नाही जरी ‘सई’ तरी ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2014 - 03:26

..

सई आवडत असेल तर खालील पोलवर आपले मत नोंदवायला विसरू नका.

http://www.maayboli.com/node/50843

.................

मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी !

साहजिकच आहे, मी चित्रपटही बघतो मराठी ..
त्यामुळे वयात येतानाची माझी ड्रिमगर्ल एखादी मराठी हिरोईनच असणे यात नवल वाटण्यासारखे काही नव्हते. पण तरीही, तशी ती कोणी नव्हती. कदाचित ड्रिमगर्ल, स्वप्नसुंदरी, वा तरुणांच्या हृदयाची धडकन बनण्यासाठी जे मटेरीअल लागते त्याचा कुठेतरी समकालीन मराठी हिरोईनींमध्ये अभाव होता. तरीही हिंदीतल्या कुठल्याही बिपाशा वा मल्लिकावर माझ्या जिगर का तुकडा ओवाळून टाकण्याऐवजी मी वाट बघणे पसंद केले. आणि एक दिवस लवकरच "सनई चौघडे" वाजले...

तिला मी त्या आधीही पाहिले होते. कदाचित एखाद्या मालिकेत वा एखाद्या जाहीरातीत. तेव्हा आठवत नव्हते. पण "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" हे हिट गाणे या सिनेमातले आहे, केवळ याच उत्सुकतेपोटी बघायला घेतलेल्या चित्रपटाने मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे कारण तीच होती. नॉनग्लॅमरस पेहरावात एक ग्लॅमरस भुमिका साकारायचे शिवधनुष्य त्यात तिला पेलायचे होते. ते तिने कसे काय पेलले याची समीक्षा करणे क्रिटीक्स लोकांचे फावल्या वेळातले उद्योग, पण माझ्यासाठी मात्र त्यानंतर तो सिनेमा कांदेपोहे या गाण्याच्या जोडीने सई ताम्हाणकरचा म्हणूनही लक्षात राहिला. येस्स! सई ताम्हाणकर!!

दुसरी स्मिता पाटील होणे नाही, संयत अभिनयाच्या जोडीला अदाकारीची ती उंची कोणी गाठणे नाही, पण तरीही सईमध्ये त्या दिवशी मला "नमकहलाल" मधील स्मिता पाटील दिसली. अध्येमध्ये डोकाऊन गेली. नमकहलाल हा टोटली अमिताभचा चित्रपट असूनही त्यातील स्मिता पाटील मला भावली होती. इथे तर हा मला सईचाच सिनेमा वाटला.

माझे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते ते! मी तिच्या नावातही गोंधळ घालायचो! कधी सई ताम्हाणकर बोलायचो, तर कधी सई परांजपे! हसेही व्हायचे! याच कारणाने मला ती आवडते यावर कोणी विश्वास ही ठेवायचा नाही! एकाअर्थी बरेच होते ते, पण त्यानंतर ती गायबली ...

माझ्या आठवणीतून नाही पण कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतून .. मधल्या काळात तिचे काय कोणते चित्रपट आले गेले हे बघायला मला गूगाळावेच लागेल, पण तसे मला करायचे नव्हते. माझ्या आठवणीतील सईच्या प्रतिमेला मला धक्का बसू द्यायचा नव्हता. तिला एखाद्या बंडल चित्रपटात दुय्यम दर्जाची भुमिका करताना मला बघायचे नव्हते. तसा एकदा योगही आला होता. तिचा एक "पिकनिक" म्हणून चित्रपट केबल टिव्हीवर लागलेला. पण त्यात माझी नेहमीची सई दिसून राहिली नाही म्हणून मी लागलीच तो चॅनेल बदलल्याचे आठवतेय ..

आमच्या पुढच्या भेटीला जवळपास चार वर्षे जावी लागली. मधल्या काळात "राडा रॉक्स" चित्रपटानिमित्त तिच्याबाबत वादग्रस्त गॉसिपिंग झाली, पण माझ्या मनाच्या एका निवांत कोपर्‍यात दडलेले सईचे स्थान काही त्याने हलले नाही.

आणि मग एक दिवस जिथे तिथे चोहीकडे सईचे फोटो झळकायला लागले...

येस्स! तेच ते फेमस लाल बिकीनीतले फोटो! चित्रपट - नो एंट्री पुढे धोका आहे!

त्या लालभडक बिकिनीमध्येही ती कुठेही वल्गर वाटत नव्हती आणि म्हणूनच चित्रपटाचे प्रमोशन करायला ते फोटो फिरत होते. माझ्यामते हे जे काही कसब आहे ते हिंदीतील कतरिना कैफ या नटीलाच जमून जावे. पण त्या चित्रपटातील तिची भुमिकाही कदाचित कतरीनासारखीच शोभेची बाहुली म्हणून असावी. कारण त्या चित्रपटाचे पुढे काय झाले ते मला समजले नाही. सईसाठी म्हणून तो बघायचा होता, प्रदर्शित व्हायच्या आधीच मित्रांनाही त्या द्रुष्टीने पटवून झाले होते. पण काही चित्रपट पहिल्या प्रयोगालाच किंवा त्या आधीच पडतात तसेच काहीसे त्याचे झाले. एक टुक्कार(?) चित्रपट न बघितल्याची खंत अशी कधी राहिली नाही, पण आठवणीत राहिला तो तिचा लाल बिकिनीतला फोटो, जो अगदी आजही "ग्लॅमरस मराठी हिरोईनचा मापदंड" म्हणून व्हॉटसअ‍ॅप सारख्या सोशल साईटसवर फिरत असतो.

अजूनही सई हि माझी सर्वात आवडती नटी होती, पण तरीही तिला "माझी ड्रिमगर्ल" हे पद देण्यास काहीतरी कमी पडतेय असे मला वाटत होते. आणि मग एके दिवशी रिक्षा सिग्नलला थांबलेली असताना एका चित्रपटाच्या पोस्टरवर नजर पडली. आधीही त्या चित्रपटाबद्दल मित्रांकडून ऐकले होते. हा कट्ट्यावरच्या यारीदोस्तीचा आणि त्यांच्यातील दुनियादारीचा चित्रपट आहे म्हणत जायचा प्लानही ठरला होता. सई त्यात आहे हे सुद्धा ऐकून माहीत होते पण तरीही हुरहुर अशी लागली नव्हती, जी तो पोस्टर बघून लागली. दुनियादारीच्या त्या पोस्टरवर मला सई नाही तर बॉबीमधील डिंपल कपाडिया दिसत होती. येस्स! हिच तर आहे माझी ड्रिमगर्ल! माझ्या ईतर कोणत्याही मित्राने तिच्यावर आपला हक्क सांगायच्या आधीच मी माझा रुमाल तिथे टाकला होता.

पहिल्या दिवसाचा पहिलाच शो मला बघायचा होता, पण सर्व मित्रांना जमवण्याच्या दुनियादारीत तिसर्‍या आठवड्यातच तो योग आला. मधले दिवस कसे गेले याची तुम्ही कल्पनाच करू शकता. पण मराठी चित्रपट तिसर्‍या आठवड्यात म्हणजे थिएटर पार रिकामे असेल आणि "मै, सई और दुनियादारी" म्हणत निवांत चित्रपटाचा आनंद घेता येईल या माझ्या कल्पनाविलासाला तडा गेला जेव्हा तिकिटबारीलाच हाऊसफुल्लच्या बोर्डाला मिरवताना पाहिले. थिएटरच्या बाहेर सईचा आणि चित्रपटातील इतर कलाकारांचा भलामोठा किंग साईज पोस्टर लावला होता. त्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती ती पाहता ओठांवर स्माईल, मनात इर्ष्या आणि डोक्यात राग एकाच वेळी दाटून येणे अनुभवत होतो. भावना संमिश्र होत्या खर्‍या पण आपापल्या जागा राखून होत्या.

अगोदरचा शो संपताच मला सर्वात पहिले आत शिरायचे होते कारण सईची एंट्री मला चुकवायची नव्हती. पण पुनश्च एका लेटलतीफ मित्रासाठी दुनियादारी करत थांबावे लागल्याने तो अनर्थ घडलाच. आत गेलो तर अंकुश चौधरीच्या एंट्रीचा सीन चालू झाला होता आणि पब्लिक टाळ्या मारत होते. मी सुद्धा त्यात थोडाफार सामील झालो, पण तरीही मला माझी खरी उर्जा राखून ठेवायची होती ती सईच्या एंट्रीला एक कचकचून शिट्टी वाजवायला, पण.......

पण ती आली, तिला पाहिले आणि पाहतच राहिलो... तोंड उघडले ते उघडेच राहिले.. शिट्टी राहिली बाजूला, श्वासापुरती हवा आत शिरली अन श्वास रोखूनच राहिला!
टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. यापेक्षा समर्पक शब्द नसावेत.. नक्कीच गीतकाराला सईवर चित्रित झालेले ते द्रुष्य बघूनच हे शब्द सुचले असावेत हे मी खात्रीने सांगतो!

अगदी पोस्टरवर पाहिलेले तशीच ती माझ्यासमोर सारे दृष्टीपटल व्यापून टाकणार्‍या कॅनव्हासवर पसरली होती! सिंपल मे डिंपल! त्यानंतर पुढचा पुर्ण सिनेमा सईसाठीच बघितला गेला. अगदी स्वताला स्वप्नीलच्या जागी ठेऊन बघितला गेला. व्हिल्लन साई झालेल्या जितेंद्र जोशीबरोबर तिला बघताना अक्षरशा राग येत होता. जेव्हा ती श्रेयसला, "माझा बच्चू आहेस तू" असे म्हणाली तेव्हा एक मोरपीस माझ्या गालांवरून फिरले होते. शेवटी स्वप्निल तिला पुळचटासारखा सोडून जात होता तेव्हा त्याचाही एवढा राग आला होता.. असे वाटले उठून त्याला सांगावे अबे जा ना, भाड मध्ये गेली तुझी दुनियादारी, आता भांड त्या दुनियेशी आणि मिळव "आपल्या सईला" परत....

स्वताला स्वप्निलच्या जागी बघणे मला सोपे गेले कारण तसा तो देखील माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. शेवटी तो मरतो तेव्हा मला वाईट वाटले नाही. का माहीत नाही पण तेव्हा मी त्या श्रेयसच्या भुमिकेतून बाहेर आलो आणि ऋन्मेष बनून सईला धीर देऊ लागलो, काही हरकत नाही सई मी आहे अजून... त्या शेवटच्या म्हातारपणाच्या द्रुष्यात सुद्धा सई इतकी तजेलेदार आणि सुंदर दिसत होती की लेडी देवानंदच जणू.. किंवा रेखानंतर खूबसुरत तीच!

चित्रपट संपवून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात नुसती टिकटिक वाजत होती.. पाऊस पडत नव्हता तरी अंग ओलेचिंब झाल्यासारखे वाटत होते.. राहून राहून ओठांवर याच ओळी येत होत्या.... नाही जरी "सई" तरी.. भिजले अंग, पाण्याने .. सोचू तुम्हे पलभर भी, बरसे सावन जोमाने .. माझी अवस्था माझ्या मित्रांनी नेमकी हेरली, आणि त्याच दिवशी या ऋन्मेषला एक नवीन नाव पडले... ए रिशी पकूऽऽर ..!!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

sai 1.jpg

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

सई !
स ई .. दोन अक्षरे..

आणि तिच्याबद्दल आता माझे दोन शब्द!

सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्‍यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्‍या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्‍यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स!

सईसारखी हिरोईन मराठी चित्रपटसृष्टीत या आधी झाली नसल्यामुळे तिची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींशी करायचा मोह आवरत नाही. मग ते तिचे सौंदर्य असो वा अभिनय. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीकडे नजर टाकल्यास मला ती बरेचदा कंगना राणावत सारखी वाटते. कंगना हिंदीमध्ये ज्या पठडीतले सिनेमे करते ते मराठीत सईचे देखील हक्काचे क्षेत्र आहे, बनू शकते. अर्थात गरज आहे तसे धाडसी सिनेमे मराठीत बनण्याची. पण तरीही मला वाटते सईमध्ये मराठी चित्रपटसृष्टीची प्रियांका चोप्रा बनण्याची क्षमता आहे. तिच्याप्रमाणेच नायिकाप्रधान सिनेमा एकहाती खेचण्याची क्षमता आहे. मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही ती ज्या फ्रेममध्ये असते तेव्हा त्या चौकटीच्या कडेला उभे राहूनही बरेचदा ती प्रेक्षकांचा फोकस स्वतावर खेचून घेते. हो, तिच्यावर थोडीफार गॉसिपिंग होते, पण ते करावे अशी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तीच आहे आणि हेच तिला मराठीतील लेडी शाहरूख खान बनवून जाणार आहे. यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर, बट यू कॅन नॉट इग्नोर हर .. पण इथेही तेच.. कंगना ते प्रियांका, व्हाया कतरीना, हा प्रवास करण्यासाठी तिला मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांची देखील साथ मिळायला हवी आणि इन्शाल्लाह एक ना एक दिवस ते नक्की होईल, बोलो आमीन !

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष उर्फ रिशी पकूऽऽर !

(लेख क्रमांक १)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जप बाबा. पण भाबडेपणा झापड बनून तुला वेड्यात तर काढत नाहीये ना याचंही भान ठेव. ऑनेस्टली चांगल्या मनाने सांगतेय. बाकी सई चांगली असली,वाईट असली, पिक्चरमधे असली/नसली तरी मला काहीही फरक पडत नाही. सो.. माझ्याकडून या टॉपिकला पूर्णविराम.

hunterrrrrr मधले ते 'देतो तुला मी गुलाबी साडी ग'- आनंद शिंदे आणि वैशाली माडे, हे गाणे मायबोली नामक मराठी च्यानेल वर दाखवले जाते. बघून डोळे अगदी पानावत्तात.

हा वरचा प्रतिसाद निसटला होता ..
मी स्वत: पाहिला नसल्याने टिप्पणी करू शकत नाही तिच्या अभिनयाबद्दल, मात्र
हंटर हा चित्रपट हिट ठरला आहे!

चला हवा येऊद्या मध्येही सई या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती.

एक मराठी अभिनेत्री एका हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी मराठी कार्यक्रमात येते हि नक्कीच अभिमानाची बाब आहे.

राहिला प्रश्न बोल्ड द्रुश्यांचा,
तर ती कोणाला चुकलीत..
माधुरी.. ममता.. उर्मिला.. स्मिता.. मुग्धा... सर्वांनीच दिलीत!

सई ताम्हणकर या गेंडीला फेस व्हॅल्यू आहे?

एक हिम्मतवाला चालला की घागरीदेखील सुंदर दिसायला लागतात या कणेकरांच्या वाक्याची आठवण झाली.

एक जुनी बातमी -

कोथरूडच्या सोसायटीत कलाकारांचा 'राडा'
http://www.esakal.com/esakal/20110418/4840335979498545607.htm

पुणे - गृहनिर्माण सोसायटीत मद्यप्राशन करून "राडा' केल्या प्रकरणी "राडा रॉक्‍स' या मराठी चित्रपटाशी संबंधित आठ जणांना शनिवारी पहाटे कोथरूड ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी चित्रपटातील अभिनेत्री सई ताम्हणकरसह चार महिला हजर होत्या, असे पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी सांगितले. रविवारी न्यायालयाने आठ जणांची दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली.

[संपूर्ण बातमी वरच्या दुव्यावर क्लिक केल्यास वाचता येईल]

जुनी बातमी देण्याचे प्रयोजन नाही समजले..
चित्रपटाशी संबंधित आठ जण होते, पण आजही त्या बातमीला प्रसिद्धी सईच्याच नावाने दिली जाते.
याचा अर्थ उघड आहे, तिचे नाव विकले जाते, ती मराठी चित्रपटसृष्टीची लेडी शाहरूख आहे..

<<<< ती मराठी चित्रपटसृष्टीची लेडी शाहरूख आहे.. >>>>>

शाहरुख खान सई च्या आवाजात चुकीचे मराठी बोलतोय असे चित्र डोळ्यासमोर आले. Lol

मी काय म्हणतो ऋन्मेष,

तुम्ही एकच महाधागा काढा ना? त्याच्यावर कोणताही विषय चर्चेला घ्यायचा, अशी मुभा ठेवा. नाहीतरी कोणताही धागा काढला तरी त्यावर सई, शाहरुख, गफ्रे, एम एन सी, व्यभिचार, समोरच्या काकू हे विषय येतातच.

शाहरुखला हिंदी चित्रपटसृष्टीचा पुरुष सई ताम्हणकर म्हणायला काय हरकत आहे? Wink

१९७

१९८

१९९

२००

Proud

काय गंमत आहे,
जर शाहरूखचे कौतुक केले असते तर दुसर्‍याच मिनिटाला त्याचे ५० टिकाकार उभे राहिले असते.
पण तेच सईचे नाव शाहरूखबरोबर घेत तिचा गौरव केला तर लोकांना आता शाहरूख फार मोठा सुपर्रस्टार वाटू लागला आणि कुठे सई अन कुठे शाहरूख असा सूर उमटू लागला.

अवांतर - बेफि आपण विसरत आहात, हा धागा सईचाच आहे, तिचा विषय इतर कुठल्या धाग्यावर विषयबाह्य म्हणून आणला नाहीये Happy

>>>अवांतर - बेफि आपण विसरत आहात, हा धागा सईचाच आहे, तिचा विषय इतर कुठल्या धाग्यावर विषयबाह्य म्हणून आणला नाहीये<<<

तुम्ही विषयबाह्य संबंधही ठेवत नाही का?

अप्पाकाका, जिथे सलमानच्या धाग्याने रडतखडत शतक गाठले तिथे सईने सहज द्विशतक गाठलेय, आपल्या आकडे मोजण्याच्या चार पोस्टी वगळताही, तर तिचे श्रेय हिरावून घेऊ नका Happy

Pages