फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिवा, आपले पाय ह्या बीबीला लागले. आम्ही धन्य झालो.
बीपीए फ्री आहे हे चौकसपणे विचारून इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
त्यावर असं लिहलय की ह्यात कणिक भिजवू नका? Uhoh
मी प्रामाणिकपणे साम्गते की मी मॅन्युअल वगैरे काही वाचत नाही. मॅन्युअल वाचावं लागणं म्हणजे प्रॉडक्ट युजर फ्रेंडली नाही असं काहीसं माझं पूर्वग्रहदूषित मत आहे Happy
मी न लाजता यात दर दिवसाआड कणिक भिजवते!

चिवा मागवलास का? हा छान असेलच, पण लालुने तो कणिक भिजवण्यासाठी सांगितलाय ना त्यातपण झक्कास होते कणिक भिजवुन. मशिन सुरु करुन घरभर फिरुन येऊ शकता व तो आपला कणिक तिंबतच रहातो. मुख्य म्हणजे पार्टीकरता ६०-७० पोळ्यांची एकदम भिजवुन होते.

शुम्पे Proud Proud Proud

सुनिधी, या हॅमिल्टनात गाजरं पण किसता येतील म्हणून हा घेतला. आणि स व स्त..

पण लालुने तो कणिक भिजवण्यासाठी सांगितलाय ना त्यातपण झक्कास होते कणिक भिजवुन. मशिन सुरु करुन घरभर फिरुन येऊ शकता व तो आपला कणिक तिंबतच रहातो. मुख्य म्हणजे पार्टीकरता ६०-७० पोळ्यांची एकदम भिजवुन होते. << हा कोणता?

मशिन सुरु करुन घरभर फिरुन येऊ शकता व तो आपला कणिक तिंबतच रहातो>> पण मी काय म्हणते, कणिक भिजवायला ३ मिनिटं वगैरे लागतात, त्यत कशाला घरभर फिरायची हौस? Proud Light 1

लाला (लालूचा लाडका) स्टँड मिक्सर पण मस्तच आहे कणकेसाठी पण त्याची किंमत पण मस्त आहे.

हो, महाग आहे खरा. आम्हाला ऑफिसने भेट दिला होता म्हणुन नाहीतर आम्ही कधी घेतला असता काय माहीत.

भारतात- पुण्यात मी ईनाल्सा व बजाजचे पाहिले आहेत जास्त. केनस्टार अजिबात घेऊ नका. कर्कश आवाज येतो साधा कूट करताना. फिलिप्सचे चांगले आहेत पण इतरांहून महाग आहेत. अल्पनाची मागच्या काही पानांवर आणखी एका ब्रँडबद्दल पोस्ट आहे.

शुभे मी घेतला रिकोचा एफपी-०१ . मस्त कणीक मळुन होतेय , भाज्या बारीक चिरल्या जातायेत. .ओलं खोबरे खोवायची अ‍ॅटॅचेमेंट आहे पण अजुन खोवुन्न बघितले नाहीये..

माझा इनाल्साचा आहे. फुप्रो मस्त चालतोय.

फुप्रोचा मिक्सर ग्राइंडर मात्र वापरले जात नाहीत. म्हणजे वाईट आहेत असं नाही. दुसरा मिक्सर ग्राइंडर आहे त्याचीच सवय आहे.

इथे भारतात कुठला घ्यावा फुप्रो?? मला ब्लेंडर कम फुप्रो पण चालणार आहे.
>>>>>> फिलिप्सचा ७५० वॅटचा आहे माझ्याकडे.सेकंदात सगळं बारीक होतं. Happy Wink हा बिघडलाच तरी असाच नवीन घेईन एवढा आवडलाय. फक्त पीठ मळून झाल्यावर साफ करणं जीवावर येतं Wink मी लोकल दुकानातुन घेतल्याने बाराच स्वस्त मिळाला. आणि हो, हा फुप्रो असल्यावर वेगळ्या मिक्सर ब्लेंडर ची गरज लागत नाहि.

मला सांगा, ते फिलिप्सचे हॅन्ड ब्लेंडर येते. त्यासोबत दो प्रकारचे अ‍ॅटॅचमेंट येतात. एक क्रीम / केकचे मिश्रण फेटायला वापरते. दुसरे जे हुक सारखे आहे ते कशाला वपरतात Uhoh

केन्स्टार बद्दल शुभांगी +१. एकदम बेक्कार आहे. एव्हड्या महागाचा डायरेक्ट टाकुन्ही देवत नाही Angry

भान, पीठ मळायच्या आधी कंटेनर आणि ब्लेड्स ना थोडा तेलाचा अभिषेक केलात, पाणी सांभाळून , हळूहळू घातलेत तर साफ करायची वेळही येऊ नये.

मशिन सुरु करुन घरभर फिरुन येऊ शकता व तो आपला कणिक तिंबतच रहातो. मुख्य म्हणजे पार्टीकरता ६०-७० पोळ्यांची एकदम भिजवुन होते. << पण मी काय म्हणते... या ६०-७० पोळ्या लाटून भाजतं कोण?

दुसरे जे हुक सारखे आहे ते कशाला वपरतात

मी ब्रेड करताना पिठाची पहिली तिंबणी करायला ते वापरायचे. पण हल्ली फुप्रोमध्येच तिंबते पिठ.

आहे ना आमच्याकडे एक बाई जी घरवाली पण आहे व कामवाली पण आहे. Happy ... चिरायचे काम रामागड्याकडुन करुन घेतले की सीताबाई बाकीचे पाहु शकतात व जास्त दमत पण नाहीत. Happy

आजच रोनाल्ड कंपनीच्या फूडप्रोसेसरचा डेमो घेतला.. चांगला वाटतो आहे.. पूर्ण पणे भारतीय बनावटीचा आहे.. किम्मत पण वाजवी आहे. http://www.ronaldmixers.net/ अधिक माहिती इथे आहे.
सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे फक्त दोन स्पीड आणि इंचींग न देता, एक फुल स्पीड, इंचींग आणि एक वेरियेटर दिला आहे ज्याने स्पीड एकदम कमी ते फुल स्पीड कुठेही व्हेरी करता येतो. नारळाची खवणी पण आहे.

रोनाल्डचा मागे अनूभव बरा आहे म्हणून लिहीला होता.:अरेरे: नारळ मस्त खवला जातो, कणिक मळणे, भाज्या चिरणे, बटाटा, गाजर किस करणे इत्यादी उत्तम होत होते. पण हा २ ते ३ वर्षाच्या वर अजीबात टिकत नाही. २ वेळेस नवीन मॉडेल बदलुन घेतले, फुप्रो पण चालत नाही.

आता घेणार असेल / असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावा. माझा अनूभव निराशाजनक असला तरी दुसर्‍याला तसा येईलच असे नाही

२ ते ३ वर्षापेक्षा जास्त टिकत नाही म्हणजे नक्की काय होते हे जाणून घ्यायला आवडेल..

आमच्या कडचा नुस्ता मिक्सर जवळपास ४०वर्षे जुना आहे. सुमितचा जो अजूनही उत्तम सर्व्हिस देतो.

हिम्सकूल फुप्रो जास्त टिकत नाही, म्हणजे फिलीप्स किन्वा सुमीत एवढा तो दर्जेदार नाहीये. मला तसे शब्दात नीट मान्डता येत नाहीये, पण घरचा अनूभव आहे. घरी ( सासरी ) आधी सुमीत होता, तो बराच काळ चालला. नन्तर फिलीप्स घेतला पण तो धाकट्या दिराला देऊन टाकला.

पण नारळ खवणी आहे म्हणून रोनाल्ड घेतला. तसे काम झटपट होते. उलट गणपतीत जास्त फायदा होईल. भराभर खवुन होते. पण सम्भाळुन, ती खवणी सॉलीड धारदार आहे. आधी लो स्पीड, म्हणजे ३ ते ४ दर्म्यान स्पीड ठेवुन नारळ खवुन घ्यावा. एकदा सवय झाली की स्पीड वाढवता येतो.

दुसरे, घरात जर दुसरा मिक्सर चान्गल्या स्थितीत असेल तर तो अजीबात बदलु नका. त्या मिक्सर वर वाटणे वगैरे करा आणी फुप्रो म्हणून हा रोनाल्ड वापरा. म्हणजे निदान ४ ते ५ वर्षे टिकेल. याचा फुप्रो एवढा दमदार नाही फिलीप्स वगैरे सारखा. फिलीप्स तो फिलीप्सच.:स्मित:

Pages