कोणते वॉशिंग मशिन घ्यावे.

Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23

मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो_एस, मॉडेल नं टाकु शकाल काय??
झक्या, घरात २ टँक आहेत १ २००लि. अन १ ३०० >>> सोसायटीचा टॅन्क नाहिये का सर्वात वरच्या मजल्यावर???>> आहे रे पण सेपरेट कनेक्शन देतील की नाही माहित नाही..

कपडे धुण्याचे काम कामवाल्यांकडे द्यायचं असेल (आपण भिजवून ठेवलेले कपडे थोडेसे घासून मग मशिनात टाकणे आणि नंतर मशिनातून काढून वाळत घालणे) तर सेमीच बरे. त्या अजिबात बिघडवू शकत नाहीत ते. Happy

आताच एलजी च्या कस्टमर सर्व्हिसचा अनुभव आला आईला, आईने मागच्या वर्षि मे मधे एलजी चे फ्रंट लोडींग वाशिंग मशिन घेतले. जास्त वापर नाहि झाला तिचा त्यानंतर कारण ६ महिने ती देशाबाहेर होति. घरी कामाला बाई असते त्यामुळे परतल्यावर महिन्यातुन २-३ वेळा असे वापरले गेले असेल. आता मशिन मधेच बंद पडायला सुरुवात झालि सुद्धा म्हणुन फोन केला. तर कंपनीचा माणुस येवुन घरि आईला बोलुन गेला एव्हढि महागाची मशिन का घेतलि, आणि २-३ हजाराचा खर्च सांगुन गेला आहे. या आधि व्हिडिओकॉन्चे मशिन होते. कधिहि काहि प्रॉब्लेम आला नाहि. १९९१ पासुन २०१२ पर्यंत अगदि मस्त चालत होते.
कोणाकडे आहे का इथे एलजीची मशिन.

मला टॉप लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.कुठले सुचवाल?मला एल जी wf t7519ql मशिन ठिक वाटते… तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.:

Fully automatic washing machine budget upto 20000/-

I have selected following brands. Kindly guide me to chosse one from these:

LG wf t7519ql
Videocon VT78C32
Samsung WA82BWMEC

IFB फ्रण्ट लोडींग मशिन मध्ये कोणती पावडर वापरावी. <<< सर्फ एक्सेलची फ्रन्टलोडींग साठी पावडर मिळते बाजारात, आम्ही ती वापरतो.

माझ्या कडे व्हिडिओकॉन टॉप लोडिंग वॉ.मशिन आहे. १९९३ पासून २०१३पर्यंत काहीही प्रॉब्लेम आला नाही.अगदी मस्त चालत आहे.सिमेन्सचा रिपोर्ट चांगला आहे.

जबरी!>>>> ह्याचे एकमेव कारण मशिन रोज वापरत नाही.आठवड्यातून दोनदा! कामवाली नसेल तेव्हा रोज वापरते. एरवीचे मशिन म्हणजे कामवालीबाई.
पण एक गोष्ट खटकतेय.ती म्हणजे कपड्यावर अगदी बारीक काळे डाग येतात. होजियरी मटेरियलवर जास्त येतात. ह्याचे कारण काय असू शकेल?

पण एक गोष्ट खटकतेय.ती म्हणजे कपड्यावर अगदी बारीक काळे डाग येतात. होजियरी मटेरियलवर जास्त येतात. ह्याचे कारण काय असू शकेल? >> दमट जागी कपडे सुकवायला ठेवता का? म्हण्जे क्लोज्ड गॅलरी वगैरे मध्ये?

दमट जागी कपडे सुकवायला ठेवता का?>>>>> नाही.दांडीवर किंवा ओपन गॅलरीमधे! इतर कपड्यांवर (फिक्या) दिसत नाही,पण होजियरी मटेरियलवर दिसतात. Glue वगैरे येत असेल का? माझ्या मैत्रिणीकडे ifb mashine आहे.तिलाही तोच प्रॉब्लेम येत आहे.

मला पण आज रोज वापरण्यासाठी वॉशिंग मशिन घ्यायची आहे. गेल्या १० दिवसापांसुन कामवाली बाईला कायमचा रामराम ठोकलाय. कपडे स्वच्छ निघतील अशी मशिन कुठली घेऊ?

गेल्या १० दिवसापांसुन कामवाली बाईला कायमचा रामराम ठोकलाय. कपडे स्वच्छ निघतील अशी मशिन कुठली घेऊ?>>>>>>>>>
मला एक विचारायचय की कामवाली बाई नसल्यास तुम्ही लोक सगळे सरसकट कपडे मशीनला एका धुण्यातच घालता का? मला तसं जमत नाही. म्हणजे पांढरे वेगळे, रंग जाणारे वेगळे,युनीफोर्म्स वेगळे, आपले अ‍ॅम्ब्रॉयडरेवाले-टिकल्या,मणी-वर्कवाले वेगळे, शिवाय चादरी-अभ्रे-टॉवेल्स इइ. इतक्या वेळी मशीन फिरवायलाही वेळ हवाच की. शिवाय वीज बिलाच्या नावाने शंख करावा लागेल.
मी रोज धुतांना, म्हणजे हाताने, देखील वेगवेगळ्या टबात वेगवेगळे भिजत घालते. तर मी असं ठरवलय की मला मशीन सुटेबल नाही. सो बाईचेच पाय धरावे की तिला डेच्चु देउन मशीन घ्यावी??

देवकी, काही मशीनमध्ये एक जाळीची पिशवी असते, त्यात कपड्यांमधील मळ जमा होत असतो. ती वेळच्यावेळी साफ करावी लागते. न केल्यास तुम्ही सांगता तसा त्रास होञ शकतो. अशी काही सोय आहे का तुमच्या मशीनमध्ये?

सस्मित, शक्यतो रंग जाणारे,वर्कवाले कपडे हातानेच धुते मी.
बेडशीट वगैरेचे वजन जास्त होत असल्याने ते वेगळेच लोड लावावे लागते.

त्यात कपड्यांमधील मळ जमा होत असतो. ती वेळच्यावेळी साफ करावी लागते.>>>> हो ३-४ इंचाची जाळीची पिशवी आहे. पण कपडे धूऊन झाल्यावर त्यात जमा झालेली कपड्यांच्या धाग्यांची गोळी काढून टाकली जाते.
Spray paintingचे ठिपक्यांप्रमाणे बारीक काळे डाग येतात.

सस्मित, शक्यतो रंग जाणारे,वर्कवाले कपडे हातानेच धुते मी.>>> मीही + माझी बाईही.
बेडशीट वेगळ्याच धुवाव्या लागतात.
मी रोज धुतांना, म्हणजे हाताने, देखील वेगवेगळ्या टबात वेगवेगळे भिजत घालते.>>>_____/\______
कपडेच कपडे चोहीकडे बघून टेंशन नाही का येत?

जागू,
कपडे स्वच्छ निघतील अशी मशिन कुठली घेऊ?>>> आताच्या मशिनची माहिती नाही.पण कपडे ब्रश मारून पुढच्या प्रोसेससाठी मशिनमधे टाकले तरच छान वाटतात.हेमावैम.
मात्र बेडशीट व पडदे यांच्याबाबतीत मावैम. गुंडाळून ठेवणे.

देवकी, ते काळे ठिपके बुरशीमुळे येतात आणि मग ते जाणे अतिशय कठीण जाते. माझ्या पावसाळी जॅकेटला ते यायचे - ते हाती धुत असून सुद्धा. त्यामुळे वॉ.म. कारणीभूत असेलच असे नाही. बुरशीचा उगम शोधून त्याचा नायनाट करा.

सस्मित, टिकल्या / मणी असलेले कपडे मशीनमध्ये धुता येत नाहीत. धुतल्यास कपडे आणि मशीन दोन्ही खराब होते (१००%). रोजचे वापरायचे कपडे एकत्रच घाला - पांढरे आणि रंगीत (पण रंग न जाणारे). महिन्यातून एकदा सगळे पांढरे कपडे (सिथेटीक वगळून) गरम सेटींगवर धुवावेत. मशीनला गरम पाण्यात सोक करण्याची सोय नसेल तर तासभर गरम साबणाच्या पाण्यात भिजवून मग मशीनमध्ये धुवा. ह्या लोडमध्ये साबण निम्मा घाला म्हणजे कपडे एकदम क्रिस्प होतात (जे मला आवडते)

हे मी फ्रंट लोडींग मशीनकरता लिहीलय. टॉप लोडींग असेल तर मधून मधून हाताने ब्रश मारावा लागतो. मग कामवाल्या बाईची गुलामगिरी पत्करावी लागते.

जागू, रोजच्या वापराकरता IFB फ्रंट लोडींग मस्त आहे.

मी माझ्यापुरता शोधलेला उपाय. सगळे कपडे जमा करायचेत आठवड्याभराचे. शक्यतो सगळे फॉर्मलच होतात. + बाकी. शनीवारी सकाळी आतले कपडे, फॉर्मल्स, मोजे, हातरुमाल असं वेगवेगळं भिजवायचं. याकरता अ‍ॅमवेच एसए८ चं सोल्यूशन् करून वापरायचं. एक बादली पाण्याला ५ ते ७ मिली. नंतर ते पाणी वापरून कपडे मुरवत ठेवायचे. अर्ध्यातासानंतर फॉर्मल्स मशिन ला अन बाकी चिल्लर खुर्दा हातानी धुवायचा. ड्रायरला मात्र सब घोडे बारा टका करून स्पीन शॉवर द्यायचा.
या आधी टाईड / एरिअल वापरून झालंय पण जरा जरी जास्त झालं तर कपडे पांढरट / धुरकट होतात तेव्हापासून अ‍ॅमवे झिंदाबाद.
एलजी ची ६.५ किलो ची सेमीऑटो वॉम आहे...

मला टॉप लोडिंग मशीन घ्यायचे आहे - इकॉनॉमिक रेन्जमधले. इथले विविध सल्ले वाचले. एलजीची कलकत्त्यातली सर्व्हिस लई बेक्कार गटात मोडते त्यामुळे बाद. व्हर्लपूलच्या फुल ऑटोमॅटिक मशीनचा २० वर्षांचा उत्तम अनुभव आहे. त्यामुळे व्हर्लपूल डोक्यात आहे (व्हाईट मॅजिक). गोदरेजची सर्व्हिसही इथे उत्तम आहे, पण मला त्या मशीनचा अनुभव असणारं कुणी भेटत नाहीये.
बहुतेक डीलर्स सॅम्संग आणि पॅनॅसॉनिक घ्यायला सांगताहेत. तेव्हा त्याबद्दल कुणाचा अनुभव असल्यास ऐकायला आवडेल. तसेच हायर (Haier) चे मशीन प्रचण्ड सवलतीत विकताहेत, पण त्याविषयीही फारसं कधी ऐकलं नाहीये.

आणखी एक लक्षात आलं की ऑनलाईन किंमती आणि प्रत्यक्ष दुकानातल्या किंमती यात किमान दीडेक हजाराचा फरक पडतो आहे. असं का असावं? ऑन्लाईन असल्या गोष्टी खरेदी करायची हिंमत होत नाहीये.

इथे आमच्या आसपासच्या कुठल्याही दुकानात १७ ते १८ हजाराखालचं कुठलंच मॉडेल उपलब्ध नाहीये, त्यामुळे जरा दूरचाच डीलर शोधायला लागणार हेही दिसतंय. पण मॉडेल्/कंपनी नक्की झालं की मी यातल्याच एकाशी निदान निगोशिएट करायचा प्रयत्न करेन.

मला फार हाय-फाय मशीन नको आहे, रोजचे कपडे, चादरी आणि जीन्स व्यवस्थित निघाव्यात एवढीच माफक अपेक्षा आहे.
नाहीतर शेवटी व्हर्लपूल आहेच, पण त्यापेक्षा इतर पर्याय असतील तर जाणकारांनी, अणभवी लोकांनी प्रकाश टाकावा. Happy

हा बाफ होता तर अस्तित्वात.
माझा शोध चालू आहे. ऑनलाईन घेऊ का ?

पॅनॅसॉनिक > अनुभव चांगला. ७.२ किलो ची मशीन वापरात आहे काकांकडे
एलजी > मी स्वत: वापरतोय ६.२ किलो चं मॉडेल. अनुभव चांगला. आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आलेला.
सॅमसंग > नो अनुभव.

वर दिलेल्या दोन्ही मशीन्स सेमी-ऑटो आहेत. काकांकडे आतापर्यंत पूर्ण-ऑटो मशीन होती; ती बदलली. त्यांच्या अनुभवानुसार सेमी-ऑटो ची पॉवर जास्त चांगली आहे.

व्हिडिओकॉन? माझं व्हिडिओकॉन सेमी-ऑटो गेली १६ वर्षं व्यवस्थित चालू आहे. २ वेळा तो प्लॅस्टिकचा पाणी वाहून जायचा पाईप बदलावा लागला फक्त.

वरदा, वॉशिंगमधीनच्या ऑनलाईन खरेदीचा अनुभव नाही. पण मोबाईलचा आहे. गेल्या महिन्यात दोन मोबाईल ऑनलाईन घेतले. पहिल्यांदाच एवढ्या एकरकमी ऑनलाईन खरेदीचे धाडस केले, त्यामुळे धाकधूक वाटत होती. पण काही अडचण न येता चांगला अनुभव आला. ऑनलाईन खरेदीत बर्‍याचदा डीलरचे नावही दिलेले असते, आणि त्याबद्दलचे लोकांचे मते (पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टक्केवारी, रिव्हिव्ज् इ.) दिलेली असतात, त्यावरून थोडासा अंदाज येतो.

माझ्या घरी पूर्वी व्हिडीओकॉन सेमी ऑटो होतं. दहाएक वर्षे झालीत तिला. दणदणीत चाललं मशीन. बॉडी गंजल्याने आता घ्यायचंय नवं. म्हणून शोध चालू केलाय. या बाफवर लेटेस्ट पोस्ट्स बघून ठरवेन. ऑनलाईन पेक्षा घराजवळचा डीलर स्वस्त देतोय. शिवाय सर्व्हिसची गॅरण्टी. मोठ्या मॉल्समधून सध्या डिस्काउंटस चालू आहेत. पण एकदा विक्री झाल्यावर सर्विस देत नाहीत. विजय सेल्समधे सर्विस मिळते त्यातल्यात्यात.

घरात मेंबर्स जास्त असल्याने आयएफबी चं फुल्ली ऑटोमॅटीक चारेक वर्षांपूर्वी घेतलं होतं. पण अनेक जणांचं हँडलिंग असल्याने असेल कदाचित ते नेहमी बिघडलेलं राहतं. कंपनीचा माणूस आल्याशिवाय रिपेअर होत नाही. सेमी ऑटोमॅटीक च्या बाबतीत लोकल मेकॅनिक तात्काळ येऊन मशीन रिपेअर करून देऊ शकतो. सध्याची फायबर बोडी गंजणार नाही हे खरं असलं तरी काही मोडेल्सच्या बाबतीत खूपच तकलादू वाटतेय.

७ किलोची मशीन घेतली तर सर्वच मॉडेल्समधे मजबून बॉडी मिळतेय.

सॅमसंग - माझ्याकडे, सासरी , माहेरी, बहिणीकडे सगळ्यांकडे किमान ७-८ वर्षे आहेत.. ऑटोमॅटिक.. नो खिटखिट ,, मस्त चालु आहेत.. प्रचंड वापर केला आहे.. मुलगा लहान असताना.. पण काहिही तक्रार नाही

Pages