ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> कुत्र्यालाही काहीतरी शिकवलेलं असायला हवं
बरोबर. एकदम मान्य. मुलांवर करतो तसे कुत्र्यावरही चांगले संस्कार करायला लागतात. Happy

शिवाय सार्वजनिक जागी पट्टा बांधल्याशिवाय नेऊ नये. शी केली तर ती साफ करावी वगैरे संस्कार घरातल्या मनुष्यप्राण्यांवर.

हल्ली नवीन लोकांना भेटावे लागते तेव्हा मी पत्ता वगैरे विचारला की फोन ठेवायच्या आधी खरोखर विचारतो की घरी कुत्रे आहे का!
>>
+१११११११११११११११११११११११

आणि अशा घरात मी जातही नाही. Happy

मग एवढा वेळ दुसरं काय बोललं जातंय?
किकुच्या गाडीमधे तोंड घालून भुकणारे कुत्रे आणि बघत बसणारा मालक यापेक्षा किकुने कुत्र्याचे जे केले त्याबद्दलच हळहळ व्यक्त झाली (जे क्रूर आहे हे मलाही मान्य आहे पण.. ). त्या मालकाची काही चूक नव्हतीच का?

कुत्रे हे फक्त कारण आहे. ह्या सगळ्यांचं मूळ काही बेशिस्त भारतीयांचा स्वार्थी स्वभाव आणि माणूसकी आटून दुष्काळ पडलेली वृत्ती. भारतीय ह्यासाठी म्हंटले की ईराणी आणि चिलीअन काय करतात ह्याने मला मला तुम्हाला अजूनतरी त्रास होत नाही म्हणून.

आपला कुत्रा न सांभाळणे काय, ट्राफिकचे नियम ऊडवून लावणं काय, रस्त्यांवर कचरा करणं काय, अतिक्रमण, भ्रष्टाचार ई ई. अगणित गोष्टी. नियम करून, दंड आकारूनही जिथे कायद्याचा दंडूका हतबल होतो तिथे तुम्ही आम्ही कितीही मनधरणी केली तर काही फरक पडत नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्यांकडे कोणी ढुंकून पहात नाही, त्यांच्या वेदनेचा विचार करीत नाही (पोलिस धरून) तर कुत्र्यांमुळे होणारा त्रास फारच नगण्य.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्यांकडे कोणी ढुंकून पहात नाही त्यांच्या वेदनेचा विचार करीत नाही (पोलिस धरून) तर कुत्र्यांमुळे होणारा त्रास फारच नगण्य.<<<

तुलना पटत नाही.

दुसरे म्हणजे, कुत्र्यांमुळे होणारा त्रास नगण्य नसतो. प्रचंड घाबरणे, निश्चल थिजून उभे राहावे लागणे येथपासून ते मरणे येथपर्यंत काहीही घडू शकते.

अहो लहान मुलाला कुत्रा पाळण्यापासून परावृत्त करण्याचे मुद्दे. इतकावेळ मालकाच्या बेजवाबदारपणा वर चर्चा चालल्येय ना. लहानमुलाच्या मनात द्वेष न भरता प्राजक्तानी परावृत्त केलंय असं त्याच्या पोस्ट वरून वाटतंय.
चमन, पूर्ण पटले.

@ चमन सर,

म्हणूनच सिस्टीम बदलली पाहीजे असं केजरीवाल नेहमी म्हणतात. सिस्टीम बदलली की सगळेच प्रश्न सुटतील. त्यासाठी आपण आंदोलन उभारलं पाहीजे. भाजपाचे सरकार गेले की अण्णा देखील उपोषणाला बसतील. मग सर्वत्र श्वानमालक आपल्या कुत्र्याला फिरायला नेताना काळजी घेताना दिसतील, घाण उचलतांना दिसतील. तो दिवस दूर नाही.

अमित, कुत्रा आणायचा हा हट्ट बहुधा सगळीच लहान मुले करतात! मी माझ्या पोरांना सांगितले, कुत्रा म्हणजे मला अ‍ॅडिशनल काम पडणार. एक्स्ट्रा मूल घरात आल्यासारखंच! त्यामुळे असं करू, की जेव्हा मला दिसेल की १ महिना भर तुम्ही स्वतःची सर्व काळजी घ्याल, आपली रूम साफ ठेवाल, कसलीच आठवण न करता आपली सर्व कामं कराल, मला ओरडायला न लावता स्कूल, होमवर्क इ. टायमात कराल तेव्हा मी कुत्रा आणायला हो म्हणेन!! दॅट्स द डील ! झालं माझं काम !
मला तशी काही चिंता नव्हतीच, कारण हे वरचं सगळं कधीही होणार नसतं Happy

अभ्यास करून किती लोक कुत्रा किंवा पाळीव प्राणी पाळतात ते मला ठाऊक नाही. हौसेखातर पाळायला आणायचा अन मग त्या जिवाचे हाल करायचे हे मी अनेक घरांत पाहिलेलं आहे. शेजारच्या बंगल्यात आहे म्हणून आणलेली एक खरीच प्रेमळ अन गोड डॉबरमन बिच या गाढवांनी दिवस रात्र बांधून ठेवल्याने अक्षरशः वेडी झालेली. तिला नेऊन कुठेतरी खेड्यातल्या शेतात टाकून आले. जीव जळाला माझा ते पाहून.

दुसरी गोष्ट मला एक समजत नाही. की प्रेम करण्याची लिमिट आपण पाळतो का?

तो प्राणी नेहेमी तुमच्या सोबत असतो, तुमचा जिवलग मित्र आहे वगैरे ठीक. पण आपल्या बिछान्यात झोपायला अन आपल्या ताटात जेवायला घालणार्‍यांचा वेडेपणा मला समजतच नाही. कुत्रे कितीही हेल्दी असले तरी त्याचे केस गळत असतात. स्किन एक्स्फोलिएट होत असते. घाम, लाळेसारखे बायोलॉजिकल फ्लुइड्स एक्स्चेंज होत रहातात.

धिस इस सिंप्ली नॉट हेल्दी.

त्या प्राण्याला ज्या व्हायरस जंतूंनी आजार होतात, ते आपल्यात पसरू शकतात, त्याला ज्या जंतूंनी काहीच होत नाही, त्यामुळे तो हेल्दी असतो, असे कमेन्साल्स, आपल्यासाठी पॅथोजेनिक असू शकतात.

एका वाटीतून श्रीखंड चाटून खाऊ घालणार आहात का लाडक्या बाळाला? असेही पाहिलेले आहेत. पुन्हा, सिंप्ली नॉट हेल्दी. २ लशी दिल्या म्हणजे झाले, असे नसते.

ब्रिटीश स्टाईल पाहिजे त्यासाठी. सेपरेट केनेल ठेवा. घरात एका लिमिटपलिकडे त्याला फिरायला एंट्री देऊ नका. त्याचे खाणेपिणे वेगळे ठेवा. त्याला अंगावर पाय ठेऊ द्यायचे असेल, तर त्यासाठी वेगळा पोशाख ठेवा, जो स्वतःच्या जेवणाआधी, झोपायला जाण्याआधी बदला इ.

अन स्ट्रे डॉग्जचं तर कौतुक काय वर्णावं? रात्री-बेरात्री टू व्हिलरवर गावभर १२ महिने अन १८ काळ इमर्जन्सी कॉल्स करताना या जमातीने जो त्रास दिलाय, त्यासाठी स्पेशल एयरगन ट्रीटमेंट आहे माझ्याकडे. तो विषय वेगळाच आहे.

मै! +१, अमितव! सगळ्या आया.न्ची डोकी एकाच दिशेने चालतात , मी पण जवळपास मैत्रीयीने घातलेल्याच अटी घातल्या आणी काम झाले.

>> काही बेशिस्त
सहमत.

बाकी मूळ प्रश्नात, बसायला इतर बाके असतील तर वादाला फारसा स्कोप नाही असे मला वाटते. हायजीन बद्दल बोलायचे तर बाके सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर आहेत. तिथे पक्षी, खारी, माकडे अश्या सगळ्या न पाळीव जीवांनाही घाण करण्याची संधी आहे.

इब्लिस काका तुम्ही अक्षयकुमारच्या नवीन "एंटरटेनमेंट " या सिनेमाची जाहिरात पाहिलित का अलीकडे ?

Mrudula, ashya baganmadhe maryadit bak ch astat. JeshTha nagarikanna ferya maratana basata yave hyakarata astat te.

माझ्या पहाण्यात लहान मुलांना जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी कुत्रा पाळल्याची उदाहरणं आहेत. कुटुंबातली मोठी भावंडं आपसुकच लहान भावंडांची जबाबदारी (काळ्जी) घेतात; परंतु शेंडेफळांना हि संधी मिळत नसल्याने घरात कुत्रा आणला जातो. शेंडेफळाला इतर कोणावरहि नाहि पण त्याच्यावर बॉसिंग करता येते हा बोनस...

अर्थात इथे घरं स्वतंत्र, भरपुर मोकळी (फेंस्ड) जागा याची तुलना भारतातल्या परिस्थितीशी करता येणार नाहि.

मुळात फ्लॅटसमधे कुत्रे ठेवणे हे विनोदी नाही का? म्हणजे कुत्रे हा पाळीव असला तरी प्राणी आहे आणि त्याला भरपूर रिकामी जागा (पळायला, खेळायला) मिळणे हे गरजेचे नाही का?

विनोदी नाही नी, काही कुत्र्यांच्या बाबतीत क्रूरही असणार ते. शिवाय घरात एकटे सोडून जाणेही काही कुत्र्यांना मानवत नाही. इब्लिसांनी उल्लेख केला तसे, नीट विचार करून, अभ्यास करून करायचे काम आहे हे.

(तसे तर मुले होऊ देणे हेही नीट विचार करून करण्याचेच काम ना. :-))

आत्यंतिक आवड, एकेकटे लोक, सुरक्षा अशा विविध कारणांमुळे लोक फ्लॅटमधेही कुत्री पाळतात. त्यांच्या दृष्टीने ती भावनिक गरजही असू शकते. सगळ्यांनाच इच्छा असली तरी मोठी घरं परवडत नसतात. अशा वेळेस मग कुत्र्याला रोज बाहेर घेऊन व्यवस्थित फिरवून आणणे, फ्लॅटची जास्त काटेकोर सफाई करणे, कुत्र्याला आणि स्वतःला व्यवस्थित सवयी लावणे हे सग्ळं 'मस्ट' असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरी आलेल्या लोकांसमोर कुत्र्याला मोकळे न सोडणे हेही शिकावं/शिकवावं लागतं. कुत्र्याला आपण लावू तशा सवयी लागतात. पण कुत्रं पाळताना त्या मुक्या प्राण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे - बाहेरच्यांनी त्यांना गोंजारायचा मक्ता घेतलेला नाही - हेही डोक्यात ठेवावं.

माझ्या मते - काय कुत्रा,मांजर, घोडा, गाय पाळायची ती पाळा स्वतःच्या घरी. पण दुसर्‍याला त्याचा किंचितही उपद्रव होऊ नये (स्वतःच्या घरी आलेल्यांनाही किंवा सार्वजनिक ठिकाणी) ही प्राथमिक जबाबदारी आहे.

मी कुत्राप्रेमी आहे. कुत्रा पाळलेला आहे. गावाबाहेर राहत असल्याने व शेत असल्याने कुत्र्याची शी वगैरे साफ करायला लागायची नाही. इतर काळजी घ्यायला लागायची (कुत्र्याची काळजी, त्याचे इन्जेक्शन वगैरे, त्याचा बाकीच्यांना त्रास होणार नाही वगैरे). आम्ही कुत्रा राखणीला पाळायचो त्यामुळे तो घरात न विचारता येणार्‍या लोकांच्या अंगावर धावून गेल्यास रोखायचो नाही. नातेवाईक राहायला आल्यास घरात कुत्रा आहे हे आधी सांगितले असायचे त्यामुळे ज्यांना आवडत नाही त्यांना न येण्याचा ऑप्शन होता.

वर अनेक कुत्रे मालक नसलेल्या, न आवडणार्‍या लोकांनी लिहिलेल्या सर्व गोष्टींना अनुमोदन. विशेषतः शहरात पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. शहरातील संसाधनांवर मनुष्याच्या पहिला हक्क असला पाहिजे.

<<< शास्त्रीय ऊत्तर - बाक माणूसप्राण्याच्या शरीररचनेनुसार त्या रचनेला सोयीस्कर बनवला आहे. >>

बाकावर जर कुत्रा बसलेला असेल तर बाक त्याच्याही शरीररचनेला सोयिस्करच आहे. नाहितर तो बसला नसता Proud

<<सामाजिक ऊत्तर - माणूस आणि पाळीव प्राणी ह्यांच्यामध्ये जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात आणि संस्कृतीत (भावना बाजूला ठेवून बघितल्यास) माणूसप्राण्याच्या जिवाला जास्त महत्व आहे. (कीड्या मुंग्यांसारखी माणसे मारली जातात आणि पोटच्या पोरांसारखे पाळीवप्राण्यांचें लाड होतात हा प्रासंगिक विवाद किंवा भावनिक मुद्दा आहे)>>

ईथे जीवाला महत्व असल्याचा प्रश्न कुठे उद्भवला ? तरीही, मानवी जीव प्राण्यांपेक्षा जास्त महत्वाचा आहे, असा कायदा आहे ? Uhoh

<<राजकीय ऊत्तर - मी मनतदान करून निवडून दिलेल्या सरकारने कर्तव्य म्हणून माझ्या सारख्या माणूस प्राण्यांसाठी तो बाक बनवला आहे, अजून पाळीव प्राणी मतदान करीत नाहीत. >>

पाळीव प्राण्यांनी त्यावर बसू नये अशी सूचना त्या बाकावर आहे ? कायदेशीर रीत्या मतदान करण्याची परवानगी नसलेले. उदा.: अज्ञान बालक जे मतदान करीत नाहीत, त्यानाही बाकावर बसण्याचा अधिकार नाकारायचा ना मग ? Rofl

<<आर्थिक ऊत्तर - सार्वजनिक मालमत्तां वापरण्याचा हक्क बजावण्यासाठी संबंधित श्वानाने नियमित टॅक्स भरला होंता कांय महाराजां? >>

टॅक्स न भरणारे .... बाकावर बसू शकत नाहीत का ? Rofl तशीही नोटीस असेल ना बाकावर ? Wink

<<वैयक्तिक ऊत्तर - राहू देत सध्या, अजून तशी वेळ आली नाही. >>>

बाफची एकूण वैचारीक पातळी पहाता ही गोष्ट कधीच होऊन गेलीये..

चमन, जोक्स अपार्ट. मी अगदी मनापासून विचारलाय तो प्रश्न.

असो. मी पुन्हा एकदा बाफकर्त्या सुमेधाव्ही याना विचारतो...

ह्या प्रसंगात, कुत्र्याला उठवून आपल्यालाबसायला मिळावे असे तुम्हाला का वाटले ? दुसर्‍या शब्दात विचारायचे तर, श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळावे असे तुम्हाला का वाटते ?

आणि हो, मी सिरीयसली विचारतो आहे.

सांगलीमध्ये आता भटक्या श्वान्,मा़ंजर आणि इतर प्राणी पक्ष्यांचा बाजार भरवला जाणार आहे.इथले प्राणिप्रेमी असा बाजार भरवणार असून त्यात सर्व प्रकारचे प्राणी असणर आहेत.अगदी भटके सुद्धा.यातून मिळणारा पैसा हा भटक्या प्राण्यांच्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.इथे काही प्रकर्षाने पुढे असणार्‍या प्राणीप्रेमी एन.जीओ आहेत त्यांनी हा उपक्रम आणलेला आहे.

.ही बातमीपण वाचा.

अमित,

तुम्ही सुमेधांना विचारत आहात, पण माझे मत लिहिले तर चालेल का?

१. बाक हा निसर्गात आपोआप निर्माण झालेला नसून माणसाने माणसाला बसता यावे म्हणून निर्माण केलेला आहे.
२. तो बाक अश्या ठिकाणी माणसाने प्लेस केलेला आहे जेथे माणसांना बसावयाला तश्या बाकांशिवाय इतर जागा योग्य नाही. (मातीत बसलात तर काय बिघडले वगैरे प्रश्न आपण विचारायचा नाहीत ही खात्री आहेच)
३. कुत्रे (पाळीव असले तरी) ते बाकावर नाही बसले तरी इतरत्र बसू शकेल (प्रोव्हायडेड त्याच्या मालकाला हरकत नसेल तर). म्हणजे मालक जर कुत्र्याला बाकावरच बसायची जबरदस्ती करत असेल तर तो कुत्र्याला निसर्गापासून दूर नेत आहे. निसर्गाने कुत्र्यांसाठी असे बाक जगात कुठेही बनवलेले नाहीत.
४. वर टण्या म्हणाले आहेत त्याप्रमाणे मानवनिर्मीत वा इतर संसाधनांवर मनुष्याचा प्रथम हक्क असणे बरोबर आहे कारण 'बळी तो कान पिळी' ह्या अत्यंत नैसर्गीक न्यायानुसार माणूस सर्वाधिक बुद्धीवान प्राणी आहे.
५. कुत्र्याशेजारी बसणे सुमेधा ह्यांना भीतीदायक वाटलेले असू शकत असल्यामुळे त्याला उठवूनच त्यांना बसायचे असावे.
६. नीधप ह्यांनी विचारलेले ते सर्व प्रश्न त्या विशिष्ट अडेलतट्टू कुत्रेमालकाला मात्र चपखलपणे लागू होताना दिसत आहेत.

ह्या प्रश्नावरच्या कोणाच्या एखाद्या पोस्ट मधला मुद्दा सुटला असला तर सांगावे.

सुमेधाव्ही, जर प्रॉब्लेमवर सोल्यूशन हवं असेल तर काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

दोन्ही बाजूण्चे काही मुद्दे बरोबर आहेत, पण बाफचा एकंदरीत सूर कुत्रेद्वेषी आहे. काही पोस्टस् तर निव्वळ कुत्रेप्रेमीना चिथावण्यासाठी टाकल्या असाव्यात असा भास होतो.

इब्लीस, हायजिनचा मुद्दा कुठेतरी व्यवस्थित डिस्कस करु.

बाफचा एकंदरीत सूर कुत्रेद्वेषी आहे << लेबले अम्या....
अजिबात मान्य नाही हे.

Pages