अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे तू घाबरत नाही का गं>>>> आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचे, ते हे जग सोडून गेल्यावर जे अनुभव येतात/भास होतात, त्यामुळे भीती खरच नाही वाटत, हे अगदी अनुभवलंय. त्यांना मुळात आपणास घाबरवायचे नसतेच फक्त स्वतःचे अस्तित्व जाणवून द्यायचे असते बहुतेक.

आशिका , पटलं तरीही ... कोणी आपल्याआजूबाजूला आहे ही कल्पनाच भयावह आहे .. निदान माझ्यासाठी तरीही Sad

आशिका पटतंय (कळतंय) गं पण वळत नाही. माझे वडील अचानक वारले सिव्हीअर अ‍ॅटॅक येऊन. मी एकुलती एक. काही कारणाने शेवटचे दर्शनही झाले नाही. ही घटना झाल्यावर २-३ महिन्यांनी जेव्हा माहेरी जायला मिळाले तेव्हा त्याच घरात खूप उदास, खिन्न वाटत होते. रात्री राहिले तेव्हा अनामिक भिती वाटत होती बाबा भेटायला वगैरे आले तर जरी ते मला प्राणांहून प्रिय होते :(:(

आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचे, ते हे जग सोडून गेल्यावर जे अनुभव येतात/भास होतात, त्यामुळे भीती खरच नाही वाटत, हे अगदी अनुभवलंय. त्यांना मुळात आपणास घाबरवायचे नसतेच फक्त स्वतःचे अस्तित्व जाणवून द्यायचे असते बहुतेक. >> आशिका अगदी मनातलं गं!

गेलेल्या व्यक्तींना आपल्यामागे उरलेल्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे (किंवा कदाचित आपल्याच मनाचे खेळ), म्हणून अधून मधून असे भास होत असावेत

गेलेल्या व्यक्तींना आपल्यामागे उरलेल्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे>>>>> + १००००.मी तर म्हणेन तु लकी आहेस ड्रीमगर्ल.. तुला इतके अनुभव येतात. Happy

ड्रीमगर्ल.. बाप्रे कसले एकेक अनुभव आहे तुझे.. यू आर वेरी स्ट्राँग.. ती हमपाँच सीरियल मधली फोटोतली प्रिया तेंडूलकरच पटकन आठवली.. बट धिस इज नो कॉमेडी... धिस इज रिअल!!!!!!!! बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............!!

मला भीती नाही वाटत (माझ्या सुदैवाने) स्मित काय करणार अनुभव येतच राहणार... माझा मनुष्यगण आहे अरेरे स्मित >> अरे देवा... धन्य आहात तुम्ही .. __/\__

हा सबंध धागा गेले २-३ दिवस वाचतोय. एवढं वाचूनही अमानवीय घटनांवर विश्र्वास काही बसत नाही. कुतूहल मात्र उदंड आहे. अशा अ‍ॅटिट्यूडमुळे स्वानुभव सांगणार्‍या मंडळींवर उगीच संशय घ्यावासा वाटत राहतो. पण त्याला पर्याय नाही. आमची जळेल तेव्हाच अम्हाला कळेल.
आणि आता माझा बव्हंशी अमानवीय नसलेला अनुभव...
आम्ही तिघं मित्र शिवथरघळीला रात्री पडवीमार्गे चालत चाललो होतो. आमचा वेळेचा अंदाज साफ चुकला होता. नाक्यापासुन २२ किमि अंतर कापायचं होतं आणि आम्ही नाक्यावर पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडे ८ वाजले होते. उशीर व्हायला बस चुकणे वगैरे कारणे होती. पिक्चरच्या स्टोर्‍या एकमेकांना सांगत आम्ही निवांत चाललो होतो (मी वास्तुपुरूषची संगितली होती). पावसाळ्याचे दिवस होते. बेडकांचे डरावगीत सर्वदूर ऐकू येत होते. एक झाड काजव्यांनी संपूर्णपणे डवरलेलं दिसलं. इथपर्यंत सगळं ठीक चाललेलं पण मग पावसाचा जोर वाढला. आम्ही चालत राहीलो. एकही वाहन जा-ये करताना दिसत नव्ह्तं. घरांचे दिवे रस्त्यापसून लांब लुकलुकत होते. आम्ही अजून तरी सर्वकाही आलबेल असल्याचं इतरांना भासवत होतो पण खरतंर घाबरलो होतो ज्याची कबुली जरा वेळातंच प्रत्येकाने दिली. तासभराच्या चालीतंच गप्पा बंद झाल्या आणि भयाण वातावरणात चालणं चालू राहीलं. अचानक मागून एका गाडीचा आवाज आला. त्यासरशी आम्ही रस्त्याच्या कडेला झालो. मलातर पहिल्यांदा कळालंच नाही कि ती बस आहे. कुणीही न थांबवता बस थांबली. पाहिले तर ती आपली महामंडळाची यश्टी होती. कंडक्टरसाहेबानं 'पोरांनो घळीत जायचं नं? चढा वर लवकर' म्हटलं की ताबडतोब पोरं आत. यश्टीत बसल्यावर आम्हा तिघांच्याही चेहर्‍यावर जे काही हसू उमटलं कि काय सांगू! १० वाजता रात्री शिवथर घळीच्या सुंदरमठाचं दार बंद व्हायच्या बेताला तिथे आम्ही ह्जर. ती मुंबई - शिवथरघळ यश्टी नेमकी त्यादिवशी लेट झाली होती. मला आठवतंय, समर्थ रामदासस्वामींनी खास आम्हां तीन भक्तांसाठी ही व्यवस्था केल्याचा सोयिस्कर अर्थं आम्ही काढला होता.

मिमिविजय
मानसि साळुंखे
मृत्यू झाल्यानंतर मृतात्मा खूप गोंधळलेला असतो . त्याला पुढचा मार्ग दाखवण्यासाठी आधीच पुढच्या लोकात गेलेले आत्मे त्याला घेण्यासाठी येतात .
मृत्युच्या वेळी माणसाची दिव्य दृष्टी जागृत होते . त्यांना हे आत्मे दिसतात . हातात तळपत्या तलवारी घेवून उभे असलेले यमदूत सुधा दिसतात .
माणसाला आजूबाजूच्या लोकांना हे सांगता येवू नये म्हणून मारणाऱ्या माणसाची वाचा बंद होते . तो बोलू शकत नाही
dreamgirl
कदाचित ते अजूनही तिथेच अहेत. त्यांना सद्गती मिळालेली नाहीये .
सगळ्यात आधी तो फोटो काढावा .कारण त्यांचं स्थान आता इथे नसून पितृलोकात आहे . मरणोत्तर क्रियाकर्म व्यवस्थित केलय का ? नसेल तर श्राद्ध वगेरे करावं . कुलदेवीचा किवा गुरुदेव दत्तांच्या नावाचा जप करून त्यांना सद्गती मिळण्यासाठी प्रार्थना करावी. कारण पितर हे ईश्वर किवा संत नसतात . त्यांनी इथेच अडकून पडण्यामुळे पुढच्या पिढ्यांना ते त्रास देतात. त्रास देण्याचा उद्देश फक्त आपलं त्यांच्याकडे लक्ष वेधलं जावं आणि आपण त्यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करावेत असा असतो

सारिका३३३ | 13 February, 2015 - 16:29 >> कोकणी लोकांची यावर जास्तच श्रद्धा असल्याने श्राद्ध वगैरे शास्त्रोक्त केलं आहे.
सगळ्यात आधी तो फोटो काढावा >> यामुळे नंतर कोणाला काय त्रास होईल ते माहीत नाही पण नवर्‍याला नक्की होईल त्यामुळे शक्य नाही!
कुलदेवीचा जप >> कुलदेवी माहीत नाही! आम्हाला त्रास नक्कीच नाही, असतील तर आशीर्वादच! पण जर त्यांना त्रास होत असेल तर नक्कीच प्रयत्न करेन. सध्या हे सगळे अनुभव भास कॅटॅगरीत टाकल्याने फार विचार केला नव्हता पण असं असू शकेल तर विचारून बघेन कोणी ज्येष्ठ जाणकार असल्यास!

>>मृत्युच्या वेळी माणसाची दिव्य दृष्टी जागृत होते . त्यांना हे आत्मे दिसतात

विश्वास ठेवणं कठिण आहे ह्यावर. पण म्हणतात ना की आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. असो. माझ्या वडिलांच्या आईला जायच्या आधी काही दिवस खोलीत एक टोपी घातलेला माणूस दिसायचा असं ती सांगत असे. पण तिला असं काहीबाही सांगून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायची सवय असल्याने आम्ही त्याचा फारसा विचार केला नाही. अर्थात वडिलांकडच्या कोणाचाच श्राध्द वगैरे करण्यावर विश्वास नसल्याने आम्ही काही केलं नाही. आईचे वडिल तर नेहमी म्हणत की माणूस मेल्यावर काय होतं ते सांगायला मी गेल्यावर येईन. पण ते गेल्यावर कधीच कोणाला दिसले नाहीत.

एखादा माणूस त्याचं जीवन परिपूर्ण जगला असेल . त्याला इथल्या गोष्टींचा मोह नसेल किवा श्राध्द करू नये अशी इच्छा असेल तर ते नाही केला तरी चालतं . कारण त्यांचा जीव इथल्याच कुठल्यातरी गोष्टीत अडकलेला नसल्यामुळे त्यांना श्राध्द करून पुढे ढकलायची गरज नसते . ते मुकाट पुढे जातात . श्राध्द हे त्यांची काही राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचं फक्त मध्यम आहे . मी अमुक करीन , मी तमुक करीन म्हणलं , त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना दिल्या कि त्याचं tension कमी होवून ते पुढे जातात .

टिव्ही नै न माझ्याकडे Sad

मी सुपरनॅचरल नावाची शिरेल पाहतेय ..

भुत, भुतांच्या गोष्टी लय आवडतात म्हणून पहिले व्हॅम्पायर डायरीज बघायला घेतल... पहिला शॉट बघुन इच्छा चाळवली .. मग दिसली त्यातली हेरॉईन .. चलता है म्हणत निघाली समोर.. मग दिसला तो स्टेफन . एवढूसं तोंड झाल माझ त्याला पाहुन.. वाटल एवढ्या मोठ्या जगात निवडून निवडून हेच सडले चेहरे भेटले यांना हिरो हिरवीणीसाठी .. तरी समोर ढकलली शिरेल म्हटल चला या असल्या चेहर्‍यांना सहन करण्याच्या आपल्या भितीच्या लिमीट ला पन आजमावून पाहू .. आणि मग एन्ट्री झाली डेमन ची.. खर सांगते व्हॅम्पायर आणि इयान समरहाल्डर या दोन भांडवलावर ४ सिझन बघीतले मी.. पण कै राम नै त्या शिरेलीत .. आताशा या लोकांनी एकता कपुर च्या शिरेलींना फॉलो केल कि काय अस वाटायला लागल म्हणून बघण सोडून दिल..

सुपरनॅचरल म्हणजे दोन भाऊ आणि त्यांच्या पप्पांची गोष्ट पण very little emotional drama so मज्जा येते बघायला .. रोज एक नवा जॉब .. नवीन नवीन भुतं , भुतण्या, शेप शिफ्टर इत्यादि मला माहित असलेले नसलेले सगळ्या मायथॉलॉजी मधले पॅरानॉरमल क्रिएचर टाकलेत त्यांनी .. अगदी हिंदू राक्षस, वेताळ आणि आपले देवीदेवता सुद्धा .. मज्जा येते.. ३र्‍या सिझन पासुन मग जॉब कमी आणि मग त्यांच्या मॉम च्या डेथ मागचं कारण, डिमन्स आणि अ‍ॅन्जल्स ची खत्रा एन्ट्री होते आणि आणखी मज्जा येते.. आता १०वा सिझन रनींग आहे.. टोरन्ट वर सर्व सिझन भेटून जाईल..

अगेन या शिरेलीत सुद्धा दोन भावांमधला मोठा भाऊ चुम्मेश्वरी पात्र आहे (just like big bro Damon in The Vampire Diaries serial).

मी त म्हणते बघाच एकदा ..

.

सोनीवर कालपासून रात्री ११ वाजता आह्टचे नवे एपिसोडस लागले आहेत - दर बुध, गुरु.
>>>>> अजिब्बात भिती नै वाटली. अजुन रामसे बंधु फेमच दाखवताहेत भुते...

Mala aahat peksha ha 'amanviy' dhaga vachayala aavadato. Jasti ghabarayala hote.

आजूनही हा त्रास माल होतो

माझे आजोबा पूर्वी अमावसेच्या आठवड्याल कोणत्याही रात्री झोपेत मोठ्याने ओर्द्याचे तसे झाले नाही तर पूर्निमेचाय आठवड्यात कोणत्याही रात्री तोच

त्रास मला होतो

वडलांच्या तोंडून आईकून आहे कि माझे काका (माज्या वादांचे मोठे भाऊ) लहान असताना घरची परिस्थिती बेताची असल्या मुले इतर ठिकाणी मोलमजुरी

करून घरी बाजारहाट आणायचे असेच एकदा अंधार झाल्यावर बाजारहाट घेऊन घरी परतत होते

वाटेत अंधार होता भरपूर झाडी आणि शेती होती (आता JCB ने ती रस्ता मोठा केला आहे आणि झाडे पण तोडली आहेत) रस्त्यात त्यांना एक बकरीचे पिल्लू

गावी त्याला "करडू" म्हणतात ओरडताना दिसले त्यांना वाटले कि मेंढपाळाच्या कळपातले असेल आपण त्याला घरी नेऊ जर, धनगर आला तर त्याला परत करू नाहीतर त्याला पाळू असे

म्हणून त्याला खांद्यावर घेतले आणि चालू लागले एका जागी

आल्यावर त्यांना मागून आवाज आला कि "माजी जागा आली आता मला जाऊदे" आणि अचानक ते करडू

खांद्यावरून नाहीसे झाले काकांनी हातातली पिशवी तिथेच टाकून धूम ठोकली तेवा पासून ते रात्री झोपेत अचानक बडबडतात

माझा त्रास वेगळे, आहे पण आजोब्न सारखाच आहे मला कोणता प्राणी व्यक्ती एखादी गोष्टीची भीती होते आणि झोपेत जोरात ओरडतो माझी पत्नी पण घाबरून मला मला झोपेतून जागे करते

गेले ३ ४ महिने ती गावी गेली आहे पण मला काही त्रास झाला नाही मी उशाला नेहेमी काही लोखंडी वस्तू (हल्लीच मी स्टील ची टोकेरी छोटी सळी आणली आहे जी तंदुरीत वापरतात ती) टोकेरी वस्तू झोपतो तर तो त्रास कमी होता पण गेल्या २ आठवड्यात माझी बहिण आली आणि मी हौल मध्ये झोपलो ती ठेवायला छोटी सळी विसरली आणि नेमकी त्या दिवशी ३ फेब १५ ची पोर्णीमा होती आणि तिचे महत्व पण प्रखर होती त्याच रात्री मी मोठ्याने ओरडलो ह्या वर काहीही उपाय नाही आहे किती मंत्र जाप करून सुद्धा काही फायदा नाही मला एक लोखंडी वस्तू घेऊन झोपवेच लागते डाव्या पायाची चप्पल पण चालते

मिमिविजय,
माझा मुलगा दहाबारा वर्षाचा होता, तेव्हा झोपेतून अचानक ओरडत उठायचा आणि तरातरा चालु लागायचा. डोळे सताड उघडे आणि आपण समोर उभे राहून हाका मारल्या तरी भान नसायचे. घरातल्यांनी 'बाहेरची बाधा' वगैरे बोलणी सुरू केली. माझा या गोष्टींवरअजिबात विश्वास नाही. मी माझ्या नेहेमीच्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांना विचारले, त्यांनी मला या प्रकारामागची कारणे छान समजावून सांगितली आणि गोळ्या दिल्या. तीन-चार महिने मुलाला औषध चालू होते आता तो १६ वर्षाचा आहे. इतक्या वर्षात काहीही त्रास झाला नाही. तुम्हीही एखाद्या चांगल्या होमिओपॅथीतज्ञाकडे जावे असे मनापासून वाटते.

मिमिविजय,
आपण आदिजो यांनी सान्गितलेला उपाय जरुर करावा,व तीन-चार महिन्यानी ईथे कळवावे हि विनंती.

अनिरुद्ध

Hi. I have read both threads. In first thread someone had mentioned about 'shwetambara' who used to roam in mulund area and was caught by shishir shinde. My mother in law used to stay in building next to shishir shinde's house. She remembers the above mentioned incidence. Just to clarify from her end that it was a female not a male who was caught as shwetambara.

बरं झालं हा धागा वर आला.
मी शोधतच होते

आमच्या ओडीसी मधे अनेकांनी ही गोष्ट सांगितलीये की त्यांना आतल्या कॉन्फरन्स रूम मधून नॉक केल्याचे आवाज ऐकू येतात. एका रविवारी मला काम होतं म्हणुन मी माझ्या एका ज्युनिअर टिममेटला सोबत बोलावलं
आम्ही दोघं काम करतच होतो आणि रात्रीचे ९ वाजले.
तो म्हणालाही की आपल्याला निघायला हवं खुप उशीर झालाय,
मी दुर्लक्ष करून काम चालू ठेवलं. साधारण १५ मिनिटांनी आम्हाला दोघांना कोणी तरी चालताना येतो तसा पावलांचा आवाज आला.
आधी मला वाटलं की मला घाबरवायला त्यानेच आवाज केला असावा म्हणून मी त्याला म्हणाले देखील की तू कितीही पाय वाजवून मला घाबरवायचा प्रयत्न केलास तरी मी काम झाल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही आणि मीही जाणार नाही.
त्यावर त्याने खुर्ची फिरवून मला दाखवलं की तो पायांची मांडी घालून खुर्चीवर बसला होता. कोणताही चान्स नव्हता की त्याने पायाने आवाज केला असेल.
तरीही मी लक्ष दिलं नाही आणि काम चालूच ठेवलं. पुन्हा काही वेळाने कॉन्फरन्स रूम मधून नॉक केल्याचा आवाज ऐकू आला.साधारण पावने दहाच्या सुमारास.मग मात्र मी घाबरले पण कामही झालं होतं त्यामुळे पटकन आम्ही दोघंही ओडीसी मधून बाहेर पडलो.

त्यानंतर सोमवार ते गुरुवार आम्ही या विषयावर एकमेकांशीही नाही बोललो आणि ओडीसी मधे कोणाशीही नाही बोललो.
शुक्रवारी सकाळी एक कलिग - सुरभी सांगत आली की गुरुवारी रात्री ती आणि आणखी एक कलिग- साक्षी काम करत होते.साधारण ९.१५ च्या सुमारास त्यांना कोणी तरी खोकल्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. पण त्यांना वाटलं की कोणीतरी असेल आणखी काम करायला थांबलेलं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी काम चालू ठेवलं.
१० मिनिटाने त्यांना पुन्हा कोणी तरी खोकल्याचा आवाज आला आणि तो अगदी समोरच्या बे मधून ऐकू आला तेंव्हा सुरभीने उठून पाहिलं तर तिथे कोणीही नव्हतं. मग आपल्याला भास झाला असेल अशी मनाची समजूत घालून त्यांनी काम सुरुच ठेवलं आणि पावणे दहाच्या सुमारास त्यांनाही कॉन्फरन्स रूम मधून नॉक केल्याचा आवाज ऐकू आला.

त्या दोघी काम सोडून निघुन गेल्या घरी. आणि साक्षी आणि सुरभी दोघींनाही एकाच वेळेला एकाच गोष्टीचे 'भास' झाले. हे कितीही समावलं तरी मनाला काही पटतं नाही.

हे सगळं ऐकल्यावर आम्ही त्यांना आमचा अनुभव सांगितला तेंव्हा एक कलिग जी रोज अशी रात्री उशीरपर्यंत थांबून काम करते - मोनिका- ती म्हणाली पावणे दहाच्या सुमारास तिला रोजच कॉन्फरन्स रूम मधून नॉक केल्याचा आवाज ऐकू येतो.
काही टिममेट्सला ही गोष्ट खरी वाटेना म्हणून काल डिसाईड झालं की सगळ्या टिमने थांबून आवाज ऐकायचा.
आता थांबायचंच आहे तर जरा टाईमपास करूयात असं म्हणत आम्ही सगळे दुपारी १ वाजता कामाला लागलो. यामुळे काम ९ पर्यंत चाललं होतं आणि मग एक प्रॉडक्शन इश्श्यु आल्याने आम्ही सगळेच त्या आवाजाबद्दल पार विसरून गेलो.
आणि पुन्हा कालही रात्री पावणे दहाला आम्ही सगळ्यांनीच कॉन्फरन्स रूम मधून नॉक केल्याचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकला.

मोनिका सोडून (तिला बहुदा सवय झाली आता त्या आवाजाची) बाकी सगळ्यांनी इथुन पुढे रात्री ९.३० च्य अपुढे ओडीसीमधे न थांबण्याचं ठरवून टाकलं

मोनिका खरी धाडसी मुलगी आहे. शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार करण्यात यावा असा ठराव मी इथे मांडत आहे.
धन्यवाद

Pages