अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्रे.. हबा! किती भयानक!
रच्याकने, देवरस्/देवरसा म्हणजे 'भगत' का?

देवरस्/देवरसा म्हणजे 'भगत' का? >>> देवरशी/देवरशीन, भगत एकच. अजुन काय म्हणतात माहिती नाही. पण त्यांचा कापाकापीवर लय जोर असतो. तुर्‍याचा कोंबडा, उलट्या पकाची तलंग, करडी कोंबडी, बिन ठिपक्याचा बोकड असा निवडक माल खाणारे भंपक देव त्यांच्या ताब्यात असतात. आणि दारूचा कप पण घेऊन जावा लागतो.

पण मनात आणलं तर भुतच भुतं नाहीतर मज्जा.
मढ्यावर उधळलेले पैसे उचलून त्याचे लाल फुटाणे आणि बॉब्या आणुन भगव्या मारुतीच्या समोर बसून खाल्ल्या आम्ही पोरानी पण ज्याचे पैसे होते तो कधीही रात्री बाराला येऊन साडेतीन रुपये दे म्हणाला नाही.

ह.बा लै डेरिंगबाज हाय तुम्ही..
बाकी 'उलट्या पकाची तलंग' हे काय आहे समजलं नाही.

'उलट्या पकाची तलंग' >> जिचे केस कुरळे आहेत आणि जिला अजून कोंबड्याने स्पर्श केलेला नाही अशी युवा व पवित्र कोंबडी.

त्या बाईला मुलगी स्वप्नात दिसली, काय झालं असेल तिचं रात्राभर.. तळ्मळ नुसती...
असं स्वप्नात येउन सांगणं हे अमानवीय असलं तरी...

मामा ने भाचीचा बळी दिला हेच किती अमानवीय (माणुसकीला न शोभणारे) आहे हे वाटून गेलं.

'उलट्या पकाची तलंग' >> जिचे केस कुरळे आहेत आणि जिला अजून कोंबड्याने स्पर्श केलेला नाही अशी युवा व पवित्र कोंबडी. >>>>>> या क्रायटेरीयापुढे लोटांगण

"फडतरेंवर भितीचा अंमल असल्यामुळे त्याला ते चेहरे त्या डेथ बॉडींसारखे वाटत असतील"
लॉजिक पटत नाही. कारण आधी स्वप्नं आणि नंतर dead body पाहण असा क्रम आहे . फडतरेंनी आधी dead body पहिल्या असत्या तर आपण म्हणू शकलो असतो कि भीतीमुळे त्यांना स्वप्नं पडलं किवा भास झालं.
दुसरी गोष्ट म्हणजे नीट observe केलं किवा खोलात जावून विचार केलात तर लक्षात येईल कि रात्री पडलेली स्वप्नं लक्ख आठवतात . पहाटेची आठवत नाहीत. आणि 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' हे खरच असेल का ? आमच्या बाबतीत तर कधीच खरं होत नाही. :-).
असे अनुभव येण्यासाठी काही conditions satisfy व्हाव्या लागत असतील. म्हणून तर ते सगळ्यांनाच येत नाहीत .

राम रक्षा, हनुमान चालिसा असला तरीही सतत (२-३महिने) जर तोच तोच आवाज होत राहीला तर व्यक्ति एकतर थोडक्यात बहीरी नाहीतर १००% मानसिक रुग्ण बनु शकते.

याला काही आधार ?

त्याला ते जूजू म्हणतात. पण त्यांच्या मते, आपला म्हणजे भारतीयांचा जूजू जास्त पावरबाज असतो..
yes . मी जू जू वर १ खास पुस्तक वाचला आहे. आणि तिकडे बहुतेक सगळ्या लोकांना जू जू येते. आणि त्याचा वापर हि फार जास्त असतो . जू जू शिकवण्यासाठी त्यांच्याकडे खास शिक्षक असतात. जू जू शिकल्यावर तिला उतरवण्याचे उतारे शिकावे लागतात . त्यासाठीही खास शिक्षक असतात

असं स्वप्नात येउन सांगणं हे अमानवीय असलं तरी... >>>

स्वानुभव : मी अंग दुखतय म्हणून प्रेस लवकर बंद करून दुपारीच घरी गेलो. गेलो तो आडवा झालो. लेगेच झोप लागली.
एका बैठकीत मी पखवाज वाजवतो आहे. शेजारी कुणीतरी पाण्याचा तांब्या ठेवला माझा हात लागला. पाणी शाईपुडावर उडाले आणि बैठकीतले सगळे निघुन गेले.
जागा झालो. कसलं फालतू स्वप्न आहे. तेही दुपारी? गोंधळलेलो. पण अर्ध्या तासात त्याचा अर्थ लक्षात आला. चुलतमामाचा गावाकडुन फोन आला की माझी आज्जी गेली. आमच्या घरी गेली विसेक वर्ष आम्ही दोघच होतो. ते स्वप्न तिच्या जाण्याची पुर्वकल्पना होती की ती गेल्यानंतर तिच्या जाण्याचा सांगितलेला अर्थ होता माहित नाही पण असे होते हे सत्य आहे हे मी नाकारू शकत नाही.

जिचे केस कुरळे आहेत आणि जिला अजून कोंबड्याने स्पर्श केलेला नाही अशी युवा व पवित्र कोंबडी. >>> अशी कोंबडी शोधायची म्हणजे कामधंदे सोडून तिच्यावर डोळ्यात तेलघालून लक्ष ठेवायल हवंय Proud नाहीतर मेली शेण खायची Rofl animated-gifs-food-099.gifह.बा. तुम्हाला Light 1

.

कोंबडीचे केस कधी कुरळे पाहिले नैत ब्वॉ!!>>> पोल्ट्रीत आजिबात नसते ती. गावरान विकणार्‍या चिकनवाल्याकडेही सहसा नसतेच ती. गावात असते. आता गेलो गावाकडे की आणतो तिचे फोटो काढून.

तलंग : जिने आजवर अंडे दिले नाही. किंवा जिचे अंडे देण्याचे वय नाही अशी लहान पणीची पण कापून फायदा होईल (खाण्यासाठी) अशी कोंबडी.

अशी कोंबडी शोधायची म्हणजे कामधंदे सोडून तिच्यावर डोळ्यात तेलघालून लक्ष ठेवायल हवंय नाहीतर मेली शेण खायची >>> मी कोंबडीविषयी बोलत होतो. त्यांच्यात कितीही दुर्लक्ष केले तरी योग्य वेळ आल्याशिवाय शेण खाण्याचा प्रकार घडत नाही. कारण तिथे कोंबडे असतात. वासनांध माणसे नव्हे.

<<पोल्ट्रीत आजिबात नसते ती. गावरान विकणार्‍या चिकनवाल्याकडेही सहसा नसतेच ती. गावात असते. आता गेलो गावाकडे की आण<< ओक्के हबा. मी पण आत्तापर्यंत ऐकुन होते...उलट्या पखवाली कोंबडीबद्द्ल.
एकंदरीत कावळ्याचं पीस/ पंख, उलट्या पखवाली कोंबडी, कवड्या, लिंब या गोष्टी भगतांच्या आवडीच्या असतात. मी त्या एक धारी लिंबुबद्दल पण असच ऐकलं होतं.
गावाकडे कुणाचा एखाद्या भारलेल्या 'जागी' अ‍ॅक्सीडेंट झाला तर रस्त्यात 'त्या' जागेवर एक अंडे आणि सटरफटर नेउन ठेवतात. अंडे या साठी की तिथे जे काय अमानविय आहे त्याची भुक अंडे म्हण्जे 'एक जीव' या अर्थी देउन भागवायची म्हणजे तो शांत होईल.

त्याची भुक अंडे म्हण्जे 'एक जीव' या अर्थी देउन भागवायची म्हणजे तो शांत होईल.>>> करेक्ट. पण तरीही तिथे अ‍ॅक्सिडेंट होतातच कारण त्या अमानवियाच्या आधी कुत्री येऊन अंड्यासहीत दामटा खाऊन जातात.

हो हो,...! पण तुम्हाला कसं कळलं? भल्तेच हुशार बुवा तुम्ही.>>> मी हुशार नाही... तुम्ही बंडू आहात.

ह्.बा.
तुम्ही सांगितलेली घटना माझ्या माहितीत आहे.>>> तुम्ही कोल्हापूर भागातल्या आहात का?

अमानवियाला जीव देण्याच्या विविध पध्दती :

१. पुर्वी नरबळी दिला जायचा. मग महानुभव पंथाने त्याजागी नारळ हे फळ फोडण्याचा पर्याय सुचवला. त्याला माणसासारखी शेंडी ठेवायची. डोळे उघडे करायचे. लाल नाम ओढायचा आणि माणुस कापण्याऐवजी त्याला फोडायचा.
२. अंडे दामटा : किरकोळ त्रास असेल तर. ताप येणे. मुलांना खरूज उठणे वगैरे.
३. कोंबडी कोंबडा : पोरीच्या संसारात व्यत्यय. दावणीची जणावरं मरणे.
४. बोकड्/पाट्/मेंढा : पोराला काही केल्या नोकरी न लागणे. घरात सलग कर्ती माणसे दगावने. सुबत्ता कमी होत जाणे.
दुसर्‍याचं वाटोळं व्हावं म्हणूनही हे प्रकार केले जातात.
दुसर्‍याचा मृत्यु व्हावा. नीट चाललेला संसार बिघडावा. नोकरी जावी. इ. कारणासाठी भगताच्या मध्यस्तीने देवाला सुपारी दिली जाते त्यासाठी देव एक बोकड, पेहराव, कोंबडी, असे काहितरी घेतो. असे सुपारी किलर देव महाराष्ट्राच्या विविध भागात विपुल प्रमाणात आढळतात.

निक्षिपा...मी तुम्ही सांगितलेली गोष्ट फेबु वर वाचली...आणि तिथे कोणीतरी हसन की असाच आहे तो माबो वरच्या कथा चोरुन टाकतो...पण आपण काहीच करु नाही शकत कारण माबो वरचे लिखाण कोणीही कॉपी करु शकते अगदी सहजपणे

नाही. पण अशीच घटना आहे. बातमी पेपर मध्ये आली होती. मामा-मामीने स्व:ताला मुल होत नाही म्हणुन बळी दिला.
आणि ती भगतीण होती.... वय - २८ , १२ वी शिकलेली.

'उलट्या पकाची तलंग' >> जिचे केस कुरळे आहेत आणि जिला अजून कोंबड्याने स्पर्श केलेला नाही अशी युवा व पवित्र कोंबडी. >>>>>> या क्रायटेरीयापुढे लोटांगण>>> अशी कोम्बडी काळी असेल तर अजुन चांगलं.
कधी कधी कोम्बडीच पिलु विकत घ्यायला लोकं यायचे.
असं पिल्लु त्याना देवाला सोडायला हवं असायचं.
आमच्या मातुश्री अज्याबात द्यायच्या नाहीत.

अशा घटना सर्रास सगळीकडे चालु असतात रानई.

अजुन एक : आमच्या गावात एकच मुस्लीम कुटूंब आहे. आधी त्यांचं खूप कौतुक व्हायचं मान मिळायचा. मग त्याना काय बुध्दी सुचली कोण जाणे. त्यानी एका बेवड्याला मशिदीत जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणतात नरबळी वगैरे. पण मला वाटतं त्यानं भाभीच्या अंगावर हात टाकला असणार.

बाप रे ह बा तु लिहिलेलं सगळंच अंगावर काटा आणणारं आहे. आपल्या समाजात अजूनही अशा प्रथा सुरू आहेत याचं आश्चर्य आणि खेद दोन्ही आहेच.

Pages