ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I am a minority here I know but I was traumatized by the talk of killing dogs. >>> सिंपथी गोळा करणं बंद करणार का? आपण एक बिचारे व्हिक्टिम आहोत अशी स्वतःचीच एकदा समजूत करून घेतली की बाकी आयुष्य सेल्फ पीटीत सुखकर जातं.

दुसर्‍यावर कुत्रे लादल्याने त्यांनाही traumatized होतं हे लक्षात आलंय का कधी?

jitki tumachi ghruna khari >>>> घृणा वाटते असं कोणी लिहिलंय तरी का? कुत्र्याबद्दल नाही त्यांच्या मालकांविरुध्द तक्रारी आहेत हे असंख्य वेळा असंख्य प्रकारे लिहूनही डोक्यात का शिरत नाहीये? तुझ्या सोईचं नाहीये म्हणून का?

I have never laughed at people who get scared nor I have posted such stuff. >>> केलेलं आहे. दोन दांडगी कुत्री धावत असलेली पाहून बायका शॉकमध्ये जातात असा कुत्सित शेरा मी वाचलेला आहे.

yes. always. I carry a dog walk bag with a torch, a waste paper and cash. >>> हे खरंच करत असशील तर ऊत्तम आहे. बाकी कुत्री-मालकांकरता ट्रेनिंग सुरू कर. कोणत्याही डॉगवॉकरला मी हे करताना पाहिलेलं नाहीये. वरळी सी फेस, मरिन ड्राईव्ह, शिवाजी पार्क या कोणत्याही ठिकाणी पायाखाली नजर ठेऊनच चालावं लागतं. कारण पब्लिक जागा म्हणजे आपल्या बापाची इस्टेट असंच मुर्दाड कुत्रेमालकांना वाटतं.

कृपया कोणी भांडू नये Happy

कुत्र्यांची भीती वाटणे नैसर्गीक आहे. कुत्र्यांबद्दल प्रेम वाटण्याइतकेच!

मला काही माहीत नाही, पण कोणीतरी म्हणाले होते की परदेशातील अनेक पाळीव प्राणी म्हणे स्वभावाने अगदी गरीब वगैरे असतात. म्हणजे एखादा परका येऊनही तुमच्या कुत्र्याच्या अंगावरून सहज हात वगैरे फिरवू शकतो.

असे खरंच असते का?

कमाल आहे, खिडकीत डोकं घालणार्‍या कुत्र्याबद्दल आणि त्याच्या मालकाच्या हतबद्धतेबद्दल सहानुभूती वाटणार्यांना त्यावर लिहिलेल्या घटना ज्यात लहान मुलाला कुत्रा चावला, एकाचा त्यात जीव गेला अशा माणसांबद्दल काहीच वाटत नाही? वाट्टेल ते आणि वाट्टेल तिथे खायला घालून कुत्राप्रेमींना जो कुत्रा कडकडून चावेल त्याचा मी लकडीपुलावर कुत्र्याचा जाहीर सत्कार करायला तयार आहे..

बेफिकीर,

>> म्हणजे एखादा परका येऊनही तुमच्या कुत्र्याच्या अंगावरून सहज हात वगैरे फिरवू शकतो.

खरं आहे. मात्र तसं विचारूनच करतात.

इथे इंग्लंड मध्ये कुत्रा पाळायचा परवाना घ्यावा लागतो. कुत्र्याला घरी आणि घराबाहेर वागण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. मनमिळाऊ जातीचे कुत्रेच घरी पाळता येतात. त्यांना घरगुती कुत्रे (डोमेस्टिक पेट) म्हणतात. रखवालीचे कुत्रे वेगळ्या जातीचे असतात. त्यांना द्यायचं प्रशिक्षण वेगळं असतं. असे कुत्रे मालकाच्या घरात वावरू शकतात, पण बाहेर नेतांना त्यांची तोंडे बांधून ठेवावी लागतात. पण तरीही जऽरा दुर्लक्ष झाल्यावर हिंसक कुत्र्याने तान्ह्या अर्भकाला फाडून खाल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वेळेस कुत्र्यास सरळ ठार मारलं जातं. अतिहिंसक जातींची पैदास बेकायदेशीर आहे. तरीपण लोकं गुपचूप पैदास करतातच!

बाहेर कुत्र्याची घाण तशीच सोडून कोणी जातांना दिसला तर नगरपालिकेकडून दंड होतो. मांजराच्या बाबतीत असेच नियम आहेत.

आ.न.,
-गा.पै.

गा पै , नक्कीच उपयुक्त माहिती.

कुत्रा चावायला आल्यास काय प्रसंगावधान राखता येईल याबद्दल कोणी लिहील्यास आभारी राहिल.
(अर्थात ते त्या वेळी सुचायलाही हवे)

माझ्या आयुष्यातल्या अशा दोन प्रसंगाना मी तोंड दिलेले आहे.
एकदा रेशन दुकानातून रॉकेल घेवून येत असताना एक गावठी कुत्र चावायच्याच उद्देशाने माझ्या अंगावर धावून आले. त्या वेळी ते रॉकेलचे कँड (जे साधारण ६-७ किलो वजनाने असेल) ते त्या कुत्र्याच्या कानावर जोरात फिरवून मारले होते. काही वेळ कुत्रा मागे सरकला पण माझे ह्र्दय धडाधड वाजत होते.मग त्याचा मालक येवून त्याला घेवून गेला पण या भानगडीत ते कँड पडून २-३ लिटर रॉकेल जमिनीवर सांडले होते. त्याचे त्या निर्लज्ज कुत्रामालकाला काहीही वाटले नाही.

दूस-या एका प्रसंगात कुत्र्याने मला तब्बल ७०० ते ८०० मीटर पळविले असेल नशिब चावले नाही पण पँट फाडली त्याने. त्याला काय उपाय केला हे इथे लिहीत नाही. इथे खूपच कुत्रा प्रेमी आहेत.ते मला अतिरेकी ठरवायलाही कमी करायचे नाहीत.

मला वाटते स्ट्रे डॉग्जबद्दल वेगळा बआफ काढावा. हा बाफ फक्त पाळीव कुत्र्यांसाठी आणि त्यांच्या माजलेल्या मालकांसाठी ठेवावा.

ज्यांना स्वतःच्या सामाजिक वागण्याची खात्री आहे की ते माजलेले नाहीत आणि त्यांचे कुत्रे शहाणे आहेत त्यांनी हे सगळे डिस्कशन स्वत:ला लावून घेऊ नये. शिवाय माजलेल्या मालकांच्या पाळीव कुत्र्यांना, त्या कुत्र्यांनी ज्या माणसावर अ‍ॅटॅक कराय्चा प्रयत्न केलाय त्या माणसांनी काय ट्रीटमेंट द्यावी हे त्या माणसांवरच सोडून द्यावे. त्यांनी केले ते चूक की बरोबर क्रूर की आणि काही हे जजमेंट न केल्यास चांगले.

तुमच्या दिशेने एखादा वाघ आला किंवा नाग आला तर तुम्ही त्याला ये खा खा ये चाव चाव म्हणणार की त्यांनी आपल्याला खाऊ चावू नये म्हणून त्याक्षणी डोक्यात जो विचार येईल तो उपाय करणार?
कुत्र्यांच्या माजलेल्या मालकांबद्दल प्रचंड राग आहे आणि स्ट्रे डॉग्जना माजवणार्‍यांवरही. बाकी तुम्ही कुत्रे मांजरी वाघ सिंह काहीही पाळा पण इतर कोणालाही त्रास न होईल असे बघा एवढीच माफक अपेक्षा आहे. इतरांना त्रास न होईल ह्यात पुढील गोष्टी येतात - १. तुमच्या डॉगीची पूप आणि पी चा इतरांना होऊ शकतो. २. तुमचे कुत्रे रस्त्यात कोणा माणसावर प्रेम दाखवायला जातील तर त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. ३. तुमच्या कुत्र्याच्या हुंगण्याचाही इतरांना त्रास होऊ शकतो. ४. तुमचे अक्राळ विक्राळ किंवा छोटेसे कुत्रे दुसर्‍या कोणाला पाहून आमच्या बाजूने धावत असेल किंवा आमच्या समोर धावत असेल तर आम्हाला भीती वाटू शकते. आणि त्यामुले आम्ही स्वसंरक्षणार्थ काही स्टेप्स घेतल्यास तुम्हाला राग येऊ नये.

गा.पै.
छान माहिती,
पण यावरून एक नक्की की आपल्याकडे प्रॉब्लेम खरा सिस्टीममध्ये आहे.
त्यामुळे जसे बेशिस्त वाहनचालक निपजतात तसेच मग बेशिस्त कुत्रामालक निपजणारच. किंबहुना अपवाद वगळता मेजॉरटी अश्यांचीच असणार.

अहो त्या फिरंग्यांना पोरे जन्माला घालायला आवडत नाहीत. मग फुकाची प्राणिमात्रांची काळजी. कुत्र्या मांजरांच्या पिलांना वगैरे फुकट आपली पोरे म्हणून सांभाळायचे. तसेही मुके प्राणी बरेच आईकतात माणूस आणि त्यांची पोरे फार काही आईकात नाहीत त्यामुळे कौतुक.

मामी +१००००००००००००००

>>> कमाल आहे, खिडकीत डोकं घालणार्‍या कुत्र्याबद्दल आणि त्याच्या मालकाच्या हतबद्धतेबद्दल सहानुभूती वाटणार्यांना त्यावर लिहिलेल्या घटना ज्यात लहान मुलाला कुत्रा चावला, एकाचा त्यात जीव गेला अशा माणसांबद्दल काहीच वाटत नाही? <<<
ह्युमन बेबीज.. लोकसंख्या केवढी वाढलीये... मेले एकदोन तर कुठे बिघडले..... असे म्हणणे असावे...

बाकी उपास तू गेलास आता द्वेष्टी ब्लॅकलिस्टमधे...

उपास - अरे पण सहानुभूती अशी एक्स्क्लुसिव कशाला ? कुत्रे चावलेल्या माणसांबद्दल वाटली म्हणजे खिडकीत तोंड अडकवून फरफटत नेलेल्या कुत्र्याबद्दल वाटू नये असे काही आहे का? मला तरी एखाद्या लहान मुलाला कुत्रा चावला तर जेवढा जीव हळहळेल तेवढेच वाईट किरणकुमार यांचे ते पोस्ट वाचून वाटले!
(याचा अर्थ मी श्वानप्रेमी आहे असे नाही, कुत्रे / मांजर कधीही पाळले नाही आणि पाळेन असे वाटत नाही)
तसेही किरणकुमार यांचा कुत्र्याशी क्रूर वागल्यावरून निषेध केला म्हणजे त्या व्यक्तीला " लहान मुलाला कुत्रा चावला, एकाचा त्यात जीव गेला अशा माणसांबद्दल काहीच वाटत नाही " हे कशावरून ?

मेनकाबाईंना या वेळी प्राणिखाते न दिल्याने मी मोदी यांचे शतशः जाहीर आभार मानतो.........

धन्यवाद

मैत्रेयी, मान्य आहे मुद्दा.. पण.. जर कुत्र्याने गाडीत तोंड घातले आणि जीभ बाहेर काढली तर त्याचे दात मोजायचे का? जो उपाय जीव वाचवायला सुचेल तोच करणार ना आपण की किरणकुमारने प्लान करुन त्या कुत्र्याला त्याच्या गाडीत डोकवायला लावलेय आणि मग त्याची अश्शी गंमत केलेय? स्वतःच्या घरातल्याला कुत्रा चावल्याचा विचार करुन बघा मग जाणवेल.. माझ्या घरात अशी भटका कुत्र्या चावल्याची घटना घडल्याने त्याचे काय काय त्रास पुढचे कित्येक महिने होतात हे अनुभवलेय.
ते ही असोच, भटक्या कुत्र्यांचा नेमका उपयोग काय हे ही कळत नाही.. मांजर उंदीर तरी कमी करते घरांघरांतले, शिवाय तिचे म्यांव फारच हळू असते.. हे भटके कुत्रे मात्र भुंकण्याशिवाय आणि उकिरडे फुंकण्याशिवाय (आणि प्रजननाशिवाय) काहीही करताना दिसत नाहीत.. त्यांच्यासाठी पांजरपोळासारखी उत्तम सोय असली तरी हे बेगडी प्राणी प्रेमी (जे त्यांच्या फावल्या वेळात) कुत्र्यांना वाट्टेल ते देऊन सोकावतात किंवा हॉटेलवाले शिळे अन्न योग्य विल्हेवाट न लावता रस्त्याच्या कडेला टाकून देतात ते ह्या कुत्र्यांच्या त्रासाचे मूळ कारण आहे हे नक्की... असो!

शिवाय मांजरे स्वतःची घान स्वतःच पुरुन टाकतात्...खर तर त्यांची साईज थोडी मोटी पाहीजे होति...कारण नवीन माणुस आले की मांजर पण फीस्स करुन धावुन जाते (आमचा बोका जायचा)...ही माझी कल्पना आहे विनोदी म्हणुन सोडुन द्या.

इब्लिसदा, खोटं नाही बोलत पण माझी सेम हे असचं करायची इच्छा होते पण त्यासाठी देखील कुत्रं उचलवलं जाणार नाही माझ्याच्याने Angry

आमच्या सोसायटी समोर एक देवीचं मंदीर आहे जिथे मी रोज दर्शन घ्यायला जाते. तिथे एक आजीही येतात त्यांचं कुत्रं घेऊन. मागे एकदा मी दर्शनाला गेलेले तेंव्हा त्या कुत्र्याने माझी चप्पल उचलून नेलेली आणि कचराकुंडीत टाकून दिलेली Sad
मी अनवाणी घरी गेले.
तेंव्हा मला माहीत नव्हतं ते त्या आज्जींचं कुत्रं आहे. मला वाटलं भटकं कुत्रं आहे म्हणुन मी दुर्लक्ष केलं..
पण त्यानंतर मी रोज ते कुत्रं मंदीरात दिसलं की मंदीरात जायचं बंद केलं...

आज सकाळी ऑफिसला जाताना नेहमी प्रमाणे मंदीरात गेले तर कुत्रं तिथेच बसलेलं. मी तरीही आत गेले कारण माझ्याकडे नंतर वेळ नसणार होता आणी दर्शन घेऊन आले आणि बघितलं तर कुत्रं परत तोंडात माझी चप्पल घेऊन उभं. मी भडकले आणि जवळचा दगड जोरदार फेकुन मारला तशा त्या आज्जी आल्या माझ्याशी भांडायला त्यांच्या कुत्र्याला का मारलं म्हणून Sad
ते भिक्करं कुत्रं माझी चप्पल घेऊन चाल्लेलं तेंव्हा या बघत बसलेल्या आणि मी त्याला मारलं कायकी लगेच आल्या तुरु तुरु चालत मला ओरडायला... म्हणे, 'त्याला लागलं असेल ना तर तुलाच त्याला दवाखान्यात न्यायला लावेन आणि औषधांचे पैसे तुझ्याच कडुन घेईन' Uhoh बावळट कुत्रं Angry अस्सं डोकं फिरलेलं ना पण मला उशीर होत होता म्हणून त्यांना तुक देऊन बाहेर पडले. पुढच्या वेळेपासुन आज्जींची चप्पल घेऊन फेकुन मारणारेय त्या कुत्र्याला Angry

रीया,

तुझ्या वरील प्रतिसादातील फक्त स्मायलींचे अर्थ एकापुढे एक लिहिले तर ते असे दिसेलः

राग - अरेरे - अरेरे - आँ, आता काय करायचं? - राग राग

मामी,

>> पाळीव कुत्र्यांपेक्षा त्यांचे मालक जास्त भिकार आणि निर्लज्ज असतात.

सहमत! हेच बघा ना, माझा इथला संदेश शीर्षकाशी अगदी सुसंगत आहे. पण कोणीच चर्चा करत नाही. सगळे नुसते कुत्र्यांच्या मागे लागलेत.

आ.न.,
-गा.पै.

सुमेधा व्ही,

एक प्रश्न....

ह्या प्रसंगात, कुत्र्याला उठवून आपल्यालाबसायला मिळावे असे तुम्हाला का वाटले ? दुसर्‍या शब्दात विचारायचे तर, श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळावे असे तुम्हाला का वाटते ?

ह्या प्रसंगात, कुत्र्याला उठवून आपल्यालाबसायला मिळावे असे तुम्हाला का वाटले ? दुसर्‍या शब्दात विचारायचे तर, श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळावे असे तुम्हाला का वाटते ? >>> सिरियसली?

शास्त्रीय ऊत्तर - बाक माणूसप्राण्याच्या शरीररचनेनुसार त्या रचनेला सोयीस्कर बनवला आहे.

सामाजिक ऊत्तर - माणूस आणि पाळीव प्राणी ह्यांच्यामध्ये जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात आणि संस्कृतीत (भावना बाजूला ठेवून बघितल्यास) माणूसप्राण्याच्या जिवाला जास्त महत्व आहे. (कीड्या मुंग्यांसारखी माणसे मारली जातात आणि पोटच्या पोरांसारखे पाळीवप्राण्यांचें लाड होतात हा प्रासंगिक विवाद किंवा भावनिक मुद्दा आहे)

राजकीय ऊत्तर - मी मनतदान करून निवडून दिलेल्या सरकारने कर्तव्य म्हणून माझ्या सारख्या माणूस प्राण्यांसाठी तो बाक बनवला आहे, अजून पाळीव प्राणी मतदान करीत नाहीत.

आर्थिक ऊत्तर - सार्वजनिक मालमत्तां वापरण्याचा हक्क बजावण्यासाठी संबंधित श्वानाने नियमित टॅक्स भरला होंता कांय महाराजां?

वैयक्तिक ऊत्तर - राहू देत सध्या, अजून तशी वेळ आली नाही.

करेक्ट चमन Lol
1. माणूस कुत्रा पाळतो. कुत्रा माणूस पाळत नाही. निसर्गाला सगळे जीव सारखे असले तरी इथे 'माणूस' ही प्राणीजमात वरचढ ठरते.
2. बाक असताना संबंधित व्यक्तीने खाली रस्त्यावर बसावे पण आमचे पाळीव कुत्रेमहाशय काही पायउतार होणार नाहीत असा जर कुत्रेमालकाचा भाव असेल तर शिव्या अटळ आहेत.
3. कुत्रा उठून गेल्यावर तो बाक कुत्रेमालक डेटॉलने साफ करुन देणार का? कारण बाक त्यांच्या वा कुत्र्याच्याही बापाच्या मालकीचा नाही.
4. एकट्या कुत्र्यांचेच असे लाड केले तर पार्शलिटी होईल. उद्या तुमच्या भाजीवर माशी बसली तर बसू द्या, कबुतर टीव्हीवर शिटले तर मनसोक्त शिटू द्या, डुक्कर घरात आले तर आने दो, आणि हां, झुरळ, पाली, डास हे तर आपले कुटुंबीय! तेव्हा पेस्ट कंट्रोल ना बाबा!

चमन आणि आशू Lol

मामी, कुत्रे आणि कुत्रेमालकांबद्दलचा तुझा राग, तिरस्कार, घृणा मी समजून आहे. पण इथे सार्वजनिक फोरमवर लिहिताना भावना आणि शब्दांवर नियंत्रण हवे असे मला वाटते. आणि सध्या अकराव्या पानापर्यंत तुझ्या भावना व्यवस्थितपणे व्यक्त झालेल्या, सर्वांपर्यंत पोचलेल्या आहेत तेव्हा आता पुरे असे मला वाटते.

कुत्रेप्रेमी, कुत्रेमालकांसाठी काही प्रश्न...
१. तुमच्या घरात अशी काही समस्या निर्माण झालीये ज्यामुळे घरातील एक मानवी सदस्य किंवा तुमचा पाळीव कुत्रा यापैकी एकाचीच घरात ठेवण्यासाठी निवड करायची आहे. ती तुम्हालाच करायची आहे. निवड करावीच लागणार आहे. अश्या वेळेला तुम्ही घरात रहाण्यासाठी कोणाची निवड कराल? का?

२. तुमच्याकडे ठराविकच पैसे आहेत. तुमच्या घरातील मानवी सदस्य व तुमचा पाळीव कुत्रा या दोघांवरही काही खर्च करणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्या दोघांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुमचे ठराविक पैसे हे दोघांपैकी एकाच्याच गरजेला पुरू शकतात. त्यामुळे तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करायची आहे. त्याला पर्याय नाही. अश्या वेळेला तुम्ही मानवी सदस्याची निवड कराल की कुत्र्याची? का?

Pages