कोणते वॉशिंग मशिन घ्यावे.

Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23

मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे टॉप लोड बहुतेक एल जीचे होते. ते सात वर्शांनी बंद पडले. खूप वापरल्यानी. आता व्हर्ल्पूल चे टॉप लोड घेउन टाकेन.

एलजी डायरेक्ट ड्राईव्ह ड्रम वापरतं. म्हणजे मोटर आणि ड्रम ला जोडणारा पट्टा यात नाही. यामुळे याची द्युरेबीलिटी वाढते असं ते म्हणतात आणि डिडि मोटर वर १० वर्षे वॉरंटी देतात.
आयएफबी ओल्ड स्कूल मॅकॅनिझम वापरतात पण ४ वर्षे संपूर्ण मशीनची (अगदी बटन्स सुद्धा) वॉरंटी देतात आणिक पुढे १० वर्षे सपोर्ट आहे.

सॅमसंग अजून काही वेगळी टेक वापरत म्हणे त्यात आत-बाहेरचे ड्र्म्स एकमेकांविरुद्ध फिरतात.

फ्रंट लोडींगमध्ये आयएफबी शक्यतो नको (मी एकेकाळी त्याचा चाहता होतो.) ३ वर्षांनी मशीन प्र चं ड आवाज करायला आणि हलायला लागते. त्या प्रचंड हलण्याने मग नाजूक भाग खराब होउन / लूज होऊन मशीन खराब व्हायला लागते. आयएफबीचा सपोर्ट अत्यंत टुकार आहे.

डायरेक्ट ड्राइव्हची अनेक मशिन्स आता बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्यामधून आपल्या गरजेनुसार (कपडे धुण्याची क्षमता, प्रोग्रॅम्स इ) निवड करावी.

मी मायबोलीवरील सल्ले वाचूनच IFB Front Load (Senorita Smart) घेतली २०१६ मध्ये. परंतु माझा अनुभव चांगला नाही. Front Load पेक्षा आधीच्या Top Load मध्ये कपडे जास्त स्वच्छ होत असत. काय कारण असावे?

माझं सेमी आहे, ते आता नखरे करतंय. नवरा म्हणतोय आता fully automatic घेऊया, मी नको म्हणतेय. एकतर चालतंय तोपर्यंत हे चालुदे मग बघू असं माझं म्हणणे आणि इथली चर्चा वाचून घेतलं नवीन तर सेमीच घेईन या मतावर आलेय. हे माझं सात आठ वर्ष चांगलं चाललंय.

इथे सगळे ऑटोमॅटिकवाले म्हणून मी घाबरून लिहीत नव्हते. पण अंजुचा प्रतिसाद वाचून लिहितेच आता. मी 1995 साली घेतलेले व्हिडिओकाँन चे सेमी ऑटोमॅटिक 2015 पर्यंत वापरले. मशीन कधीही बिघडले नाही पण पाणी ड्रेन करायचा दोरा नंतर तुटायला लागला. ती कंपनी बहुतेक बंद पडली किंवा त्या टाइपच्या मशीनी बनवायच्या बंद झाल्यामुळे दीर्घकाळ टिकेल असा दोरा मिळणे कठीण झाले. त्यात 20 वर्षे एकाच मशिनीला चिकटून राहिल्यामुळे घरचेही मला बोलायला लागले. शेवटी कंटाळून चांगली काम करणारी मशीन ओळखित देऊन टाकली फुकट. पण नवीन सेमीच घेणार यावर ठाम होते. पॅनासोनिकची सेमी मिळाली. एकदम मस्त चालते. व्हरपुल फ्रंट लोड वापरलीय भावाकडे, पण ती कपडे साफ धुत नाही असे उगीचच वाटते.

साधना, सेम पिंच!
इकडे लोक नवीन मशिन घ्यायचे म्हणून विचारत आहेत आणि माझे १९९३ सालचे व्हिडिओकॉन ऑटोमॅटिक मशीन वापरात आहे. अजूनही ठणठणीत आहे.मात्र इतक्या वर्षात एप्रिल २०१९ पासून रोज वापरात आहे.बाकी इतकी वर्षे आठवड्यातून १-२ वेळ वापरात होते.काम करणारीला वापरायला सांगितले तर नको म्हणाली. त्यापेक्षा हाताने पटकन होतात.तर इतके जुने मशीन मी वापरत आहे त्यामुळे मला खूपच बापुडवाणे वाटायला लागले होते.
रच्याकने,पाणी ड्रेन करायचा दोरा नंतर तुटायला लागला म्हणजे काय? पाइप का?

व्हिडिओकॉन चांगली कंपनी होती वॉशिंग मशीन ची . का बंद झाली काही कळत नाही. आमच्या आई कडे पण व्हिडिओकॉनचे सेमी आहे 1999साली घेतले होते एकदा फक्त मोटर बदलली ते पण 2018मध्ये. अजुन चालु आहे.
रच्याकने,पाणी ड्रेन करायचा दोरा नंतर तुटायला लागला म्हणजे काय? पाइप का? >>>पाईप नाही.
ड्रेन करायचे एक बटन असते जे लेफ्ट साइड असे ढकलायचे असते. म्हणजे ड्रम मधले पाणी बाहेर पडते पाईप मधुन. त्या बटन ला आतल्या साइड ला एक पुलि सारखे असते त्याला एक दोरी attach असते. ती दोरी आत मशीन मध्ये एका कशाला तरी परत ड्रम च्या एका पार्ट ला बांधलेली असते. बटन एका साइडला सरकवल्यावर ती दोरी ओढली जाते पर्यायाने ती ज्याला बांधली असते ते वर उचलेले जाते. अणि ड्रम मधले पानी पाईप मधुन बाहेर पडते.
आमची दोरी पण तुटली अणि बटन ही खराब झाले तर घरात असलेली एक दोरीड्रम च्या त्या पार्ट ला बांधली अणि बाहेर ठेवली आता पाणी ड्रेन करायच्या वेळी ती दोरी ओढून धरावे लागते. सोडून दिली की पाणी जाणे थांबते. पण पाणी जाई पर्यंत दोरी हातात घेउन बसावे लागते.

Bosch कंपनी चे auto वॉशिंग मचिनचांगले आहे. कुणी वापरले आहे का ईकडे. माझ्या मावशी कडे सैमसंग चे ऑटोमेटिक आहे. रोज वापरते ती 6वर्षे झाले चांगले आहे. टॉप लोड आहे. कपडे ही चांगले निघतात.
ऑटोमेटिक चा फायदा म्हणजे एकदा चालु करुन दुसरी कामे करु शकतो सारखे मशीन जवळ जावे लागत नाही.

हुश्श आहेत सेमीवाले. मला वाटलंकी सेमी fan मीच का.

सर्वात बेस्ट सेमी मशीन व्हिडीओकॉन. कंपनी मात्र आता बंद पडलीय. मी किती वेगवेगळ्या कंपनीची वापरली आहेत सेमी मशीन्स, टीकलं मात्र हेच. आता ड्रायरचा टायमर नखरे करतोय. प्लस पाण्याचं बिघडलं आहे, ड्रेन न करता पाणी ड्रेन होत रहातं, अगदी खूप प्रमाणात नाही तरीही होतं , पाणी भरले जातं मशीनमध्ये आणि मशीन सुरु केल्यावर अगदी कमी ड्रेन होतं पाणी. इथे बऱ्याच जणांना ड्रेन होत नाही हा prblm येतोय आणि मला ड्रेन होतं हा. दाखवणार आहे कोणालातरी.

माझं १९९२ /९३ साली घेतलेलं व्हर्लपूल सेमी ऑटोमॅ टिक आहे अजून. काही पार्ट्स बदललेत. पण व्यवस्थित चालतेय.

व्हिडिओकॉन सेमी १७ वर्षं वापरलं. कपडे इकडून तिकडे टाकणं वगैरेत वेळ जाणे परवडत नसल्याने ३ वर्षांपुर्वी एलजी फुल ऑटोमॅटिक घेतले. सासरच्या मूळ घरी पॅनासोनिक फुल ऑटो घेतले. दोन्ही मशीन उत्तम चालू आहेत. धुलाई उत्तम. वेळ वाचतोय आणि लक्ष ठेवण्याची गरज नसल्याने इतर कामं होतात. चक्क बाहेरची कामंही करायला जाऊ शकतो आपण. कपडे वाळत घालायच्या दांड्याही वर-खाली करायच्या करून घेतल्याने ढीगभर कपडे धुवायला वाळत घालायचा जराही कंटाळा येत नाही. सेमी ऑटोमध्ये पाण्यामुळे जड झालेल्या व गुरफटलेल्या चादरी बेडशीट्स इकडून तिकडे टाकणे वैतागवाणे वाटायचे.

ड्रेन न करता पाणी ड्रेन होत रहातं, अगदी खूप प्रमाणात नाही तरीही होतं , पाणी भरले जातं मशीनमध्ये आणि मशीन सुरु केल्यावर अगदी कमी ड्रेन होतं पाणी. >>>
हा प्रॉब्लम लगेच सॉल्व होतो मशीन च्या खाली कुठल्या तरी पार्ट च्या इथे कचरा साठून राहिल्या मुळे असे होते तो कचरा काढून टाकला की ठिक होते.किंवा मी वरती लिहलेली दोरी ज्या पार्ट ला बांधली गेली असते तो थोडासा वर उचलला असेल .
सेमी चा सगळ्यात कंटाळवाणा भाग म्हणजे ड्रायर ला कपडे लावणे एकसारखे लेवलींग नाही केले तर थाडथाड वाजत राहते.

सोडून दिली की पाणी जाणे थांबते. पण पाणी जाई पर्यंत दोरी हातात घेउन बसावे लागते.>>>
मी केलेय हे काम Happy Happy

आत्ताच्या अमेझॉन sale मधून bosch चे फ्रंट लोड मागवले आहे, १९ ला येईल. पण आईकडे दोन्ही मशीन वापरण्याचा अनुभव घेतला आहे, त्यामुळे सेमी चे इतके फॅन्स कसे असं वाटलं. मशीन चांगलं चालतं किंवा बिघडत नाही हे कबूल आमचं पण परत देईपर्यंत चांगलं चालू होतं पण ते मेन ड्रम मधून ड्रायर मध्ये कपडे टाकणं म्हणजे दिव्य, कसेही वेडेवाकडे कपडे गुंतलेले असतात आणि कितीही काळजीपूर्वक काढले तरीही ते ओघळले जातात, शेपलेस होतात या आणि फक्त या कारणामुळे माझ्याकडून सेमी साठी बिग नो. ऑटोमॅटिक मस्त धुलाई आणि कपडे तिथेच वळल्यामुळे नो गुंतागुंत.

साध्वी >>>+11111 सेमी चांगलं असतं.. Automatic लवकर खराब होतं... यावर माझाही विश्वास नाही... आपल्या वापरावर कोणत्याही वस्तूचं लाइफ अवलंबून असतं असं मला वाटतं... बर्‍याच जणांचे मशीन अगदी 90 च्या दशकातले आहेत आणि सुस्थितीत आहेत.. खरंच great.. खरंतर आधीच्या सगळ्याच वस्तू मजबूत आणि टिकाऊ राहत होत्या.. आता facilities वाढल्या पण नाजूकपणाही वाढलाय...

माझं १९९२ /९३ साली घेतलेलं व्हर्लपूल सेमी ऑटोमॅ टिक आहे अजून. काही पार्ट्स बदललेत. पण व्यवस्थित चालतेय. >>> हे पण होतं, चांगलं चाललं, एक दोनदा दुरुस्ती करावी लागली, पाच सात वर्ष वापरलं बहुतेक मग तिसऱ्यांदा दुरुस्ती आल्यावर बदललं, samsung घेतलं ते एकदम बेकार, पहिले ओनिडा पण त्रास देणारे होते. पण over all त्यांचे ड्रायर खराब निघाले, तक्रार केल्यावर एकदा कंपनीने फुकट बदलून दिलेले खूप जणांना. व्हिडीओकॉन मात्र सात आठ वर्ष अजिबात दुरुस्ती नाही केली, आता ड्रायरपण नखरे करतोय, नवीन सेमीच घेईन म्हणतेय.

अर्थात जितकी वर्ष जी जी मशीन्स टिकली त्याची दुप्पट वर्ष धरायला हवीत, आमच्याकडे काम पडते बिचाऱ्यांना बाकीच्यांपेक्षा जास्त.

सेमी ऑटोमॅटिक लौकर खराब होत नाही, पूर्ण ऑटोमॅटिक लौकर खराब होतं हा निष्कर्ष कसा काय काढला?
कुठली घ्यावी हा वैयक्तीक निर्णय आहे.

व्हिडीओकॉन मात्र सात आठ वर्ष अजिबात दुरुस्ती नाही केली>>>>>> माझ्या मशिनला आता लिंबूमिरची नाहीतर काळा धागा बांधावा लागेल.इतक्या वर्षांत एकही दुरुस्ती नाही.अगदीच खोड काढायची तर जागा बदल केल्यानंतर,मशिनच्या बाहेरच्या बाजूने ग्लू यायला लागलेला.तेव्हा मेकॅनिकही म्हणाला मशिनमधे दोष नाही,शिफ्टिंगमुळे कदाचित झाले असेल.नंतर त्याने ग्लू पुसून काढला.त्यानंतर परत बाहेर आलाच नाही.

आमच्या घरातली ही एकमेव अस्तू आहे,जिला दुरुस्तीची गरज भासली नाही.अतिशय कमी वापर हे मुख्य कारण असावे.

सेमी ऑटोमॅटिक लौकर खराब होत नाही, पूर्ण ऑटोमॅटिक लौकर खराब होतं हा निष्कर्ष कसा काय काढला?>>>>

इथे आपापले अनुभव देणे सुरू आहे ना? निष्कर्ष काढायला दोन्ही प्रकार वापरल्यावर काढता येईल. मी सेमी वापरत असल्याने मला ती बरी वाटते, ऑटोचे माहीत नाही.

इलेक्ट्रॉनिक वस्तू टिकल्या तर चांगल्या टिकतात, नाही तर पहिल्या दिवसापासून नखरे सुरू. मी व्हिडिओकान वशिंग मशीन व फ्रीज एकत्र घेतले. मशीन 20 वर्षे चांगली चालली, फ्रिजने सुरवातीपासून नखरे सुरू केले. एकदोनदा सर्व्हिस सेंटरवाले घेऊनही गेले दुरुस्तीला पण काही फरक नाही. शेवटी कंटाळून फ्रीज काढून टाकला.

सेमी ऑटोमॅटिक लौकर खराब होत नाही, पूर्ण ऑटोमॅटिक लौकर खराब होतं हा निष्कर्ष कसा काय काढला? >>> मी नाही काढला हा निष्कर्ष. इथली चर्चा वाचून असं म्हटलं मी. पण नंतर काही जणांनी लिहीलंय फुल्ली ऑटोमॅटीक पण चांगलं असतं.

मी Bosch फ्रंट लोड वॉशिंग मशीन ८ वर्षा पासून वापरते आहे, आता पर्यंत काहीच प्रॉब्लेम न येता चालली पण काही दिवसा पासून बंद आहे काही पार्टस बदलायला लागतील आमच्याकडे हार्ड वॉटर प्रॉब्लेम आहे म्हणून काही पार्टस खराब झाले आहेत खर्च १० ते १५ हजार म्हणून आता नवीन मशीन घ्यावे असा विचार चालू आहे, Bosch चा अनुभव उत्तम आहे पण LG मध्ये काही नवीन टेकनॉलॉजि आली आहे स्टीम वॉश, डायरेक्ट ड्राईव्ह इत्यादी तर LG फ्रंट लोड मशीन कुणाकडे आहे का? स्टीम वॉश चा अनुभव कसा आहे? लवकर रिप्लाय करा please ह्या वीकएंड ला exchange मध्ये नवीन मशीन घ्यायचे आहे

या धाग्यावर १५ ऑक्टो. २०१२ ला प्रतिसाद लिहीला होता.

आयएफबी फ्रंट लोडींग फुल्ली अ‍ॅटोमॅटिक वापरतोय ३ वर्ष, अजुन तरी काही प्रोब्लेम नाही. जर मशीन आवाज करत असेल तर लेवेल पुन्हा एकदा अ‍ॅड्जस्ट करा. हलत असेल तर मोटर व ड्रमचा रबर बेल्ट सैल झाला नाही ना हे बघा, असल्यास बदलुन घ्या. इन्स्टॉलेशन्च्या वेळेस मागे ड्रम सुरक्षेसाठी दोन स्क्रु लावलेले असतात ते काढलेले आहेत ह्याची खात्री करा. असेही आयएफबी वाले ४ वर्षाची १००% गॅरंटी देतात.

आज २२ ऑक्टो. २०२० ला पुन्हा लिहीतोय.
मी घेतलेले आयएफबीचे मशीन दहा वर्ष झाले, व्यवस्थित चालु आहे. मधे ३/४ रेपेयर झाले ( ऑपरेटिंग पॅनल बोर्ड- वीज गडबड) पण मी रेगुलर एएमसी घेत असल्याकारणाने नुकसान नाही झाले.

आमच्या काकांना फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घ्यायची आहे पण १ मिनिटामध्ये बकेट ८ लिटर भरते. त्यांना सेमी ऑटोमॅटिक नको आहे. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन साठी पाणाच्या प्रेशरचा काय हिशेब आहे. कमी प्रेशर असताना कोणी काय उपाय केले आहेत का?

तीन ते चार माणसांच्या कपड्यांकरता, घरातल्या पाण्याच्या टाकीच्या नळावर चालेल असे एखादे टिकाऊ मशीन आहे का?
(घरातल्या टाकीच्या नळाचा दाब कमी असतो, त्याने काही फरक पडतो का?)

कुणी टॉप लोड आणि फ्रंट लोड दोन्ही वापरले आहेत का?
फ्रंट लोड मध्ये जेवढे स्वच्छ निघतात तेवढे टॉप लोड मध्ये निघतात का? विशेषतः चादरी?
टॉप लोड कधी वापरली नाही.

Fully automatic LG चे घेतले आहे आताच.
१) manual washing कसे करायचे त्याचा एक प्रयोग जमला नाही. एक चादर टाकली,पाणी टाकले बुडेल एवढे. Soak,wash,rinse अशा तीन टप्प्यांत काम करते पण एकदम wash करायचा प्रयत्न फेल झाला. ड्रम फिरलाच नाही.
ते स्टार्ट होत नाही. कुकुईकुई आवाज करून नापसंती व्यक्त करत होते.
दिवाळीनंतर पुढचे प्रयोग करणार.
२) manual spinning ( अगोदर बाहेर हाताने धुतलेले कपडे ड्रममध्ये टाकून फिरवून पाहिले ते जमले. ड्रम एक फेरी मारून तीस सेकंद थांबला.मग पुन्हा एक फेरी मारून थांबला. कपडे किती वजनाचे आहेत ते मशिनने अंदाज घेतला आणि स्वत:च पाच मिनिटांची वेळ निश्चित केली आणि ड्रम फिरू लागला. थोड्या हळू वेगात फिरून मग वेग दोन तीन टप्प्यांत वाढवत नेऊन ड्रम थांबला. एक मिनिटाने घंटी वाजली आणि END हा संदेश आल्यावर झाकण उघडून कपडे बाहेर काढले.
चालू असताना झाकण उघडायचे नाही, बदल करायचे नाहीत, करायचे असेल तर 'गो' चा बाणवाले बटण दाबून स्विच ओफ दाबायचे आणि मगच झाकण उघडायचे किंवा बदल करायचे. ऑटोमध्ये ढवळाढवळ करायची नाही. बघू .
वॉशिंगचे सर्व प्रयोग बाकी आहेत. झाल्यावर अपडेट देईन. सध्या पांढरा हत्ती झोपवला आहे. हौस फिटली आहे.
(( अगोदरचे टिवीएस ऑटमॅटिक नव्हते. काय वाटेल ते करू शकायचो. पण त्याचे रबर सील मिळेनासे झाले आणि वॉशिगचे forward backward turning बंद होऊन फक्त एकच forward होत राहिल्याने कपडे गुंडाळू जाऊ लागले. ))

Surf exel machine liquid वापरून पहा लोक्स....I am just loving it....Superb cleaning....माझ्याकडे IFB ची front load washing machine आहे...7 वर्षांपासून वापरत आहे....पण cleaning च्या बाबतीत मी समाधानी नव्हते...सगळे लोक ही machine चांगली का म्हणतात असं मला वाटायचं पण 6 महिन्यांपूर्वी surf exel चं front load machine liquid वापरुन पाहिलं आणि काय आश्चर्य जादू झाल्यासारखे कपडे अगदी स्वच्छ व्हायला लागले...सुरवातीला मी आनंदी नव्हते पण surf exel माझ्या आयुष्यात आला आणि माझे जीवनच बदलून गेले...Thanks to surf exel... Lol

Pages