Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23
मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयएफ्बी
आयएफ्बी
आयएफ्बी
आयएफ्बी
IFB... using since last 2
IFB... using since last 2 years... siemens pan changle ahe front loading...
Samsung चे कुठलेही संपूर्ण
Samsung चे कुठलेही संपूर्ण स्वयंचलित घ्या. उत्तम आहे.
सिमेन्स-एक महिन्यापुर्वीच
सिमेन्स-एक महिन्यापुर्वीच घेतले.खुपच छान आहे.आवाज मुळीच नाही.
फ्रंट लोडींग का घ्यायचंय?
फ्रंट लोडींग का घ्यायचंय? त्यात कपडे अडकतात.
चालु स्थितीत असणारे कोणते
चालु स्थितीत असणारे कोणते घ्या........उत्तम
IFB फ्रण्ट लोडींग घ्या उत्तम
IFB फ्रण्ट लोडींग घ्या उत्तम आहे!
IFB चा ड्रम उत्तम आहे आणि फ्रंट लोडींग असल्याने कपडे घसरे दिल्या सारखे छान धुतले जातात..
टॉप लोडींग पेक्षा कपडे जास्त स्वच्छ निघतात... अगदी हाताने धुतल्या सारखे नसले तरी!
कपडे अडकतात??? दक्षिणा.. २
कपडे अडकतात??? दक्षिणा.. २ वर्षात माझ्याकडे तरी नाही अडकले.. शिवाय फ्रंट लोडिंग पाणी कमी वापरते आणि पावडरही..
मी पण गेली २ १/२ वर्ष फ्रंट
मी पण गेली २ १/२ वर्ष फ्रंट लोडिंग मशीन वापरतेय. सध्या व्हर्लपुल आणि आधी सिमेन्स.
उदयवन, नवीन मशीन घेताना कोणी बंद पडलेलं मशीन घेत नाही नां?
IFB, सॅमसंग आणि सिमेन्सच्या
IFB, सॅमसंग आणि सिमेन्सच्या काही फ्रंट लोडिंग मशीन्स मध्ये हल्ली ड्रायरची पण सुविधा उपलब्ध आहे.
नवीन मशीन घेताना ह्या सुविधेचा पण विचार करा.
गेली ५ वर्ष IFB चं मशीन वापरतोय. फ्रंट लोडिंग. काही प्रॉब्लेम दिलेला नाहीय अजुन.
आशुतोष... बरोबर.. माझ्याकडे
आशुतोष... बरोबर.. माझ्याकडे IFB ड्रायर सकट आहे... उत्तम काम करतो एकदम..
आमचा IFB चांगला नाही निघाला.
आमचा IFB चांगला नाही निघाला. खुपच आवाज करायचा. सर्विस पण नाही दिली त्यांनी चांगली. शेवटी एक्स्चेंज मधे LG घेतला. वोशिंगमशिन आणि ड्रायर. LG हा IFB पेक्षा कधीही उजवाच. दोन्ही कंपन्यांचे वॉशिंग मशीन वापरल्यानंतर अनुभवलेले बोल आहेत बरे हे!
फ्रंट लोडिंग चांगले कि टॉप
फ्रंट लोडिंग चांगले कि टॉप लोडिंग.
हप्त्यावर घेऊ कि एकदम कार्डावर बिल फाडू?
सॅमसंग चे टॉप लोडिंग घेतले तर?
मी एलजी ट्रॉम फ्रंट लोडिन्ग वापरले आहे. मस्त चालते. उत्तम सर्विस. इथे मला त्याहून स्वस्त मिळाले तर बर्या पैकी चालणारे हवे आहे.
माझ्याकडे एलजी टॉप लोडिन्ग
माझ्याकडे एलजी टॉप लोडिन्ग आहे. एक वर्ष झालं उत्तम सुरु आहे.
मार्केटात जाउन फार मोठ्या मॉल (क्रोमा वैगेरे) मधुन घेण्यापेक्षा छोट्या मोठ्या दुकानातुन स्वस्त मिळालं.
हजार रुपयाचा फरक पडला किमतीत. माझ्याजागी चांगलं बार्गेन करणारा असता तर अजुन ५०० रुपये कमी झाले असते.
एम आर पी जास्त असते. स्वस्तात मिळु शकते. हे लक्षात ठेवा.
माझ्याकडे एल जी टॉप लोडिंग
माझ्याकडे एल जी टॉप लोडिंग आहे गेली पाच वर्षे अजुनपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही (आमच्या बाई वापरत असुनही :हाहा:). मीच आता काहीतरी चेंज म्हणुन फ्रंट लोडींग घेणारे. किसनदेव म्हणताहेत त्याप्रमाणे जर कपडे आणखीन स्वच्छ निघत असतील तर नक्कीच घेणार
किसन्देव + १०० मी ही साधारण १
किसन्देव + १००
मी ही साधारण १ वर्शापासून IFB वापरतेय.. मस्त निघतात कपडे..
फ्रंट लोडींग का घ्यायचंय? अ ओ, आता काय करायचं त्यात कपडे अडकतात. >>> नाही ग्ग..
मार्केटात जाउन फार मोठ्या मॉल (क्रोमा वैगेरे) मधुन घेण्यापेक्षा छोट्या मोठ्या दुकानातुन स्वस्त मिळालं. >> खरयं
व्हर्लपूल तर फारच छान आहे.
व्हर्लपूल तर फारच छान आहे. त्याच्याबद्दल कोणिच का नाही बोलत काही?
Front loading मध्ये IFB राजा
Front loading मध्ये IFB राजा आहे !
अमा नविन घेणार असशील तर front loading आणि IFB च घे. मी गेली ९ वर्षं वापरतोय. Top loding मध्ये कॉलर थोडीशीच मळली असली तरी हाताने घासावी लागायचीच. पण front loading आल्यापासून ती कटकट गेली. चादरी, bedsheets वगैरे (extreme मळल्या नसतील तर) जराही घासाव्या लागत नाहीत. थोडक्यात कपडेवाली-free आयुष्य जगता येते
front loading मध्ये कपडे फाटत्/विरत पण नाहीत. सेनापतींनी म्हटल्याप्रमाणे पाणी आणि साबणही कमी लागतो. साबण कमी घालायची सवय करून घ्यायला थोडा वेळ लागतो. कारण कपडे फिरताना दिसत रहातात आणि भरपूर फेस नाही आला तर कपडे निघणार नाहीत अशी आपली सम्जूत असते. पण जास्त फेस front loading मशीनला सोसत नाही - IFB ला तरी. सर्फ, अरिअल वगैरेच्या front loading मशीनकरता वेगळ्या पावडरी मिळतात त्या वापराव्या. दिसायला महाग वाटतात पण खूप छान परीणाम देतात आणि मशीनही छान रहाते. मी 'ग्राहक' मध्ये मिळणारी supaer acto वापरतो. ती खूप स्वस्त पडते. (तुझ्या आजुबाजुला ग्राहक असेल तर त्या संघात सामिल हो. खूप फायदेशीर आहे).
रेशमी साड्या / ड्रेस पण छान निघतात front loading मध्ये - न फाटता. साबण amway मधे मिळणारा वापरावा आणि रग लागणार नाहीत असे बघावे.
आशुतोष IFB चे washer आणि dryer एकातच असते का आता? आणि स्टिम ड्रायरच आहे ना? काही वर्षांपूर्वी तरी दोन वेगळी units असायची. म्हणून मला हवा असून जागेअभावी ड्रायर घेतला नव्हता.
आमच्या व्हर्लपुलच्या सेमी
आमच्या व्हर्लपुलच्या सेमी ऑटोमेटिक मशीनला २० वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर निवृत्त करायची वेळ आली आहे. स्पिन ड्राय टबला गुद्दे मारून चालवावे लागतेय आणि कपडे पुरेसे कोरडे निघत नाहीत. ( टेक्निशियन सांगतोय की जोपर्यंत चालतेय तोवर चालवून घ्या, नवीन मशीन इतक्या चांगल्या चालत नाहीत)
व्हर्लपुलच्या अलीकडे निघालेल्या मशीन्स नाजूक वाटल्या.
कोणती नवीन मशीन घ्यावी?
आय एफ बीच्या मशिन्समध्ये स्टीम ड्रायर असतो का? भारतात तरी याची गरज पावसाळ्यापुरतीच असते. अमेरिकेतही लोक आता स्टीम ड्रायर म्हणजे उर्जेचा व्यर्थ उपयोग असे समजतात असे वाचल्याचे स्मरते.
आयएफ्बी उत्तम.
आयएफ्बी उत्तम.
मी वर लिहिल्याप्रमाणे सध्या
मी वर लिहिल्याप्रमाणे सध्या व्हर्लपूलचं फ्रंटलोडिंग वापरतेय. साबण एरियलचा फ्रंटलोडिंगसाठी असतो तो वापरतेय पण जाणवलेली गोष्ट म्हणजे शर्टची कॉलर आणि कफ्स स्वच्छ निघत नाहीत. मला प्रत्येक धुण्याच्या वेळेस कॉलर स्वच्छ व्हायचं लिक्वीड वापरावंच लागतं.
आडो, वॉ.मशीनचं माहित नाही पण
आडो, वॉ.मशीनचं माहित नाही पण व्हर्लपूलच्या फ्रिजचा माझा अनुभव अतिशय वाइट आहे. त्यांचे डिझाईन इतके वाईट आहे की भाज्या फळे ३-४ दिवसातच खराब होतात. म्हणजे प्रॉडक्टची मूळ गरज पण ते पूर्ण करत नाहीत असे दिसतय. value additions द्यायचे तर दूरच राहिले.
माधव, आमच्याकडचे व्हर्लपुलचे
माधव, आमच्याकडचे व्हर्लपुलचे वॉ म अणि फ्रीज दोन्ही छान निघालेत. खरे तर वॉ म चांगली निघाली म्हणून फ्रीजसुद्धा व्हर्लपुलचाच घेतला.
माझ्या आईकडे सुद्धा सिमेन्सचं
माझ्या आईकडे सुद्धा सिमेन्सचं वॉशिंग मशीन आहे ... २००० सालापासून. आजपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. खूपच छान आहे.
व्हर्लपूल तर फारच छान आहे.
व्हर्लपूल तर फारच छान आहे. त्याच्याबद्दल कोणिच का नाही बोलत काही?>>
दक्स, माझ्या त्यावेळच्या मार्केट स्टडीप्रमाणे व्हर्लपुल बाकीच्या मॉडॅलपेक्षा २००० रु महाग होते.
माझ्याकडे गेल्या दिड
माझ्याकडे गेल्या दिड वर्षापासून एलजी स्ट्रॉम फ्रंट लोडींग मशिन आहे. जुन्या टॉप लोडींग सेमी अॅटोमॅटिक मशिनला पाणी पुरत नव्हतं म्हणून फ्रंट लोडींग मशिन घेतलं. पाणी खूप कमी लागतं, वॉशिंग पावडर पण कमी लागते. फेस झाला नाही पाहिजे, त्याने मशिन खराब होतं असं सांगितलं होतं आम्हाला.
कपडे टॉप लोडींग मशिनपेक्षा स्वच्छ निघतात, अगदी हाताने धुतल्यासारखे (खरंतर त्याहीपेक्षा जास्त स्वच्छ). खूपच जास्त मळक्या कॉलर्स असतिल तरच ते कॉलरला लावायचं लिक्विड वापरावं लागतं आम्हाला. सिल्कचे कुर्ते, लोकरी कपडे, कोट, ब्लँकेट्स पण धुतले आहेत मी, अॅमवेचं लिक्विड डिटर्जंट वापरुन. कधीच काहीही त्रास झाला नाही.
माझ्या मशिनमध्ये ड्रायर ऑप्शन नाहीये. ५ हजार जास्त किंमत होती ड्रायरवाल्या मॉडेलची. भारतात याची काय गरज असा विचार करून आम्ही घेतलं नाही. पण नंतर हिवाळ्यामध्ये जर ड्रायरवालं मॉडल असतं तर किती सोप्पं झालं असतं असा विचार डोक्यात आला होता. वॉशर आणि ड्रायर एकत्रच असणारे मॉडेल्स आहेत आता बाजारात. जर तुमच्या घरात कपडे वाळवायला जागा कमी असेल तर ड्रायर असलेला बरा.
मी आयएफबी च्या जुन्या फ्रंट लोडींग मशिन्सचा अनुभव घेतला आहे. त्यांचा खूप जास्त आवाज येतो आणि व्हायब्रेशन्स जाणवतात. एलजीचा आवाज खूप कमी येतो. कदाचीत आयएफबीच्या नविन मॉडेल्सचा आवाज येत नसेलही.
मला पण व्हर्लपुलचा फार चांगला
मला पण व्हर्लपुलचा फार चांगला अनुभव आहे म्हणून मी तोच घेतलाय.. फ्रिज आणि वॉम दोन्ही सुद्धा. दोन्ही छान चाललंय.
फ्रंट लोडींग मशिन खुप हलते
फ्रंट लोडींग मशिन खुप हलते आणि आवाजही करते असा माझा अनुभव आहे, जाणकारांनी प्रकाश टाकावा
फ्रंट लोडींग मशिन टॉप
फ्रंट लोडींग मशिन टॉप लोडींगपेक्षा बरेच महाग आहे. त्यामुळे मी नुकतेच एलजी चे टॉप लोडींग घेतले. स्टील ड्रम आणि दोन फिल्टर आहेत. लाल मातीत मळलेले , ( आणि सिमेंटमधे मळलेले! ) कपडेही चांगले निघताहेत. पण शर्टच्या कॉलर एकदम साफ निघत नाहीत. तरीही हे मशिन आवडले आहे.
व्हर्लपुलची कस्टमर सर्विस चांगली नाही असे ऐकले आहे.
Pages