अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरी घटना लिहील्या आहेत .. हम्म..........

मागच्या दिवाळीच्या दरम्यानची घटना
दरवर्षी दिवाळीच्या सुट्यात आमची एक कोकण ट्रीप असतेच, आमची १४ मुलांची ट्रीप तारकर्लीला निघाली. आमच्यात कुणीही भुतांना मानत नाही आणि जुमानतही नाही , आमवस्या पौणिमा हेही दिवस इअतर दिवसांपेक्षा वेगंए नाहीत असे समजणारे. आम्ही एक इनोव्हा,स्कॉर्पीओ आणि वॅगन आर घेवून पुण्याहून कोल्हापूर मार्गे प्रवास सुरु केला, कोल्हापूरनंतर गगनबावड्याच्या पुढे गेल्यावर एक घाट उतरायला लागतो तिथे एका नयनरम्य ठिकाणावर जावून मी माझी वॅगन आर गाडी साईडला पार्क केली आणि गाडीतल्या चार लोकांनी उतरुन फोटोग्राफी सुरु केली. तेवढ्यात मागून आमची स्कॉर्पीओ गाडी आली आणि त्याच ठिकाणी पार्क केल्यानंतर लक्षात आले की स्कॉर्पीओचे पुढचे चाक पंक्चर आहे. मग या दोन्ही गाड्यातील मंडळींनी स्टेपनी काढून लावण्याचा प्रयत्न सुरु केला. पण चाक काढतेवेळी चुकीच्या पधतीने पान्हे फिरविल्याने टायरच्या नटबोल्डचे थ्रेड उडाले आणो पान्हा स्लीप होवून लागला , खूप प्रयत्न करुनही आम्हाला ते चाक काढता आले नाही. नंतर मागून इनोव्हा आली त्यांनीही त्यांच्या परिने प्रयत्न केले पण व्यर्थ.. आता संध्याकाळचे वाजले तरीही यश न आल्याने आम्ही पुढे किमी जावून एका टायरवाल्या आण्णाला पकडून आणला त्याने तासभर प्रयत्न केला पण त्यालाही ते जमले नाही . शेवटी आपला मुक्काम घाटात असणार आहे हे आम्हाला कळून चूकले.
मग स्कॉर्पीओ तिथेच सोडून जेवणाची व्यवस्था करण्यासाठी इनोव्हा पुढे निघाली तर अवघ्या मीटरवर इनोव्हाचा डाव्या बाजूचा मागचा टायर फूटला आणो गाडी अक्षरशा: तिरकी होवून जमिनीला टेकली. आता या दोन्ही गाड्या बंद अवस्थेत होत्या. त्यामुळे वैतागलेल्या मित्रांनी पुढचा प्रवास दुस-या दिवशीवर ढकलला आणि रात्र शेकोटी पेटवून काढायाची असे ठरवले . शेकोटीसाठी वाळलेली लाकडं शोधायला मी आणि माझे मित्र जंगलात शिरलो.
रात्रीचे १० वाजून गेले होते आमच्या मोबाईल टॉर्च च्या जेमेतेम प्रकाशात आम्ही ब-यापैकी लाकडे गोळा केली ती तीन लोकांनी खांद्यावर घेतली आणि बाकीच्यांनी दोन्ही हातात एक एक वाळकी फांदी घेवून पुन्हा गाडीकडे , आता आम्ही काय करत होतो तेच कळेना झाले कारण आम्ही गाड्यापासून निघाले तेव्हा फक्त १० मीनीटात जंगलात पोहचलो होतो आणि आता पाऊन तास चालत होतो तरी रस्ता दिसायचे नाव नव्हते,
फोनलाही रेंज नाही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता काही सापडेना, आधीच गाड्या बंद पडल्यामुळे वैताग आला होता . शेवटी थकून अमोलने खांद्यावरचा लाकडांचा ढीग जमिनीवर आपटला त्या आवाजाने सर्वांनी त्यांचे मोबाईल टॉर्च तिकडे फिरविले तर त्या लाकडातून एक हिरव्या पिवळ्या रंगाचा साप सळसळ करत सरपटत पळाला . तो पाहताच अमोलची जाम टरकली कारण एवढा वेळ तो साप खांद्यावर घेवून फिरत होता. आम्ही सर्वांनी त्याला नीट चेक केले चूकून चावला असायचा म्हणून, पण सुदैवाने तसे काही नव्हते आता काही झाले तरी एका दिशेला चालत रहायचे कुठेतरी रस्ता सापडेल अशा आशेने आणि सर्व सरपण पुन्हा एकदा चेक करुन आम्ही निघालो . साधारण २०-२५ मीनीटे चालल्यावर डांबरी रस्ता दिसला पण तोपर्यंत आमच्या गाड्यापासून आम्ही ३ किमी पुढे आलो होतो. पुन्हा ती पायपीट करत गड्यांजवळ आलो . तिकडे बाकीची मंडळी तोंडभरुन शिव्य देत बसली होती आम्ही जावून कुठे बसलो म्हणून. मग शेकोटी पेटविली आणि आमचा दंगा सुरु झाला.
इनोव्हाची स्टेपनी काढून लावणे शक्य असल्याने आम्ही तो प्रयत्न चालू केला. त्याचा टायर काढला त्यासाठी जॅक लावला होता. स्टेपनी बसविताना जॅकची उंची कमी पडत होती त्यामुळे एका बहाद्दराने स्कॉर्पीओमधला जॉक आणला आणि तो इनोव्हाला टायरखालून चढवू लागला. मी इनोव्हाच्या जवळच उभा होतो आणि माझा डावा पाय त्या जॅकच्या शेजारी होता, मला बाजूच्या गवतात काहीतरी चमकल्यासारखे दिसले आणि माझा डावा पाय तिकडे वळविण्यासाठी इनोव्हाच्या जॅकपासून काढला , तोपर्यंत दुसरा जॅक चढवताना गाडीचा बॅलन्स सटकला आणि गाडी धाडकन खाली आली , अवघ्या दीड सेकदापुर्वी माझा पाय गाडीखाली होता तो तसाच असता तर जागेवर चेपला असता हे बघूनच माझी छाती धड्धड करत होती. एकंदरीत एक एक प्रसंग इशारा देणारा आणि शहारे आणणारा होता. आता कसलाही शहानपणा न करता रात्र कटवायची असे ठरवून शेकोटीचा आधार घेतला. कुडकुडतच माझ्या वॅगन आर गाडीत मी आणखी चौघे झोपलो , जाग आली तेव्हा गणेश नावाच्या मित्रावर प्रथमोपचार चालू आहेत असे दिसले , रात्री चालता चालता त्याचा तोल जावून तो पडला आणि गुडगा फोडून घेतला असे त्याचे म्हणणे होते , बाकी सगळे निवांत लाईट लाईट ड्रींक घेवून सुस्त झाले होते.

मग दुसरा अर्धा दिवस गाड्या दुरुस्तीत गेला तिथून पुढे तारकर्ली गाठले पण तिथे पाऊस सुरु झाल्याने ना काही बघायला मिळाले ना स्कूबा डायविंग करायला मिळाले. तिस-या दिवशी परतीच रस्ता धरला आणि या पोपट ट्रीपची सांगता केली.

मला वाटते अमानवीय ही एक अवस्था आहे ज्यात माणूस थोडासा डिस्टर्ब असतो.

नाही तर मायबोलीवर रजिस्टर व्हायला सांगा >> कदाचित ते भूत माझ्याच मनात आहे.. यथावकाश माबो वरही आणेलच .. Biggrin

हो असतो कारण या तिन्ही गणान्चे स्वभाव विशेष बघा.

समजा एखादा गब्बर सिन्ग नावाचा माणुस खूप त्रास देत असेल तर किन्वा धमक्या देत असेल तर...

१) देव गणान्ची माणसे अशा गब्बर पासुन चार हात दूर रहाणे पसन्त करतात, वाद-तमाशे नको म्हणून आपण बरे आपले काम बरे असे रहातात.

२) राक्षस गणाची माणसे घाबरत नाहीत, निदान त्याला जाब विचारुन त्याचा त्रास कसा दूर होईल हे बघतात. त्याच्याशी वेळ प्रसन्गी नडु शकतात, अरे ला कारे करुन धाडस दाखवतात.

३) मनुष्य गणाची माणसे मात्र घाबरुन रहातात, पोलीसात जायची पण हिम्मत नसते.

हो पण एक अपवाद आहे. जर या मनुष्य, देव, राक्षस गणाच्या पत्रिकेत मन्गळ प्रभावी असेल किन्वा मन्गळाची पत्रिका रास ( मेष किन्वा वृश्चिक ) असेल किन्वा जन्म तारीख ९, १८, २७ यापैकी असेल किन्वा मन्गळाचे जन्म नक्षत्र ( मृग-वृषभ, चित्रा-कन्या, धनिष्ठा-मकर ) असेल तर मग अशी माणसे कुणालाच घाबरत नाहीत, मग तो गुन्ड असो वा भूत.

आता कळ्ळ भूत पोलीसाना किन्वा वर्दीला का घाबरतात ते? जनरली पोलीस किन्वा मिलीटरी अशा लोकान्ची मन्गळाशी गाठ पडतेच पडते.

वृश्चिक वाले भुताना घाबरत नाहीत. > कैच्याकै. माझा सख्खा भाऊ भुतांना काय रात्री घराबाजुला असलेल्या विलायती चिंचेच्या झाडाच्या सावलीला देखील घाबरतो. अजुन दोन मित्र आहेत जे आयुष्यात कधीच भुताचा चित्रपट बघण्याचे धाडस करणार नाही. एकाने तर बदली झाल्यावर दुसर्‍या शहरात एकट्याने रात्री रहायला लागायला नको म्हणून तडकाफडकी लग्न देखील केले.
असे वृश्चिकवाले आमच्या राशिला भेटले आहे

अस म्हणतात की भुते फक्त मनुष्य गणालाच दिसतात, राक्षस गणाला दिसत नाही फक्त जाणवते. देव गणाला मात्र काही होत नाही.

अस म्हणतात की भुते फक्त मनुष्य गणालाच दिसतात, राक्षस गणाला दिसत नाही फक्त जाणवते. देव गणाला मात्र काही होत नाही.
>>
मी ही असेच ऐकले आहे.

नाही, वृश्चिक वाले भुताना घाबरत नाहीत.
>> ओके.

. एकाने तर बदली झाल्यावर दुसर्‍या शहरात एकट्याने रात्री रहायला लागायला नको म्हणून तडकाफडकी लग्न देखील केले.
》》》
आजारापेक्षा उपचार भयंकर Biggrin

भूताला घाबरले पाहिजे , त्याशिवाय हा धागा कसा चालणार >> Proud

माझी वहिनी आहे ना वृश्चिक राशीची .. भुतांचे चित्रपट पण बघते आणि खुप घाबरते सुद्धा ..

रच्याकने आम्ही तिघ..मी दादा आणि वहिनी मिळून काँज्युरिंग बघत होतो .. जस्ट तो कपबर्ड वरुन उडी टाकण्याचा शॉट संपला आणि लाईट गॉन .. आम्ही तिघच्या तिघांनी सटकन बेडरुमच्या कपाटाच्या वर बघीतल होत Lol

आत्ता आठवून हसतो पण त्या दिवशी रात्री हितभर तिघांची पन Rofl

ते कॉन्फरन्स मधले नॉकिंग १०० % सेंट्रलाईझ्स ओवरहेड एसी हिटिंग सिस्टीमचा आवाज आहे. एसीचे प्रेशर, टेंपरेचर चे टाईम टेबल असते, नाईट अवर्स, ऑड अवर्स, वीकेंडसना ते प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी सेटिंग केलेले असते. सडन प्रेशर ड्रॉप्स मुळे त्या मेटलच्या एसी डक्ट पाईप्स्मध्ये आवाज येतात.तिथून प्लंबिंग लाईन गेली असेल तर त्याने पन आवाज होतात.

>>स्वप्ना , आणि समजा आवाज आला , उघड्या दरवाजावर नॉक केल्याचा .तर मग कोणाची हिम्मत होईल वळून कॉन्फरंस रूमकडे बघायची
>>पण समजा कोणी दरवाजा उघडा ठेवून आत थांबल आणि नॉक व्हायच्या वेळी एक अचानक अपनेआप धाडकन दरवाजा बंद झाला तर

एकट्यादुकट्या माणसाची हिंमत होणार नाही पण खूप लोक एकत्र असतील तर का नाही होणार? हवं तर रामरक्षा, देवाचे फोटो वगैरे आयुधं जवळ ठेवायची Happy पण ऑन अ सिरियस नोट, हा प्रकार अमानवीयच असेल असं नाही. एखादा अलार्म कुठेतरी वाजत असेल. किंवा वरच्या मजल्यावर नॉक केलेलं खाली ऐकू येत असेल किंवा आणखीही एखादं लॉजिकल एक्सप्लेनेशन असू शकेल. जर शोध घेतलाच नाही तर मात्र कधीच कळणार नाही. आणि त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे शहामृग मातीत डोकं खुपसून बसतं तश्यातला प्रकार होईल. त्यापेक्षा काय प्रकार आहे त्याचा मुळापासून शोध घेतलेला बरा. ज्या ठिकाणी रोज कामाला जायचं आहे त्याबद्दल अशी शंका असून कसं चालेल? अर्थात हेमावैम.

हायझेनबर्ग......अगदी अगदी....रिया मला वाटतं तुम्ही हे चेक करायलाच हवं. उगाच घाबरण्यात अर्थ नाही.

>>अजून एक विचित्र प्रकार म्हणजे काही वर्षांपूर्वी मला आणि सौ ला एकच स्वप्न दिसलं होत.

ह्याला ड्रीम शेअरिंग म्हणतात असं कुठेतरी वाचल्यचं स्मरतंय.

>>अस म्हणतात की भुते फक्त मनुष्य गणालाच दिसतात, राक्षस गणाला दिसत नाही फक्त जाणवते. देव गणाला मात्र काही होत नाही.

हे असू शकेल कदाचित. माझा देवगण आहे (म्हणे!) आणि आईबाबांचा राक्षसगण (म्हणे!). सिंगापूरच्या हॉटेलच्या रूममधला एक अनुभव मी मागे शेअर केला होता तेव्हा त्या दोघांना बाथरुममध्ये कोणीतरी आंघोळ करतंय असं रात्रभर जाणवत राहिलं. पण जाऊन पाहिलं तर कोणी दिसलं नाही. आईला रात्री बेडजवळ एक फिरंग छोटा मुलगा दिसला पण तो सत्यात का स्वप्नात ते कळलं नाही. मला मात्र कसलाच आवाज ऐकू आला नव्हता. फक्त त्या रुममध्ये प्रचंड चिडचिड झाली होती.

AC chi gosht may be khari asu shakte pan mag chalanyacha awaj? Khokalyacha awaj?

N AC madhun pn roj exavt pavane dahalach avaj.... Actually yogayog asu shakato pan je asel te aso

तस पाहिलं तर इथे अनेक योगायोग असू शकतात ,
आणि त्याहून जास्त भास असू शकतात ..
असुद्या काय .. असच काहीतरी शेयरण्यासाठीच तर हा धागा आहे ..

रच्याकने ,

घोस्टांची चित्रे बघितली का तुम्ही .? हा कल्पनाविलास नसून त्या लोकांनी त्यांच्या स्पिरिच्युअल ज्ञानाने काढली आहेत म्हणे. हि पहा,
http://www.spiritualresearchfoundation.org/spiritualresearch/difficultie...

या वेबसाईट बद्दल कोणाचे काय मत आहे .?
तथ्य वाटते का यात .?

माझा स्पिरिच्युअलिटीवर तर विश्वास आहे. त्यामुळे हि वेबसाईट अर्थपूर्ण वाटते..
पण कधीकधी मनात शंका येते हे हि खर..
अजून बरच आहे भूतांमध्ये जाणून घेण्यासारखं अस वाटत..
कोणाकडे असेल काही वाचण्यासारख तर डकवा कि कृपया..

एखाध्या हॉटेल मधे एखादा पदार्थ किती चांगला बनतो असे ईतरांकडुन एकून मी एक दिवस त्या हॉटेल मधे जातो.
माझी ऑर्डर आल्यानंतर पहीला घास घेणार तोच,
कोणीतरी स्टींग ओपरेशन करुन, मल विडीयो दाखवतो की हा पदार्थ बनताना किचन मधे किती अस्वच्छता होती, झुरळे होती, बनवणारा किती घामजलेला होता ई.
तेव्ह मला जसे वाटेल,
तसे मला या धाग्यावर येऊन शास्त्रिय स्पष्टीकरण देण्या-या पोष्टी वाचुन वाटते आहे.

.

Pages