..
सई आवडत असेल तर खालील पोलवर आपले मत नोंदवायला विसरू नका.
http://www.maayboli.com/node/50843
.................
मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी !
साहजिकच आहे, मी चित्रपटही बघतो मराठी ..
त्यामुळे वयात येतानाची माझी ड्रिमगर्ल एखादी मराठी हिरोईनच असणे यात नवल वाटण्यासारखे काही नव्हते. पण तरीही, तशी ती कोणी नव्हती. कदाचित ड्रिमगर्ल, स्वप्नसुंदरी, वा तरुणांच्या हृदयाची धडकन बनण्यासाठी जे मटेरीअल लागते त्याचा कुठेतरी समकालीन मराठी हिरोईनींमध्ये अभाव होता. तरीही हिंदीतल्या कुठल्याही बिपाशा वा मल्लिकावर माझ्या जिगर का तुकडा ओवाळून टाकण्याऐवजी मी वाट बघणे पसंद केले. आणि एक दिवस लवकरच "सनई चौघडे" वाजले...
तिला मी त्या आधीही पाहिले होते. कदाचित एखाद्या मालिकेत वा एखाद्या जाहीरातीत. तेव्हा आठवत नव्हते. पण "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" हे हिट गाणे या सिनेमातले आहे, केवळ याच उत्सुकतेपोटी बघायला घेतलेल्या चित्रपटाने मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे कारण तीच होती. नॉनग्लॅमरस पेहरावात एक ग्लॅमरस भुमिका साकारायचे शिवधनुष्य त्यात तिला पेलायचे होते. ते तिने कसे काय पेलले याची समीक्षा करणे क्रिटीक्स लोकांचे फावल्या वेळातले उद्योग, पण माझ्यासाठी मात्र त्यानंतर तो सिनेमा कांदेपोहे या गाण्याच्या जोडीने सई ताम्हाणकरचा म्हणूनही लक्षात राहिला. येस्स! सई ताम्हाणकर!!
दुसरी स्मिता पाटील होणे नाही, संयत अभिनयाच्या जोडीला अदाकारीची ती उंची कोणी गाठणे नाही, पण तरीही सईमध्ये त्या दिवशी मला "नमकहलाल" मधील स्मिता पाटील दिसली. अध्येमध्ये डोकाऊन गेली. नमकहलाल हा टोटली अमिताभचा चित्रपट असूनही त्यातील स्मिता पाटील मला भावली होती. इथे तर हा मला सईचाच सिनेमा वाटला.
माझे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते ते! मी तिच्या नावातही गोंधळ घालायचो! कधी सई ताम्हाणकर बोलायचो, तर कधी सई परांजपे! हसेही व्हायचे! याच कारणाने मला ती आवडते यावर कोणी विश्वास ही ठेवायचा नाही! एकाअर्थी बरेच होते ते, पण त्यानंतर ती गायबली ...
माझ्या आठवणीतून नाही पण कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतून .. मधल्या काळात तिचे काय कोणते चित्रपट आले गेले हे बघायला मला गूगाळावेच लागेल, पण तसे मला करायचे नव्हते. माझ्या आठवणीतील सईच्या प्रतिमेला मला धक्का बसू द्यायचा नव्हता. तिला एखाद्या बंडल चित्रपटात दुय्यम दर्जाची भुमिका करताना मला बघायचे नव्हते. तसा एकदा योगही आला होता. तिचा एक "पिकनिक" म्हणून चित्रपट केबल टिव्हीवर लागलेला. पण त्यात माझी नेहमीची सई दिसून राहिली नाही म्हणून मी लागलीच तो चॅनेल बदलल्याचे आठवतेय ..
आमच्या पुढच्या भेटीला जवळपास चार वर्षे जावी लागली. मधल्या काळात "राडा रॉक्स" चित्रपटानिमित्त तिच्याबाबत वादग्रस्त गॉसिपिंग झाली, पण माझ्या मनाच्या एका निवांत कोपर्यात दडलेले सईचे स्थान काही त्याने हलले नाही.
आणि मग एक दिवस जिथे तिथे चोहीकडे सईचे फोटो झळकायला लागले...
येस्स! तेच ते फेमस लाल बिकीनीतले फोटो! चित्रपट - नो एंट्री पुढे धोका आहे!
त्या लालभडक बिकिनीमध्येही ती कुठेही वल्गर वाटत नव्हती आणि म्हणूनच चित्रपटाचे प्रमोशन करायला ते फोटो फिरत होते. माझ्यामते हे जे काही कसब आहे ते हिंदीतील कतरिना कैफ या नटीलाच जमून जावे. पण त्या चित्रपटातील तिची भुमिकाही कदाचित कतरीनासारखीच शोभेची बाहुली म्हणून असावी. कारण त्या चित्रपटाचे पुढे काय झाले ते मला समजले नाही. सईसाठी म्हणून तो बघायचा होता, प्रदर्शित व्हायच्या आधीच मित्रांनाही त्या द्रुष्टीने पटवून झाले होते. पण काही चित्रपट पहिल्या प्रयोगालाच किंवा त्या आधीच पडतात तसेच काहीसे त्याचे झाले. एक टुक्कार(?) चित्रपट न बघितल्याची खंत अशी कधी राहिली नाही, पण आठवणीत राहिला तो तिचा लाल बिकिनीतला फोटो, जो अगदी आजही "ग्लॅमरस मराठी हिरोईनचा मापदंड" म्हणून व्हॉटसअॅप सारख्या सोशल साईटसवर फिरत असतो.
अजूनही सई हि माझी सर्वात आवडती नटी होती, पण तरीही तिला "माझी ड्रिमगर्ल" हे पद देण्यास काहीतरी कमी पडतेय असे मला वाटत होते. आणि मग एके दिवशी रिक्षा सिग्नलला थांबलेली असताना एका चित्रपटाच्या पोस्टरवर नजर पडली. आधीही त्या चित्रपटाबद्दल मित्रांकडून ऐकले होते. हा कट्ट्यावरच्या यारीदोस्तीचा आणि त्यांच्यातील दुनियादारीचा चित्रपट आहे म्हणत जायचा प्लानही ठरला होता. सई त्यात आहे हे सुद्धा ऐकून माहीत होते पण तरीही हुरहुर अशी लागली नव्हती, जी तो पोस्टर बघून लागली. दुनियादारीच्या त्या पोस्टरवर मला सई नाही तर बॉबीमधील डिंपल कपाडिया दिसत होती. येस्स! हिच तर आहे माझी ड्रिमगर्ल! माझ्या ईतर कोणत्याही मित्राने तिच्यावर आपला हक्क सांगायच्या आधीच मी माझा रुमाल तिथे टाकला होता.
पहिल्या दिवसाचा पहिलाच शो मला बघायचा होता, पण सर्व मित्रांना जमवण्याच्या दुनियादारीत तिसर्या आठवड्यातच तो योग आला. मधले दिवस कसे गेले याची तुम्ही कल्पनाच करू शकता. पण मराठी चित्रपट तिसर्या आठवड्यात म्हणजे थिएटर पार रिकामे असेल आणि "मै, सई और दुनियादारी" म्हणत निवांत चित्रपटाचा आनंद घेता येईल या माझ्या कल्पनाविलासाला तडा गेला जेव्हा तिकिटबारीलाच हाऊसफुल्लच्या बोर्डाला मिरवताना पाहिले. थिएटरच्या बाहेर सईचा आणि चित्रपटातील इतर कलाकारांचा भलामोठा किंग साईज पोस्टर लावला होता. त्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती ती पाहता ओठांवर स्माईल, मनात इर्ष्या आणि डोक्यात राग एकाच वेळी दाटून येणे अनुभवत होतो. भावना संमिश्र होत्या खर्या पण आपापल्या जागा राखून होत्या.
अगोदरचा शो संपताच मला सर्वात पहिले आत शिरायचे होते कारण सईची एंट्री मला चुकवायची नव्हती. पण पुनश्च एका लेटलतीफ मित्रासाठी दुनियादारी करत थांबावे लागल्याने तो अनर्थ घडलाच. आत गेलो तर अंकुश चौधरीच्या एंट्रीचा सीन चालू झाला होता आणि पब्लिक टाळ्या मारत होते. मी सुद्धा त्यात थोडाफार सामील झालो, पण तरीही मला माझी खरी उर्जा राखून ठेवायची होती ती सईच्या एंट्रीला एक कचकचून शिट्टी वाजवायला, पण.......
पण ती आली, तिला पाहिले आणि पाहतच राहिलो... तोंड उघडले ते उघडेच राहिले.. शिट्टी राहिली बाजूला, श्वासापुरती हवा आत शिरली अन श्वास रोखूनच राहिला!
टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. यापेक्षा समर्पक शब्द नसावेत.. नक्कीच गीतकाराला सईवर चित्रित झालेले ते द्रुष्य बघूनच हे शब्द सुचले असावेत हे मी खात्रीने सांगतो!
अगदी पोस्टरवर पाहिलेले तशीच ती माझ्यासमोर सारे दृष्टीपटल व्यापून टाकणार्या कॅनव्हासवर पसरली होती! सिंपल मे डिंपल! त्यानंतर पुढचा पुर्ण सिनेमा सईसाठीच बघितला गेला. अगदी स्वताला स्वप्नीलच्या जागी ठेऊन बघितला गेला. व्हिल्लन साई झालेल्या जितेंद्र जोशीबरोबर तिला बघताना अक्षरशा राग येत होता. जेव्हा ती श्रेयसला, "माझा बच्चू आहेस तू" असे म्हणाली तेव्हा एक मोरपीस माझ्या गालांवरून फिरले होते. शेवटी स्वप्निल तिला पुळचटासारखा सोडून जात होता तेव्हा त्याचाही एवढा राग आला होता.. असे वाटले उठून त्याला सांगावे अबे जा ना, भाड मध्ये गेली तुझी दुनियादारी, आता भांड त्या दुनियेशी आणि मिळव "आपल्या सईला" परत....
स्वताला स्वप्निलच्या जागी बघणे मला सोपे गेले कारण तसा तो देखील माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. शेवटी तो मरतो तेव्हा मला वाईट वाटले नाही. का माहीत नाही पण तेव्हा मी त्या श्रेयसच्या भुमिकेतून बाहेर आलो आणि ऋन्मेष बनून सईला धीर देऊ लागलो, काही हरकत नाही सई मी आहे अजून... त्या शेवटच्या म्हातारपणाच्या द्रुष्यात सुद्धा सई इतकी तजेलेदार आणि सुंदर दिसत होती की लेडी देवानंदच जणू.. किंवा रेखानंतर खूबसुरत तीच!
चित्रपट संपवून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात नुसती टिकटिक वाजत होती.. पाऊस पडत नव्हता तरी अंग ओलेचिंब झाल्यासारखे वाटत होते.. राहून राहून ओठांवर याच ओळी येत होत्या.... नाही जरी "सई" तरी.. भिजले अंग, पाण्याने .. सोचू तुम्हे पलभर भी, बरसे सावन जोमाने .. माझी अवस्था माझ्या मित्रांनी नेमकी हेरली, आणि त्याच दिवशी या ऋन्मेषला एक नवीन नाव पडले... ए रिशी पकूऽऽर ..!!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सई !
स ई .. दोन अक्षरे..
आणि तिच्याबद्दल आता माझे दोन शब्द!
सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स!
सईसारखी हिरोईन मराठी चित्रपटसृष्टीत या आधी झाली नसल्यामुळे तिची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींशी करायचा मोह आवरत नाही. मग ते तिचे सौंदर्य असो वा अभिनय. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीकडे नजर टाकल्यास मला ती बरेचदा कंगना राणावत सारखी वाटते. कंगना हिंदीमध्ये ज्या पठडीतले सिनेमे करते ते मराठीत सईचे देखील हक्काचे क्षेत्र आहे, बनू शकते. अर्थात गरज आहे तसे धाडसी सिनेमे मराठीत बनण्याची. पण तरीही मला वाटते सईमध्ये मराठी चित्रपटसृष्टीची प्रियांका चोप्रा बनण्याची क्षमता आहे. तिच्याप्रमाणेच नायिकाप्रधान सिनेमा एकहाती खेचण्याची क्षमता आहे. मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही ती ज्या फ्रेममध्ये असते तेव्हा त्या चौकटीच्या कडेला उभे राहूनही बरेचदा ती प्रेक्षकांचा फोकस स्वतावर खेचून घेते. हो, तिच्यावर थोडीफार गॉसिपिंग होते, पण ते करावे अशी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तीच आहे आणि हेच तिला मराठीतील लेडी शाहरूख खान बनवून जाणार आहे. यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर, बट यू कॅन नॉट इग्नोर हर .. पण इथेही तेच.. कंगना ते प्रियांका, व्हाया कतरीना, हा प्रवास करण्यासाठी तिला मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांची देखील साथ मिळायला हवी आणि इन्शाल्लाह एक ना एक दिवस ते नक्की होईल, बोलो आमीन !
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष उर्फ रिशी पकूऽऽर !
(लेख क्रमांक १)
सामी, ड्रीमगर्ल, रीया
सामी, ड्रीमगर्ल, रीया
माझं प्रामाणिक मत :- सई
माझं प्रामाणिक मत :-
सई ताम्हणकर ही शुद्ध माठ दिसते. रांजण म्हटलं तरी चालेल... किंवा नर्मदेतील घासून घासून गुळगुळीत झालेला गोटा असतो तशी. अॅक्टींगच्या नावाने बिगरी फेल. केवळ मराठीमध्ये आहे आणि ग्लॅमरस असल्याचा आव आणते म्हणून अद्याप टिकून आहे.
तिच्यापेक्षा अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी लाखपटीने परवडल्या.
हो याच्या सुरस कथा तिची
हो याच्या सुरस कथा तिची बॅचमेट असलेल्या सांगलीच्या रूमीकडून ऐकल्या होत्या. >>>>>>> @ ड्रीमगर्ल, आम्हाला ही सांगा ना. नाव नका लिहू, आम्ही समजुन घेऊ.
ती मस्त थोराड आहे ,पण
ती मस्त थोराड आहे ,पण वेस्टर्न आऊटफीअट्समधे सहज कॅरी करते.ती सहजता/ बोल्डपणा चांगला आहे इतकंच.
बापरे, दोन टोकाच्या
बापरे, दोन टोकाच्या प्रतिक्रिया आहेत इथे ( म्हणजे एका बाजूला एक प्रतिक्रिया आणि बाकीच्या सगळ्या दुसर्या टोकाला
)
सई ताम्हणकर दिसायला सुंदर आहे असं मला वाटत नाही, खरंतर ऑर्डिनरी लूक्स आहेत. पण 'अनुबंध' ह्या मालिकेत चांगलं केलं होतं तिने काम. तिचे चित्रपट फारसे पाहिलेले नाहीत पण जितकं काम पाहिलंय त्यामधील तिचा बोल्डनेस ( ही तिच्या कपड्यांवरची कमेंट नाही. बोल्ड वावर ह्या अर्थाने. ) आवडतो पडद्यावर पाहायला. डोक्यात वगैरे तर अजिबात जात नाही. कधीकधी एकाच साच्यातला अभिनय वाटतो पण तिने केल्या आहेत म्हणे वेगळ्या भूमिका. मी पाहिलेल्या नाहीत त्यामुळे माहीत नाही.
तिच्या मराठीवरही बरीच टीका झालेली पाहिलीय पण जेवढं तिचं काम मला आठवतंय त्यावरुन मला तरी तिचं मराठी भयाण वाटलं नाही ( अमृता खानविलकरच्या मराठी बोलण्यात मराठीपण नाही तसं सईच्या बाबतीत नाही वाटलं. तसंही अगदी शुद्ध सुरेख मराठी बोलणार्या किती नायिका आहेत आपल्याकडे ? गोनिदांच्या छायेत वाढलेल्या मृणालचे उच्चार सुद्धा हिंदीकडे झुकतात बरेचदा. )
देव करो आणि त्या सई
देव करो आणि त्या सई ताम्ह्नकरने इथल्या कुठ्ल्याही प्रतिक्रिया वाचू नयेत........

आणि ले़खाबद्द्ल बोलाल तर मुळीच पट्ला नाही.......
सई म्हणजे मराठीतली 'किम
सई म्हणजे मराठीतली 'किम कार्दाशीन ' वाटते.
सई ताम्हणकरचा बिकीनीतला फोटो
सई ताम्हणकरचा बिकीनीतला फोटो इथे टाकला तर अॅडमिन सुद्धा अश्लील, बोल्ड, हॉट या कुठल्याही कॅटेगरीखाली उडवणार नाहीत.
हरे रामा!
हरे रामा!:हाहा:
.............................
..........................................
इनफ इझ ENOUGH !!!!!!
इथे उगाच टवाळक्या करायला म्हणून प्रतिसाद येत आहेत आणि ज्यांना सई आवडत असेल अश्यांनी इथे येऊ नये म्हणून भयावह वातावरणनिर्मिती करत त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय.
आव्हान स्विकारा !!!
मला सांगा मायबोलीवर गुप्त मतदानाने पोल काढायची सोय आहे का?
असल्यास एक पोल काढूया ...
बस्स दोनच पर्याय -
१) मला सई आवडते.

२) मला सई आवडत नाही.
दॅट्स ईट !!!! दूध का दूध और पाणी का पाणी !!! होऊन जाऊ दे ................
पूनमताईं बद्दल कोण घेतंय पोल
पूनमताईं बद्दल कोण घेतंय पोल ?
या निमित्ताने प्रत्येकाने आपापल्या आवडीची नटी तपासून घ्यावी
आर या पार ची लढाईचा उल्लेख
आर या पार ची लढाईचा उल्लेख करताच अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती.
माझ्यामते आता या धाग्यावर असंबद्ध प्रतिसाद येतील किंवा धागाच थांबेल, आणि निकाल मात्र पोल न घेताच स्पष्ट होईल
<<ती नववी-दहावीत असताना
<<ती नववी-दहावीत असताना सगळ्या विश्रामबाग/सांगली/मिरजेत फेमस होती. >> हो याच्या सुरस कथा तिची बॅचमेट असलेल्या सांगलीच्या रूमीकडून ऐकल्या होत्या. >> ऐकवा तरी त्या सुरस कथा सईच्या धाग्यावर.
मी तिला प्रत्यक्ष पाहिलं ते पार्ल्यातल्या माझ्या ऑफिस मेधल्या मैत्रिणीकडे पेइग गेस्ट म्हणून. संद्याकाळी मी जरा तिच्या कडे गेले होते तेव्हा ती पण बाहेरून घरी आली . माझी मैत्रीण तिला जेवणार का म्हणून विचारत होती आणि हि बराच वेळ फोनवर तेव्हा मैत्रिणीने तिची ओळख करून दिली हि सई ताम्हणकर आणि मुंबईत ती मालिकांमध्ये नाहीतर सिनेमात काम मिळतंय का ते बघायला आली आहे . त्यावेळी ती स्ट्रगल पिर्येड मध्ये होती

त्यावेळी ती अजिबातच सुंदर वगैरे दिसत नव्हती. एकदम सर्वसामान्य लुक . प्रचंड बुटकी पण आहे
त्यावेळी ती अजिबातच सुंदर
त्यावेळी ती अजिबातच सुंदर वगैरे दिसत नव्हती>>>>>>>>> हाहा..... तसे एश्वर्या रायचेपण असे काही सुरवातीचे फोटो आहेत कि ज्यात ती भयानक दिसते........ पण स्वतःची थोडी काळ्जी घेतली तर चागले दिसता येत...
....... सुंदर वगैरे दिसत नव्हती. एकदम सर्वसामान्य लुक . प्रचंड बुटकी पण आहे >>>>>>>पण इतक्या सगळ्या गोश्टी नसताना तिने इतक यश मिळ्वल म्ह्णजे खर तर तिच कौतुकच करायला हव ...............इथे नोन्द घ्या मी तटस्थ आहे.(म्ह्णजे मला ती आवड्ते अस पण नाही आणी आवड्त नाही अस पण नाही)
इतकी लोक पण तिच्यावर खार खाउन
इतकी लोक पण तिच्यावर खार खाउन का आहेत कळ्ल नाही ...........
ऋन्मेष (तुम्ही स्वतः सई
ऋन्मेष (तुम्ही स्वतः सई ताम्हनकर नसाल तर) रागावू नका हो.. शेवटी पसंद अपनी अपनी...
गोष्टीगावाचे, चार शिव्या मला
गोष्टीगावाचे, चार शिव्या मला घाला, राग नाही; पण सईला काही बोलाल तर येणारच !
सुम, पण इतक्या सगळ्या गोश्टी
सुम,
,
पण इतक्या सगळ्या गोश्टी नसताना तिने इतक यश मिळ्वल म्ह्णजे खर तर तिच कौतुकच करायला हव ...............
>>>>>>
धन्यवाद
इतकी लोक पण तिच्यावर खार खाउन का आहेत कळ्ल नाही ...........
>>>>>>>>>
क्रेडीट गोज टू सई; अन्यथा लोक कोणावर तरी टिका करायला आपला बहुमूल्य वेळ का खर्ची करतील.
केवळ मराठीमध्ये आहे आणि
केवळ मराठीमध्ये आहे आणि ग्लॅमरस असल्याचा आव आणते म्हणून अद्याप टिकून आहे.तिच्यापेक्षा अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी लाखपटीने परवडल्या. >>>
ग्लॅमर आणि अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी , पटलं
सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी
सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी (ज्युनियर) आणि अम्रुता खानविलकर या तिन्ही बायका अभिनेत्रि म्हणुन आवडत नाहीत.
>> मला सांगा मायबोलीवर गुप्त
>> मला सांगा मायबोलीवर गुप्त मतदानाने पोल काढायची सोय आहे का?
असल्यास एक पोल काढूया ...
बस्स दोनच पर्याय -
१) मला सई आवडते.
२) मला सई आवडत नाही. <<
ऋन्मेष,
तुम्हीच सुरु करा की 'प्रश्नाचा धागा'.
रसप, ओके, बघतो
रसप, ओके, बघतो
खाली पोल काढला आहे, मत द्या
खाली पोल काढला आहे, मत द्या सईच्या बाजूए प्लीज, येथील फूकटचा गदारोळ थांबेल जरा..
सई मला आवडते / सई मला आवडत नाही. ???
http://www.maayboli.com/node/50843
इतकी लोक पण तिच्यावर खार खाउन
इतकी लोक पण तिच्यावर खार खाउन का आहेत कळ्ल नाही ...........
>>>>>
लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्याला जास्त फळे येतात.
ऋन्मेऽऽष
>> छान आहे लेख....
ऋन्मेऽऽष , तुम्ही लोकान्कडे
ऋन्मेऽऽष ,
तुम्ही लोकान्कडे जास्त लक्श देउ नका. स्वतः काहिहि नसताना दुसर्याना नावे ठेवायचि सवय असते त्याना.....
सध्य्या जवळ्जवळ निम्म्याहून जास्त बर्यापैकी चालणार्या मराठी चित्रपटात तीच मुख्य नटी असते हेच सत्य आहे. जे कीतीही असल्या फालतू कमेन्टस आल्या तरी बदलनारे नाहीये......
धन्यवाद प्राश, काही कॉमेंटस
धन्यवाद प्राश,
काही कॉमेंटस फालतू असतात, काही उगाचच लिहितात, कबूल.
पण काही जणांचे मत प्रामाणिकही असतेच.
आपल्याला कोणाचाही खरा हेतू माहीत नसल्याने प्रत्येकाच्या मताचा आदर करायला हवा.
मी लक्ष देतो, पण विचलित होत नाही. मला याची कल्पना असती तरी मी हा लेख इथे प्रकाशित करण्यास कचरलो नसतो कारण मी माझ्या मताशी आणि आवडीशी प्रामाणिक आहे याची मला कल्पना आहे ना.
काही लोकाना लालू यादव, राखी
काही लोकाना लालू यादव, राखी सावंत, राहूलबाबा, निर्मलबाबा ..... इतकेच काय सोनाक्षी सिन्हा पण आवडते.
'आपली आवड' ... पसंद अपनी अपनी..
काही लोकाना लालू यादव, राखी
काही लोकाना लालू यादव, राखी सावंत, राहूलबाबा, निर्मलबाबा ..... इतकेच काय सोनाक्षी सिन्हा पण आवडते.>>>>>>सोनाक्षी सिन्हा एकवेळ ठीक आहे पण राखी सावंत???????.....डोळ्यात दोष असावा मग
' राखी सावंत' मुळे झळाळी (
' राखी सावंत' मुळे झळाळी ( मराठीत ग्लॅमर ) आलं ... असं तिच्या पक्षाचे म्हणणे आहे.. वाचलं नाहीत का?
पण खरोखर माझ्या नात्यात अशी मंडळी आहेत ज्याना राखी सावंत आवडते... आणि 'राहुलबाबा' शिवाय भारताला दुसरा पर्याय नाही असे म्हणणारे पण नात्यात आहेत..:)
काही लोकाना लालू यादव, राखी
काही लोकाना लालू यादव, राखी सावंत, राहूलबाबा, निर्मलबाबा ..... इतकेच काय सोनाक्षी सिन्हा पण आवडते.
'आपली आवड' ... पसंद अपनी अपनी.. स्मित
>>>>>>>>
लालू यादव, राहूलबाबा - हे राजकारणी आहेत. राजकारणी लोकांचे चाहते कमी तर समर्थक किंवा चमचे जास्त असतात.
निर्मलबाबा - हे साधूसंत असल्याने यांचेही चाहते नसून भक्त असतात.
सोनाक्षी सिन्हा - हिचा तर मायबोलीवरच एक फॅनक्लब आहे.
राखी सावंत - नो कॉमेंटस !
Pages