कोणते वॉशिंग मशिन घ्यावे.

Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23

मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एरिअल जास्त चांगलं आहे असं माझं मत. त्यातल्यात्यात स्वस्त हवं असेल तर टाईड पण चांगलं आहे. (दोन्हींची फ्रंट लोड टाईप लिक्विड्स)
शक्यतो ४० डिग्री से. ची सायकल चालवतो मी आणि जास्त मळकट असतील कपडे तर ६० डिग्री आणि सोक १०-१५ मिनिटं...

एरिअल जास्त चांगलं आहे असं माझं मत.>>आधी एरिअलच वापरत होते मी...बट poor results...कदाचित पाण्याचा पण फरक असेल तर काय माहीत...आमच्याकडे खूपच hard water आहे...पण surf exel वापरतेय तेव्हापासून मी machine ची setting पण change केली...आधी अर्धा तास चालायची machine आता तर 15 मिनिटांतच मस्त cleaning होतंय ...

एरीयल, सर्फ एक्सेल आणि जेंटील सगळे लिक्वीड आलटून पालटून काही वर्षे वापरत आहोत. तिन्हीत चांगले निघतात. या वर्षी फ्रंट लोड वरून टॉप लोडवर शिफ्ट झालो, तरीही फरक जाणवला नाही.
पण मी निवडलेल्या मॉडेल मध्ये हिटर फक्त एका ऑटो सायकल मध्ये चालते आणि त्यात तापमान डिफॉल्ट एकच लेव्हल आहे ते बदलता येत नाही. नवीन रेस्पी डाऊन लोड केल्या पण त्यात हिटर वाली नवी सायकल नाही. रिक्वेस्ट केलीय samsung ला दोन चार हिटर रेस्प्या add करा म्हणुन.

पाॅडस् कुणी बघितले आहेत का वापरून. मला विकत घ्यावेसे वाटतायत पण कुणी पाॅड्स आधी वापरले असतील तर प्लीज अनुभव सांगा

कपड्यांचा रंग fade न होण्यासाठी काही उपाय आहे का? मी surf excel powder वापरते कारण घरी liquid आवडत नाही. Samsung front load मशीन आहे घरी.

मी surf excel powder वापरते कारण घरी liquid आवडत नाही. Samsung front load मशीन आहे घरी.
>>
माझ्याकडे पण Samsung front load आणि surf excel quick wash पावडर.
लिक्वीड वापरून बघू आता.
तुमच्याकडे लिक्वीड न चालण्याचं कारण काय? काही निगेटिव्ह अनुभव???

मी डोस कमी वापरतो नेहेमीपेक्शा. ६० मिलि किंवा एक पूर्ण स्कूप सांगितलेला असेल तर ४५ मिलि - पाऊण स्कूप असं वापरतो मी. बर्‍यापैकी टिकतात रंग. आणि हो नेहेमीच एक्स्ट्रा रिन्स अ‍ॅड करतो प्रोग्राम मध्ये...

तुमच्याकडे लिक्वीड न चालण्याचं कारण काय? काही निगेटिव्ह अनुभव??? >>>> old schools. अधिक सांगणे नलगे

Pages