कोणते वॉशिंग मशिन घ्यावे.

Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23

मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंतर होमशॉपी/स्नॅपडीलमधून वगैरे मशीन घ्यायचं धाडस होत नाहीये हेच खरं..

केश्वे, व्हिडिओकॉन पण बघते गं.

मृनिश, रश्मी यांच्या पोस्ट्सवरून सॅम्संगचा अनुभव चांगला आहे असं दिसतंय. सॅमसंगचं ब्रॅण्ड स्टोअर जवळ आहे, तिथे जाऊन पण बघेन मग..

सॅमसंगचं ब्रॅण्ड स्टोअर जवळ आहे, तिथे जाऊन पण बघेन मग... > फक्त पहाच पण ब्रॅन्ड स्टोर मध्ये. घेतांना एखाद्या डिलर कडून घ्या काहीतरी डिस्काउंट, ऑफर मिळेल. जनरली ब्रॅण्ड स्टोअर मध्ये काही ऑफर्स नसतात. अर्थात आता गणपती आहेत म्हणून काही असतीलही पण कोलकात्यात नाही माहीती Happy

कलकत्त्यात आता १५ ऑगस्टच्या आणि नंतर प्री-पूजा ऑफर्स सुरू होतील. गणपतीच्या नाहीत (काही वर्षांनी त्याही होतील). म्हणूनच चौकशी सुरू केली आहे.
काल एका मोठ्ठ्या डीलरच्या दुकानात ऑफर्स बघायला गेले तेव्हा ते कसं गंडवतात ते कळलं. त्यांनी बेधडक मला १८००० च्या खाली टॉप लोडिंग येतच नाही असं ठामपणे सांगितलं. मग मी एकेक मॉडेलचं नाव घेऊन विचारायला लागल्यावर नाही, ते आता स्टॉकमधे नाही, दुसरं ते ऑब्सोलीट झालंय मिळत नाही वगैरे सांगायला सुरुवात केली. मग त्यावर मी इतर डीलर्स, कंपनीच्या वेबपेजवरील माहिती इ. बोलायला लागल्यावर मला 'या इकडे, तुम्हाला दाखवतो लिस्ट' असं करून बाजूला बोलावलं कारण आणखी एक वयस्कर कस्टमर कपल आधीच आलेलं होतं (आमच्याकडे इथे मेजॉरिटी कस्टमर प्रोफाईल हे मध्यमवयीन ते वयस्कर असतं). पण तेवढ्यात त्यांनी ते ऐकलं आणि मग त्यांनी वाद घालायला सुरुवात केली की त्यांना का नाही इतर मशीन्सबद्दल सांगितलं म्हणून. मी शेवटी वैतागून दुकानातून बाहेर पडले. त्यांच्या जवळच्याच रायव्हल डीलरचाही साधारण असाच अनुभव आहे पूर्वीचा. त्यामुळे आता अगदी शहरातल्या मुख्य भागातला कुणीतरी डीलर शोधायला हवा जो सगळी रेन्ज स्टॉकमधे ठेवतो.

वरदातै
छोटा डीलर नाही का जवळपास ?
माझ्या घराजवळचा डीलर आहे. गेल्या पंधरा वर्षापासूनची ओळख आहे. त्याला मॉडेल सांगितलं आणि लोएस्ट ऑफर मिळालेली सांगितली की तो त्या प्राईसच्या जवळपासच्या किंमतीत ती वस्तू मागवून देतो. त्यांना भरपूर कमिशन मिळतं, त्यातून वरचा फायदा ते सोडून देतात. दोन तासात चार पाचशे (जास्तही कदाचित) रूपये मिळाले तर वाईट नाही. शिवाय आपल्याला घसघशीत डिस्काउंट मिळतं. इलेक्ट्रॉनिक्सच नाही, कार च्या बाबतीत पण मिळू शकतं डिस्काउंट. (व्हिडीओकॉनची जी मशीन ११,००० ला आहे ती त्याच्याकडे ९९०० ला मिळतेय).

यात करता येण्याजोगा अजून एक उपाय. ऐकीवच आहे. पण फुल्ल फायदा -
त्या कंपनीमध्ये ओळखिचं कुणी असेल तर त्या एम्प्लॉई ऑफरमध्ये टॉपमोस्ट मॉडेल्स सुद्धा अतिशय कमी किमतीला मिळू शकतील. तसंच वेअरहाऊसमध्ये क्वालिटी चेक रिजेक्ट झालेला तरीही एकदम मस्त माल फार स्वस्त मिळू शकतो. खखोदेजा.

लोकहो, टिकाऊपणा हा एक भाग झाला चांगल्या मशीनचा. पण कपडे स्वच्छ निघणे हे पण तितकेच महत्वाचे आहे. त्या बद्दल पण लिहित जा म्हणजे मग मॉडेल ठरवताना सोपे पडेल. ज्यांचा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास असतो त्यांच्याकरता एक दिवस वापरलेल्या शर्टची कॉलर स्व्च्छ निघणे ही स्वच्छता तपासायची सोपी पद्धत आहे.

पूर्वी टॉप लोडींग मॉडेलमध्ये स्वच्छता नीट होत नसे. पण नवीन मॉडेल बहुतेक चांगली आहेत.

वरदा, चांगल्या साईटवर चांगले कस्टमर रेटींग असलेल्या विक्रेत्याकडून ऑनलाईन घेणे सुरक्षीत आहे. तसेही खरेदीनंतर दुकानातून काहीच सर्विस मिळत नाही. तुम्हाला थेट कंपनीशीच संपर्क साधायला लागतो. फक्त जूने मशीन बदलीत द्यायचे असेल तर ते बहुतेक जमणार नाही. (फ्लिपकार्टवर टिव्हीची एक्सचेंज ऑफर बघितली तशी वॉमची नाही बघितली)

शेवटी Whirlpool Whitemagic Royale 6512SD नक्की केलंय. घराजवळच नवी शाखा उघडणार्‍या डीलरने जवळजवळ २२०० रु. कमी केलेत.

तशीही मी व्हर्लपूलची लॉयल कस्टमर आहेच त्यामुळे चुकला फकीर मशीदीत असाच प्रकार झालाय
इथे सल्ले देणार्‍या सर्वांचे आभार Happy

आमच्या सहीत अजुन दोन नातेवाईकांकडे lg च स्टील टर्बो ड्रम वाल्या ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स आहेत बर्यांच वर्षांपासुन तरीही चांगल्या चालतायत. आता lg चे नवीन पण ह्याच गोष्टी असणारया सुंदर मॉडेल्स आले आहेत किमती
मुंबईत तरी साधारण १५ ते २५ पर्यंत आहेत ६.५ केजी च्या.अधिक महिती साठी इथे बघा .

http://www.flipkart.com/home-kitchen/home-appliances/washing-machines/lg...

परंतु ओळखीच्या दुकानातुन हेच मशीन स्वस्त पडेल.आपल्या जबाबदारीवर नीट पडताळुन मगच वॉशिंग मशीन घ्या.

एकटा रहाणार्‍या व्यक्तिसाठी वॉशिंग मशिन हवय. व्यक्ती खूप बिझी असणार आहे, तेव्हा वॉशिंग मशिन असं हवय की कमी तापदायक असेल.
ज्यास्त महाग नकोय पण वारंवार त्रास देणारं नकोय. तसेच बर्‍यापैकी चांगलं चालणारं, ईलेक्ट्रीसिटी कमी वापरणारं असं सुच्वाल का?

वरते प्रत्येकाच्या पोस्टमधून नक्की काय बरं समजत नाहीये.

@देवीका, DMR Mini Washing Machine असे सर्च करा.
एका माणसासाठी पुरेसे आहे. सेमी अ‍ॅटोमॅटीक आहे. फक्त दोन कंट्रोल नॉब आहेत.
किंमत ४,००० / रू च्या आसपास आहे. स्नॅपडील वर आहे.
आत्ता सगळे सोल्ड आऊट आहे.
स्वतः सगळे रिव्यु वाचुन पटत असेल तर घ्या. मला ट्रोन्स्पोर्टसाठी सोपे जाईल म्हणुन मी घेतले आहे आणि गेले काही महिने चांगले चालत आहे.

मी टॉप लोड, स्टील ड्रम, फुलली ऑटोमॅटिक वॉ म बघते आहे- सॅमसंग आणि एलजीचे. कोणाच्या काही टिप्स? सध्या ऑनलाईन 'सेल धमाके' पुष्कळ चालू आहेत, पण डीलरकडे जाऊनच घेणार आहे. सॅमसंग आणि एलजीच्या आफ्टर सेल्स सर्व्हिसबद्दलही काही अनुभव असतील तर प्लीज सांगा.
तसंच, ईलेक्ट्रोलक्सच्या वॉ म बद्दल कोणाचा काही अनुभव आहे का?

माझ्याकडे सॅमसंग फ्रंट लोडिंग आहे. परफॉर्मन्स चांगला आहे. मी पेटीएमवरून घेतलं ऑक्टोबर १६ मधे. दुकानात रेट्स जास्ती होते, अन इन्स्टॉलेशन / डेमो इत्यादी साठी वेगळे पैसे लागतील म्हणून सांगितलं. नाहीतर कंपनीच्या कॉलसेंटरवर रिक्वेस्ट टाकून बोलवा म्हणाला. दुकानदार कुठलाही फ्लॉ एंटरटेन करत नाहीत. कॉलसेंटरलाच फोनायला लागतं. अगदी घेतल्या दिवशी काही झालं तरीही.

पुण्याला घरी एलजी आहे (नोव्हेंबर १६ मधे दुकानातून घेतलेलं) . इलेक्ट्रोलक्स होतं पूर्वी (घेतलं तेंव्हा वोल्टास होतं, अन एक महिन्यात नाव बदललं). आफ्टर सेल्स बरी होती, रेग्युलर मेन्टेनन्सला एकजण यायचा. पण एकदा मोटर बिघडली म्हणून बदलायला उघडलं तर दिसलं की मोटर सॅमसंगची आहे. मग बदलायच्या वेळी विचार केला की सॅमसंग घेणंच काय वाईट. पण टॉप लोडिंगमधे एलजी बेटर वाटलं. त्याचाही परफॉर्मन्स चांगला आहे. पण पाणी जास्ती वापरलं जातं, अन वॉशिंग क्वालिटी फ्रंट लोडिंगपेक्षा थोडी कमी.

चिंतोपंत हो, सॅमसंग बघतेच आहे.
अँकी, डिटेल्ड माहितीकरता धन्यवाद!
एलजी आणि सॅमसंगमध्येच कन्फ्यूजन होत आहे. बहुदा आता डीलरकडे जाऊन, प्रत्यक्ष बघूनच फायनल निर्णय होईल. एलेक्ट्रोलक्सबद्दलही इतरत्र रिपोर्ट चांगले कळले आहेत. आफ्टर सेल्स महत्त्वाचे आहेच. सध्याचे माझे व्हिडिओकॉन आफ्टर सेल्सवरच चालवले आहे आम्ही जवळपास!

ईलेक्ट्रोलक्सच्या वॉ म बद्दल कोणाचा काही अनुभव आहे का?>>

आम्ही साधारण १० एक वर्षे वापरले ते सिंगल टब सेमी होते त्यामुळे पाणी चालु बंद करणे एवढे एक मन्युअल काम होते आणि स्पीनिंग.. त्यामुळे एलेक्ट्रोलक्स बाबत अनुभव चांगला होता!

१० वर्षात शुन्य मेन्टेनस लागलेला..
सध्या आयएफबी पण ते फ्रंट लोडेड आहे

पूनम कोणते घेतलंस ते सांग . मला ही घ्यायचे आहे . सध्याच सॅमसंग, टॉप लोडिंग, आटोमॅटिक आणि प्लास्टिक टब आहे .पण मोटर बिघडली आहे . त्याचे तीन साडे तीन हजार होणार आहेत दुरुस्तीचे आणि तशी ही 12 /15 वर्ष पण झालीत ह्याला म्हणून विचार करतेय नवं घ्यायचा.

आमच्याकडे बॉश चं 6.5 च आहे... आता मागच्या महिन्यात घेतलंय... एकदम सायलेंट आहे... कपडे धुतले तर जातायेत पण पाणी एवढं कमी का दिसतंय ते कळत नाही.. एकदम थोडं दिसत पाणी... गुगल केलं तर म्हणे नवीन फ्रंट लोड टेक्नोलॉजि मध्ये पाणी कमी लागत म्हणे.. पण पाण्याशिवाय कपडे कसे स्वछ होतील???

टेक्निकली माझ्यामते फ्रंट लोड. कारण - पाणी कमी लागतं. कपडे गुंतत नाहीत एकमेंकात.
डिसअ‍ॅड्व्हांटेजेस - तुलनेत महाग असतात. वेगळा साबणचुरा वापरायला लागतो. एकाठिकाणी फिक्स करायला लागते (?)

फ्रंट लोडिंग परफॉर्मन्स मध्ये जास्त चांगले असते . पण तरी ही भारतात पॉप्युलर नाहीये ते कारण नळाचे पाणीच लागते त्याला , बालदीने पाणी घालण्याची सोय नाहीये त्यात आणि आपल्याकडे अशी सोय असणं गरजेचं आहे

थँक्स, आमच्याकडे गेली ५-६ वर्षे एल जी चा टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटीक वा म आहे. नेक्स्ट कधी घेतला तर फ्रंट लोड घ्यावा असे वाटते.

तसे मी एकदाही तो वापरला नाहीये (घरी काम करायचे या विचारानेच मला कसेतरी होते, हॅट्स ऑफ सर्व ग्रुहिणी आणी काम करत घर सांभाळनार्या स्त्रियांना) तरी घरी नविन फ्रंट लोड वा म घ्यायला सांगीतला तर काय रीअ‍ॅक्शन देतील काय माहीत.

इथे बरेच सल्ले मिळाले होते, म्हणून अपडेट- एलजीचे वॉम घेतले. टॉप लोड, ६.५ किलोचे.

सॅमसंगही अंतिम यादीत होते. पण त्याचं नवीन डिझाईन केलं आहे, ज्यात झाकण उघडताच एक छोटा कप्पा आहे- मोजे, रुमाल वगैरे लहान कपडे धुण्याकरता, किंवा कॉलर घासण्याकरता. तो मला अनावश्यक वाटला. त्याशिवाय आता मशीन नाहीच मिळत. त्यामुळे सॅमसंग बाद केले.

पॅनॅसोनिकचेही आवडले होते. पण वॉम करता ती कंपनी रेकमेन्ड केली जात नाही फारशी. एलजीचे रिपोर्ट्स सगळीकडूनच चांगले होते. फक्त या मशीनमध्ये 'सोक' ऑप्शन नाहीये. पण कपडे आधीच भिजवलेले असतात, त्यामुळे फारसं बिघडत नाही आणि नसले, तर थोडा वेळ भिजवून ठेवून मग मशीन चालू करता येतंच. त्यामुळे गैरसोय वाटली नाही. मोटर चांगली आहे. कपडे चांगलेच घुसळून निघत आहेत.

सल्ला देणा-या सर्वांचे परत एकदा आभार.

Pages