कोणते वॉशिंग मशिन घ्यावे.

Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23

मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वशिंग मशिनची टेक्नॉलॉजी एवढी साधी आहे की शक्यतो कोणत्यात ब्रॅन्डला अडचण येत नाही फक्त फॅमिली रिक्वायरमेन्ट पाहून योग्य मॉडेल निवडावे. कारण प्रत्येक मॉडेल हे त्याच्या वापरकर्त्याच्या गरजा लक्षात ठेवून बनवलेले असते. कोणाला एक्दम सिम्पल चालते तर कोणाला बरेचसे फीचर्स असलेले. मग किमती त्यानुसार बदलतात. उपलब्ध जागा, पाणी यानुसार मॉडेल निवडायला मर्यादा येतात.

आमच्या भाड्याच्या जागेत आम्ही बाथरूम लहान असल्याने ते बाहेर ठेवले आहे आणि प्लॅस्टिकच्या नळीने पाणी त्यात सोडतो त्यामुळे भान्डे भरेपर्यन्त पाहात बसावे लागते परमनन्ट फिक्स्चर मध्ये पाणी आपोआप बन्द होते . असे फायदे तोटे. बहुतेक गॅजेट्स नामवन्त कम्पन्यांचे असल्याने त्याला किमान दर्जा असतोच पण वॉ म., फ्रीज हे दुकानात चालवून पाहता येत नाही/टेस्ट करता येत नाहीत (टीव्ही,म्युझिक सिस्टीम सारखे). त्यामुळे घरात पीस आल्यावरच तो विशिष्ट पीस त्रास देतो का हे कळते. मग मात्र आफ्टर सेल्स सर्व्हिसवाले फार त्रास देतात. जिथून घेतला ते कमपनीच्या सर्वीस सेन्टरचा नम्बर देऊन बाजूला होतात.
त्यासाठी विजय सेल्समधून घेतले तर विजयवाले स्वतः कम्प्लेन्ट घेतात आणि त्याचा कम्पनीकडे फॉलो अपही करतात. विजयवाल्यान्चा स्वतःचा कम्प्लेन्ट रजिस्ट्रेशन नम्बर असतो. मात्र त्यांच्याकडे काही विशिष्ट कम्पन्यांना कमी डिस्काऊन्ट मिळतो. (हा प्रचार नाही अनुभव आहे)मी स्वतः विजयमधून सॅमसंगचा फ्रीज घेतला इतरत्र त्यापेक्स्झा हजार पाचशेने कमी मीळत असूनही . एका मारवाडी मित्राच्या सल्ल्याने...

त्यासाठी विजय सेल्समधून घेतले तर विजयवाले स्वतः कम्प्लेन्ट घेतात आणि त्याचा कम्पनीकडे फॉलो अपही करतात.>>+१... ऑफ्टर सेल सर्व्हीस खूप मह्त्त्वाची आहे... त्यांच कॉल सेंटरपण आहे..

धन्यवाद बाजो Happy आमचं पण बाथरुम छोटं आहे. बाल्कनी मोठी असली आणि तिथे नळ असला (जोडणीसाठी) तरी इलेक्ट्रिक पॉइंट नाहीये तिथे Sad म्हणून आतच मशिन ठेवावं लागणार. तसं मशिन विजय सेल्स मधूनच घेतोय. आफ्टर सेल्स सर्व्हिस महत्वाची आहेच.

रेफ्रिजरेटर साठी एखादा धागा आहे का? मला मिळाला नाही. त्यातपण सिंगल डोअर वि. डबल डोअर यात थोडसं संभ्रम आहे.

कालच फ्रंट लोडींग वॉ.म बघुन आलो. ईथे वाचुन गेलो त्यामुळे ifb आणी simens या शिवाय दुसरीकडे लक्षच दिले नाही. ifb चे मशीन simens पेक्षा जरा स्वस्त वाटले. पण आत मध्ये ड्रमला जे बार असतात ते simens ला स्टीलचेच होते आणी ifb ला फायबरचे. क्रोमाचा सेल्समन सांगत होता स्टीलचे चांगले तर विजय सेल्स चा बोलला की त्याने काही फरक नाही पडत. क्रोमाला ifb चे महाग वाटले विजय सेल्स पेक्षा. अजुन कोणी डिलर असेल तर सांगा गोरेगांव साईडला.

क्रोमाला ifb चे महाग वाटले विजय सेल्स पेक्षा.>> ह्ये दोघबी म्हागच आहेत.
लोकल दुकानात चौकशी करायची. बार्गेन करायचं.
इव्हन विजय सेल्स वाल्याला देखील बार्गेन करु शकतो.

क्रोमाला ifb चे महाग वाटले विजय सेल्स पेक्षा.>> ह्ये दोघबी म्हागच आहेत.>>>>>>>>>>> महाग असल्ले तरी बेस्ट....ifb ची नवी रेंज आलि आहे मी वर्षभर पुर्वी घेतली..नंबर आठवत नाही..पण आम्हि ती १८००० ल घेतली....कपडे छान धुवुन निघतात

झकास अरे आफ्टर सेल्स सर्व्हीस पण महत्वाची आहे रे. विजय सेल्सवाल्यांची त्यांची स्वतःची असते त्यामुळे तो ऑप्शन बरा वाटतोय.

एलजीचे एक फिचर खूप मस्त आहे. त्याच्या मोटरच्या अ‍ॅक्सललाच ड्रम जोडलेला आहे. इतर मशीनमध्ये मोटर आणि ड्रम यांच्यामध्ये एक बेल्ट असतो. बेल्ट-विरहीत तंत्रज्ञानामुळे वीजबचत, कमी आवाज असे फायदे आहेत. पण मुद्दलातली मोटर कशी आहे ते एलजीच्या बाबतीत तपासले पाहिजे.

ifb आणि simens दोन्ही कंपन्याच आफ्टर सेल्स सर्विस देतात. विजय सेल्स अथवा क्रोमाचा त्यात काहीही संबंध येत नाही. जोडणी करायला जो माणूस येतो तो पण कंपनीचाच असतो, विजय सेल्सचा नाही. त्यामुळे फक्त हाच मुद्दा असेल तर विजय सेल्स अथवा क्रोमाकडे जायची गरज नाही.

मी दसर्‍याला IFB फ्रंट लोडिंग घेतला, 'विजय सेल्स' मधून. बहुतेक सेनोरिटा मॉडेल आहे. ड्रम स्टीलचा आहे माझा. यात कपडे अगदी स्वच्छ निघतात आणि जवळपास वाळलेले असतात, त्यामुळे नंतरचा पण वेळ वाचतो. काही शर्टचे कॉलरला जरा धक्का लागलाय, पण त्यांची आधीपासूनच तशी अवस्था होती.

फक्त एकच म्हणजे 'नॉर्मल वॉश' चा वेळ जवळपास २ तास आहे Sad आणि क्विकवॉश चा १ तास, कारण याच्या एक लेव्हल खालचे मॉडेल, जे माझ्या मित्राकडे आहे त्यात या दोन्ही वेळा निम्म्या आहेत.

अर्थात कपडे आधी भिजवून ठेवावे लागत नाहीत Happy आणि मळलेल्या चादर-बेडशीट एकदम नव्यासारखे स्वच्छ निघतात त्यामुळे खुश आहे.

आफ्टर-सेल्स सर्विस बद्दल माहिती नाही पण वर दिलय तसं 'विजय सेल्स'वाल्यांची स्वतःची सर्विस असल्याने फायदाच होईल.

. जोडणी करायला जो माणूस येतो तो पण कंपनीचाच असतो, विजय सेल्सचा नाही. त्यामुळे फक्त हाच मुद्दा असेल तर विजय सेल्स अथवा क्रोमाकडे जायची गरज नाही.>>> +१

फक्त एकच म्हणजे 'नॉर्मल वॉश' चा वेळ जवळपास २ तास आहे अरेरे आणि क्विकवॉश चा १ तास>> जरा जास्तच आहे. Happy

टॉप मध्ये हा वेळ कमी आहे बहुतेक.
माझ्या मशीन मध्ये ४५ मिनिटाच सायकल आहे.
क्विक वॉश कमी कपड्यांसाठी अजुन कमी वेळ.
ड्रम क्लीनिन्ग सायकल सगळ्यात मोठं. साधारण दोन तासांच. पण ते महिन्या दिड महिन्यातुन एकदाच करतो.

सेम हिअर.. व्हर्लपूल ७०० ए मॉडेल.
माझ्याकडे नॉर्मल वॉश विथ लो वॉटर लेव्हल ३७ मिनिटं. मिडियम ठेवली तर १ तास काही मिनिटं. टब क्लिन झकास म्हणतो तशी २ तासाची प्रोसेस... वैतागवाणी.

पाणी किती लागते?
सेमी ऑटोमॅटिक व ऑटोमॅटिक मशीनमधे पाण्याच्या वापरात किती फरक पडतो.
एकदा मशीन लावले की साधारणतः किती बादल्या पाणी लागते, याची कुणाला कल्पना आहे का?

माझ्याकडे आधी सेमी ऑटोमॅटिक सिंगल टब मशिन होते. त्याला एकावेळी कपडे धुताना एकदा रिंझ सायकल वापरली तर किमान ६-८ बादल्या आणि दोनवेळा रिंझ केलं तर किमान १२-१३ बादल्यांच्या आसपास पाणी लागायचं.

आता फ्रंट लोडींग वॉशिंग मशिन आहे, त्यामध्ये कपडे धुण्याच्या एका पुर्ण सायकलसाठी ३०-३५ लीटरपेक्षा जास्त पाणी लागत नाही असं सांगितलं आहे.

@ प्रसाद, मी दिल्लीमध्ये रहाते. मशिन बदलायचं महत्वाचं कारण पाणी न पुरणे हेच होतं आमच्याकडे. दिवसभरात ४-५ माणसांच्या कुटूंबासाठी फक्त ५०० लीटर पाणी मिळत असेल तर कमी वापराशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. (पाणी जास्त आलं तरी बिल्डींगमध्ये घरटी ५०० लीटरपेक्षा मोठ्या आकाराच्या पाण्याच्या टाकीला परवानगी नाहीये)

इतकं पाणी वाया घालवल्यावर काही दिवसातच पुण्यातही पाणीटंचाई जाणवायला लागेल हे नक्की कारण पाण्याचे स्त्रोत तर वाढणार नाहीयेत.

टब क्लिन झकास म्हणतो तशी २ तासाची प्रोसेस... वैतागवाणी. >> टब क्लिन म्हणजे नक्की काय? मी गेले १६ वर्षे वापरते आहे. व्हिडीओकॉन सेमी - ५ वर्षे , एल्जी टोप लोडींग गेली १० वर्षे.. तरी माहित नाही Sad
आता आधी मॅन्युअल नीट वाचायला हवे Happy

वर्षा , रिकाम मशीन गरागरा फिरतय त्येला टब क्लीनिन्ग म्हणत्यात. Lol

मशीन मध्ये कपडे न टाकता फक्त थोडी क्लीनीन्ग पावडर टाकुन टब क्लीनीग सायकल असतं ते सुरु करायच.
हे दोन तीन महिन्यातुन एकदा करा असं पुस्तकात लिहिलय. ह्याला वेळ लागतो जास्त.
पाणीही जास्त लागतं.

फ्रन्ट लोडीन्गला पाणी कमी लागतं टॉप लोडिन्गपेक्षा अस वाचलय मी कुठेतरी..

धन्यवाद अल्पना.
फुल्ली अन सेमी ऑटोमॅटिकमधे पाणी वापराचे तुलनात्मक प्रमाण याबद्दल कुणी सांगितलेत तर बरे होईल.

सबका बॉस बॉश बद्दल कोणीच कसे काय बोलले नाही ? नवीन वॉशिंग मशीन घेण्याची वेळ आली तर मी नक्कीच बॉशचा विचार करीन. बॉश व सिमेन्स्‌ ह्या तोडीस तोड कंपन्या आहेत. आय. एफ. बी देखील पूर्वी बॉशचेच तंत्रज्ञान वापरत होती. कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे काही गुंड्या (विशेष करून मटेरिअल क्वालिटीबाबत) बॉशने नक्कीच आपल्याकडे ठेवलेल्या असणार. म्हणून मी आता बॉशला प्राधान्य देईन.

फ्रंट लोडींग वॉशिंग मशिनला विज बील कमी येते असे एकले आहे. आय बी एफ चे मशिनची कींमत आमच्यकडे २२००० सांगितली Sad

विज बिल कमी येत नाही कारण फ्रंट लोडींगची सायकल टॉप लोडींगपेक्षा जास्त वेळ चालते. पण पाणी नक्की कमी लागते.

किंमत त्यांच्या साईटवर पण त्याच दरम्यान दिसतेय म्हणजे बरोबर आहे.

लॉफ्ट टँक साठी फ्रंट लोडींग सुटेबल नाही असं सांगितले गेल्याने तसेच बरेच चांगले टॉप लो डींग ला पण प्रेशरचा ईश्श्यु सांगितल्याने कन्फ्युजन झालंय.. आमच्याकडे सकाळी ४५ मि. पाणी येतं.. घरात २ टँक आहेत १ २००लि. अन १ ३०० लि. सुचवा काहीतरी... सेमी ऑटो.. घ्यायच मन होत नाहीये..

आय एफ बी चं टॉप लोडींग पण छान आहे. त्यात १५ ली पासून ४ च्या टप्प्यात पाणी सेट करतायेत त्यामुळे कमीत कमी पाण्यात वॉशींग होतं. पॉवर पण छान आहे त्याची. आणि पाणी वर खाली सर्क्युलेट होण्यासाठी साईड्नी पंप केलं जातं.

लॉफ्ट टँक साठी फ्रंट लोडींग सुटेबल नाही असं>> माझ्या मते प्रेशरचा इश्यु नसेल;.
पाण्याची क्वान्टिटीचा इश्यु आहे का?
टॉप लोडिन्गमध्ये पाणी जास्त लागतं. किती लिटर ते सायकल आणि कपड्यांच्या क्वान्टीटीवर अवलंबुन आहे.

सेमी ऑटो.. घ्यायच मन होत नाहीये..>> घेउ पण नकोस. अर्धवट वाटत मला तरी ते.
आपल्याला काम पडत त्यात. शिवाय त्याला जागा जास्त लागते.

घरात २ टँक आहेत १ २००लि. अन १ ३०० >>> सोसायटीचा टॅन्क नाहिये का सर्वात वरच्या मजल्यावर???

Pages