दिवाळी अंक २०१४

Submitted by नंदिनी on 6 October, 2014 - 07:29

२०१४ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.

बाजारामध्ये कुठले अंक उपलब्ध झाले आहेत तेही इथं नमूद करता येइल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्या लवकर दिवाळी अंक प्रकाशित व्हायला लागले? Uhoh
मला इथे बसून काहीच कळत नसल्याने हा अडाणी प्रश्न विचारते आहे..

बहुतेक यायला लागलेत. जाहिराती तरी चालू झाल्यात. मलाही इथं बसून काही कळत नाही, तरी आधीच बीबी काढून ठेवलाय, कारण नंतर काय काय ऑर्डर करायचं हा फार मोठा गोंधळाचा प्रश्न होतो.

यंदाच्या मुशाफिरी दिवाळी अंक संपादनात ललीचा हातभार आहे. माहेर, मेनकामध्ये मायबोलीकर झळकतीलच.
हे अंक माझ्या आत्तापर्यंतच्या यादीत आहेत.

मी शॉपिन्ग लिस्ट दिली आहे. आमच्या इथल्या लायब्ररीची बाई घेउन मला देते विथ डिस्काउन्ट.

माहेर मेनका, किस्त्रीम श्रीव सौ, मिळून सार्‍याजणी आवाज, साप्ताहिक सकाळ धनुर्धारी, शतायुषी.
शेव्टचे दोन आईबाबा घेत असत व तासंतास वाचून खल करत असत. जस्ट टु रिलिव्ह दॅट मेमरी.

वाट बघते आहे.

जाहिराती कुठे मिळतील बघायला? (आणखी एक अडाणी प्रश्न) मी नेटवर दिवाळी अंक २०१४ असा सर्च दिल्यावर माबो सोडून काहीच दिसलं नाही

लले, अभिनंदन गं Happy
मुशाफरीची अनुक्रमणिका वगैरे बघायला मिळेल का ऑनलाईन?

वरदा, मला फेसबूकावर काही जाहिराती दिसल्या. यंदाचा ललित आला नाही, त्यात पण जाहिराती असतील. मागच्यावर्षी मुशाफिरीची फेसबूकवर अनुक्रमणिका दिली होती. यंदा काहीच नाही.

मी नेटवर दिवाळी अंक २०१४ असा सर्च दिल्यावर माबो सोडून काहीच दिसलं नाही>>> तुझी पोस्ट वाचल्यावर मी तेच केलं आणी हाच बीबी मिळाला.

Maayboliwar mahattvachya ankanchya anukramanika lavkarach wachayala miltil.

बूकगंगावर अंक आला की preview मधे अनुक्रमणिका दिसते. पण अजून यंदाचे अंक / त्यांची लिंक तिथे दिसत नाहीये.

मासिकांमध्ये त्यांच्या त्यांच्या दिवाळी अंकांत काय असेल याबाबत जाहिराती(?) असतात, माहेरमध्ये नेहमीप्रमाणेच अनेक मायबोलीकरांची नावे पाहिल्याचे आठवते.

मी मागच्या आठवड्यात बुधवारी की काय चक्कर टाकली होती तेव्हा फक्त ऋतुरंग मिळाला. स्थलांतर हा विषय घेऊन काढलेला अंक आहे. भारत - पाकिस्तान फाळणी प्रसंगावर लिहिलेले काही मान्यवरांचे (कुलदीप नय्यर, गुलजार वगैरे) लेख (अनुवादीत) आहेत. इतरही अनेक स्थलांतरांचे पैलू दाखवणारा हा अंक छान वाटतोय.

आज सकाळी सकाळी जाऊन खालील अंक आणले :

माहेर, मेनका, नवल, हंस, दक्षता, लोकसत्ता, दीपोत्सव, मुशाफिरी, साप्ताहिक सकाळ.

मायबोलीकरांची नावं वाचून आनंद झालाय. आता दिवाळी सुरू झाली म्हणायला हरकत नाही. Happy

लेखक अनिल अवचट ह्यांचे या वर्षीच्या दिवाळी अंकातले लेख असे आहेत :

१). सा. सकाळ= तुकोबा ,
२ ). दीपावली=आजीपर्व ,
३) . अनुभव =cancer
४ ). मौज = रक्ताची गोष्ट ,
५) . पासवर्ड = कुत्र्याची चित्रे ,
६) . बाल साधना= गोष्ट ,
७) . प्रपंच =माझे खडी बोलीतील दोहे .
८) मुक्त शब्द : 'गावे , मनात वसलेली .'

आमच्या लायब्ररीत काल येणार होते अंक. दिवाळी स्पेशल खात काढाव लागत आमच्याइथे दिवाळी अंकांसाठी. आजच जाऊन काढणार आहे.

Pages