दिवाळी अंक २०१४

Submitted by नंदिनी on 6 October, 2014 - 07:29

२०१४ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.

बाजारामध्ये कुठले अंक उपलब्ध झाले आहेत तेही इथं नमूद करता येइल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम तो छा गयी हो Wink

मी मागवलेले अंक पण पोचले गेल्या आठवड्यात. सध्या फक्त चाळलेत, त्यातली ओळखीतली नावं चटकन लक्षात आली.

"पासवर्ड" दिवाळी अंकाचे स्वरुप नक्की काय आहे हे सांगता येईल का ? गेल्या वर्षीचे 'युनिक फीचर्स' चे अंक आवडले होते त्यावरून मागवायचा विचार करत होतो म्हणून प्रश्न.

असामी, 'पासवर्ड' हा मुलांसाठीचा अंक आहे. (वयोगट १० ते १६ धरून चाला.)
मराठी आणि इंग्रजी अशी दोन व्हर्जन्स आहेत. मजकूर एकसारखाच, भाषा वेगळी. छान सादर केलेला आहे, स्वरूप, मजकूर, रंगरूप - सगळंच फ्रेश आहे.

बी, समीक्षण कुठे वाचलंस? मलाही आवडेल वाचायला.>>> ललिताताई, मी हे समीक्षण फेसबुकवर वाचले. चंप्र देशपांडे हे माझे मित्र आहेत. त्यांच्या वॉलवर वाचले.

तू सं.स. अस नाहीतए स.सं. आमच्यासाठी ते ललिताचे अंक या गटात बसतात आणि सुरवातीला ते ललीचे अंक म्हणूनच घेतले जातात Proud

ललिता, वा ग्रेट आहे. तुला चंप्र शोधता आलेत. ते आणि त्यांचे मित्र अत्यंत छान लिहितात. वेगळ काहीतरी.

तू कुठे कुठे लिहितेस ते लिहितेस का? तू एक लेखिका आहेस हे मला माहिती नव्हत. स्वान्तसुखाय लिहितेस की व्यवसायार्थ? अभिनंदन!

बर्‍याच दिवसांनी कपालबडवतीमोडमध्ये!

बी, प्रीति छत्रे ही एक नावाजलेली कथालेखिका आहे. कित्येक कथांना बक्षीसे मिळाली आहेत. दिवाळी अंकामधून लिखाण केलेले आहे.

नंदिनी, हो मी प्रीति छत्रे हे नाव ऐकले आहे आणि तिच्या कथाही वाचलेल्या आहेत. बहुतेक माहेर मधे पण ह्या लेखिका म्हणजेच ललिताताई आहेत हे माहिती नव्हते.

ललिता, धन्यवाद पण अगदी आखूडता रिप्लाय दिलास. भरभरुन लिहायला हवे होते काय लिहिलेस .. काय लिहिते आहेस त्याबद्दल Happy

बी, जर तुम्ही ललिता-प्रीति (प्रीति छत्रे) म्हणजेच जुन्या मायबोलीवरच्या Lalitas असे धरून चालला असलात तर- त्या दोन भिन्न व्यक्ती आहेत. Happy
तुमचा असा काही समज नसेल तर मात्र मध्येच नाक खुपसल्याबद्दल क्षमस्व.

तुम तो छा गयी हो >> अगदी अगदी.
ललिताने आमच्या 'फ फोटोचा' या फोटोग्राफी विषयावरच्या ऑनलाईन दिवाळी अंकासाठी मु.शो. ही केलं आहे. Happy
अंक अजुन प्रकाशित झाला नाहीये ( सरकारी लाल फितीमुळे प्रकाशन रखडलेय ते डिसें मधे होईल)

ललिताचे सगळे अंक वाचायचे आहेत. वाचुन रिप्लाय देईनच.

'अनुभव'च्या दिवाळी अंकामधला डॉ. समीर कुलकर्णी यांचा 'योगस्थ' हा लेख अवश्य वाचावा असा आहे. लेख योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्याविषयी आहे. निव्वळ व्यक्तिचित्र वा निव्वळ आठवणी असं नाही; चौकट मोडलेला फॉर्म आहे.

गजानन, काही हरकत नाही. ललितास ह्या मला माहिती आहेत. त्या इथे स्वित्झरलॅन्डवरुन सिंगापुरला आल्या होत्या तेंव्हा मी त्यांच्याशी भेटलो होतो. खूप मनमोकळ्या स्वभावाच्या आहेत. एक उत्तम लेखिका सुध्दा आहेत त्या. त्यांच्या रंगीबेरंगीवर त्यांनी खूप सुंदर लेखन केलेले आहे.

Lol पुढे इतकी चर्चा झाली होय काल.. Lol

बी, मी काय लिहिते याबद्दल मीच कसं काय भरभरून लिहिणार? Wink

डॉ. समीर कुलकर्णींचं लेखन आवडतंच मला, इन जनरल. 'अनुभव'मधे ते नियमित लिहितात.

असामी, अंक घेतलात तर कसा वाटला हे नक्की कळवा. Happy

ललिता, माहिती म्हणून लिहि कौतुक म्हणून नको लिहुस. हे आणि कस लिहायच हे तुला तरी सांगणे ने लगे Happy

असामी, आत्ता पुण्यात दिवाळी अंक मिळतील का? माझ्यामते दिवाळीच्या वेळेसच त्या तीन चार हप्त्यात दिवाळी अंक मिळतात. आता अगदी उरले सुरले असकस दिअ मिळतील.

मी त्यांच्याशी भेटलो >>>> 'त्यांना' रे !!!
हप्त्यात >>>> Uhoh बी काय झालं तुला ?

हे स.कु. आणि 'मौज'मध्ये कथा लिहिणारे स.कु. एकच का? मौजमध्ये डॉ. लिहिलेलं नाहीये..

पराग, त्यांच्याशी भेटलो हे चुकीचे आहे का? आमच्याकडे त्यांना भेटलो असे कुणी म्हणत नाही. त्यांच्याशी भेटलो.. त्यांच्याशी बोललो.. त्यांच्याशी काम होते .. त्यांच्याशी बोलणे झाले.. हेच जास्त प्रचलित आहे. आणि हप्ता म्हणजे एक आठवडा. बोलीभाषीतील शब्द आहे. या हप्त्यात.. त्या हप्त्यात असे बोलले जाते विदर्भात. असो. लक्षात ठेवीन. धन्यवाद.

त्यांच्याशी बोललो.. त्यांच्याशी काम होते हे ऐकलं आहे.. पण त्यांच्याशी भेटलो हे ऐकलं नव्हतं.. (मुंबई,पुण्यात तरी.. विदर्भाचं माहित नाही.. )
मी भाषातज्ज्ञ नाही पण.. हल्ली बरेच ठिकाणी विभक्तीप्रत्यय चुकीचे वापरलेले दिसतात (उदा. त्यां'चे' धन्यवाद) आणि खटकतात.. म्हणून लिहीलं..

बी, तुमचे खूप आभार ललिता-प्रीती यांना विचारल्याबद्दल!
ललिता -प्रीती, लोकसत्ताच्या विव्हा पुरवणीमध्ये तुमचे लेख वाचले आहेत! प्रीती छत्रे म्हणजे तुम्हीच हे कळल्यावर फार भारी वाटतंय! मला ते लेख भयंकर आवडले होते! Especially, ओबामा यांच्या शपथविधीवर वर निबंध लिहा वाला! मी तो सेव्ह करून ठेवला आहे! You have a fan here!

जिज्ञासा, तुझे पण पुरवणीबद्दल सांगितलेस त्याबद्दल अनेक अनेक आभार. प्लीज लिंक पण दे ना नेमकी.. म्हणजे माझा वेळ वाचेल. धन्स.

Pages