स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात मिळेल असा कास्ट आयर्न किंवा बीडाच्या भांड्यांचा ब्रॅन्ड हवा आहे. मला बिर्याणी साठी उभट पण मोठं (डच अव्हन??) भांडं घ्यायचय.

>>अंजली_१२ | 2 June, 2014 - 22:27 नवीन
सायो त्या स्टिल कुकवेअर मधे फोडणी वगैरे करता येते का?>> हो. म्हणजे का नाही करता येणार? खाली अजिबात लागत वगैरे नाही. साधारण ह्या सेट्समध्ये एकच लहान साईझचं भांडं येतं जे पुरेसं नसतं म्हणून मध्यंतरी मार्शल्समधून कुझिनआर्टचं स्टीलचा आणखी एक पॅन घेतला. तो ही मस्त आहे.

मला बिर्याणी साठी उभट पण मोठं (डच अव्हन??) भांडं घ्यायचय. >> भारतात मिळणार नाहीत बहुतेक . अन परदेशातून न्यायला अम्मळ वजनदार असणार, पण lecreuset चे डच अव्हन्स स्टोव्हटॉप, स्लो कुकिंग साठी एकदम बेस्ट.

भारतात पारंपारिक बिर्याणी वाल्यांची जाड पितळी भांडी असतात अन रेग्युलरली कल्हई करवून घेत असतात.

खाली अजिबात लागत वगैरे नाही.>>>> हां तेच म्हणायचं होतं मग घ्यायला हरकत नाही कॉस्टको मधून.
इंग्रो मधून हार्ड अनॉडाईज कढई घेतली. खूपच मस्त आहे.

अंजली, तुझ्याजवळ मार्शल्स असेल तर अधेमधे चक्कर टाकत जा. मध्यंतरी कास्ट आयर्नचा तवा फक्त $१२ ला मिळाला. बाहेर त्याची किंमत $२५,२६ आहे. फक्त आवडलं की लगेच घेऊन टाकायचं. गरज आहे की नाही हा विचार घरी येऊन करायचा. विचार करत पुढच्या वेळी गेलं की वस्तू संपलेल्या असतात तिथे Wink

स्टीलच्या बाकी भांड्यांचं माहिती नाही, पण कर्कलंडच्या सेटचा अनुभव आहे म्हणून त्याबद्दल लिहू शकते. बुडं जाड असली तरी या भांड्यांमधे सुरवातीला फोडणी जळते. जोवर आपल्याला आपली हॉट प्लेट किंवा गॅस फ्लेम किती मंद-मोठी ठेवायची ते कळत नाही, भांडं किती लवकर तापतं याचा अंदाज येत नाही तोवर एकतर शांतपणे वाट बघावी लागते, किंवा जळत्या फोडणीवर ताटली शोधायला धावपळ करावी लागते. Proud एकदा हा अंदाज आला की मात्र सगळं अलबेल होतं.

ही स्टीलची भांडी इतकी सही आहेत की आता कितीही हायफाय नॉनस्टिक भांडी बाजारात आली तरी वापराविशी वाटत नाहीत.

सध्या होम गुड्समधून कास्ट आयर्नचा $५ चा एक २" X २" चौरस तवा आणलाय. तो नीट सांभाळता आला तर मोठा घ्यावा असा विचार आहे.

ही स्टीलची भांडी इतकी सही आहेत की आता कितीही हायफाय नॉनस्टिक भांडी बाजारात आली तरी वापराविशी वाटत नाहीत.>>>+१०००

तुम्हि कोणी, हार्ड अनॉडाईज भांडी वापरत नाही का? माझ्याकडे Calphlon ची २ भांडी ३-४ वर्षापासुन आहेत. काहिही झालेलं नाहि त्यांना. हा पण फार जड आहेत आणि बाहेरुन खराब दिसतात. काळा रंग उडाला आहे बाहेरचा. आतुन मात्र जशीच्य तशी आहेत. त्या अनुभवामुळे मी कायम हार्ड अनॉडाईज सेट्स चं घेत आली आहे.

माझ्याकडे एक हार्ड अनोडाइज्ड तवा आहे. तो जड आहे म्हणून मला वापरायला कंटाळा येतो पण नवरा त्याच्यावर डोसे करायला कंटाळतो. हे तवे डोशासाठी वापरायचं काही वेगळं टेक्निक आहे का? तापायला वेळ लागतो पण एकदा तापला की भराभर कामं होतात असं मैत्रीण म्हणते.

मी त्याऐवजी हार्ड अनोडाइज्ड ग्रील (बर्नरवर ठेवायची) पॅनकेक वगैरे बनवताना वापरते. ती बरेचदा एका बाजुच्या बर्नर्सवर मुक्काम ठोकून असते. Happy

हार्ड अ‍ॅनोडाइज्ड तव्यावर दोसे बनतात का? कसे बनवायचे?

भारतात असे हायफण्डू हुक्स मिळत नसतील पण आपले साधे ज अक्षरासारखे हुक्स स्टीलचे वगैरे मिळतात ते चांगले टिकतात. आणि कामासाठी येणारी बाईच जास्त वापरणार असेल तर नक्कीच. (पण ते लिंक मधले हुक्स मस्त आहेत.)

भारतात संजीव कपूरने जाहिरात केलेली काही भांडी मिळत आहेत आणि टप्परवेअरची सुद्धा पण कायच्या काय महाग आहेत ती.

भ्यॉsss
माझ्याकडे आहे तो जडच्य जड हार्ड आयोडाइज्ड तवा/पॅन. पण मध्यंतरी कास्ट आयर्नचं पॅन आणलं नवर्‍यानं (असल्या खरेद्या कौतुकाने तोच करतो... ).
भल्तिच प्रेमात पडलेय (पॅनच्या). तसलं बिर्याणीसाठी हवंय....

स्कॅन पॅन. ते seasoned आहे.
पोरस (सच्छिद्र) असल्याने त्याला साबण लावायचा नसतो असं कुणी सांगुन गेलय... (म्हणे)
तरीही अगदी किंचित लिक्विड सोप (बदनामीपुरता) आणि गरम पाणी घालून स्वच्छं धुवुन पुसुन घेते. नुस्तच पाण्याने धुणे पचनी पडलेलं नाही.
जबरी आहे. साधी बटाट्यांची काचर्‍या-भाजी सुद्धा भारी होते. भरली वांगी, भेंडी वगैरे तर लय भारी.

scEn??

अगो बाई माझा explorer नाही टायपू देत मराठीत.... ते आधी दोन शब्दांचं नमनाचं घालावं लागतं ना... मग सेव्ह करायचं अन संपादन नावाच्या कर्मात बाकीचं तेल.

बाकी...

माझ्याकडे आहे तो जडच्य जड हार्ड आयोडाइज्ड तवा/पॅन. पण मध्यंतरी कास्ट आयर्नचं पॅन आणलं नवर्‍यानं (असल्या खरेद्या कौतुकाने तोच करतो... ).
भल्तिच प्रेमात पडलेय (पॅनच्या) >>> Biggrin

हार्ड अ‍ॅनोडाईस्ड तवे/कढाया कधी बदलाव्यात? माझ्याकडच्या तव्यावर/कढईवर चरे दिसताहेत. हे वापरण्याचे ४थे वर्ष आहे. ही भांडी एक्स्जेंज ऑफरमध्ये बदलून(त्याच प्रकाराची नविन) मिळतात का?

Pages