Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद बस्के .. Food
धन्यवाद बस्के .. Food processor वापरायला जरा कठीण वाट्ला त्यामुळे बघत होते की kitchen aid सारखे काही कमी खर्चिक इथे US मध्ये मिळेल का.. कारण बहुधा थोडे दिवसच इथे रहावे लागनार असे वाटते..
खरं सांगायचं तर फूड
खरं सांगायचं तर फूड प्रोसेसरमध्ये वगैरे कणीक भिजवण्यापेक्षा हाताने भिजवणं सोपं नाही का पडणार. परात, बोल आणि आपले हात एवढंच धुवायचं काम झालं की. फूड प्रोसेसरची भांडीच केवढी होतात. एकदा पाणी , तेल अंदाज आला की काम पटकन होईल.
पनिनी मेकर माझा पण लाडका आहे.
पनिनी मेकर माझा पण लाडका आहे. माझ्या मुलाला डब्याला सँडविचेस न्यायला खूप आवडतं कारण हात जास्त खराब न होता डबा पटापट संपवता येतो. रोजची भाजी पनिनी ब्रेडमध्ये घालून वाटल्यास एखादी चीज स्लाईस ठेवून मस्त सँडविच होतं.
आमच्याकडे सध्या लेकीला सबवे
आमच्याकडे सध्या लेकीला सबवे सँडविचेस खूप आवडतात , त्यामुळे मॉर्निंगस्टारच्या पॅटीज आणून सँडविचेस करणं चालू असतं. हे डब्याचं भाजी सँडविच चांगलं ऑप्शन वाटतंय. नवीन पनिनी रेसिपीजचा धागा निघाला तर तिकडे दे बिल्लो तुझ्या रेसिपीज. पुढच्या वर्षी आमचा डबा सुरू होईल शाळेचा. उपयोगी पडेल.
माझ्याकडे टोस्टमास्टरचा
माझ्याकडे टोस्टमास्टरचा सॅन्डविचमेकर आहे. मुलगा लहान असताना घेतला होता ९ डॉलरला. पैसे वसूल झाले. भाजी घालून ब्रेडची पॉकेट्स ऑन द गो खाण्यासाठी चांगली पडायची. लेक डॉर्मला गेल्यापासुन पानीनी मेकर आणि सॅन्डविच मेकर दोन्ही पडून आहेत.
sayo, te zalach. mi hatanech
sayo, te zalach. mi hatanech bhijwte, ghari polya kelya tar..hatachya muscles na exercise hoto asa mhanat..
mazyakadehi george foreman grill ahe. mi visarle hote. kahitari kele pahije ekda..
माझ्याकडे फिलिप्सचा पनिनि
माझ्याकडे फिलिप्सचा पनिनि मेकर आहे. सॅन्डविच व्यतिरिक्त इतर काय रेसिपीज करता येतिल.
माझ्याकडे खालील प्रकरण आहे,
माझ्याकडे खालील प्रकरण आहे, Black and decker चे
http://www.flipkart.com/chef-pro-cps822/p/itmdp8znjau7vupr?pid=SWMDP8ZGR...
१. एखादी बोरिंग भाजी आणि सकाळ्ची उरलेली पोळी संपवायची असेल तर पोळीत भाजी भरून, थोडे तूप् /बटर् /चीझ /तेल + ओली/ कोरडी चटणी असे ग्रील करते. हा सगळ्यात बेस्ट वापर आहे माझ्यासाठी.
२. मी ग्रील सँडविच करते.
३. टेलिशॉपिंगमधे पनीर, टिक्की वै. ग्रील करताना, ऑम्लेट करताना दाखवतात मी कधी करून पाहिले नाहिये.
४. मागे कोणीतरी थालिपीठ छान आणि भरकन होतात असे लिहिल्याचे आठवते.
Black & Decker 250 Watts Bowl
Black & Decker 250 Watts Bowl And Stand Mixer M650
हा कोणी भारतात कणिक मळण्यासाठी वापरला आहे का?
पनिनी मेकरचा वेगळा धागा उघडला
पनिनी मेकरचा वेगळा धागा उघडला आहे.
आज प्रेस्टीजचा आणि फुचुराचा
आज प्रेस्टीजचा आणि फुचुराचा हार्ड आयोनाइजड २ लिटर्चा कुकर बघितला. फ्युचुराचा जरा महाग वाटला. प्रेस्टीजचाच स्टिल्चा हि पाहिला. तो इंडक्शन कुक टॉपवर हि चालतो. इंडक्शन कुक टॉप सद्ध्या तरी घेइन असं वाटत नाही आहे. तरीही या ३ पैकी कुठला घेतलेला बरा?
मी फ्युचुराचा हार्ड आनोडाईज्ड
मी फ्युचुराचा हार्ड आनोडाईज्ड सुचवेन.
मी आताच दिवाळीला फ्युचुराचा
मी आताच दिवाळीला फ्युचुराचा हार्ड आनोडाईज्ड ३ लिटरचा कुकर घेतला.छान आहे. पदार्थ पटकन शिजतात त्यामुळे इंधन आणि वेळ दोन्हीची बचत होते.
माझेही मत फ्युच्युराकरता.
माझेही मत फ्युच्युराकरता. बेस्ट कुकर आहे.
प्रेस्टीजचाच स्टिल्चा हि
प्रेस्टीजचाच स्टिल्चा हि पाहिला>>> हंडी शेप्ड का? मस्त आहे एकदम. माझ्याकडे आहे. साफ करायलाही सोप्पा आहे.
फ्युच्युरा हार्ड अॅनोडाईज्ड
फ्युच्युरा हार्ड अॅनोडाईज्ड कूकर (हंडी शेपमधे) २ लिटरचा घेतला आहे. दोन माणसांच्या भाज्या, उसळी दोन माण्सांसाठी करायला बेस्ट आहे.
प्रेस्टीजचा स्टीलचा प्रेशर पॅन (३ लिटरचा) इंडक्शनसाठी घेतला आहे. त्यामध्ये रोजचा वरणभात, खिचडी, पुलाव वगिरे छान होतात. भरली वांगी वगैरेसाठी पण वापरते.
अजून एक मोठा प्रेशर पॅन आहे (हार्डअॅनाडोऐज्ड) त्यामधे बिर्याणी, पुलाव वगैरे (थोडी जास्त क्वाण्टीटी) असेल तर बरा पडतो.
याखेरीज अजून दोन हिंडालियमचे उभे कूकर आहेतच, त्यामध्ये वरणभात आणि बटाटे उकडणे वगैरे कामे शक्यतो केले जातात.
बेस्ट कुकर कोणता आहे? हार्ड
बेस्ट कुकर कोणता आहे? हार्ड अॅनोडाईज्ड कूकर का प्रेस्टीजचा स्टीलचा? कमी वेळात पदार्थ पटकन शिजायला हवा़ आहे. हार्ड अॅनोडाईज्ड कूकरचे कोटिंग रोज वापरले तर जाईल का? रोजच्यासाठी कुकर हवा आहे.
शिवाय रोजच्या भाजी साठी स्टील प्रेशर पॅनचा किती ऊपयोग होतो ?
बेस्ट कूकर असे काही मला
बेस्ट कूकर असे काही मला सांगता येणार नाही,. दोन्ही रोज वापरतेय .
माझा दोनच लिटरचा लहान हार्ड अॅनाडाईज्ड पटकन गरम होतो, त्यामुळे भाज्या लवकर होतात आणि तो खूप वेळ गरम राहतो. माझ्या या कूकरचे कोटींग गेले चार वर्षे रोज वापरून तरी गेलेले नाही.
रोज कूकरला भाज्या शिजावायची सवय असेल तर स्टील प्रेशर पॅन/कूकर्/हंडी या सर्वांचाच चांगला उपयोग होतो.
छोटा हॅड मिक्सर कोणत्या
छोटा हॅड मिक्सर कोणत्या कंपनीचा घ्यावा?
मसाले चटणी मिरची बारीक करायब
http://www.shimono.com.sg/Food-Processor-Juicer या साईट वर पा।हा
माझ्या या कूकरचे कोटींग गेले
माझ्या या कूकरचे कोटींग गेले चार वर्षे रोज वापरून तरी गेलेले नाही. >> माझ्यापण! मी पण रोज वापरतेय्..(मी मऊ स्क्रबरच वापरते आणि डिशवॉशर ला शक्यतो लावत नाही)
मी आधी हातानेच कणीक भिजवायचे
मी आधी हातानेच कणीक भिजवायचे पण मग thumb tendonitis मागे लागल्यावर फु प्रो आणला.. I love it
माझ्याकडे हॅमिल्टन बिचचे मॉडेल आहे. वापरायला, साफ ठेवायला एकदम मस्त नी स्वस्त पर्याय आहे.
सगळ्यांना धन्यवाद. आता
सगळ्यांना धन्यवाद.
आता फ्युचुराचा घ्यायला हरकत नाही.
माझा हार्ड आयोडनाइझ फ्युचुरा
माझा हार्ड आयोडनाइझ फ्युचुरा गेली सात वर्षे वापरात आहे. अगदी जशाला तसा.
>>अगदी जशाला तसा आपण एक
>>अगदी जशाला तसा
आपण एक शिट्टी वाजवली तर दोन शिट्ट्या मारणारा कुकर डोळ्यांपुढे आला.
जसाच्या तसा.
मृ
मृ
आपण एक शिट्टी वाजवली तर दोन
आपण एक शिट्टी वाजवली तर दोन शिट्ट्या मारणारा कुकर डोळ्यांपुढे आला>>
पण ते हार्ड अनोडाइज्ड कुकर शिट्टी न मारणारे असतात ना? त्यामुळे सतत सत्र्क राहून वेळेवारी गॅस बंद केला गेला पाहिजे ना? की तो वेगळाच कोणता कुकर? माझ्या सारख्या वेंधळ्यांना जोरात शिट्टी मारून जागं करणाराच कुकर ठीके.
एक माठ प्रश्न. माठ विकत
एक माठ प्रश्न. माठ विकत घ्यायचा आहे. आधी दोन वेळेला ( एकदा लाल , एकदा काळा) घेतलेल्या माठात पाणी फार गार होत नव्हतं. आता नविन घेताना काही टिप्स आहेत का ?
कोणी अमेरिकेत जेसीपेनी, मेसी
कोणी अमेरिकेत जेसीपेनी, मेसी मधून प्रेशर कुकर घेतला आहे का? इथले कुकर आणि भारतीय कुकर यामधे काय फरक असतो?
राईस कुकर कुठला चांगला आहे
राईस कुकर कुठला चांगला आहे ?
ब्राऊन राईस पण करता येईल असा हवा आहे.
मवा माझ्याकडे अरोमा चा राईस
मवा माझ्याकडे अरोमा चा राईस कुकर आहे. टार्गेट मधून घेतला होता. त्यात दोन ऑप्शन आहेत. ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस. प्ल्स वर एक स्टीमर आहे. चांगलाय हा कुकर.
Pages