बर्‍यापैकी भूमिका केल्याचा दाखला आहे. शहिदच्याच इश्कविश्क मध्ये ती त्याची आई झाली होती.

बाकी सॉरीबद्दल म्हणाल तर चूक झाली असेल आणि कुणी दाखवून दिली तर त्याचे आभार मानले पाहिजेतच...म्हणून.

मीनाक्षी शेषाद्री इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न करुन प्लेनो, टेक्सस इथे राहते आणि तिथे नृत्य शिकवते >>> ओह, अभिनयक्षेत्राला कायमचा बाय बाय .. Sad

तिचे नाव घेताच मला सर्वप्रथम घायलच आठवतो.. सुरुवातीच्या सीनमध्येच ती जी काही अदाकारी दाखवते त्यातच सिनेमा पकड घेतो.. मग पुढे आहेच सनी.. तारीख पे तारीख..

बादवे, हल्ली सनी म्हटले की सनी लिओनचाच बोलबाला आहे पण हे ओरिजिनल सनी, सनी देओल आहेत कुठे सध्या ??

<< तिचे नाव घेताच मला सर्वप्रथम घायलच आठवतो.. सुरुवातीच्या सीनमध्येच ती जी काही अदाकारी दाखवते त्यातच सिनेमा पकड घेतो.. मग पुढे आहेच सनी.. तारीख पे तारीख.. >>

हा घायल नाही बरं, दामिनी आहे.

अशोक पाटील साहेब,

पुनम रेहानी माझ्या आईला देखील फार आवडते. खरं तर ती जोडीच, म्हणजे डॉ. अश्विनीकुमार (हा हमलोगमध्येही होता) + पुनम रेहानी आणि ती दुसरी जोडी देखील नीलिमा अजीम + राजेश खट्टर. डॉ. अश्विनीकुमार देखील पुढे कुठे दिसला नाही.

हा घायल नाही बरं, दामिनी आहे.
>>
हो, हो, रात्री दोनची पोस्ट असल्याने पेंगेत होतो. सुधारणेबद्दल धन्यवाद Happy

थॅन्क्स चेतन सुभाष गुगळे....

~ कौटुंबिक पातळीवर फार लोकप्रिय झाली होती "फिर वही तलाश"....अगदी हमलोग आणि बुनियाद इतकी सार्‍या भारतभर पसरली नसली तरी २५ वर्षापूर्वीच्या कालखंडात या मालिकेने लेख टंडन यांच्या कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे चांगलेच नाव कमाविले होते. डॉ.अश्विनीकुमार हमलोगमुळे लोकप्रिय होतेच, या मालिकेतही ते कॉलेजकुमार म्हणून खूप शोभले. नीलिमा अझीम आणि राजेश खट्टर यांची जोडीही इतकी लोकप्रिय झाली की पुढे नीलिमाने त्यांच्याशी प्रत्यक्ष जीवनात लग्नही केले. नीलिमाची संवादधाटणी केवळ लाजवाब होती.

मात्र पूनम रेहानीने ह्या एकाच मालिकेनंतर अभिनयक्षेत्राला रामराम केला.

छान धागा.

नीलिमा अझीमची अनेक नाटके दूरदर्शन वर आलेली आहेत. खूप् ताकदीची अभिनेत्री. हैदरच्या प्रिमीअर ला धाकट्या मुलासोबत आली होती.

अचिंत कौर पण अजूनही तशीच फिट छान आहे हेअर कट पण सेम एनडीटीव्ही गुड टाइम्सवर पेट्स चा कार्यकरम लागतो त्यात ती व नवरा, तिचे तीन कुत्रे इत्यादि दाखवले. अतिशय जॉली कपल आहे व ती टीपी़कल मुंबई कर वाटते. मिस्टर नेव्हीतले अधिकारी आहेत असे पूर्वी वाचले होते.

वंदना पंडीत गोड होत्या. दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते गाणे फेवरिट होते आहे अजूनही. . तसेच वसंतरावांच्या मागे तंबोरा धरून साथीला बसलेली. एक प्रकारे त्याकाळची सुखाची कल्पनाच होती ती व्यक्तिरेखा. तसे सासर इत्यादि. आता सर्व किती भाबडे वाटते. पण तेव्हा सिनेमा थेटरात जाउन बघितला होता.

<< तसे सासर इत्यादि. >>

नाही हो. तिचं सासर वाईट दाखवलं होतं. पद्मा चव्हाण सावत्र सासूच्या भुमिकेत असल्यावर अजून काय भोग भोगायचे बाकी राहणार?

इथे कुणाला तरी प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश या खिचडी पिक्चरमधल्या गाण्यातल्या त्या हिरोची (?) आठवण आली होती.. त्या मनुष्याला अजुन एकाच पिक्चरमध्ये बघितल आहे.. त्याला तेवढे दोन पिक्चर तरी कसे मिळाले हेच आश्चर्य आहे... त्यात खिचडी मध्ये त्याची हिरवीण चक्क अर्चना जोगळेकर??? हे म्हणजे "लंगुर के हाथ अंगुर"

भरत मयेकरांच्या मंदिरा बेदी आणि अचिंत कौर यांच्या उंचीबद्दलच्या पोस्टीला प्रचंड अनुमोदन....

<< मंदिरा बेदी आणि अचिंत कौर यांच्या उंचीबद्दलच्या पोस्टीला प्रचंड अनुमोदन.... >> ते चेतन गुगळेंनी लिहिलंय. पण बरोबरच आहे.

खिचडी शोधून श्रेयनामावली पाहिली.
त्या नवोदित आणि शीघ्रअस्तंगत तार्‍याचे नाव शेखर नाईक आणि चित्रपटाचे निर्माता-संकलक- दिग्दर्शक व्ही.के.नाईक.

माझा अंदाज बरोबर असावा.

माझ्या समजुतीनुसार हे शेखर नाईक आता दिग्दर्शक आहेत. त्यांनी उरूस, म्हैस या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे आणि आता साधनाताई आमट्यांच्या आयुष्यावर चित्रपटाची घोषणा केली आहे.

ग्रेसी सिंह हिने सुप्रसिद्ध लोकप्रिय सुपरस्टार केकेआर बरोबर देशद्रोही नावाचा अप्रतिम सिनेमा केल्यानं तर तिच्या करियरला.........वाळवी लागली.

पद्मिनी आणि रागिणी या दोन गाजलेल्या नर्तिका.
मेरा नाम जोकर मधे पद्मिनी शेवटची दिसली.. नंतर सुनील दत्तच्या एका चित्रपटात ( बहुतेक दर्द का रिश्ता ) मधे ओझरती दिसली.. यू टूबवर तिचा तामिळमधला इंटर व्ह्यू आहे. तामिळ कळत नाही म्हणून काय बोललीय ते समजले नाही.

http://www.youtube.com/watch?v=Rh1TaM09hdw

मंदाकिनीचे लग्न दाऊदबरोबर झाले आहे अश्या भरपुर वावड्या उठल्या होत्या, अश्विनी के यांनी दिलेल्या लिंकवरून तरी ती अफवाच होती असे वाटते.

गायत्री जोशीचे लग्न स्वदेश चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुंबईतील ख्यातनाम उद्योगपती आणि बिल्डर विकास ऑबेरॉय यांच्या सोबत झाले त्यामुळे तिने चित्रपटात काम करणे बंद केले.

दिनेश.....थॅन्क्स

पद्मिनीच्या सुखद आठवणी आपल्या मनी कायम विसावल्या आहेत. दर्द का रिश्ता हा तिच शेवटचा हिंदी चित्रपट ठरला...तामिळमध्ये ती त्यानंतरही चारपाच वर्षे भूमिका करत होती...नंतर पतीसमवेत अमेरिकेत स्थायिक झाली.

"त्रावणकोर सिस्टर्स" या नावाने ह्या तिघी.....ललिता, पद्मिनी आणि रागिणी....लोकप्रिय होत्या. ह्या तिघीही देवाघरी गेल्या आहेत.

अशोक, आजही तिच्या नृत्यातील ग्रेसला तुलना नाहीच..

http://www.youtube.com/watch?v=PrZHRpUN3kE

http://www.youtube.com/watch?v=MiBN0lWIFA8

या दोन क्लीप्स बघाच !

अगदी प्रदीर्घ चित्रपट कारकिर्द असलेल्या किती कमी अभिनेत्री आहेत आपल्याकडे !
वहिदा रेहमान, हेमा मालिनी, रेखा,.. अगदी मोजक्याच.
डींपल, हेलन यांनी मोठा ब्रेक घेऊनही दुसरी इनिंग यशस्वी केली. माधुरी अजून जम बसवायचा प्रयत्न करतेय.
श्रीदेवी पण तशीच प्रयत्नात आहे. मुमताजचे पुनरागमन यशस्वी ठरले नाही. राखीने काही चित्रपटात चरीत्र भुमिका केल्या पण नंतर ती पण गायबच आहे.

भाग्यश्री पटवर्धन कुठे असते ? एकच चित्रपट, तोपण जोरदार गाजलेला, पुढे काय झाले.

@अशोकजी : फिर वही तलाश ही मालिका पाहिल्याचे आठवत आहे, तसेच त्यातली लक्षात राहिलेली अभिनेत्री म्हणजे निलिमा अजीम.

पुर्वी मराठीत सुशिला नावाचा चित्रपट होता रंजनाचा, त्यामधे काम केलेला अभिनेता कोण आहे ? तो त्या चित्रपटाशिवाय कधी फारसा दिसला नाही.

भाग्यश्री पटवर्धन मध्यंतरी लौट आओ त्रिशा या मालिकेमध्ये होती.. मैने प्यार कीया नंतर तिने हिमालयशी लग्न केल आणि सिनेसृष्टीला टाटा केल..

अविनाश मसुरेकर, तो सिरीयल मध्ये पण होता की कुठल्याशा. >>>> मराठी उपग्रह वाहीनी सह्याद्रीच्या घरकुल नावाच्या मालिकेत.. यात आधी भक्ती बर्वे इनामदार होती... मालिकेदरम्यान तिच अपघाती निधन झाल्यावर तिच्या जागी सुहासिनी मुळे आल्या...

एका मराठी सिनेमात रवीन्द्र महाजने त्याच्या कानडी बॉसच्या मुलीला मराठी शिकवायचा ती हिरोईन कोण होती ?तीपण नंतर दिसली नाही, खुप सुंदर होती ती

सतीश पुळेकर गेले कित्येक वर्षं दिसलेले नाहीत. मध्ये कुणाच्या तरी निधनाच्या वेळी ( स्मिता तळवलकर ? ) त्यांना बोलताना पाहिले.

'माझी नीता' ह्या मालिकेत कुणी काम केलं होतं ? ती अभिनेत्रीही नंतर दिसली नाही. ( आईचं काम रिमा ह्यांनी केलं होतं बहुतेक )

Pages