..
सई आवडत असेल तर खालील पोलवर आपले मत नोंदवायला विसरू नका.
http://www.maayboli.com/node/50843
.................
मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी !
साहजिकच आहे, मी चित्रपटही बघतो मराठी ..
त्यामुळे वयात येतानाची माझी ड्रिमगर्ल एखादी मराठी हिरोईनच असणे यात नवल वाटण्यासारखे काही नव्हते. पण तरीही, तशी ती कोणी नव्हती. कदाचित ड्रिमगर्ल, स्वप्नसुंदरी, वा तरुणांच्या हृदयाची धडकन बनण्यासाठी जे मटेरीअल लागते त्याचा कुठेतरी समकालीन मराठी हिरोईनींमध्ये अभाव होता. तरीही हिंदीतल्या कुठल्याही बिपाशा वा मल्लिकावर माझ्या जिगर का तुकडा ओवाळून टाकण्याऐवजी मी वाट बघणे पसंद केले. आणि एक दिवस लवकरच "सनई चौघडे" वाजले...
तिला मी त्या आधीही पाहिले होते. कदाचित एखाद्या मालिकेत वा एखाद्या जाहीरातीत. तेव्हा आठवत नव्हते. पण "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" हे हिट गाणे या सिनेमातले आहे, केवळ याच उत्सुकतेपोटी बघायला घेतलेल्या चित्रपटाने मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे कारण तीच होती. नॉनग्लॅमरस पेहरावात एक ग्लॅमरस भुमिका साकारायचे शिवधनुष्य त्यात तिला पेलायचे होते. ते तिने कसे काय पेलले याची समीक्षा करणे क्रिटीक्स लोकांचे फावल्या वेळातले उद्योग, पण माझ्यासाठी मात्र त्यानंतर तो सिनेमा कांदेपोहे या गाण्याच्या जोडीने सई ताम्हाणकरचा म्हणूनही लक्षात राहिला. येस्स! सई ताम्हाणकर!!
दुसरी स्मिता पाटील होणे नाही, संयत अभिनयाच्या जोडीला अदाकारीची ती उंची कोणी गाठणे नाही, पण तरीही सईमध्ये त्या दिवशी मला "नमकहलाल" मधील स्मिता पाटील दिसली. अध्येमध्ये डोकाऊन गेली. नमकहलाल हा टोटली अमिताभचा चित्रपट असूनही त्यातील स्मिता पाटील मला भावली होती. इथे तर हा मला सईचाच सिनेमा वाटला.
माझे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते ते! मी तिच्या नावातही गोंधळ घालायचो! कधी सई ताम्हाणकर बोलायचो, तर कधी सई परांजपे! हसेही व्हायचे! याच कारणाने मला ती आवडते यावर कोणी विश्वास ही ठेवायचा नाही! एकाअर्थी बरेच होते ते, पण त्यानंतर ती गायबली ...
माझ्या आठवणीतून नाही पण कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतून .. मधल्या काळात तिचे काय कोणते चित्रपट आले गेले हे बघायला मला गूगाळावेच लागेल, पण तसे मला करायचे नव्हते. माझ्या आठवणीतील सईच्या प्रतिमेला मला धक्का बसू द्यायचा नव्हता. तिला एखाद्या बंडल चित्रपटात दुय्यम दर्जाची भुमिका करताना मला बघायचे नव्हते. तसा एकदा योगही आला होता. तिचा एक "पिकनिक" म्हणून चित्रपट केबल टिव्हीवर लागलेला. पण त्यात माझी नेहमीची सई दिसून राहिली नाही म्हणून मी लागलीच तो चॅनेल बदलल्याचे आठवतेय ..
आमच्या पुढच्या भेटीला जवळपास चार वर्षे जावी लागली. मधल्या काळात "राडा रॉक्स" चित्रपटानिमित्त तिच्याबाबत वादग्रस्त गॉसिपिंग झाली, पण माझ्या मनाच्या एका निवांत कोपर्यात दडलेले सईचे स्थान काही त्याने हलले नाही.
आणि मग एक दिवस जिथे तिथे चोहीकडे सईचे फोटो झळकायला लागले...
येस्स! तेच ते फेमस लाल बिकीनीतले फोटो! चित्रपट - नो एंट्री पुढे धोका आहे!
त्या लालभडक बिकिनीमध्येही ती कुठेही वल्गर वाटत नव्हती आणि म्हणूनच चित्रपटाचे प्रमोशन करायला ते फोटो फिरत होते. माझ्यामते हे जे काही कसब आहे ते हिंदीतील कतरिना कैफ या नटीलाच जमून जावे. पण त्या चित्रपटातील तिची भुमिकाही कदाचित कतरीनासारखीच शोभेची बाहुली म्हणून असावी. कारण त्या चित्रपटाचे पुढे काय झाले ते मला समजले नाही. सईसाठी म्हणून तो बघायचा होता, प्रदर्शित व्हायच्या आधीच मित्रांनाही त्या द्रुष्टीने पटवून झाले होते. पण काही चित्रपट पहिल्या प्रयोगालाच किंवा त्या आधीच पडतात तसेच काहीसे त्याचे झाले. एक टुक्कार(?) चित्रपट न बघितल्याची खंत अशी कधी राहिली नाही, पण आठवणीत राहिला तो तिचा लाल बिकिनीतला फोटो, जो अगदी आजही "ग्लॅमरस मराठी हिरोईनचा मापदंड" म्हणून व्हॉटसअॅप सारख्या सोशल साईटसवर फिरत असतो.
अजूनही सई हि माझी सर्वात आवडती नटी होती, पण तरीही तिला "माझी ड्रिमगर्ल" हे पद देण्यास काहीतरी कमी पडतेय असे मला वाटत होते. आणि मग एके दिवशी रिक्षा सिग्नलला थांबलेली असताना एका चित्रपटाच्या पोस्टरवर नजर पडली. आधीही त्या चित्रपटाबद्दल मित्रांकडून ऐकले होते. हा कट्ट्यावरच्या यारीदोस्तीचा आणि त्यांच्यातील दुनियादारीचा चित्रपट आहे म्हणत जायचा प्लानही ठरला होता. सई त्यात आहे हे सुद्धा ऐकून माहीत होते पण तरीही हुरहुर अशी लागली नव्हती, जी तो पोस्टर बघून लागली. दुनियादारीच्या त्या पोस्टरवर मला सई नाही तर बॉबीमधील डिंपल कपाडिया दिसत होती. येस्स! हिच तर आहे माझी ड्रिमगर्ल! माझ्या ईतर कोणत्याही मित्राने तिच्यावर आपला हक्क सांगायच्या आधीच मी माझा रुमाल तिथे टाकला होता.
पहिल्या दिवसाचा पहिलाच शो मला बघायचा होता, पण सर्व मित्रांना जमवण्याच्या दुनियादारीत तिसर्या आठवड्यातच तो योग आला. मधले दिवस कसे गेले याची तुम्ही कल्पनाच करू शकता. पण मराठी चित्रपट तिसर्या आठवड्यात म्हणजे थिएटर पार रिकामे असेल आणि "मै, सई और दुनियादारी" म्हणत निवांत चित्रपटाचा आनंद घेता येईल या माझ्या कल्पनाविलासाला तडा गेला जेव्हा तिकिटबारीलाच हाऊसफुल्लच्या बोर्डाला मिरवताना पाहिले. थिएटरच्या बाहेर सईचा आणि चित्रपटातील इतर कलाकारांचा भलामोठा किंग साईज पोस्टर लावला होता. त्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती ती पाहता ओठांवर स्माईल, मनात इर्ष्या आणि डोक्यात राग एकाच वेळी दाटून येणे अनुभवत होतो. भावना संमिश्र होत्या खर्या पण आपापल्या जागा राखून होत्या.
अगोदरचा शो संपताच मला सर्वात पहिले आत शिरायचे होते कारण सईची एंट्री मला चुकवायची नव्हती. पण पुनश्च एका लेटलतीफ मित्रासाठी दुनियादारी करत थांबावे लागल्याने तो अनर्थ घडलाच. आत गेलो तर अंकुश चौधरीच्या एंट्रीचा सीन चालू झाला होता आणि पब्लिक टाळ्या मारत होते. मी सुद्धा त्यात थोडाफार सामील झालो, पण तरीही मला माझी खरी उर्जा राखून ठेवायची होती ती सईच्या एंट्रीला एक कचकचून शिट्टी वाजवायला, पण.......
पण ती आली, तिला पाहिले आणि पाहतच राहिलो... तोंड उघडले ते उघडेच राहिले.. शिट्टी राहिली बाजूला, श्वासापुरती हवा आत शिरली अन श्वास रोखूनच राहिला!
टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. यापेक्षा समर्पक शब्द नसावेत.. नक्कीच गीतकाराला सईवर चित्रित झालेले ते द्रुष्य बघूनच हे शब्द सुचले असावेत हे मी खात्रीने सांगतो!
अगदी पोस्टरवर पाहिलेले तशीच ती माझ्यासमोर सारे दृष्टीपटल व्यापून टाकणार्या कॅनव्हासवर पसरली होती! सिंपल मे डिंपल! त्यानंतर पुढचा पुर्ण सिनेमा सईसाठीच बघितला गेला. अगदी स्वताला स्वप्नीलच्या जागी ठेऊन बघितला गेला. व्हिल्लन साई झालेल्या जितेंद्र जोशीबरोबर तिला बघताना अक्षरशा राग येत होता. जेव्हा ती श्रेयसला, "माझा बच्चू आहेस तू" असे म्हणाली तेव्हा एक मोरपीस माझ्या गालांवरून फिरले होते. शेवटी स्वप्निल तिला पुळचटासारखा सोडून जात होता तेव्हा त्याचाही एवढा राग आला होता.. असे वाटले उठून त्याला सांगावे अबे जा ना, भाड मध्ये गेली तुझी दुनियादारी, आता भांड त्या दुनियेशी आणि मिळव "आपल्या सईला" परत....
स्वताला स्वप्निलच्या जागी बघणे मला सोपे गेले कारण तसा तो देखील माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. शेवटी तो मरतो तेव्हा मला वाईट वाटले नाही. का माहीत नाही पण तेव्हा मी त्या श्रेयसच्या भुमिकेतून बाहेर आलो आणि ऋन्मेष बनून सईला धीर देऊ लागलो, काही हरकत नाही सई मी आहे अजून... त्या शेवटच्या म्हातारपणाच्या द्रुष्यात सुद्धा सई इतकी तजेलेदार आणि सुंदर दिसत होती की लेडी देवानंदच जणू.. किंवा रेखानंतर खूबसुरत तीच!
चित्रपट संपवून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात नुसती टिकटिक वाजत होती.. पाऊस पडत नव्हता तरी अंग ओलेचिंब झाल्यासारखे वाटत होते.. राहून राहून ओठांवर याच ओळी येत होत्या.... नाही जरी "सई" तरी.. भिजले अंग, पाण्याने .. सोचू तुम्हे पलभर भी, बरसे सावन जोमाने .. माझी अवस्था माझ्या मित्रांनी नेमकी हेरली, आणि त्याच दिवशी या ऋन्मेषला एक नवीन नाव पडले... ए रिशी पकूऽऽर ..!!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सई !
स ई .. दोन अक्षरे..
आणि तिच्याबद्दल आता माझे दोन शब्द!
सईला मी माझी ड्रिमगर्ल म्हटले की ओघाने तिच्या सौंदर्याबद्दल हक्काने बोलणे आलेच. तिची शरीरयष्टी आणि हेल्दी फिगर पाहता ते मला विद्या बालन वा सोनाक्षी सिन्हाच्या पठडीतील वाटते. तथाकथित सौंदर्याच्या निकषात आणि फिगरच्या मोजमापात बसत नसूनही आकर्षक.. निव्वळ आकर्षक नव्हे तर सोबत अपील करणारे, खुणावणारे. तिच्या किंचित चौकोनी / षटकोनी चेहर्यातील वेगळेपण न जाणवते तर नवलच. त्या चौकटीला साजेसेच असे टपोरे डोळे. दातांची कमान उलगडत होणार्या खळखळाटातही हातचे राखून केलेले हास्य. तिच्या केसांच्या कुरळेपणात अडकण्याच्या भितीने त्याबद्दल लिहायचे टाळतो. मधुबाला आणि माधुरी यांनाच सौंदर्याचा बेंचमार्क मानणार्यांना कदाचित तिचे सौंदर्य मानवणार नाही, पण व्हू केअर्स!
सईसारखी हिरोईन मराठी चित्रपटसृष्टीत या आधी झाली नसल्यामुळे तिची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींशी करायचा मोह आवरत नाही. मग ते तिचे सौंदर्य असो वा अभिनय. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीकडे नजर टाकल्यास मला ती बरेचदा कंगना राणावत सारखी वाटते. कंगना हिंदीमध्ये ज्या पठडीतले सिनेमे करते ते मराठीत सईचे देखील हक्काचे क्षेत्र आहे, बनू शकते. अर्थात गरज आहे तसे धाडसी सिनेमे मराठीत बनण्याची. पण तरीही मला वाटते सईमध्ये मराठी चित्रपटसृष्टीची प्रियांका चोप्रा बनण्याची क्षमता आहे. तिच्याप्रमाणेच नायिकाप्रधान सिनेमा एकहाती खेचण्याची क्षमता आहे. मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही ती ज्या फ्रेममध्ये असते तेव्हा त्या चौकटीच्या कडेला उभे राहूनही बरेचदा ती प्रेक्षकांचा फोकस स्वतावर खेचून घेते. हो, तिच्यावर थोडीफार गॉसिपिंग होते, पण ते करावे अशी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तीच आहे आणि हेच तिला मराठीतील लेडी शाहरूख खान बनवून जाणार आहे. यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर, बट यू कॅन नॉट इग्नोर हर .. पण इथेही तेच.. कंगना ते प्रियांका, व्हाया कतरीना, हा प्रवास करण्यासाठी तिला मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांची देखील साथ मिळायला हवी आणि इन्शाल्लाह एक ना एक दिवस ते नक्की होईल, बोलो आमीन !
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष उर्फ रिशी पकूऽऽर !
(लेख क्रमांक १)
आमचे एक परिचित आहेत ते
आमचे एक परिचित आहेत ते ताम्हनकर असे लिहीतात. तर ते असो.
कोणी काहीही म्हनाले तरी सई
कोणी काहीही म्हनाले तरी सई साडीत फ़ार छान दिसते..............................
सस्मित... मीच तो सई-पुई
सस्मित...
मीच तो सई-पुई म्हणणारा....
आमचे एक परिचित आहेत ते
आमचे एक परिचित आहेत ते ताम्हनकर असे लिहीतात. तर ते असो.>> http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%... याच्याशी रिलेटेड असेल का?
मीच तो सई-पुई
मीच तो सई-पुई म्हणणारा....>>>>
पुन्हा हसु आले.
धागाकर्त्याकरिता आनंदाची
धागाकर्त्याकरिता आनंदाची बातमी:-
http://www.loksatta.com/viva-news/sai-tamhankar-in-viva-lounge-1073351/
पण या वृत्तातल्या << कुठलाही नव्या जमान्याचा हिट मराठी सिनेमा तिच्याशिवाय पुरा होऊच शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. >> या वाक्याविषयी जरा गडबड आहे. नवीन मराठी चित्रपट मितवा हा हिट म्हणावा की नाही? हो म्हंटले तर वृत्तातले विधान खोटे ठरते आणि नाही म्हंटले तर मग स्वप्नील जोशीला सुपरस्टार का म्हणावे असा प्रश्न पडतो. थोडक्यात धागाकर्त्याचे दोन आवडते कलाकार सई व स्वप्नील यांच्यातच या वाक्याने स्पर्धा लावून टाकलीये.
कुठलाही नव्या जमान्याचा हिट
कुठलाही नव्या जमान्याचा हिट मराठी सिनेमा तिच्याशिवाय पुरा होऊच शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. तिचा आत्मविश्वास, तिची स्टाइल, तिची फॅशन तरुणाईला भुरळ घालते. मराठी चित्रपटसृष्टीचा ग्लॅमर कोशंट वाढवणारी अभिनेत्री म्हणून नि:संशय जिचं नाव घेता येईल त्या
सई ताम्हणकरशी थेट गप्पा मारण्याची संधी.......
सह्हीहीह्ही.... सईईईईईईई ... धन्यवाद चेतनजी
बाकी ते तसे म्हटलेय त्याचा शब्दशा अर्थ घ्यायचा नसतोच मुळी.. सचिनशिवाय आपण जिंकू शकत नाही वगैरे म्हटले तरी याचा अर्थ सचिनशिवाय खेळलेल्या सार्या मॅचेस आपण हरलोच आहोत असेही नाही ना.. पण ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचे ग्लॅमर आहे हे आता नॉनमराठी लोक्स सुद्धा कबूल करतात..
राहिला प्रश्न मितवाचा... तर मग असे म्हणूया की सई ताम्हाणकर नसतानाही एक आधुनिक प्रेमकथा हिट करून दाखवणारा स्वप्निल हाच खर्रा मराठी चित्रपटाचा सुपर्रस्टार
सई ताम्हाणकर नसतानाही एक
सई ताम्हाणकर नसतानाही एक आधुनिक प्रेमकथा हिट करून दाखवणारा>>>>>>>>> सई असल्यावरच किंवा सईमुळे पिच्चरं हीट होतात???? बाई ग. कसल्या घागरी ओतते म्हणे तुमची सई पिच्चरात??
तो उका नी प्रिबा चा पिच्चर
तो उका नी प्रिबा चा पिच्चर (नाव आठवत नाहीये.) दुनियादारी, शशी देवधर, क्लासमेट मधे सई अगदी सेम टु सेम दिअस्लीये / वागलीये आणि अभिनय ही तस्साच. तोंडावर चिडके रडके भाव आणुन बोलण्याचा.
यातला उका नी प्रिबा चा पिच्चर आवडला कारण उका. आणि क्लासमेट थोडा आवडला कारण स्टोरी चं सादरीकरण.
<< तो उका नी प्रिबा चा पिच्चर
<< तो उका नी प्रिबा चा पिच्चर (नाव आठवत नाहीये.) >>
टाईम प्लीज का? त्यात ती दोघांत तिसरी असते बहुदा.
हो, टाईम प्लीजच तो.. म्हणजे
हो, टाईम प्लीजच तो.. म्हणजे त्यातही सई होतीच
उका नी प्रिबा हे लीडमध्ये असलेला चित्रपट आवडला खरा पण त्याचे नाव लक्षात नाही..
पण सईच्या सर्व सिनेमांची नावे चटाचटा लक्षात ठेवून पटापटा बोललात यामागे सई नामाचाच महिमा का
ऋन्मेशराव … सईबाईची इतकीपण
ऋन्मेशराव … सईबाईची इतकीपण तारीफ करत जाऊ नका…।
तुमच्या ग'फ्रे बाई रागाला यायच्या ……
असो.
असो.
ओ रिशी पकूर, त्वरा करा.
ओ रिशी पकूर, त्वरा करा.
खरंय लवकरात लवकर प्रवेशिका
खरंय लवकरात लवकर प्रवेशिका मिळवा. मायबोलीवरच्याच अजून ३१ (एकतीस) जणांशी तुमची स्पर्धा आहे, बाहेरचे अजुन वेगळेच.
मंगळवारी (दिनांक ३ मार्च)
मंगळवारी (दिनांक ३ मार्च) दुपारी साडेतीन वाजता >>>>> कठीण आहे जमणे
<< कठीण आहे जमणे >> तुम्ही
<< कठीण आहे जमणे >>
तुम्ही खरंच तिचे चाहते आहात का? की छद्म चाहते (स्यूडो फॅन) आहात? खरा चाहता कसा असतो ते समजण्याकरिता मस्त चित्रपट पाहा. त्यातला चाहता आपल्या आवडत्या अभिनेत्रीची झलक दिसावी म्हणून तिच्या घरासमोरच्या हॉटेलात भांडी घासतो. शाहरू़खचा आगामी चित्रपट फॅन हादेखील अशाच काहीशा कथासूत्रावर आधारित आहे तोही आला की पाहा आणि काहीतरी स्फूर्ती, प्रेरणा (इथे मुलींची नावे अपेक्षित नाहीत) घ्या. मायबोलीकर तुमच्या पाठीशी आहेत. तुम आगे बढो, हम तुम्हे पीछेसे धकेलते है||
खरा चाहता कसा असतो ते
खरा चाहता कसा असतो ते समजण्याकरिता मस्त चित्रपट पाहा. >>> अहो तो चित्रपट पाहिला आहे म्हणूनच तर... भिती... तसे काही घडण्याची.. माझी गर्लफ्रेंड.. तिचे काय होईल
<< म्हणूनच तर... भिती... तसे
<< म्हणूनच तर... भिती... तसे काही घडण्याची.. माझी गर्लफ्रेंड.. तिचे काय होईल अरेरे>>
घाबरु नका, असं काही घडणार नाही. सई विवाहित आहे. तुमचे खर्रे खुर्रे वय पाहता ती फार तर तुम्हाला दत्तक घेईल इतकंच
ती फार तर तुम्हाला दत्तक घेईल
ती फार तर तुम्हाला दत्तक घेईल इतकंच>>
देव करो आणी ऋन्मेषच्या
देव करो आणी ऋन्मेषच्या गफ्रेला एखादी तरुण, सुन्दर्,हुशार अशी अभिनेत्री पसन्त पडो.
(No subject)
सई विवाहित आहे. >>>>>>वरील
सई विवाहित आहे. >>>>>>वरील फोटो सई आणि तिचा नवरा (फोटो आंतरजालावरून साभार)
दोघेही ढब्बे आहेत. .
दोघेही ढब्बे आहेत. .
सइ एका हिन्दि सिनेमात येतेय..
सइ एका हिन्दि सिनेमात येतेय.. एक नविन गाण पाहिल त्यात एक माणूस बालकनित उभा राहुन समोरच्या घराच्या बालकनित उभ्या असलेल्या म्यरिड सइ कडे पाहुन हातवारे करतो व मधल्या मधे एक म्हातारा त्या दोघाचे चाळे पहातो.
नाही जरी ‘सई’ तरी ... च्या
नाही जरी ‘सई’ तरी ...
च्या चालीवर
नाही जरी ‘ऋन्मेऽऽष’ (सईच्या कार्यक्रमास गेले) तरी ...
लोकसत्ताकारांनी या कार्यक्रमाचे प्रसारण ठेविले झी वाहिनीवरी.
तेव्हा आता हे तरी नक्की पाहा आणि महिला दिन साजरा करा:-
http://www.loksatta.com/mumbai-news/actress-sai-tamhankar-advice-for-suc...
या मुलाखतीचे ८ मार्च रोजी झी २४ तास या वाहिनीवरून प्रक्षेपण होईल.
सई ताम्हणकर प्रथमच ग्रामीण
सई ताम्हणकर प्रथमच ग्रामीण ढंगात
http://www.loksatta.com/manoranja-news/sai-tamhankar-will-play-rural-gir...
प्रथमच सईचे गावरान ठसकेबाज रूप पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सईच्या तोंडी विशिष्ट प्रकारच्या ग्रामीण बोलीतील संवाद आहेत. पण तो हेल.. बोली याबाबत सईने मौन पत्करले आहे.
चेतनजी, तुम्ही सईचे छुपे फॅन
चेतनजी, तुम्ही सईचे छुपे फॅन दिसत आहात.. कबूल करा कि हो
अरे नाही मी तुमचा फॅन आहे.
अरे नाही मी तुमचा फॅन आहे. सईकडे तर कधी यापूर्वी लक्ष गेलेच नव्हते. तुमचे लेखन वाचून या बयेचाही कुणीतरी फॅन असू शकतो हे कळले आता कुठेही कधीही तिच्याविषयी बातमी दिसली की तुमची आठवण होते आणि लगेच तुम्हाला अपडेट (अद्ययावत) करण्याकरिता इथे लिंक देतो. बाकी मी जिचा फॅन आहे तिला इथे कदाचित फारसे कोणी ओळखत नसावे. माझ्या वापरकर्त्यानामावर (युजरआयडी) वर क्लिक करून माझी माहिती पाहा म्हणजे मी कुणाचा फॅन आहे ते कळेल. तिचे बरेच व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनेलवर डकवले आहेत. तेही तुम्ही पाहू शकता. मग कदाचित तुम्ही सईला विसरून जाल इतकी ती छान आहे.
तुमचे खर्रे खुर्रे वय पाहता
तुमचे खर्रे खुर्रे वय पाहता ती फार तर तुम्हाला दत्तक घेईल इतकंच
>> त्या लींक वर गेले आणि
Pages