ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्वानप्रेमी नाही म्हणजे लगेच कोणी श्वानद्वेषी ठरत नाही. असूही शकतात, नसूही शकतात>> +१

आसपास व्यवस्थित वागणारे कुत्रे असतील तर मी दुरून अगदी मनापासून कौतुक करते. पाळीव प्राण्यांनी जीव लावणे वगैरेही व्यवस्थितच समजतं. आमच्याघरी किती वर्षे मांजरं होती तर त्यांच्यातही माझा जीव गुंतलेला असायचा. पण म्हणून आपल्या पाळीव प्राण्याविषयी दुसर्‍यांनी तितकीच आस्था, जिव्हाळा, प्रेम बाळगावं आणि त्यांची जवळीक सहन करावीच हे मला पटण्यासारखं नाही.

श्वानप्रेमी नाही म्हणजे लगेच कोणी श्वानद्वेषी ठरत नाही. असूही शकतात, नसूही शकतात>> करेक्ट! घरात कुत्रे असलेल्यांकडे मी अजूनही जाऊ शकते पण त्या कुत्र्याने माझ्या अंगावर येता कामा नये. मी एका पोस्टमध्ये म्हटलंही होतं की काही कुत्र्यांच्या डोळ्यातच गरीबपणा दिसतो, तापटपणा नसतो. मालक देखिल आपला कुत्रा दुसर्‍याला घाबरवण्यासाठी वापरणारे नसतात. तेव्हा त्यांच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. मी जो कॉलेजात असताना एकप्रकारच्या खुनशीपणाचा अनुभव घेतलाय त्यामुळे मी फक्त उगाचच्या उगाच भॉ भॉ करत अंगावर येणार्‍या कुत्र्यांच्या कट्टर विरोधात आहे, आणि अर्थातच त्या कुत्र्यांना फुस लावणार्‍यांच्या.

समोरच्या माणसाला जर आपल्या एखाद्या गोष्टीमुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर त्या त्रासाची जाणीव होण्यासाठी आपल्याकडे तेवढी समज किंवा विचार करण्याची क्षमता हवी, ती जर नसेल, तर आपल्यावर तशी वेळ आल्याशिवाय ती जाणीव होणार नाही. (म्हणून पाल/कोळी इ कल्पना - केवळ विनोद म्हणून). किती लोकांमधे ही समज असते? शिवाय ती जाणीव असूनसुद्धा आपलं वागणं बदलणं हे अजून दुर्मिळ. ही गोष्ट सार्वजनिक ठि़काणी असो किंवा घरी, पाळलेल्या कुत्र्यांच्या बाबतीत असो किंवा भरधाव/हॉर्न वाजवत वाहन चालवणे, कचरा टाकणे, थुंकणे अश्या सगळीकडेच लागू होते.

काही बाबतीत कायदे होतात - जसे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी. पण धूम्रपानाचे इतरांवर होणारे दुष्परिणाम हे सरसकट सगळ्यांना लागू होतात, त्यामुळे तसे कायदे कदाचित लवकर होत असतील, पण दुर्दैवाने कुत्र्यांच्या बाबतीत तसं नाहिये - नीट शिकवलेली आणि निरोगी कुत्री सरसकट धोकादायक नसतात, शिवाय कुत्र्याची भीती वाटणार्‍या माणसांची संख्याही तुलनेने कमीच असू शकते. त्यामुळे त्याबाबतीत कितपत गांभीर्याने पाहिलं जाईल काय माहित. आणि कुत्र्यांचं घाण करणं, बाकांवर बसणं तर धोकादायकंही नसतं. (फ्रान्स मधे पाळीव कुत्री रस्त्यावर वगैरे सर्रास घाण करतात - हे २००९ मधे पहिलेलं आहे - मी तर कुठल्याही सार्वजनिक हिरवळींवर जाणंच बंद केलं होतं).

पण कमीतकमी भटक्या कुत्र्याला जर खायला घालायचं असेल तर त्या कुत्र्याला आपल्या घरी ठेवणं सक्तीचं केलं पाहिजे. आणि जर पाळीव कुत्रा कोणाला चावला तर मालकाला शिक्षा व्हायला हवी.

नि. पा. सध्या काय पॉलिसी आहे माहीत नाही पण पुर्वी ( मनेका पर्वाच्या पुर्वी ) ज्यावेळी कुत्रे पकडून नेत असत त्यावेळी ३ दिवस त्यांची उत्तम देखभाल केली जात असे. त्या काळात त्यांच्या मालकांनी असलेले लायसन्स दाखवून किंवा नवे लायसन्स घेऊन त्यांना ताब्यात घेता येत असे. त्यानंतर त्यांना मारून टाकले जात असे. इंजेक्शन देऊन वगैरे ... असा रिपोर्ट त्या काळच्या " श्री " साप्ताहिकात आल्याचे आठवतेय. त्यात फोटोही होते.

कोणीतरी सुचवल्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांना सरहद पार किंवा नॅशनल पार्क्स मध्ये पाठवून द्यावे.

पाळीव कुत्र्यांच्या परिक्षा घ्याव्यात आणि जी ग्रेड कुत्रे मिळवणार त्याप्रमाणे मालकाला पैसे भरावे लागतील असे काहीसे करावे

<<पण कमीतकमी भटक्या कुत्र्याला जर खायला घालायचं असेल तर त्या कुत्र्याला आपल्या घरी ठेवणं सक्तीचं केलं पाहिजे>> +1

<<पण कमीतकमी भटक्या कुत्र्याला जर खायला घालायचं असेल तर त्या कुत्र्याला आपल्या घरी ठेवणं सक्तीचं केलं पाहिजे>> + १०००

वेल + १०००००००००० एकाच बोटीतल्या प्रवासिनी Happy
घराच्या बाहेर पडल कि वरच्या जिन्यात बसलेला कुत्रा कान टवकारून डोकावतो कोण बाहेर पडतंय घराच्या ते बघायला कारण तिथेच ठाण मांडून बसलेला असतो
बिल्डींग च्या खाली उतरलं कि १०-१२ कुत्री शेपट्या हलवत हलवत अंगावर धावून येतात. हातात प्लास्टिक ची पिशवी असली कि हमखास जवळ जवळ करून पिशवीत डोकावतात Happy काही काही वेळा कीव पण येते बिचाऱ्यांची नाही अस नाही . स्पेशली जो वरच्या जिन्यातला कुत्रा कोणी आल गेल कि लगेच कान टवकारून डोकावतो तेव्हा:)

एका ओळखिच्यानी सांगितलेल ,

एका डोक्टर च्या वडिलांना एक छोट कुत्र्यचे पिल्लु फक्त पायाला चाटले. त्यांनी फार काहि लक्ष दिले नाहि. कारण फक्त चाटले होते. चावले नाही.
पण नंतर त्याना रेबीज होउन ते वाचु शकले नाही. Sad

कनू असे कसे होऊ शकते?
प्लीज संपूर्ण माहिती द्या.

आणि अर्थातच त्या कुत्र्यांना फुस लावणार्‍यांच्या.
>> फुस लावणारे खरे चु** असतात. विकृत माणसांच्या यादीत या प्रकारची पण माणसे अ‍ॅड केली पाहिजेत.

कालच टीव्हीवर बातमी होती की बार्शी ( पन्ढरपूर) मध्ये एका लहान मुलीला कुत्रा चावला, पण सरकारी दवाखान्यात किन्वा गावात इतरत्र पण कुठेच रेबीज वरची लस उपलब्ध नव्हती.:राग: तिचे वडील बिचारे हवालदील होऊन सगळीकडे चौकशी करत फिरत होते. त्या मुलीला चक्क १५ दिवसानी सोलापूरला नेण्यास सान्गीतले. पण ती वाचु शकली नाही, बिचारी खूप यातना सहन करुन गेली असे बातम्यात सान्गीतले.:अरेरे:

काय म्हणावे या सरकारच्या आणी डॉक्टर्स च्या हलगर्जी पणाला? एकतर या कुत्र्याना पकडुन मारा, नाहीतर कुठतरी अन्तराळात पाठवुन द्या. तरन्गतील वरच्यावर.

अरे,बर्‍याचदा आठवण येते या धाग्याची.,राजकारणांच्या काही धाग्यावर प्रतिसाद वाचले-'इथे चर्चा करुन उपयोग आहे का काही?' वगैरे त्यावरुन हा आणि हा एक असे दोन धागे आठवले. आणि आज श्वानांचा धागा वरती आलेला दिसलाही. Happy
शिवाय कालची ती सोलापूरची बातमीपण आणि मध्ये
हे वाचनात आलं तेव्हापण आठवलेला हा धागा.
Happy

अहो डॉक्टर वाक्याबद्दल सॉरी, पण कोणावर कसली परिस्थिती ओढवेल सान्गता येते काय? आणी ही लस उपलब्ध व्हावी/ असावी या करता डॉक्टर्स ( सरकारी दवाखान्यातील वा खाजगी देखील) सुद्धा प्रयत्न करीत नाहीत/ मागणी करत नाहीत याचे आश्चर्य वाटले.

हा डॉक्टर्स वर हल्लाबोल नाहीये, पण विचार करा. त्या मोकाट कुत्र्याना तर आवरता येणार नाही मग निदान कुणाचा जीव वाचण्यासाठी पण काही करता येत नाही का?

या करता डॉक्टर्स ( सरकारी दवाखान्यातील वा खाजगी देखील) सुद्धा प्रयत्न करीत नाहीत/ मागणी करत नाहीत याचे आश्चर्य
<<
छेछे. यामधे आश्चर्य काय छे?

(मॉडर्न मेडिसिनवाले) डॉक्टर्स हे संख्यात्मक अत्यंत नगण्य मतदार असल्याने यांच्या सर्वच मागण्यांना सरकार व लोकांकडूनही नेहेमीच फाट्यावर मारण्यात येते.

दरम्यानच्या काळात कुत्रं चावण्यावरची होमिओपथिक लस आपण वापरावी असे सुचवून पहातो. त्यांच्या "पॅथी"त नक्किच उपलब्ध असेल. जमत नसेल तर लाईक क्युअर लाईक म्हणून एक दुसरे कुत्रे चावतेय का, याचा प्रयत्न करून पहावा.

बाकी अमुक औषध घ्या असं सुचविण्याऐवजी इतर काहीही आमच्या हातात नाही. अगदी त्या Rx चा अर्थ देखिल, 'Take thou' अर्थात, हे तुम्ही घ्या, असाच होतो.

आणि हो,
मोकाट कुत्र्यांना आवरता येत नाही म्हणून मी बंदूक आणून ठेवली आहे, हे वर लिहिलेले आहेच. Happy

(लहानपणी बेंबीभोवती १४ इन्जेक्क्षने घेतलेला) इब्लिस

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Dogs/arti...

भयानक प्रकार आहे हा. आमच्या भागात पण पारले जी चे पुडे घेउन फिरताना २ महिलांना आजच पाहिले , बिस्किटे वाटप करत. यांना कुठल्यातरी भगताने सांगितले असणार. मुक्या जीवाला खावु घाला, तुमचे काम होइल म्हणुन.
Angry

निवांत पाटील, आज सकाळीच ही बातमी वाचली, अक्षरशः अंगावर काटा आला. अशीच एक बातमी मागे वाचनात आली होती बहुतेक सातार्‍याला एका पाच वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता पण तो बिचारा कमनशिबी होता त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी तेथे कोणीच नव्हते कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेला होता. भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे अश्याने माणसेच कायदा हातात घेऊन कुत्र्यांना मारून टाकतील.

कुत्रे पाळण्यास काही हरकत नाही पण साले जाता येता कोणाच्याही अंगावर धावून गेले तर जाम डोक्यात जातात.

माझ्या सोसायटीमध्ये एक कुटूंब काही दिवसापुर्वी रहायला आले.त्यांच्याकडे कुत्रा आहे. परवा आला धावून माझ्या कारवर इतका कि त्याने दोन पाय कारच्या दरवाज्यावर ठेवून तोंड खिडकितून आत करुन भूंकू लागला, मग माझी सटकली लगेच विंडो ग्लास बंद करुन त्यांचे मुंडके अडकवले आणि फिरवला त्याला तसाच २-३ किमी . पुन्हा सोसायटीजवळ येवून मोकळा केला. मेला नव्हता पण चांगली अद्दल घडली त्याला. हा सगळा प्रकार त्या कुत्र्याचा मालक असणारा खवचट म्हातारा बघत होता. कुत्रा सोडताच तो माझ्यावर धावून आला. आमच्या कुत्र्याला का जखमी केले म्हणून मग थोडे वाद झाले. मी कंपलेट करतो वगैरे इथपर्येंत. मग काय त्यालाही धमकवावे लागले.

असे संबंध खराव होतात कुत्र्यांमुळे....................

मेला नव्हता पण चांगली अद्दल घडली त्याला. हा सगळा प्रकार त्या कुत्र्याचा मालक असणारा खवचट म्हातारा बघत होता. कुत्रा सोडताच तो माझ्यावर धावून आला. आमच्या कुत्र्याला का जखमी केले म्हणून मग थोडे वाद झाले. मी कंपलेट करतो वगैरे इथपर्येंत. मग काय त्यालाही धमकवावे लागले.

असे संबंध खराव होतात कुत्र्यांमुळे....................
>>>
एकदम सही..मला पण राग हे लोक कुत्रे पाळतात आणि घाण फुट्पाथ वर स्वतःच्या घरात करा की म्हणाव्...

मोकाट कुत्र्यांना आवरता येत नाही म्हणून मी बंदूक आणून ठेवली आहे, हे वर लिहिलेले आहेच. >>> Lol

फक्त कुत्र्यांसाठीच ना ? Wink

किकु,

>> मग काय त्यालाही धमकवावे लागले.
>> असे संबंध खराव होतात कुत्र्यांमुळे....................

मग असे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी त्या थेरड्याला पण राईड द्यायची की कुत्र्याला दिली तशी! Wink

आ.न.,
-गा.पै.

dog man's best friend

अशी म्हण मराठीत नाही का?

नसावीच,

चिल्लर पार्टी सारखा चांगला चित्रपट (त्यातील रणबीर कपूरचे गाणे वगळता) का चालला नाही याचे कारण या धाग्यात आणि धाग्यातला प्रतिसादांमध्ये दडले आहे.

येथील एकेक प्रतिसाद बघून मला असे वाटू लागलेय की कुत्रा हा पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी आहे की काय Sad

भयानक प्रकार आहे हा. आमच्या भागात पण पारले जी चे पुडे घेउन फिरताना २ महिलांना आजच पाहिले , बिस्किटे वाटप करत. यांना कुठल्यातरी भगताने सांगितले असणार. मुक्या जीवाला खावु घाला, तुमचे काम होइल म्हणुन.

>>>
आम्च्या ईथे एक पंजाबीन कुत्र्यांना रोज चिकनभात खाऊ घालते...मी पाहिला नाही पण सासुबाईंनी सांगितला त्यांना चिकनभात करुन द्यायला हवेय कोणितरि..अस्सा राग आलेला ना ...
अजुन एक आफीसच्या बाहेर जरा लांब एक बाप खुप पैसेवाला असलेला मुलगा (वाया गेलेला)रोज भटक्या कुत्र्यांना बिस्कीटापासुन चिकनपर्यंत वेगवेगळ्या डिश आणतो खायला...

मग माझी सटकली लगेच विंडो ग्लास बंद करुन त्यांचे मुंडके अडकवले आणि फिरवला त्याला तसाच २-३ किमी . >>> हे क्रूर वाटलं. तुम्ही डायरेक्ट कंप्लेंटच करायची त्याला आधी सेफ अंतरावर हाकलल्यावर. मालक नुसता बघत बसला होता का त्याचा कुत्रा तुमच्या गाडीच्या खिडकीतूनही भुंकताना? अगदी जोरात भांडण करायचं मग.

कुत्रा सोडताच तो माझ्यावर धावून आला.>>> कोण? कुत्रा की मालक?

Pages