दिवाळी अंक २०१४

Submitted by नंदिनी on 6 October, 2014 - 07:29

२०१४ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.

बाजारामध्ये कुठले अंक उपलब्ध झाले आहेत तेही इथं नमूद करता येइल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेर मॅग्झ्टरवर वाचला थोडा. शर्मिलाचा लेख फार फार सुंदर आहे! धीरज अकोलकरचे सिनेमे शोधून पाहायची उत्सुकता वाटली.
चिनुक्सचा - सॅनिटरी नॅपकीन वापरणारा पुरुष हा लेख कोणावर असेल त्याचा अंदाज होता, न्युजपेपरमध्ये बातमी वाचली होती पूर्वी. परंतू इतकी इत्यंभूत माहीती वाचल्यावर मुरुगांतरम(? नाव नंतर कन्फर्म करून लिहिते) यांच्याबद्दल खूपच आदर वाटला! किती कळकळ ! रिस्पेक्ट..
नंदिनीची शब्द परतएकदा वाचताना परत मजा आली! Happy
कविनची कथादेखील आवडली..

ललिताप्रीतीची कथा वाचायला घेतली आहे. वेगळाच फॉर्म निवडला आहेस गं.. वाचून झाल्यावर अपडेट करते नंतर..

आईने फराळाबरोबर 'पुण्यभूषण' नावाचा पुण्यावरचा अंक पाठवला आहे. प्रचंड आवडला! अजुनतरी पूर्ण झाला नाही. पण पूरवून पूरवून वाचायला मजा येते आहे. निरंजन घाटे यांचा लेख एकदम खुसखुशित आहे.. Happy ( पण हे विनोदी लिहितात हे माहीत नव्हते मला. निरंजन घाटे वाचल्यावर काहीतरी विज्ञानाशी संबंधित असेल असं वाटले होते. कदाचित माबुदोस..)

बरं हितगुज दिवाळी अंक कधी येणार?

मला माहेर मिळाला नाही .कॉपीज नाहीत . मेनका मिळालेला आहे . बहुतेक अंक चाळले आहेत . कालनिर्णय , अंतर्नाद , सामना , चारचौघी ,लोकसत्ता , मटा ऋतुरंग वगैरे . ऋतुरंग मला रोचक वाटला . लिस्टित टाकलेला आहे .

( बहुतेक दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर यंदा जुयरेगा फेम आदित्य मेघना जास्त झळकलेले दिसून आले )

'साधना' आणि 'मौज' हे दोन दिवाळी अंक फार्फार आवडले.
'अक्षर' तितकासा आवडला नाही.

काल ३ अंक विकत आणले आहेत. मौज, अक्षर, ऋतुरंग.
'अक्षर'मधल्या 'सेल्फी' या विभागाची कल्पना चांगली वाटली.
ऋतुरंग स्थलांतर विशेषांक आहे
अजून सविस्तर वाचायला सुरूवात केलेली नाही.

डिजिटल दिवाळी अंक 2014 हा नेटवरचा दिवाळी अंक वाचनात आला . चेपू वर बरिच चर्चा झालेली आहे याची . लेखकांमध्ये मोठी नाव दिसत आहेत . कविता महाजन , संध्या सोमण , अवधूत परुळेकर वगैरे .

घरी आत्तापर्यंत आलेले अंक म.टा., पुरुष स्पंदनं , अक्षरगंध. अंक चांगले आहेत , अजून नीट वाचायचे आहेत.म.टा. मध्ये गोविंदजी तळवलकरांचा विशेष लेख 'नेहरू पर्व ' खास आकर्षण , अक्षरगंध हा नाटक विशेषांक ( संपादिका मधुवंती सप्रे ) आहे, तरी अंकाचा एक भाग लता मंगेशकर यांच्यावरील निवडक लेख व पद्मा सचदेव यांची त्याच विषयावरील मुलाखत याने व्यापलाय. पुरुष स्पंदनं( संपादक हरीश सदानी , रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ) धर्म व नातेसंबंध विशेषांक आहे.

चिनुक्सचा - सॅनिटरी नॅपकीन वापरणारा पुरुष हा लेख कोणावर असेल त्याचा अंदाज होता, न्युजपेपरमध्ये बातमी वाचली होती पूर्वी. परंतू इतकी इत्यंभूत माहीती वाचल्यावर मुरुगांतरम(? नाव नंतर कन्फर्म करून लिहिते) यांच्याबद्दल खूपच आदर वाटला! किती कळकळ ! रिस्पेक्ट..
>>>

यांचा एक टेड टॉक आहे. तो जरूर बघा

१) महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंकात, संजय जोशीने "कॉर्पोरेट खांदेपालट" क्षेत्रावर आधारित अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. सगळ्यांनी आवर्जून वाचावा असा आहे

२) मौज दिवाळी अंकातला विजय कुवळेकर यांचा लेख फार सुंदर आहे. विश्राम बेडेकर यांचे व्यक्तिचित्र छान उभे केले आहे.

३) वसा च्या दिवाळी अंकातली विवेक गोविलकर यांची कथा चांगली आहे.

४) दीपावली मधली योगिनी वेंगुर्लेकर यांची कथा हटके आहे.

५) साहित्य सूची - संपादकीय, भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत आणि एक कथा

6) संवाद - आम्ही आणि आदर्श

7) प्रपंच - स्वत:ला बदलताना

8) विशाखा - एक उग्र आदिम लेखक (भालचंद्र नेमाडे यांच्यावर लेख )

9) ग्राहकहित - वाचंनसंस्कृती

अक्षर दिवाळी अंक :

- सेल्फी ही विशेष लेखमाला आवडली. खूप काही विचारधन वगैरे नाहीये, पण तरूण पिढीचे 'यंग अ‍ॅण्ड रेस्टलेस' सुरातले उथळपणा टाळून मांडलेले विचार चांगले वाटतात वाचायला. घरातला तरूण सदस्य खूप प्रभावित झाला ते वाचून...

कथा विभाग ऑलमोस्ट वाचून झालाय.

- मिलिंद बोकीलांची कथा ('चित्ता') साधी, सरळ पण एकदम चित्रदर्शी आहे. अखेरपर्यंत उत्सुकता टिकून राहते.

- सतीश तांबेंची कथा ('ना.मा.निराळे') विषय जिव्हाळ्याचा, थोडी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट मांडणी आहे. पूर्वार्ध खूप मन लावून वाचला, पण उत्तरार्धात जरा भरकटायला झालं. कदाचित पुन्हा वाचून अधिक चांगल्या तर्‍हेनं कळेल.

- गणेश मतकरींची कथा ('शूट') छान आहे. पण 'खिडक्या...'ची सर नाही. (दरवेळी ही तुलना होतेच.)

- वसुधेंन्द्र नामक लेखकाची एक अनुवादित कथा आहे. ('जिथे क्षमा केली जात नाही') मूळ कथा कुठल्या भाषेतली आहे याचा उल्लेख नाहीये. कथा बेंगळूर शहरात घडते. त्यावरून ती कानडी असावी असा मी अंदाज बांधला. कथेची थीम चांगली आहे. पण मांडणी अगदीच बाळबोध वाटली मला.

- अजून एक अनुवादित कथा आहे. ती वाचायची राहिली आहे.

- मला सर्वात आवडली ती राजकुमार तांगडे यांची 'झोपले वाटतं...!' ही कथा. जबरदस्त लिहिली आहे. नर्मविनोदी शैलीत असे चिमटे काढले आहेत, व्यवस्थेचं, सरकारी फोल योजनांचं इतकं भेदक दर्शन घडवलंय, की बस्स! प्रत्येक पंचला गालातल्या गालात हसताना छातीत एक बारीकशी कळ जाते, पोटात तुटतं.

'लेख' विभागातला पहिलाच निळू दामले यांचा लेख ('पंतप्रधान विकणे आहे') एकदम सटॅक्क आहे!

सोनाली नवांगुळ यांनी करून दिलेला पटकथाकार ऊर्मी जुवेकर-चँग यांचा परिचय खूप आवडला. जुवेकर यांचं व्यक्तिमत्त्व जबरी आहे ... एकदम सडेतोड!!

बाकीचे 'लेख' अजून वाचायचेत. पण ओव्हरऑल अंक आवडलाच.

काल माझे दिवाळी अंक पोचले. त्यापैकी इत्यादि अंक वाचायला घेतला. "गोष्ट कालची आणि आजची" नावाची एक कथा आहे. पूर्ण कथा इतकी पाल्हाळिक आणि काळाचे तमाम संदर्भ गंडलेली आहे, की बास. कथेचा जो मूळ गाभा आहे तो न पटण्यासारखाच आहे (तरी फिक्शन म्हणून सोडून देऊ) पण तरीही अत्यंत अवास्तव बेसिसवर कथा लिहिलेली आहे.

अक्षरमधली सेल्फी मालिका वाचली. बरीच मनोगतं फार सुंदररीत्या आणि टू द पॉइन्ट लिहिलेली आहेत. आवडली.

ललिता, धन्यवाद.

ना. मा. निराळे ह्या कथेवर आज मी च. प्र. देशपांडे ह्यांचे समीक्षण वाचले. म्हणून मी सतीश तांबेंना मेल पाठवून ना. मा. निराळे ची पीडीएफ पाठवाल का ही विनंती केली आहे.

मला असं वाटत आहे ह्यावर्षी बर्‍याच दिवाळी अंकातून जास्त छान वाचायला मिळत आहे मागच्या वर्षीच्या तुलनेने.

यंदाचे दिवाळी अंक अखेर हातात पडले.

सगळेच अंक थोडेफार वाचून झाले आहेत.

माहेरमध्ये नेहमीप्रमाणेच बरेच मायबोलीकर झळकलेत. सगळ्यात आधी वाचली ती ललिताची कथा. कथा खूप आवडली. ललिताच्या कथांमध्ये अफाट वेग, जोरदार घडामोडी असं काही नसतं कथा एक एक मुद्दा अलगदपणे उलगडत, हळूहळू खुलत जाते (शास्त्रीय संगितासारखी Happy ) ही कथाही त्याला अपवाद नाही. नेहमीप्रमाणेच कथेतलं डिटेलींग अत्यंत जबरी !! साधेसाधे प्रसंगही डोळ्यासमोर उभे रहातात अगदी.
कथास्पर्धेतली पहिली विजेती कथा मायबोलीकर मुग्धामानसीची. ही कथाही खूप सुंदर लिहीली आहे. फार आवडली. एक घटना आत्ताची आणि एक भुतकाळातली असा बरेचदा वापरला गेलेला फॉर्म असला तरी कथा शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवते. ग्रामिण आणि शहरी भाषेचा बाज उत्तम राखला आहे. पहिल्यानंबरास अगदी योग्य कथा.
कथास्पर्धेतली तिसरी विजेती कथा कविता नवरेची. ही कथा टिपीकल प्रेमकथा वाटली. बर्‍याच ठिकाणी प्रेडीक्टेबल वाटली पण वाचायला मजा आली.
नंदिनीची शब्द मायबोलीवर आधी वाचल्याचं आठवत नाही. तिच पात्र आणि ते नाव पण प्लॉट वेगळा आहे. ही कथाही आवडली. एकदम खास नंदिनी स्टाईल आहे.
ह्या चारही कथा वाचून बरेच दिवसांनी खूप चांगल्या कथा वाचल्याचं समाधान मिळालं!

मंगला गोडबोल्यांची आणि आणखीने एक कथा ठिक ठाक वाटल्या.
चिन्मयचा लेख नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण. वरदाचा लेख खूप अभ्यासपूर्ण आहे पण भाषा जरा जड आहे आणि विषय, फारशी माहिती नसल्याने समजून घ्यायला जरा क्लिष्ट वाटला. नंतर पुन्हा एकदा वाचेन.
आर्फीने घेतलेली मुलाखत फक्त चाळली आहे. डिटेलमध्ये पुन्हा वाचेन.

थँक्स, पराग Happy

मलाही नंदिनीची 'शब्द' आधी वाचल्याची आठवत नाहीये. (आणि तसंही, पूर्वप्रकाशित असती तर दिवाळी अंकात कशी काय घेतली गेली असती? Wink Proud )

पराग, थँक्स.

शब्द नावाने मायबोलीवर सुप्रसिद्ध असलेल्या कथांमधलीच ती पुढची कथा आहे. त्या मालिकेत टोटल सात कथा आहेत. त्यापैकी एक कथा माहेर दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. (पूर्वप्रकाशित नाही.)

'डिजिटल दिवाळी अंका' मधील कौशल इनामदार यांचा शंकर वैद्य सरांवरचा लेख अतिशय वाचनीय .

शिवाय 'अनुभव' मध्ये वसंत आबाजी डाहाकेंनी व्हॅन गॉगच्या चित्रांचं केलेलं विश्लेषणही खास . Happy

Pages