ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे सगळे प्रश्न फिल्मी / भडक/ भावना उद्दीपित करणारे वाटले<<<

मला ते प्रश्न अनावश्यक वाटले. त्या प्रश्नांची उत्तरे दिली की कुत्रेमालकांचे आपोआप प्रबोधन होईल असा काहीतरी ग्रह असल्यासारखे किंवा लहान मुलांना विचारावेत तसे!

पण तरी त्या प्रश्नांमागील मूळ हेतू मान्य आहेच. कुत्रेमालक इतर माणसांपेक्षाही स्वतःच्या कुत्र्याला महान समजतात हे चूक आहे हा तो मुद्दा!

इब्लिसांच्या पोस्टमुळे निदान खालील गोष्टी तरी नक्कीच सिद्ध होतातः

१. कुत्रा चावतो.
२. तो चावल्यास मृत्यू होऊ शकतो.
३. कुत्र्याने चावण्या न चावण्यावर स्वतः त्या कुत्र्याव्यतिरिक्त कोणाचे नियंत्रण असू शकत नाही.

कुत्रेमालकांचे प्रबोधन होण्यासाठी प्रश्न विचारले नव्हते. ते प्रबोधन वगैरे कधीही होणार नाही हे कळून चुकलेय.
वेळ आली की कुत्रेमालकही कुत्र्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबातील मानवी सदस्यांनाच प्राधान्य देतील याची कल्पना आहे फक्त ते कुत्रेप्रेमीमालकांकडून ऐकायचे होते.

कुत्रेप्रेमीमालक इतक्या अंधश्रद्धपणे कुत्र्यांबाबत ठाम भूमिका का घेत आहेत तेही समजत नाही आहे.

कुत्रा मुळात हिंस्त्र असतो, शेळी किंवा मेंढीसारखा नसतो हे मान्य नाही का?

(आणि शेवटी, हा विषय ताणणार तरी किती?, हे आहेच म्हणा)

नी सहमत
कुत्र्याला पाळायाच तर पाळा ना

नको कोण म्हणतय . पण त्या कुत्र्यामुळे इतरांना त्रास होतो त्याच काय

वर आमचा कुत्रा की नै कोणाला काही करत नाही हे कशाला

विचारतो कोण तुमच्या वाटण्याला...>> फारच मजेदार विधान. हीच अरेरावी/ बेफिकीरी कुत्रे मालकांनी दाखवली तर का बर राग आला? (मलापण आलाच आणि मी कुत्रे मालकांच्या बाजूने अजिबातच नाही)

आणखी एक समजत नाही कुत्र्यामुले त्रास होतो हे सांगितल्यावर कुत्रेद्वेष्ते कसे काय होतो ?

माझे एक दूरचे काका आहेत जे एका महाविद्यालयाचे हेडमास्टर होते, एकदम विनोदी पण कडक आणि शास्त्र विषयात एकदम हातखंडा.
त्यांच्याकडे न्यूटन की एडिसन नावाचा एक कुत्रा होता. त्यांचा मुलगा बंड्या १०वीला असतांना अभ्यासाविषयी वेळोवेळी त्यांच्याकडून बोलणे खाई. तेव्हा ते आपला नेहमीचा डायलॉग मारत.
'बंड्या माझा एडिसन जर तुझ्या आईच्या पोटी जन्माला आला असता ना तर ९२ टक्के पडून बोर्डात आला असता नक्की आणि तुला त्याने शेपटीवरच्या माश्या हाकलायला नोकरीला ठेवला असता.'
एकदा आम्हा सगळ्या देखत त्यांनी असे म्हंटल्यावर आम्ही एडिसनकडे पाहिले तर तो काहितरी महत्त्वाचं ऐकल्यासारखं कान टवकारून शेपटी हालवत होता आणि बंड्या बिचारा रडवेल्या चेहर्‍याने आमच्याकडे बघत होता.

एक गंमतीशीर अवांतर किस्सा! येथे देण्याचे कारण म्हणजे प्राण्यांबाबत काहींना असलेली अतीव आस्था हा एक समान धागा असणे व ह्याबाबत इतर कोणताही बाफ ज्ञात नसणे:

मल्हारमाची ह्या पुण्याजवळील रिसॉर्टमध्ये नातेवाईकांसह गेलो होतो. पाच रूम्स घेतल्या होत्या. रूम्स चांगल्याच एक्स्पेन्सिव्ह होत्या. काहीतरी पाच साडेपाच हजार पर डे (एक रूम अर्थातच दोन माणसांसाठी)!

एका रूममध्ये माझ्या दोन मावस बहिणी आणि बायको सहज गप्पा मारायला बसल्या. एक बहिण आणि बायको बेडवर उश्यांना टेकून आणि एक बहिण खुर्चीवर! अचानक बेडवर बसलेल्या बहिणीने सहज म्हणून उशी अ‍ॅडजस्ट केली तर खुर्चीवर बसलेली बहिण किंचाळत ओरडली की 'उठा, त्या उशीमागे साप आहे'!

सगळे धावत बाहेर आले आणि आमच्यासकट पुन्हा सगळे आत जाऊन पाहू लागले तर खरंच चांगला दिड फूट लांबीचा आणि जाडजूड हिरवागार साप उशीमागे होता.

आमच्यातल्या एकाने तो चक्क मारला. तो साप मरत असतानाच आमच्यापैकी काहींनी फोनाफोनी करून मल्हारमाची ढवळून काढले व जो मॅनेजर आला तो म्हणे सर्पमित्र निघाला.

त्याने आधी सर्वांना धीर दिला व नंतर चक्क ऑब्जेक्शन रेज केले की साप का मारलात?

आम्ही म्हणालो सापाचे काय करणार? पूजा?

तर म्हणे मल्हारमाची हे रिसॉर्ट निर्माणच मुळी जंगलात केलेले आहे, ही जागा मूळतः प्राण्यांचीच आहे, माणसाने त्यावर अतिक्रमण केलेले आहे, येथे साप येणे विशेष नाही.

त्यावर मात्र मी त्याला उलटापालटा झापला.

प्रश्न साप निरुपद्रवी आहे की कसा हा नसून ऐन वेळी माणूस काय प्रतिक्षिप्त क्रिया करणार ह्याचा आहे. पाच पाच हजार रुपये भरून जर साप ह्या विषयावरून वाद होणार असतील तर आम्ही निघतो आणि बाहेर जाऊन कंप्लेंट करतो असे मी म्हणालो. शेवटी बायकोच्या ऑफीसमधील एकांचे ते रिसॉर्ट असल्यामुळे उगाच इश्यू व्हायला नको म्हणून शांतता निर्माण केली.

धागा वाचून काढला.
मला कुत्रे आवडतात, पण पाळायची संधी मिळालेली नाही. निवृत्तीनंतर पाळायचा विचार आहे.

बहुतेक कुत्रेमालक आपल्या कुत्र्याची घाण साफ करत नाहीत हे विधान बहुतेक लोक रस्त्यात कचरा करायला कचरत नाहीत अश्या धर्तीचे आहे. गामांनी लिहिल्याप्रमाणे इंग्लंडात बहुतेक लोक कचरा थेट कचराकुंडीत टाकतात आणि कुत्र्याची शी उचलून त्यासाठी केलेल्या स्पेशल डब्यात. सामाजिक संस्कृतीचा भाग आहे.

पाळीव कुत्रे हे घरातल्या कोणत्याही इतर सदस्यांसारखेच असते, कुत्राधारक कुटुंबांसाठी. त्यामुळे बाकावर बसणे, एकत्र जेवणे वगैरे त्यांना नॉर्मल वाटते. एखाद्या कुटुंबातल्या व्रात्य मुलीने तुमच्या खोड्या काढल्या तर जसे सहन कराल / नाही तसे कुत्र्याच्या बाबतीत - असे कुत्राधारकांना वाटते.

भटके कुत्रे हा वेगळा मुद्दा आहे.

>> प्रश्न साप निरुपद्रवी आहे की कसा हा नसून ऐन वेळी माणूस काय प्रतिक्षिप्त क्रिया करणार ह्याचा आहे
साप म्हणजे डेंजर/ मारा त्याला. असेच शिकल्याने तशी प्रतिक्षिप्त क्रिया होत असावी.
सातार्‍याचे घर नवीन होते तेव्हा असेच पुष्कळ साप वगैरे सापडत असत. पहिल्यांदा मला दिसला/ पायावरून गेला तेव्हा भीती वाटली नव्हती. एकदाचा लाइव साप दिसला अशी एक्साइटमेंटच होती.

काय आहे अमितव... माझ्याकडे कुत्रा नाही आणि तो तुम्हाला चावायला आलेला नाही की तुम्हाला काय वाटते याचा विचार करावा...
बाकी तुम्ही जिथून आलायत तिथे कुणाबद्दल काय काय चवीने बोलले जाते हे सर्वांना माहितीये त्यामुळे तुमच्या वाटण्याला विचारतो कोण वगैरे वाक्याने तुम्हाला मानसिक ट्रॉमा बिमा झालाय असलं काही सांगू नका.

मला वाटतं इथे एक अमांच्या पोस्ट्स सोडल्या तर कुणी कुत्रेमालकाने येऊन काही लिहिले आहे (त्यातही अमा त्यांच्या कुत्र्यांची जबाबदारीने सार्वजनिक जागेत देखभाल करतात असे म्हणत आहेत). तेव्हा इथे कुत्रेमालक येऊन स्वतःची आणखी काही बाजू मांडतील असं वाटत नाहीये
भारतात सगळे नसले तरी बहुतांशी कुत्रेमालक अतिशय बेजबाबदार वागतात, दुसर्‍यांबाबत बेपर्वा असतात असं आपल्या बहुतेकांचं स्वानुभवावर व निरिक्षणावर आधारित मत आहे. मीही कुत्रेप्रेमी नाहीच. पण अल्पसंख्य असले तरी उत्तम वागणूक असलेले आणि कुत्र्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलेले मालक्/कुटुम्बियही पाहण्यात आहेत. पण ते दुर्मिळतेनेच दिसतात हेही खरं.
मूळ मुद्दा होता की अशा बेजबाबदार मालकांना वठणीवर आणण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी वगैरे काही नियम-कायदे आहेत का आणि कोण ऑथोरिटीज याचा पाठपुरावा करणार असा... मुग्धानन्दने वरती एक कायद्याचं कलम दिलेलं आहे. पण मुळात हे सग्ळं कुणाच्या अंमलबजावणीखाली येतं हे मला तितकंसं स्पष्ट नाही - विशेषतः रस्ता किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी ह्या अडचणीचं काय करायचं?

आपल्या सगळ्यांची बर्‍यापैकी भडास काढून झालीये. आता काही उपाययोजना सुचत असतील तर बघूयात Happy

भटके कुत्रे हा आणखी एक स्वतंत्र प्रॉब्लेम आहे. त्याचाही विचार इथेच करायचा की वेगळा?

पण साप मारणे हे चूकच आहे, साप विषारी असलानसला तरीही आधी सर्पमित्र बोलावून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडता येते.

पहिल्यांदा मला दिसला/ पायावरून गेला तेव्हा भीती वाटली नव्हती. एकदाचा लाइव साप दिसला अशी एक्साइटमेंटच होती.<<<

मान्य आहे, रिअ‍ॅक्शनसुद्धा माणसामाणसानुसार बदलू शकते.

बायको कोल्हापूरची आहे, ती तो साप पाहून थंड उभी होती, म्हणाली त्यांच्या बागेत बरेच मोठे साप निघायचे, तिला त्याचे काही वाटलेच नाही.

पण तो जो साप होता त्याला काठीने ढकलून 'आता बाहेर जा बाबा, आम्ही आजच्यापुरती ही रूम घेतलेली आहे' असे सांगणे शक्य नव्हते. त्यामुळे आमच्यातील एकाने तो मारला असावा.

विषयांतराबद्दल क्षमस्व!

मला वाटतं इथे एक अमांच्या पोस्ट्स सोडल्या तर कुणी कुत्रेमालकाने येऊन काही लिहिले आहे <<
आणि त्यांना वारंवार कुत्रे आवडत नाही म्हणजे कुत्रेद्वेष्टे नाही हे सांगूनही त्यांनी लेबले लावणे, सिंपथी टूर सोडली नाहीये.
फॉर द रेकॉर्ड हे मांडलेय... बाकी काही नाही..

कदाचित कुत्र्यावरून सापाकडे जाण्याचा मार्ग बंद करता येईल.
लोक साप पाळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मालकांनी त्याबद्दल काही कृती करण्याचा प्रश्न नाही.
साप स्वतः होऊन लोकांच्या अंगावर धावून जात नाहीत अथवा फूत्कार सोडत नाहीत. कुत्रा असे काही करणार नाही याची खात्री कुत्र्याचा मालकही देऊ शकत नाही.

व्रात्य मुलांवर आधी वादळी चर्चा झाली आहे. तिथेही जर व्रात्य मुले परक्यांसमोर व्रात्यपणा करताना, त्यांना त्रास देताना त्यांचे पालक त्यांना आवरत नसतील तर ते पालकही या कुत्र्यांच्याच पालकांच्या लायनीतले आहेत असेच सर्वसाधारण मत दिसते आहे.

थँक्यु वरदा.
सिरिअसली, उद्या परत मला त्या बाकावर कुत्रे व मालकीणबाई दिसल्या की तोच त्रास होणार. गेल्या वेळेस मी आजूबाजूला असलेल्या ज्ये. नागरिकांशी बोलून चार पाच जणांना गोळा केले होते पण मुळात त्यातल्या काही जणांना काहीच फरक पडत नव्हता. काही ज्ये. नां च्या बायकांनी तुम्ही ह्याच्यात पडू नका असे दटावून सांगितले. व एक दोघे उरले ते जौद्या सोडा...तुम्ही दुसर्‍या बाकावर बसा व मिटवून टाका म्हणाले. ह्या प्रकारामुळे उद्वेग अजूनच वाढला. नियम व कायदे माहीत असले तर बरेच.

व्रात्य मुले दुसर्‍यांच्या अंगावर धावून जात असतील, घाबरवत असतील आणि त्यांचे आईबाप काही म्हणत नसतील तर ती चूक/ जबाबदारी आईबापाची होत नाही का?
मग यांचे कुत्रेमूल कुणाच्या अंगावरही धावून जात असेल, घाबरवत असेल तर तर ती यांची जबाबदारी नाही का?

सार्वजनिक (पब्लिक या अर्थाने असलेल्या जागांचा वापर प्राण्यांनी करण्याबद्दल/ न करण्याबद्दल काही नियम असण्याची शक्यता शून्य आहे. पण सोसायटीच्या सगळ्यांच्या वापराच्या सुविधांबद्दल सोसायटी नियम करू शकते. जसे लिफ्टचे उदाहरण आले आहे. याबद्दल वर्तमानपत्रांतूनही पत्रापत्री होताना दिसते.

कुत्र्यांबाबत आणखी एक मुद्दा आठवला.

कोठेतरी वाचले होते की कुत्र्यांना लोनलीनेस जास्त जाणवतो. त्यांना अडकवून ठेवले की ते अधिकच भडकतात.

आमच्याइथे एका कुत्र्याला फक्त रात्री फिरायला नेतात. बाकी तो बांधलेला असतो. (त्यांचा बंगलेवजा फ्लॅट आहे, गार्डन आहे मोठे, तरीही!). मी पाहतो तेव्हा तो कुत्रा त्याच्या जवळ असलेल्या खिडकीतून दोन पाय वर टाकून आत बघत राहिलेला असतो. काहीवेळा विचित्र आवाजात ओरडत असतो.

हे पाहून कुत्रेमालक तरी कुत्र्यांची व्यवस्थित काळजी घेतात की नाही हेही समजायला मार्ग नाही.

ट्रॉमटाईझ होण्यापूर्वी पान नऊवर अमांची पोस्ट एकच पोस्ट आहे. त्यापूर्वी हा बीबी उघडल्यावर त्या काहीही लिहायला आलेल्या नव्हत्या. इनफॅक्ट नीट लक्षात असेल तर हा बीबी उघडल्यावर त्या 'पेट थेरपी' हा आयडी काढून लिहीत होत्या. त्यांचं कुत्रे प्रेम मायबोलीवर माहित आहेच. त्याबद्दल म्हणणं नाही काहीच. मागच्या पोस्टवरून त्या कुत्र्यासंबंधीत एक जबाबदार नागरीकही आहेत हे लक्षात आलंय तेव्हा त्या त्यांच्या आसपास बाकी बेजाबबदार कुत्रे मालकांना काही प्रबोधन करतात का,करत असतील तर कसं, काय रिस्पॉन्स मिळतो हे ही थोडं वाचायला आवडेल.

>>
बाकी तुम्ही जिथून आलायत तिथे कुणाबद्दल काय काय चवीने बोलले जाते हे सर्वांना माहितीये त्यामुळे तुमच्या वाटण्याला विचारतो कोण वगैरे वाक्याने तुम्हाला मानसिक ट्रॉमा बिमा झालाय असलं काही सांगू नका.>>

नीधप, हे असं लिहिणं म्हणजे मुद्दे संपल्याचं लक्षण आहे.

>आईबापाची होत नाही का
होतेच की.
त्याबद्दल दुमत नाहीच आहे कोणाचे. मला वाटते कुत्रेधारक सुद्धा ती जबाबदारी मान्य करतीलच.
मुद्दा असा आहे की मी तुमच्याकडे आले की तुमच्या व्रात्य मुलीला एका खोलीत कोंडून ठेवा असे म्हटले की काही पालकांना आवडत नाही. Happy

सुमेधाव्ही, मूळ मुद्दा बसायला बाक रिकामे न मिळण्याचा आहे का?

ओक. पण मुलाला जसं पाहुण्यांना लाथा मारू नका असं शिकवलं जातं, तसं कुत्र्यालाही काहीतरी शिकवलेलं असायला हवं. आणि तसं नसेल , त्याला बांधूनही ठेवायचं नसेल तर घरी कोणाला बोलावू नये.

आमच्या सोसायटीतल्या एकांचा कुत्रा तर डोअरबेल वाजली तरी दाराकडे धावत येऊन भुंकत सुटतो. त्याला वेगळ्या खोलीत बंद करून मगच ते दार उघडतात.
पोस्टमन, सिलिंडरचे डिलिव्हरी करणारे, कुरियरवाले, दूधवाले जर तुमच्या कुत्र्याला घाबरत असतील किंवा त्यांना कुत्र्यांचा त्रास होतो हे अनेकदा पाहिले आहे. ते तर कुत्रेमालकांच्याच कामाने आलेले असतात तरीही अशावेळी कुत्रेमालक कुत्र्याला आवरत नाहीत हे पाहिलेले आहे.

सायो, मुद्दे संपायला इथे मारामारी चाललेली नाही. फुकट वाकड्यात शिरण्याचे उद्योग तुम्ही लोक करत रहाता. त्याला अशीच उत्तरे मिळतील.

पण मुलाला जसं पाहुण्यांना लाथा मारू नका असं शिकवलं जातं, तसं कुत्र्यालाही काहीतरी शिकवलेलं असायला हवं. <<
मुद्दा तोच आहे की ९५% कुत्रेमालक हे शिकवत नाहीत. आणि त्याबद्दल कुणी काही म्हणालेलं त्यांना चालत नाही.

मृदुला,
हो. मला माणसांच्या सोयीसाठी असलेल्या कुठल्याच बाकावर कुत्र्याने बसणे मान्य नाही अगदी माणसे नसतील तरी. आणि कुत्रामालकाच्या मते ...बाक तुमच्या मालकीचा नसेल, तर माणूस काय किंवा जनावर काय्..कोणीही बसू शकले पाहिजे. माणसांसाठीच्या बाकावर कुत्र्याने बसणे हायजिनच्या दृष्टीनेही मानवासाठी घातकच आहे हाही एक उपमुद्दा आहेच. म्हणून ह्या बाबत सार्वजनिक वावराचे काही नियम आहेत का हे बघत होते म्हणजे अश्या मूर्ख मालकांना नियम सांगता येतील जिथल्या तिथे.

भरत मयेकर | 31 July, 2014 - 19:40<<< पूर्ण पोस्टला अनुमोदन!

हल्ली नवीन लोकांना भेटावे लागते तेव्हा मी पत्ता वगैरे विचारला की फोन ठेवायच्या आधी खरोखर विचारतो की घरी कुत्रे आहे का!

आत्तापर्यंत एका बाईंकडे एक भटके कुत्रे चक्क येऊन बसत होते ते सोडले तर बाकी कोणाकडे कुत्रे नव्हते. त्या बाईंनाही मी स्पष्टपणे सांगितले की मला भीती वाटते, तेव्हा एक तर ते कुत्रे घालवा नाहीतर आपण इतर ठिकाणी भेटू! हवा तो परिणाम झाला, कुत्रे हाकलण्यात आले. पाळलेले कुत्रे असते तर बांधायला लावले असते.

मला कुत्रा, मा.न्जर काहिही आवडत नाही आणी वर लिहलेले बहुतेक अनुभव भारतात मला बहुतेक वेळा आलेले आहेत..
पण, इथे अमेरिकेत तरी असे कुठलेही अतिरेकी अनुभव अजिबात आलेले नाही( म्हणजे आमचा कुत्रा आवडुनच घ्या टाईपचे)
इथे कुत्रे मालक कुत्र्याला फिरायला नेतात तेव्हा बा.न्धलेला पट्टा हातातुन अजिबात सोडत नाही आणी तो बटन दाबुन कमी जास्त करायचा असल्याने जर समोरचा व्यक्ती कुत्र्याला बिचकत असेल तर ते लगेच बटन दाबुन कुत्र्याला जवळ ओढुन घेतात.. ग.न्मत म्हणजे भारतात जसे दोनपाळिव कुत्रे जरी जवळ आले तर भुकुन जिव नकोसा करतात तस इथे विनाकारण भु.न्कताना मी कुत्र्याला पाहिल नाही.
बाकी फिरायला गेल्यावर कुत्र्याने घाण केल्यास इथेही मालक ते साफ-सुफ करतातच!
बाकी इथे कुत्र्या.न्चे कि.न्वा जनरल्च पेटस चे जेवधे लाड होतात ते पाहिल्यावर पहिल्या.न्दा पहिल्या.न्दा प्रच.न्ड आश्च्रर्य वाटलेले.. पेट ग्रुमिन्ग से.न्तर, वेगळे खाणे, बेड, ई..
मुलिला मात्र कुत्रा पाळायची हौस आहे आणी दहाव्या बर्डेला गिफ्ट म्हणुन पपी पाहिजे अस डिक्लेअर केल होत..२ दिवस मुद्देसुद वाद घालुन तो बेत आता १० वर्शासाठी पोस्टपोन करवलाय..

Pages