होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा मागे का पडला?
ते जानूचे बाबा हल्ली सारखे पांडुरंगा पांडुरंगा करत असतात. जानू बरी झाली तर मुलगी आणि जावई यांच्यासह कार्तिकीला येईन असे मागे ते श्रीला म्हणताना दाखवले होते. आत्ता कुठे ऑगस्ट महिना सुरु झाला आहे आणि कार्तिकी तर नोव्हेंबरमध्ये आहे. म्हणजे तोपर्यंत हे दळण असेच चालू रहाणार का? पांडुरंगा, तुच वाचव रे आम्हाला आता यातुन.

>>>>श्रीरंगच्या ज्या वेगवेगळ्या आया दाखवलेल्या आहेत (आई, काकू, आत्या, आई आजी वगैरे) त्यातील आईआजी सोडून बाकीच्या सगळ्यांचा अभिनय खूप बालिश होतो आहे हे मालिका निर्मीतीशी संबंधीत कोणाच्याच लक्षात येत नसेल का?<<<
अगदी!!
आणि कालच्या भागात मनोज जोशी आणि प्रसाद ओक यांना सुद्धा बालिश अभिनय करायला लावला. कुणी लिंगभेद केला जातो म्हणून तक्रार करायला वाव नाही! Happy

त्या जानूची सावत्र आई (शशिकला) सारखी पैशासाठी आरडाओरडा करत असते. जानूच्या बाबांची पहिली बायको गेल्यानंतर त्या शाशिकलेवर असे काय संकट कोसळले होते कि तिने या विधुर माणसाशी लग्न केले? भरपुर पैसेवाला नवरा हवा होता तर लग्न करतानाच विचार करायचा होता ना! आता आरडाओरडा करून काय फायदा? एकदा तिची बाजु तरी कळू द्या आम्हाला!
एकदा त्या आपटेशी लग्न लाऊन द्या हिचे! आम्ही तरी सुटू एकदाचे! सारखी हिची बकबक तरी संपेल.

मनोज जोशी यांच्याकडुन असल्या बालिश अभिनयाची अपेक्षा नक्कीच नव्हती. Sad

>>>>>कालच्या भागात मला जान्हवी प्रेग्नंट असल्यासारखे वाटले
.......
बटाटेवडे मानवले

रक्षाबंधनाच्या वेळी रमाकांत आपल्या अमेरिकेतल्या मुलीला, श्रीच्या बहिणीला, सिमरनला विसरला का? हल्ली बऱ्याच दिवसात त्याने सिमरनला फोन केला नाही आहे! कथेची सोय का लेखक झोपला?

सिमरन साठी योग्य कलाकार मिळाली नसावी..किंवा मालिकेचा माबोवरचा धागा पाहून कुणी करायला पुढे येत नसावे Proud

भारतीय वंशाची, दत्तक घेतलेली, अमेरिकेत वाढलेली मुलगी दाखवण्यासाठी निर्माता आणि लेखक यांना खुपच विचार करावा लागेल. आत्तापर्यंतची मालिका बघता, तेवढा विचार करण्याची क्षमता यांच्यांत नक्कीच नाही आहे. Sad
पण, तिचा एकदा ऊल्लेख केला आहे म्हणजे, किमान मालिकेत पाणी घालण्यासाठी तरी, तिला एकदातरी मालिकेत आणावेच लागेल. (आई) आज्जी आणि समस्त गोखले कुटुंबियांची किमान एकदातरी तिची भेट झालीच पाहिजे. Happy
त्या पप्पुला नाही का पुन्हा आणले? Happy

pappu kon? ....सरुला पहायला आलेला एक माणूस असतो तो....( मुलगा कसं म्हणणार ?) Wink

काल २ मिनिट बघायला मिळाली तर त्यात कोणी एक माणून जान्हवीला सांगत होता कि तुम्ही मला ईमेल केली होती आणि त्यात तुमचं नाव 'सौ. जान्हवी श्रीरंग गोखले' असं लिहिलं होतं.. मग जन्हवीला जबरदस्त धका बसला, सगळं जग हादरलं वगैरे. नंतरचं बघायला मिळालं नाही.

शेवटी एकदाचं गुपित बाहेर आलं का म्हणजे?

Pages