आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"नायक" या झी मराठी (तेव्हाची अल्फा मराठी) वरील मालिकेचा हिरो. आणि त्याची बहिण अदिती.
अदिती फार फार गोडुली होती.

पियु तुला ती त्यावेळच्या अल्फा मराठीवरील दे धमाल मालिका आठवते का? त्यातले अनेक बालकलाकार आज मोठे होउन आले आहेत.. त्यात प्रिया बापट, स्पृहा जोशी आहेत... एक निनाद नावाचा मुलगा होता चष्मीश तो तुतिमी मध्ये चिमाच्या त्या डॉक्टर मैत्रिणीचा नवरा म्हणुन आला होता.. दादा होळकरबरोबर कारस्थान करत होता... त्याच मालिकेतला एक किडमिडीत मुलगा थ्री इडियट्समध्ये मोठा झालेला मिलीमीटर होता.. या मालिकेत लीड रोल करणारा, बोबड बोलणारा एक मुलगा जो आभाळमायामध्ये होता भुषण नाव त्याच तो ही दिसत नाही कुठे...

मला दे धमाल आठवते. प्रिया बापट, स्पृहा जोशी पण आठवल्या.

एक निनाद नावाचा मुलगा होता चष्मीश तो तुतिमी मध्ये चिमाच्या त्या डॉक्टर मैत्रिणीचा नवरा म्हणुन आला होता
>> हे गुगलुन बघते.

त्याच मालिकेतला एक किडमिडीत मुलगा थ्री इडियट्समध्ये मोठा झालेला मिलीमीटर होता..
>> हेही आठवत नाहीये.

या मालिकेत लीड रोल करणारा, बोबड बोलणारा एक मुलगा जो आभाळमायामध्ये होता भुषण नाव त्याच तो ही दिसत नाही कुठे...

>> यस्स्स्स.. भुषण उर्फ झंप्या. राईट?

आणि आभाळमायामधली चिंगी? घार्‍या डोळ्यांची? ती गायिका पण आहे ना म्हणे? स्वरांगी मराठे.

राईट पियु झंप्या.. तो दिसलाच नाही नंतर

अग थ्री इडीयट्सच्या शेवटी हे सगळे लडाखला जातात तिथे त्यांना एक मुलगा भेटतो जो त्यांना ओळखत असतो.. ते त्याला विचारतात तु आम्हाला कसा ओळखतोस तर तो म्हणतो की "मिलीमीटरसे सेंटीमीटर जो बन गया हुं" त्यांच्या हॉस्टेलमधला पोर्‍या नै आठवला का?

मला आठवणारे..
अंजली चित्रपटातली अंजली... गुगल वर तिचे फारसे फोटो देखील नाहीत.. कुठे आहे ती सध्या..मला हा चित्रपट पुन्हा पहायचाय. Sad
दहावी फ मधले सगळेच विद्यार्थी.. मला फार आवडतो हा चित्रपट.

"परदेसी" च्या क्लिप्स पाहिल्या दिनेश....पैकी लताचे ते गाणे यापूर्वीही ऑडिओ स्वरुपात ऐकले होतेच....व्हिडिओ (दोन्ही) प्रथमच पाहिले....पद्मिनी, वैजयंतीमाला, रागिणी, हेमा, वहिदा, रेखा, हेलेन या नायिकांनी आपली प्रकृती अगदी उत्तम राखली त्याला कारणही त्यांच्या शास्त्रोक्त नृत्याप्रती असलेले प्रेम आणि अथक परिश्रम घेण्याची तयारीच होय.

@ महेश ~ तुम्हाला "फिर वही तलाश" मालिका आठवते हे वाचून आनंद झाला. नीलिमा अझीम या मालिकेनंतरही दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीशी निगडित राहिल्याने तिचे नाव पुढे बराच काळ चर्चेत होते. पूनम अदृश्य झाली.

मी_केदार | 13 October, 2014 - 16:27

एका मराठी सिनेमात रवीन्द्र महाजने त्याच्या कानडी बॉसच्या मुलीला मराठी शिकवायचा ती हिरोईन कोण होती ?तीपण नंतर दिसली नाही, खुप सुंदर होती ती

>> गोंधळात गोंधळ नावाचा हा चित्रपट. बॉसची ती मुलगी नाही तर मेहूणी. बॉस राघवेन्द्र कडकोळ. ती संजय जोगची नायिका आहे ह्या चित्रपटात.

आपली माणसे नावाच्या एका चित्रपटात तिने विक्रम गोखलेंची नायिका, डॉ. श्रीराम लागूंची मुलगी ही भूमिका साकारली आहे.

अशोकमामा, वरच्या शास्त्रोक्त नायिकांच्या यादीत हेलनचे नाव नक्कीच नाही. अर्थात ती नृत्यांगना म्हणून श्रेष्ठच आहे.

शास्त्रीय नर्तिकांमध्ये श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, माधुरी दिक्षित यांचं नाव हवंच. मराठी शास्त्रीय नृत्यांगनामध्ये अर्चना जोगळेकर, शर्वरी जमेनीस, सोनाली कुलकर्णी (सीनीअर) ही नावं पटकन आठवली. अजूनही असतीलच

हो नंदिनी..... अनेक नृत्यांगना यांच्या यादीत नावे टंकता टंकता हेलेनचे नाव शास्त्रोक्त गटात घेतले गेले.....चूकच आहे. तरीही मला वाटते तिला किमान काही पातळीपर्यंत (मधुमती, राणी, शीला वाझ इ.) शास्त्रोक्त नृत्य अवगत असावे. पडद्यावरील तिच्या बहुतांश भूमिका ह्या क्लब नृत्याशीच निगडित असल्याने तिलाही अन्य विकल्प नव्हताच असे म्हणावे लागेल.

मराठीतील अर्चना जोगळेकर हे नाव तर या गटात प्रकर्षाने येते.

पद्मिनी, वैजयंतीमाला यांना ओळखण्यात माझा नेहमी गोंधळ व्हायचा नंतर मेरा नाम जोकर पाहिला आणि पद्मिनी ला नीट ओळखु लागले. दोघींची नृत्य असलेली गाणीच बहुतेक पाहिली ,चित्रपट कमीच.मात्र त्यांची शास्त्रीय नृत्य पाहायला अप्रतिम.रेखा माझ्यापेक्शा माझ्या वडिलांना फार आवडते त्यामुळे तिचे चित्रपट त्यांच्यामुळे खुप पाहिलेत.काल पन कपिल च्या शो त साडीत मस्त दिसत होती .'नीला आसमा' गाणंही सुंदर गायलीय.लिंक नाहिये नंतर देईन.
रगिनी नव्हती माहीत .गुगलुन पाहिलं बहिण होती तर पद्मिनीची.मस्त माहिती मिळतेय तुमच्याकडुन.

झंप्या मस्त काम करायचा.खरच कुठेय तो?
राखी 'अंजली' मलापण खुप आवड्लेली मागे चॅनल बदलताना मुळ भाषेत पाहिला मधुनच.तो पण मस्त भाषा कळत नसली तरी .ती अंजली सद्या साउथ मधे हीरोइन म्हणुन काम करतेय.ओळखुन येत नाही .तीच नाव शामिली (बेबी शामिली).फोटो बघ, आहेत.

अर्चना जोगळेकर इथे न्यूजर्सीत राहते गेले कित्येक वर्षे. तिचे अर्चना नृत्यालय म्हणून कथक चे क्लासेस पण प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या इव्हेन्ट्स मधे तिच्या स्टुडन्ट्स चे आनि तिचे स्वतःचे कथक चे पर्फोर्मेन्सेस पण असतात.

धन्यवाद मै Happy
आदिती, प्रतिभा सिन्हा ने नदीम शी लग्न केलं होतं असं ऐकलं होतं. ती लंडन मध्ये असु शकेल.

एका सिनेमात रंजनाचा डबल रोलचे नाटक करते , कुलदीप पवार गायक सुरेशकुमार आहे आणि रंजनाची एक बहिण तिचे महेश कोठारेशी लव्ह मॅरेज झालेले असते.
हे बहिणीचे काम केलेली अभिनेत्री आणि धुमधडाका मधे अशोक सराफची नायिका एकच आहे का ?

महेश तुम्ही उल्लेख केलेला चित्रपट आहे - गुपचूप गुपचूप.

धुमधडाका मध्ये अशोक सराफची नायिका आहे - सुरेखा.

बहुदा या सुरेखानेच गुपचूप गुपचूप मध्ये महेश कोठारेची नायिका रंगविली आहे.

निलीमा अझिम ची ती तितली सिरियल आठवते का? त्यात तिने उथळ स्त्री ची भुमिका केलिये, नवरा साधा शांत असतो, आणि ही सतत भटकताना दाखवलिये, त्यातच एका फाटक्या पेंटर च्या प्रेमात पडते, घरदार मुल सोडते, मग नवरा ही अक्सेप्ट करत नाही. खूप छान होती ती मालिका!!
त्यात तिचा नवरा म्हणजे अधांतरी मालिकेमधला चष्मेवाला हिरो.

कासव, अश्विनी के, महेश

पुजा पवार झपाटलेला मध्ये होती. अजुनही काही चित्रपटांमधून तिने लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर जोडी जमविली होती.

शलाकाबद्दल टिपरेमधल्या लोकसत्तेमधल्या सदरात आलं होतं की ती लग्न करून अमेरिकेला गेली. हे सदर अर्थात तिची टिपरेमधली आईच लिहीत होती. जमल्यास लेख वाचा मला सर्व डिटेल्स आठवत नाहीत पण घरच्यांचा विरोध वगैरे असं काहीतरी पण होतं

Pages