अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स, एफएम १०४.० रात्री १२ वाजता एक भुताची गोष्ट ऐकवतात. आता सत्यघटनेवर आधारित आहे असं म्हणतात. खरं खोटं राम जाणे. पण ऐकायला मजा वाटते हे नक्की.

झी वर शनिवार आणि रवीवार रात्री १०:३० वाजता फिअर फाईल्स नावाचा कार्यक्रम लागतो तोही सत्य घटनांवर आधारीत आहे अस म्हणतात... पुन्हा ख.खो.दे.जा

काळ्या मान्जराचा आणी भूत वगैरेचा काय सम्बध असतो???? सगळ्या भुताच्या मालिकेत ती असतात....खरच अस काही का उगीच त्या बिचार्याला बदनाम करतात .........

झी वर शनिवार आणि रवीवार रात्री १०:३० वाजता फिअर फाईल्स नावाचा कार्यक्रम लागतो तोही सत्य घटनांवर आधारीत आहे अस म्हणतात... पुन्हा ख.खो.दे.जा >>> youtube वर सगळे episodes आहेत.

लोक्स, एफएम १०४.० रात्री १२ वाजता एक भुताची गोष्ट ऐकवतात. आता सत्यघटनेवर आधारित आहे असं म्हणतात. खरं खोटं राम जाणे. पण ऐकायला मजा वाटते हे नक्की. >>> तो डॉ . नागर काय ग ? त्याच्या जाहीराती मस्त असतात . क्या ये सच है !!

फिअर फाईल्स चा एक एपिसोड बघितला. डरावना वैगरे होता पण सत्यघटनेवर आधारित असेल अस वाटल नाही.

youtube वर सगळे episodes आहेत. >>> बी.एस मी बघितला एक एपि यु ट्युबवर.. मला प्रश्न असा आहे की त्या खरच सत्य घटना असतात का? काल बघितलेल्या गोष्टीत जिच्याबाबत ती घटना घडली ती स्वतः इंटरव्ह्यु देत होती... पण दरवेळी अस बघायला मिळत नाही त्यामुळे सगळ्याच घटना खर्‍या नाही वाटत

सत्य घटनेवर आधारित आहे असं सांगितलं कि ट्यारपि वाढतो. आणि मालिकेमध्ये अर्थातच मसाला लावून दाखवलं जातं

त्या फिअर फायलीत लोकं भुत झाल्यावर उडतात बिडतात....आणि एकदम भारी भुतीया मेकप पण करतात....खरच सत्य घटना असतील त्या या वर समहौ विश्वास नाही बसत...

हो ना, आणि जिवंत असताना कुत्र्र्याला हाड म्हणायची ताकद नसली तरी मेल्यावर लई पावरबाज भुतं होतात. मग कोणाच्या बापाला ऐकत नाहीत.

व्हॉट्सअप वर दिल्लीच्या कोर्टाचा व्हिडियो फिरतोय. सीसीटीव्ही मधे पकडले गेलेले काही अमानवीय क्षण. अचानक व्हील्सवाल्या ऑफिस चेअर्स एकीकडून दुसरीकडे जाताहेत. फाईल कॅबिनेट आपोआप उघडले जाऊन कागदपत्र हवेत उडताहेत्....वगैरे... काय खरं काय खोटं माहित नाही. पण तो व्हिडिओ भारी आहे हे खरं..

सत्य घटनेवर आधारित
हा आधारीत शब्दाचा आधार घेऊन काहीही दाखवतात.

हो तो दिल्ली कोर्टाचा विडीओ जवळपास प्रत्येक ग्रूपवर पडलाय, पण तो डाऊनलोड केला नाही.
एकतर त्यात सारे फेक असणार हे नक्की. आणि तरीही ते बघून डोक्यात विचारचक्र चालू होणार जे मला रात्री भयानक स्वप्ने पडायला मदत करणार. कोणी सांगितलेल ईटरनेटचा ५-६ एमबी डाटा पॅक खर्च करून नको तो त्रास घ्या. एकतर मी झोपतोही एकटाच Sad

आत्ताच युटुब बघितला. देल्ही कोर्ट सर्च करुन. १ आठवड्या पुर्वी अपलोड केला आहे. त्याच व्हिडीओ खाली एका कॉमेन्ट मधे लिहील आहे की मुव्हीचा पार्ट आहे. "paranormal manchester" अस सर्च केला तर तोच व्हिडीओ. १ वर्ष्यापुर्वीही अप लोड केलेला दिसला. भुतानेच केला असणार आहे Lol

हाच व्हिडीओ मला बँगलोर मधील इंफोसिस ऑफिसमधील म्हणून आला होता आणि त्याच दिवशी माझ्या नवर्‍याला दिल्लीतील म्हणून....
म्हणजे नक्कीच हे मानवीय कृत्य असणार....:हाहा:

हे बदनाम करायची साजिश असते.
ते नै का, फ्रूटी मध्ये एडस झालेल्या कामगाराने आपले रक्त मिसळले म्हणून फिरत असते.
तसेच हे.
झाले, इन्फोसिस डुबली आता. मार्केट गडगडणार त्याचे.

रिया, रोज असतो का हॉरर स्टोरीजचा प्रोग्राम रेड एफएमवर? फक्त पुण्यात का मुंबईत पण? १०४.० वरचा बंद झाला वाटतं. मागच्या शुक्रवारी शेवटची स्टोरी ऐकली होती. ह्या सोमवारी लावलं तर गाणी चालू होती. Sad

>>झाले, इन्फोसिस डुबली आता. मार्केट गडगडणार त्याचे.

त्या भुतांना पण प्रोजेक्टसवर कामाला लावतील. सुट्टी नको, पगार द्यायला नको आणि इन्क्रिमेन्ट नको. आयडियल वर्क फोर्स.

त्या भुतांना पण प्रोजेक्टसवर कामाला लावतील. सुट्टी नको, पगार द्यायला नको आणि इन्क्रिमेन्ट नको. आयडियल वर्क फोर्स.
>>
ऐडयीआ छान आहे. पण जर ती भुते तिथलीच प्रोजेक्टने खपलेल्या ईंजिनीअर्सची असतील तर ... Uhoh

ऐडयीआ छान आहे. पण जर ती भुते तिथलीच प्रोजेक्टने खपलेल्या ईंजिनीअर्सची असतील तर ... अ ओ, आता काय करायचं >>>>>>

आणखीनच उत्तम. त्यांना वेगळ ट्रेनिंग द्यायला नको. Happy

मी परवाच पाहिलाय तो विडीयो, अज्जिबात भयानक नाहीये आणि भिती देखील वाटली नाही नाहीतर सहसा असं काही पाहिलं की मलाही झोप येत नाही. फक्त खुर्ची इथनं तिथे कुणीतरी ओढल्यासारखी दिसत, ड्रॉवर्स अचानक उघडले जातात आणी पेपर्स बाहेर फेकले जातात ते पण खुप जास्त वेळ नाही आणी बॅकग्राउंड मुझिक वाजतं चिरचिर चिरचिर पण काहीही घाबरण्यासारखं वाटलं नाही.

थोडक्यात फेक असण्याची शक्यता ९५% आहे.

रिया मी कॅब मधे असते त्या हॉरर स्टोरीच्या वेळी. माझी एक कॅबमेट आहे तिला आवडतं ते ऐकायला. मग आम्हाला पण ऐकावं लागतं. सो २-३ स्टोरिज ऐकल्या होत्या मी. फार स्ट्रेस येतो ऐकून. Sad

Pages