नाही जरी ‘सई’ तरी ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2014 - 03:26

..

सई आवडत असेल तर खालील पोलवर आपले मत नोंदवायला विसरू नका.

http://www.maayboli.com/node/50843

.................

मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी !

साहजिकच आहे, मी चित्रपटही बघतो मराठी ..
त्यामुळे वयात येतानाची माझी ड्रिमगर्ल एखादी मराठी हिरोईनच असणे यात नवल वाटण्यासारखे काही नव्हते. पण तरीही, तशी ती कोणी नव्हती. कदाचित ड्रिमगर्ल, स्वप्नसुंदरी, वा तरुणांच्या हृदयाची धडकन बनण्यासाठी जे मटेरीअल लागते त्याचा कुठेतरी समकालीन मराठी हिरोईनींमध्ये अभाव होता. तरीही हिंदीतल्या कुठल्याही बिपाशा वा मल्लिकावर माझ्या जिगर का तुकडा ओवाळून टाकण्याऐवजी मी वाट बघणे पसंद केले. आणि एक दिवस लवकरच "सनई चौघडे" वाजले...

तिला मी त्या आधीही पाहिले होते. कदाचित एखाद्या मालिकेत वा एखाद्या जाहीरातीत. तेव्हा आठवत नव्हते. पण "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" हे हिट गाणे या सिनेमातले आहे, केवळ याच उत्सुकतेपोटी बघायला घेतलेल्या चित्रपटाने मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे कारण तीच होती. नॉनग्लॅमरस पेहरावात एक ग्लॅमरस भुमिका साकारायचे शिवधनुष्य त्यात तिला पेलायचे होते. ते तिने कसे काय पेलले याची समीक्षा करणे क्रिटीक्स लोकांचे फावल्या वेळातले उद्योग, पण माझ्यासाठी मात्र त्यानंतर तो सिनेमा कांदेपोहे या गाण्याच्या जोडीने सई ताम्हाणकरचा म्हणूनही लक्षात राहिला. येस्स! सई ताम्हाणकर!!

दुसरी स्मिता पाटील होणे नाही, संयत अभिनयाच्या जोडीला अदाकारीची ती उंची कोणी गाठणे नाही, पण तरीही सईमध्ये त्या दिवशी मला "नमकहलाल" मधील स्मिता पाटील दिसली. अध्येमध्ये डोकाऊन गेली. नमकहलाल हा टोटली अमिताभचा चित्रपट असूनही त्यातील स्मिता पाटील मला भावली होती. इथे तर हा मला सईचाच सिनेमा वाटला.

माझे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते ते! मी तिच्या नावातही गोंधळ घालायचो! कधी सई ताम्हाणकर बोलायचो, तर कधी सई परांजपे! हसेही व्हायचे! याच कारणाने मला ती आवडते यावर कोणी विश्वास ही ठेवायचा नाही! एकाअर्थी बरेच होते ते, पण त्यानंतर ती गायबली ...

माझ्या आठवणीतून नाही पण कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतून .. मधल्या काळात तिचे काय कोणते चित्रपट आले गेले हे बघायला मला गूगाळावेच लागेल, पण तसे मला करायचे नव्हते. माझ्या आठवणीतील सईच्या प्रतिमेला मला धक्का बसू द्यायचा नव्हता. तिला एखाद्या बंडल चित्रपटात दुय्यम दर्जाची भुमिका करताना मला बघायचे नव्हते. तसा एकदा योगही आला होता. तिचा एक "पिकनिक" म्हणून चित्रपट केबल टिव्हीवर लागलेला. पण त्यात माझी नेहमीची सई दिसून राहिली नाही म्हणून मी लागलीच तो चॅनेल बदलल्याचे आठवतेय ..

आमच्या पुढच्या भेटीला जवळपास चार वर्षे जावी लागली. मधल्या काळात "राडा रॉक्स" चित्रपटानिमित्त तिच्याबाबत वादग्रस्त गॉसिपिंग झाली, पण माझ्या मनाच्या एका निवांत कोपर्‍यात दडलेले सईचे स्थान काही त्याने हलले नाही.

आणि मग एक दिवस जिथे तिथे चोहीकडे सईचे फोटो झळकायला लागले...

येस्स! तेच ते फेमस लाल बिकीनीतले फोटो! चित्रपट - नो एंट्री पुढे धोका आहे!

त्या लालभडक बिकिनीमध्येही ती कुठेही वल्गर वाटत नव्हती आणि म्हणूनच चित्रपटाचे प्रमोशन करायला ते फोटो फिरत होते. माझ्यामते हे जे काही कसब आहे ते हिंदीतील कतरिना कैफ या नटीलाच जमून जावे. पण त्या चित्रपटातील तिची भुमिकाही कदाचित कतरीनासारखीच शोभेची बाहुली म्हणून असावी. कारण त्या चित्रपटाचे पुढे काय झाले ते मला समजले नाही. सईसाठी म्हणून तो बघायचा होता, प्रदर्शित व्हायच्या आधीच मित्रांनाही त्या द्रुष्टीने पटवून झाले होते. पण काही चित्रपट पहिल्या प्रयोगालाच किंवा त्या आधीच पडतात तसेच काहीसे त्याचे झाले. एक टुक्कार(?) चित्रपट न बघितल्याची खंत अशी कधी राहिली नाही, पण आठवणीत राहिला तो तिचा लाल बिकिनीतला फोटो, जो अगदी आजही "ग्लॅमरस मराठी हिरोईनचा मापदंड" म्हणून व्हॉटसअ‍ॅप सारख्या सोशल साईटसवर फिरत असतो.

अजूनही सई हि माझी सर्वात आवडती नटी होती, पण तरीही तिला "माझी ड्रिमगर्ल" हे पद देण्यास काहीतरी कमी पडतेय असे मला वाटत होते. आणि मग एके दिवशी रिक्षा सिग्नलला थांबलेली असताना एका चित्रपटाच्या पोस्टरवर नजर पडली. आधीही त्या चित्रपटाबद्दल मित्रांकडून ऐकले होते. हा कट्ट्यावरच्या यारीदोस्तीचा आणि त्यांच्यातील दुनियादारीचा चित्रपट आहे म्हणत जायचा प्लानही ठरला होता. सई त्यात आहे हे सुद्धा ऐकून माहीत होते पण तरीही हुरहुर अशी लागली नव्हती, जी तो पोस्टर बघून लागली. दुनियादारीच्या त्या पोस्टरवर मला सई नाही तर बॉबीमधील डिंपल कपाडिया दिसत होती. येस्स! हिच तर आहे माझी ड्रिमगर्ल! माझ्या ईतर कोणत्याही मित्राने तिच्यावर आपला हक्क सांगायच्या आधीच मी माझा रुमाल तिथे टाकला होता.

पहिल्या दिवसाचा पहिलाच शो मला बघायचा होता, पण सर्व मित्रांना जमवण्याच्या दुनियादारीत तिसर्‍या आठवड्यातच तो योग आला. मधले दिवस कसे गेले याची तुम्ही कल्पनाच करू शकता. पण मराठी चित्रपट तिसर्‍या आठवड्यात म्हणजे थिएटर पार रिकामे असेल आणि "मै, सई और दुनियादारी" म्हणत निवांत चित्रपटाचा आनंद घेता येईल या माझ्या कल्पनाविलासाला तडा गेला जेव्हा तिकिटबारीलाच हाऊसफुल्लच्या बोर्डाला मिरवताना पाहिले. थिएटरच्या बाहेर सईचा आणि चित्रपटातील इतर कलाकारांचा भलामोठा किंग साईज पोस्टर लावला होता. त्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती ती पाहता ओठांवर स्माईल, मनात इर्ष्या आणि डोक्यात राग एकाच वेळी दाटून येणे अनुभवत होतो. भावना संमिश्र होत्या खर्‍या पण आपापल्या जागा राखून होत्या.

अगोदरचा शो संपताच मला सर्वात पहिले आत शिरायचे होते कारण सईची एंट्री मला चुकवायची नव्हती. पण पुनश्च एका लेटलतीफ मित्रासाठी दुनियादारी करत थांबावे लागल्याने तो अनर्थ घडलाच. आत गेलो तर अंकुश चौधरीच्या एंट्रीचा सीन चालू झाला होता आणि पब्लिक टाळ्या मारत होते. मी सुद्धा त्यात थोडाफार सामील झालो, पण तरीही मला माझी खरी उर्जा राखून ठेवायची होती ती सईच्या एंट्रीला एक कचकचून शिट्टी वाजवायला, पण.......

पण ती आली, तिला पाहिले आणि पाहतच राहिलो... तोंड उघडले ते उघडेच राहिले.. शिट्टी राहिली बाजूला, श्वासापुरती हवा आत शिरली अन श्वास रोखूनच राहिला!
टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. यापेक्षा समर्पक शब्द नसावेत.. नक्कीच गीतकाराला सईवर चित्रित झालेले ते द्रुष्य बघूनच हे शब्द सुचले असावेत हे मी खात्रीने सांगतो!

अगदी पोस्टरवर पाहिलेले तशीच ती माझ्यासमोर सारे दृष्टीपटल व्यापून टाकणार्‍या कॅनव्हासवर पसरली होती! सिंपल मे डिंपल! त्यानंतर पुढचा पुर्ण सिनेमा सईसाठीच बघितला गेला. अगदी स्वताला स्वप्नीलच्या जागी ठेऊन बघितला गेला. व्हिल्लन साई झालेल्या जितेंद्र जोशीबरोबर तिला बघताना अक्षरशा राग येत होता. जेव्हा ती श्रेयसला, "माझा बच्चू आहेस तू" असे म्हणाली तेव्हा एक मोरपीस माझ्या गालांवरून फिरले होते. शेवटी स्वप्निल तिला पुळचटासारखा सोडून जात होता तेव्हा त्याचाही एवढा राग आला होता.. असे वाटले उठून त्याला सांगावे अबे जा ना, भाड मध्ये गेली तुझी दुनियादारी, आता भांड त्या दुनियेशी आणि मिळव "आपल्या सईला" परत....

स्वताला स्वप्निलच्या जागी बघणे मला सोपे गेले कारण तसा तो देखील माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. शेवटी तो मरतो तेव्हा मला वाईट वाटले नाही. का माहीत नाही पण तेव्हा मी त्या श्रेयसच्या भुमिकेतून बाहेर आलो आणि ऋन्मेष बनून सईला धीर देऊ लागलो, काही हरकत नाही सई मी आहे अजून... त्या शेवटच्या म्हातारपणाच्या द्रुष्यात सुद्धा सई इतकी तजेलेदार आणि सुंदर दिसत होती की लेडी देवानंदच जणू.. किंवा रेखानंतर खूबसुरत तीच!

चित्रपट संपवून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात नुसती टिकटिक वाजत होती.. पाऊस पडत नव्हता तरी अंग ओलेचिंब झाल्यासारखे वाटत होते.. राहून राहून ओठांवर याच ओळी येत होत्या.... नाही जरी "सई" तरी.. भिजले अंग, पाण्याने .. सोचू तुम्हे पलभर भी, बरसे सावन जोमाने .. माझी अवस्था माझ्या मित्रांनी नेमकी हेरली, आणि त्याच दिवशी या ऋन्मेषला एक नवीन नाव पडले... ए रिशी पकूऽऽर ..!!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

sai 1.jpg

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

सई !
स ई .. दोन अक्षरे..

आणि तिच्याबद्दल आता माझे दोन शब्द!

सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स!

सईसारखी हिरोईन मराठी चित्रपटसृष्टीत या आधी झाली नसल्यामुळे तिची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींशी करायचा मोह आवरत नाही. मग ते तिचे सौंदर्य असो वा अभिनय. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीकडे नजर टाकल्यास मला ती बरेचदा कंगना राणावत सारखी वाटते. कंगना हिंदीमध्ये ज्या पठडीतले सिनेमे करते ते मराठीत सईचे देखील हक्काचे क्षेत्र आहे, बनू शकते. अर्थात गरज आहे तसे धाडसी सिनेमे मराठीत बनण्याची. पण तरीही मला वाटते सईमध्ये मराठी चित्रपटसृष्टीची प्रियांका चोप्रा बनण्याची क्षमता आहे. तिच्याप्रमाणेच नायिकाप्रधान सिनेमा एकहाती खेचण्याची क्षमता आहे. मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही ती ज्या फ्रेममध्ये असते तेव्हा त्या चौकटीच्या कडेला उभे राहूनही बरेचदा ती प्रेक्षकांचा फोकस स्वतावर खेचून घेते. हो, तिच्यावर थोडीफार गॉसिपिंग होते, पण ते करावे अशी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तीच आहे आणि हेच तिला मराठीतील लेडी शाहरूख खान बनवून जाणार आहे. यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर, बट यू कॅन नॉट इग्नोर हर .. पण इथेही तेच.. कंगना ते प्रियांका, व्हाया कतरीना, हा प्रवास करण्यासाठी तिला मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांची देखील साथ मिळायला हवी आणि इन्शाल्लाह एक ना एक दिवस ते नक्की होईल, बोलो आमीन !

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष उर्फ रिशी पकूऽऽर !

(लेख क्रमांक १)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवड आपली आपली, दुसर काय ? > Lol

दिल आगया बोकी पे...तो परी भी..........

मला तिचा चेहरा बोक्या सारखा का वाटतो कुणास ठावूक पण मनातल्या मनात तिच्या फोटो ला मी नेहेमी बोक्या सारख्या मिशा लावून बघते आणि पर्फेक्ट सूट होतात....

ईव्हन पुणे५२ च्या प्रिमीअर ला तिला बघितले तेव्हाही प्रत्यक्षात तशीच वाटली,

वरच्या फोटोला पण मिश्या लावून बघितल्या Happy

ऋन्मेऽऽष, तुम्ही अभिषेक ला भेटला आहात का कधी ? तो पण तुमच्या सारखाच दुनियादारी फॅन आहे , आणि लिखाण ही तुमच्या सारखेच.

ऋन्मेऽऽष, ही घ्या लिंक http://www.maayboli.com/node/44208

ऋन्मेऽऽष, तुम्ही अभिषेक ला भेटला आहात का कधी ? तो पण तुमच्या सारखाच दुनियादारी फॅन आहे , आणि लिखाण ही तुमच्या सारखेच. >>>>>> सामी , यू सेड इट ;). मला पण कालच हा साक्षात्कार झाला..रादर, करून दिला गेला. Happy

रीया, तुला का मारणार पण ? ती बोकी तर मला आणि अनिश्का ला वाटते.

तिच्या ट्विटर वर ही लिन्क दिसते आहे, म्हणजे प्रतिसाद पण तिने वाचले असतीलच. Happy

तिच्या ट्विटर वर ही लिन्क दिसते आहे, म्हणजे प्रतिसाद पण तिने वाचले असतीलच.
>>>>>>>>>>>
सेलिब्रेटींना असल्या प्रतिसादांचीही सवय असते, आणि सई तर स्टार आहे. ती त्यामागच्या (जेलसी) भावना लक्षात घेऊन इग्नोर करेल हे नक्की. मी सुद्धा तेच करतोय Happy

एकदा अश्याच एका मित्राकडून एकले की, सई खूप भारी दिसते. त्या दिवसापासून जो काही धक्का बसलाय त्यातून अजून सावरले नाहीय आणि त्यात हा एक धक्का.... कसे होणार? Proud

मला ती नववारीत बरी वाटते(दिसते नाही म्हटलेय)

दिसण्याबाबतीत, मुक्ता बर्वे आणि सई ... म्हणजे एक थोराड काकू तर एक ठमाकाकू.

मुक्ताचा चेहरा पाहिला की, ये बाजूला बस, तुला शिकवते ... कसं असतं ना... म्हणत सुरु करेल वाटतं.

तर सईचा चेहरा म्हणजे, ये कच्चा गिळेन तुला.... एकदम मांजर. सुम्दर वगैर काही नाही. रुंद गाल. आतमध्ये डोळे....
पण आपली आपली आवड... तेव्हा असु दे. असु दे. Proud

मुक्ता बर्वेचा 'रंग नवा' हा कवितांचा कार्यक्रम नुकताच पाहिला. अगदी दुसर्‍या रांगेतून ! भलतीच गोड दिसत होती.... आणि हुशार तर ती आहेच. तिच्या कविताही खूप छान होत्या.

दुसरी गोष्ट म्हणजे, एक आवडती मैत्रिण मुक्ता बर्वेसारखी दिसते, म्हणूनही मला मुक्ता बर्वे आवडते !

मलाही आवडते पण तिचा मायनस पॉईण्ट एकच आहे की ती कुठल्याही कपड्यांत मावत नाही..
>>>>>>>
हे बरेच जण ओढून ताणून बोलत आहेत .. त्यांना एवढेच सांगू इछितो याला जाडेपणा नाही तर हेल्दी फिगर असे म्हणतात ..

वर लेखातही मी विद्या बालन / सोनाक्षी सिन्हा यांची उदाहरणे दिली आहेत .. वाटल्यास राणी मुखर्जीला देखील या गटात घेऊ शकता .. अगदी जुन्या काळातही हेमा मालिनी, वैजयंती माला अश्याच हिरोईनी होत्या .. यांना सुंदरच नाही तर "ड्रिमगर्ल" सुद्धा म्हटले जायचेच.. पण असो च!

ऋन्मेष.:स्मित: तो फोटो आकर्षक आहे, कुरुप वा सुन्दर नाही.

सुन्दर नट्या- मधुबाला, बीना रॉय, साधना, नलिनी जयवन्त, सायरा बानो, सुरैय्या, वैजयन्तीमाला, पद्मिनी, वहिदा रहेमान, हेमामालिनी, माला सिन्हा,जयाप्रदा,, माधुरी दिक्षीत, ऐश्वर्या रॉय, सोनाली बेन्द्रे ( तेव्हाची )दिपीका पदुकोण (अजून कोणी उ. भारतीय, महाराष्ट्रीयन वा दाक्षिणात्य सुन्दर्‍या)

आकर्षक नट्या- नन्दा, बबिता, रेखा, बी. सरोजादेवी, मीना कुमारी, नूतन, तनुजा, रवीना टन्डन, काजोल, सोनाली कुलकर्णी ( ज्युनीअर), उर्मिला मातोन्डकर

चला यादीत भर टाका बाकीच्यानी जमल्यास.

सुन्दर नट्या
आकर्षक नट्या
मादक नट्या

अजुनही बरेच प्रकार असतात हो ना ? Wink

आम्ही (अ‍ॅडीशन) केलं तुमच कांय Proud

आपली आपली आवड...जावूदे झाल.
पण तुम्ही जर हा लेख लिहला नसता तर मला खरच कधी कळले नसते कि सई ला पण पंखे असू शकतात.

प्लीज.!!!

इथे मधुबालेला आणूच नका... तिला पार वरती राहू द्या.
इतरांच्यात खुशाल नंबर लावा.

सई ताम्हणकरच्या वर बहुतेक फक्त मल्लिका शेरावतच राहील.

मला ती नववारीत बरी वाटते>>> नववारीचे माहिती नाही पण ती नववी-दहावीत असताना सगळ्या विश्रामबाग/सांगली/मिरजेत फेमस होती. तेव्हा तिथे ती फारच सुंदर कॅटेगरीत होती.

मला ती नववारीत बरी वाटते>>> नववारीचे माहिती नाही पण ती नववी-दहावीत असताना सगळ्या विश्रामबाग/सांगली/मिरजेत फेमस होती. तेव्हा तिथे ती फारच सुंदर कॅटेगरीत होती.

केदारदादा यू टू??????????????????????
ईईईईईईईईईईईईईईईई काय झालं तुझ्या चॉईसला Uhoh

मला ती नववारीत बरी वाटते>>> नववारीचे माहिती नाही पण ती नववी-दहावीत असताना सगळ्या विश्रामबाग/सांगली/मिरजेत फेमस होती. तेव्हा तिथे ती फारच सुंदर कॅटेगरीत होती>>>>> सुंदर नसेल हो बोल्ड म्हणून फेमस असेल

अरे जाऊद्या ना त्याने त्याची आवड लिहीलेय फक्त. प्रत्येकाचा चॉईस असतो राव... कोणाला दे दणादण साऊथका सुपरपंच आवडतो तर कोणाला मिष्टी दोही आर्ट फिल्म्स (ही अगदी ढोबळ तुलना आहे बरं मसालापट आणि संथ आर्टपटांतील)

मला स्वतःला सई आवडत वगैरे नाही. कारणे द्या असं म्हटलंय लेखकांनी... जसं का आवडते याची कारणे पटणारी नाहीत तसंच का आवडत नाही याचीही पटणार नाही सो जाऊच दे. पोस्टकार्ड या मूव्हीत साधी साडी व मेक अप साधा असल्याने सुखद धक्का बसलेला इतकंच!

ती नववी-दहावीत असताना सगळ्या विश्रामबाग/सांगली/मिरजेत फेमस होती. >> हो याच्या सुरस कथा तिची बॅचमेट असलेल्या सांगलीच्या रूमीकडून ऐकल्या होत्या. तेव्हा मुंबईची नुकती तोंडओळख होत असल्याने त्या कथा सुरस वाटलेल्या. Happy

रच्याकने : माझा आय डी फारच जास्त वेळा वापरला गेला आहे लेखात आणि प्रतिक्रियांत... कोणी मला शोधायला यायचं नी सई मिळायची Proud

Pages