स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Glad च्या (९९% gladच) सुर्या चांगल्या धारदार असतात. हिरव्या रंगाची मूठ असते. सगळीकडे मिळतात.

I dont know about brands in India, but check my post here for brands available in US and possibly elsewhere in the world

http://www.maayboli.com/node/6204?page=47&destination=node%2F6204%3Fpage...

Couple of tips to make sure the edge stays sharp longer- never put it in a dishwasher , also dont store it in a cutlery drawer with other tools - either use the knife block if it came with your set , or keep each knife flat , without touching any other tools .

A set of good kitchen knives should be considered a long term purchase- budget accordingly and take care of it accordingly as well.

एवढ्यातच बेड, बाथ अँड बियाँड मधून सिरॅमिकच्या सुर्‍या आणल्या. एकदम चांगल्या आहेत वापरायला. खूप धारदार आहेत. डिश वॉशरमध्ये लावता येत नाहीत मात्र.

टाटा स्कायवर नापतोलमध्ये या रोटी मेकरची जाहिरात होते आहे.
http://www.naaptol.com/food-makers/branded-electric-roti-maker-atta-make...
अडीच हजारात ठीक वाटतोय. पण कणीक मळण्यत एडिटिंगची चलाखी आहे असा संशय येतोय.
खूप जास्त रोट्या कराव्या लागणार्‍यांसाठीच वेळेची म्हणावी अशी बचत होईल.
अनेक वर्षांपूर्वीही असाच रोटीमेकर आला होता.

त्या रोटीमॅटिक लिंकमधल्या पोळ्या 'मऊ पोळ्या' कॅटेगरीतल्या पोळ्या दिसत नाहीत. गरमागरम खायला छान लागतील पण डब्यासाठी किंवा आधी करुन ठेवल्या तर कशा लागतील त्याबद्दल शंका वाटतेय.
कुणी ऱोटिमॅटिक वापरुन पाहिले तर रिव्ह्यू नक्की लिहा ! Happy

ह्या पोळ्या लाटल्या न जाता पररवल्या जातात त्यामुळे चिवट होतात. लगेचच गरमागरम खायला चांगल्या आहेत

ह्या पोळ्या लाटल्या न जाता पररवल्या जातात त्यामुळे चिवट होतात. लगेचच गरमागरम खायला चांगल्या आहेत
« 1
mazykade aahe ha rotimaker sadhya kahich waprat nahi....

कुणी ब्रेड मेकर वापरलाय का ?
मी एक पोर्तुगीज मेकचा घेतलाय. या आठवड्यात वापरायला सुरवात करणार आहे. व्हाईट ब्रेड, फ्रेंच ब्रेड, केक, पावाचे पिठ मळणे, साधे पिठ मळणे, जॅम, पास्ता असे बरेच ऑप्शन्स आहेत. यात फक्त सर्व घटक टाकायचे.
मशीनच सगळे काम करते ( मळणे, दोनदा प्रूव्हींग करणे, बेक करणे ) ... वापरल्यावर लिहीनच.

दिनेशदा, आमचे मित्र बरेच वर्ष ब्रेड मेकर वापरत आहेत. छान होतो ब्रेड! नेहमी ब्रेड खाल्ला जाणार असेल तर चांगले पडते.

ऐसी अक्षरे. कॉम वर मस्त ब्रेडच्या रेसीपीज आहेत फारच प्रोफेशनल लेव्हलच्या आहेत.

मला भा.न्ड्याचा सेट घ्यायचा आहे, t-fal hard anodized(sears $75) , kirkland(??), wolfgang-puck( $100)
अशा किमती आहे, वरिल पैकि सेटचा अनुभव आहे का कुणाला?
खरतर या सेट मधली भा.न्डि जरा मोठिच वाटतात रोजच्या स्वय.न्पाकाला, आयकियातली काही भा.न्डी, काहि भारतातली अस सध्या सगळ मिक्स प्रकरण आहे , बरच त्यातल जुन झालय त्यामुळे सगळ बाद करुन एकसारख घ्याव अस वाटतय.

प्राजक्ता, माझ्याकडे साधारण असा कर्कलंडचा, कॉस्टकोतून घेतलेला सेट आहे. अंडी-ऑम्लेट यांच्यासाठी ANOLON हार्ड अनोडाइझ्ड १-२ तवे सोडल्यास अख्खा स्वयंपाक या सेटमधल्या भांड्यांत होतो. या क्वालिटीची इतर भांडी बघता हा स्वस्त वाटला. घेऊन ७-८ वर्षं झाली. उत्तम टिकला आहे. ३-४ माणसांच्या रोजच्या स्वयंपाकाला अगदी पुरेसा आहे. देशी, इटालिअन, चायनीज... सगळे प्रकार नीट होतात.

http://reviews.costco.com/2070/11503441/kirkland-signature-kirkland-sign...

धन्स.म्रु! कॉस्ट्कोत बघते आलाय का सेट, य.न्दा फार बिल होणार, स्नॅपवेअर चे काचेचे डबे पण घ्यायचेत..

मृ -- यात भाज्या वगैरे चिकटतात का ग? म्हणजे कमी तेलात कांदा परतला फार तर चिकटेल का?

कॉस्टकोला गेल्यावर थोडक्यात सुटका होते का Wink

मृ च्या लिंकमधला सेट अनावेलेबल दाखवतोय. दुकानात विचारून पहा.

जनरली १८/१० वगैरे पाहून स्टीलची भांडि घेतली तरी मिडीञम किंवा लो वर बर्नर ठेवल्यास पदार्थ चिकटत नाही. माझं नऊएक वगैरे वर्षांचं भांडं आताशा लागायला लागलं.

मृ ने कर्कलँडचं कौतुक केल्यावर मी ही दोन वर्षांपूर्वी तो सेट घेतला होता. व्यवस्थित चालू आहे. प्रॉब्लेम इतकाच की ह्या सेटमधली मोस्टली सगळीच भांडी इतकी मोठी असतात की रोजच्या जेवणाला लागतच नाहीत. म्हणून मार्शल्समधून एक पसरट मिडीयम पॅन विथ झाकण (स्टीलचा) घेतलाय. त्यातही तेल वगैरे पुरेसं असेल तर खाली लागत नाही. गॅस खूप मोठा नसतो.

होना! जनरली माझा रोजच स्वय.न्पाक बनतो, म्हणजे मी बल्क मधे करुन फ्रिज करत नाही( तस करण चुकिच नाही गै.समज नसावा) त्यामुळे जरा मध्यम भा.न्डि बरि पडतात... मोस्टली सगळ्याच सेट मधली पॅन फार बल्की असत्तात..
काय कराव यावर आता?!
इथले हार्ड अ‍ॅनोडाइज्ड वापरलेय का ़कुणि?भारतातल एक भा.न्ड छान चालु आहे ( फ्युचुराच्च्)

मी वापरते kirkland चा stainless steel चा सेट. माझा आठवड्याचा स्वयंपाक असल्याने मोठी भांडी तेव्हा वापरली जातात. दोन छोटी भांडी चहा, डाळ वगैरे बनवायला उपयोगी पडतात. पॅन्स ऑम्लेट, फ्रोझन पराठा करायला वापरते.
मला हा सेट आवडतो. काही चिकटत वगैरे नाही पण वापरुन झाल्यावर लगेच गरम पाण्याने धुतल तर स्वच्छता सोपी पडते.
दोन गोष्टी मला खटकतात म्हणजे झाकणाला भोकं नाहीयेत त्यामुळे वाफ घालवायला झाकण तिरप ठेवायला लागत. दुसर म्हणजे झाकणाचे handles पण stainless steel चे आहेत आणि ते चांगले तापतात. मग टॉवेल वगैरे वापरायला लागतो.
पण overall मला हा सेट आवडतो. आम्ही बघताना Macys च्या Emeril च्या सेटशी compare केलेला. तोपण बघा - http://www1.macys.com/shop/product/emeril-by-all-clad-chefs-stainless-st...

माझ्याकडे भांड्यांचा सेट नाही. नुसतं मॅचिंगसाठी सेट घेणं मला अपील झालं नाही.
१ स्टीलचं पसरट पॅन आय्कियातलं आहे आणि मस्त आहे. १ स्टीलचं गोल आणि उभट झाकणाचं भांड आहे जे आमट्या, कढी, सार, रस्से असे पातळ पदार्थ करायला बरं पडतं, ते रॉस मधून घेतलय.
कॉपर बॉटमच्या देसे२ कढया आणि १ लोखंडी कढई आहे.
नॉन स्टिकची भांडी हाताने घासावी लागतात म्हणून कमीच वापरते मी आणी ही स्टीलची भांडे डिशवॉशर मध्ये लावता येतात म्हणून जास्ती आवडीची.

बाकी सेट मधली भांडी रोजच्या सैपाकाला जरा जास्तच मोठी पडतात याला अनुमोदन.

प्राजक्ता , मी वापरते हार्ड अ‍ॅनोडाईझ्ड भांडी Calphalon, circulon दोन्ही ब्रॅन्ड चांगले आहेत. माझे नवे डोसा पॅन डिश वॉशर सेफ आहे. बाकीची हाताने धुवायला लागतात. पण पदार्थ खाली अजिबात लागत नाही त्यामुळे स्वच्छ करायला सोपे जाते. मी बिर्याणीला देखील तिच वापरते. माझ्या कडे सेट नाहिये. मी ओपन स्टॉक मधली सेलवर घेतली होती.
पॅनकेक पफ पॅन मी गेली बरीच वर्षे वापरतेय अप्पे करायला. कास्ट आयर्नचे पॅन मला सिविएस फार्मसीत ९.९९ ला मिळाले होते.

सेट नको असेल तर मेसीज मधे सेल चालुच असतो. हव्यात्या साईज च भांड घेतल तर भरपुर वापर होतो. सध्या मी नॉन स्टीक च्या वाट्याला जातच नाही. गॅसच तंत्र जमलं की काही प्रॉब्लेम येत नाही.

Pages