अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा वर आला पण सीजन गेलाय भूतांचा .. भुते भारतीय प्रमाणवेळेनुसार पावसाळ्यात किंवा थंडीच्या रात्रीमध्ये येतात.. ऑक्टोबर हीटमध्ये तर नो चान्स.. तरी गेले दोन दिवस क्लायमेट बदललेय.. लेट्स सी !!

क्लायमेट बद्दल काय बुलुन उपयोग नाय ? कारण मुबैंत कायम दोनच ॠतु, पडला तर पाउस नायतर १२ महीने उनाचा कडाका
पण या दिसांत यिचीत्रच प्रकार घडतुया ?
दिवा़ळीला थंडी पडायची राहिली ,पण पडतोय पाउस
अरे कुठे नेउन ठेवलाय रेनकोट माझा -----
आणि हो भुतांना सिजन नसतो त्यांना अंडरइस्टीमेट करु नका ते तुम्हाला त्यांची पॉवर दाखवतील कदाचित तुमच्या बाजुला बसुन हा धागा वाचतही असतील , बघा बरं बाजुला . Happy Lol .

सिनी Proud
मला खरोखरच बाजूला बघायला भिती वाटू लागलीय .. रात्रीचे एक वाजून नऊ मिनिटे..
डोंण्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन घोस्ट !!!

आणखीण एक भुताची गोष्ट सांगते मानो या ना मानो ,पण तुम्ही जो धागा वाचताय तो अस्तीत्वातच नाहीये .मग तुम्ही कोणाला पोस्ट पाठवत आहात .असे धागे यापुर्वीही अनेक जणांनी काढ्ले आहेत पण एकतर ते धागे गायब तरी होतायत किंवा आपोआप डिलीट. विचारा हवं तर माबो करांना . नवीन आलेल्यांवर विशेष लक्ष असतं भुताखेतांचं . सतत धागे काढणार्यांवर तर ते आपला आपला इंगा दाखवतातच. मलाही तुम्ही मानवीय तर समजत नाही ना? Happy Lol

Proud Proud .
ती शक्यता नाहीये.
डरना जरुरी है व त्यानंतर येणार्या रामुच्या सगळ्याच चित्रपटांनी घाबरवणे सोडुन उलट सहनशक्ती वाढवली आहे. Proud नाना पाटेकरांचा डरना तला सीन ची आठवण करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद . Happy .

सहनशक्ती वाढवली आहे ??
उलट रामूने आपल्या मनातील भुताची प्रतिमा पार पातळ केलीय. त्यामुळे आपली भूतप्रतिकारशक्ती सुद्धा घटली आहे. आता जेव्हा खरोखरच्या भूताशी आपला सामना होईल तेव्हा आपले काही खरे नाही .. Sad

जेव्हा खरोखरच्या भूताशी आपला सामना होईल तेव्हा आपले काही खरे नाही >>>>>>>. खर्याखुर्या भुतापेक्षा भुताच्या भीतीनेच माणुस आड्वा होईन..नाही होतोच...

माझ्या भावाचा अनुभव अहे. २००१ मधे त्याचे लग्न झाले आणि तो त्यानन्तर डोम्बिवलि वरुन पुण्याला रहायला आला बायको बरोबर - नविन फ़्लट मधे. त्याची रात्रीची शिफ़्ट असायची. आणी तो औफ़्फ़िसला ला गेल्यावर एक दिवस त्याच्या बायकोला एक म्हातारा माणुस घरात दिसला. आणि अचानक गायब झाला. असे नेहमी होउ लागले. तिला तो स्वप्नात पण दिसयचा. त्यान्नी चोउकशि केल्यावर कळले कि ती जागा बान्धत असताना एका म्हातार्या मजुराचा तेथे पडुन म्रुत्यु झाला होता. त्यनि तो फ़्लट विकायचा प्रयत्न केला. पन विकला जायीना. मग वहिनीने या मधुन सुटका होन्यासठी सोळा सोमवार चे व्रत केले आणि त्यानन्तर त्यान्चा फ़्लट लगेच विकला गेला आणि सर्व त्रास बन्द झाला. आता ते लोक नविन जागेत सुखात आहेत.

जेव्हा खरोखरच्या भूताशी आपला सामना होईल तेव्हा आपले काही खरे नाही >>>>>>>. खर्याखुर्या भुतापेक्षा भुताच्या भीतीनेच माणुस आड्वा होईन..नाही होतोच...>> मी भुत पाहीलेले नाही (प्रत्यक्ष्)अजुनतरी. भुताच्या भीतीने माणुस होत असावा आडवा .मी यातली जाणकार नाही . Happy

मग वहिनीने या मधुन सुटका होन्यासठी सोळा सोमवार चे व्रत केले आणि त्यानन्तर त्यान्चा फ़्लट लगेच विकला गेला आणि सर्व त्रास बन्द झाला. आता ते लोक नविन जागेत सुखात आहेत.>>>

ज्याना हा फ्लॅट विकला , त्यान्च काय ?

ज्याना हा फ्लॅट विकला , त्यान्च काय ?
>>>>
ते सुद्धा सुखात असतील जर अंधश्रद्धाळू नसतील.
असा अनुभव आहे आमच्या ओळखीच्या काकांचा, डिटेल नाही देत पण ५०-५५ लाख किंमतीचा भुताटकीचा फ्लॅट त्यांनी निव्वळ १८ लाखात मिळवला होता. चार वर्षांपूर्वी. आज त्याची किंमत ७०-७५ लाख झालीय. आणि गेले चार वर्षे त्यांनी तिथे सुखसमाधानाने राहिल्याने गिर्हाईक सुद्धा मिळत आहेत जर विकायचा विचार केल्यास.

तळटीप - नेहमीची वास्तूशांती वा गणेशपूजन वगळता काहीही होमहवन केला नाही.

तळटीप क्रमांक २ - कोणाच्या पाहण्यात असे भुताटकी फ्लॅट असल्यास कळवा. प्लीज!

नेहमीची वास्तूशांती वा गणेशपूजन वगळता काहीही होमहवन केला नाही.
>>

म्हणूनच नसेल त्रास झाला. Happy

मध्यंतरी लोकसत्तात वाचलं की ख्राईस्टचर्च मध्ये एका हॉटेलात पाकिस्तानी टीम उतरली असताना एका खेळाडूचा पलंग रात्री हलायला लागल्याने त्याने सगळ्या टीमला फोन करून जागं केलं. भीतीने त्याला ताप भरला. स्टुअर्ट ब्रॉड व त्याची गर्लफ्रेन्ड ह्यांनाही ह्याच हॉटेलात अमानवीय अनुभव आला होता म्हणे.

मी हि ती पाकिस्तानी cricketer chi बातमी वाचलीय . त्याला म्हणे अद्भुत शक्ती जाणवल्या त्या रूम मध्ये .
किस्से टाका प्लीज . अवांतर चर्चा नको

माझि आइ जावुन दिड वर्ष झाले ति गेले ४ वर्षे खुप आजारी आसायची अनी शेवटची २ वर्षे बिछ्यान्याला खिळुन होती
माझि आई जाण्याच्या आगोदर काहि दिवस ति माझ्या पत्निस म्हणत होति कि हे (माझे वडिल स्वप्नात येतात आणी तिला म्हणतात कि मि आता तुला बरोबर घेवुन जाणार आहे)

अनि जायच्या आदल्या रात्रि मध्ये आस्ताना माझे हात धरुन मला थांबायला सांगत होती आणि तिला खूप भीती वाटते आहे असा बोलत होती

दोन महीन्यापुवी माझे छोटे काका आजारी असताना त्याना दोन सावल्या रात्रि त्यान्च्या बाजुला बसलेल्या दिसायच्या ते cancer च्या last stage ला होते, त्यामुळे त्यांना बोलताना खुप त्रास व्हायचा, ते खुणेनेच हे सर्व काहि सांगायचे. मरण्यापुर्वी दोन दिवस सतत त्यांना हे दिसत होत.आम्हाला तर हे समजन्याच्या पलीकड्च होत.कारण एक सावली माझ्या वडिलांची होती त्यान्च्यां म्रुत्युला ८ वर्षे झाली आणी दुसरी माझ्या मोठ्या काकांची होती ज्यांच्या म्रुत्युला ६ वर्षे झाली होती.
नक्कि काय होत ते ? मला जेव्हा हे समजल ना तेव्हा खुप रड्ली, खरच माझ्या वडीलांचा आत्मा होता तो मग ईतके वर्षे आम्हाला का नाही जाणवला कधी.

मिमिविजय / मानसि,
खरच माझ्या वडीलांचा आत्मा होता तो मग ईतके वर्षे आम्हाला का नाही जाणवला कधी. >> इथे या आधी चर्चा झाली आहे त्यातुन जाणवले की बर्याच जणांना आपल्या मृत्युसमयी अशाप्रकारचे भास झाले होते म्हणजे कुणी जवळची व्यक्ती किंवा नातेवाईक जे आधीच मेलेले होते ते मरणासन्न असलेल्या व्यक्तिला नेण्यास आले आहेत असे त्या व्यक्तिला दिसत असते. तुम्ही त्याबद्दल वाचले तर तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
त्यामुळे मानसि तुमच्या वडिलांचा आत्मा तुम्हाला जाणविण्याचा प्रश्न्च नाही.

कोणाच्या पाहण्यात असे भुताटकी फ्लॅट असल्यास कळवा. प्लीज! >> माझे मागचे अनुभव वाचा Happy आम्ही अजूनही त्याच फ्लॅटमध्ये राहतो... अजूनही किरकोळ "भास" जाणवतात पण त्रास जवळपास नाहीच !

नुकताच आलेला अनुभव...
सासरे बरीच वर्ष आजारी होते... २०१४च्या ऑगस्टमध्ये निवर्तले. आम्ही गावच्या घरी तेरा दिवस होतो. ज्या दिवशी सकाळी वारले त्या रात्री त्यांच्या खोलीतच झोपलो होतो, हॉलमध्ये पाहुणे मंडळी दाटीवाटीने झोपलेली. पहाटे साबूंच्या नेहमीच्या उठण्याच्या वेळेवर स्लीपर घासत चालण्याचा परीचयाचा आवाज आला. रात्रीच्या जागरणामुळे भास होत असेल म्हणून दुर्लक्ष केले. तर त्यांच्या बेडच्या कोपर्‍यात चौकडीची लुंगी व बनीयन या नेहमीच्या वेषात बसलेली आकृती दिसली! दचकून उठून पाहीलं झोपेत भास झाला असेल म्हणून पण छे! स्पष्टपणे ती आकृती आम्ही झोपलेलो तिथे उदास पणे बघताना दिसली... मी हळूच हाक पण मारली अण्णा करून... उत्तर नाही! भासच असेल म्हणून पुन्हा झोपले. सकाळी कोणाला काहीच बोलले नाही. संध्याकाळी नवर्‍यानेच हलके कुजबुजत सांगितले, रात्री झोप आली नाही नीट! सतत अण्णांचे भास होत होते. कदाचित आठवणींमुळे भास होत असावेत म्हणून आम्ही ती घटना विसरून गेलो.

राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा फोटो लावला आहे, माझा मुलगा सतत सांगतो, फोटोतले आजोबा सतत भुवया उडवून हाक मारतात! वास्ताविक मुलगा अडीच महीन्यांचा असल्यापासून सासरे खूप आजारी व बेडरिडन होते, त्यामुळे मुलाने त्यांना पाहीले नाही! त्यांची भुवया उडवून बोलण्याची सवय त्याला कशी समजली कोणास ठाऊक! शेवटच्या दिवसांमध्ये बाकी काहीच आठवत नसे पण ते माझ्या मुलाची फार आठवण काढत, त्याला बघायचेय म्हणत पण अतिदक्षता विभागात असल्याने डॉक्टरांनी परवानगी दिली नव्हती. ती इच्छा अपूर्ण राहीली म्हणून की काय पण मुलावर आणि आमच्यावरही त्यांचं लक्ष असावं असं वाटतं!

Pages