ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केश्वे, मी पण हेच लिहायला खाली स्क्रोल केलं. कितीही राग, किळस, भीती असली तरी कुठल्याही प्राण्याला अशी वागणूक निदान मला तरी क्रूरतेचीच वाटते. Uhoh

अके आणि वरदा..........
काही अंशी सहमत. पण या कुत्रामालकांकडे तक्रार केली तर त्यांचे फेमेस डायलॉग ठरलेले असतात...... जसे
१) तो फक्त भूंकतो चावत नाही कधी.. ( जसे काय याला सांगून चावणार आहे)
२) मुक्या प्राणी आहे जाउ द्या हो भूंकला तर ... ( मुका आहे तर भूकतो कशाला कुत्रा कुठला)
३) अहो तुम्ही नविन आहात ना म्हणून तुमच्यावर भूंकला असेल. ( मग मी काय त्याची मुलाखत घेवू का ओळख करुन घेण्यासाठी)
४) मी सांगितले तर लगेच गप्प बसतो तो. ( मग काय जेंव्हा जेव्हा तो माझ्यावर भूंकेल तेव्हा तूला शोधायचे का )

असो..
सोसायटीतल्या कुत्र्यांच्या भितीने मुले हल्ली खेळायला येत नाहीत खाली....................

किरण कुमार, केश्विनीशी सहमत आहे.

बाकी, सोसायटीतील कुत्र्यांबद्दल तुम्ही सोसायटीच्या एजीएममधे चर्चा करून नियम तयार करू शकता.

किरण Rofl

पण तरीही तू जे केलस ते वाचुन आई ग्गं असंच झालं :)पण कधी कधी खरच ही कुत्री डोक्यात जातात. मी तर म्हणते माझ्याकडे बंदुक असती तर गोळी मारली असती त्या कुत्र्यांना Happy
सो मी तुला समजू शकते

कुत्र्याला मारणे हा काही उपाय नाही होऊ शकत.

पाळीव कुत्र्यांचा त्रास असेल आणि मालक ऐकत नसेल तर सोसायटीत बेशिस्त कुत्र्यांचे पालक अशी स्पर्धा ठेवून पहा. लोकांना मतं द्यायचा अधिकार ठेवा आणि बाय डिफॉल्ट ज्यांच्याकडे कुत्रा आहे त्यामधून पाच सर्वात जास्त बेशिस्त पालकांची नॉमिनेशन्स येऊ द्या स्पर्धेसाठी. पुढे माईक , प्रेक्षक आणि कु.पा. !!

मग माझी सटकली लगेच विंडो ग्लास बंद करुन त्यांचे मुंडके अडकवले आणि फिरवला त्याला तसाच २-३ किमी . >>> हे क्रूर वाटलं. >>> अतिशय क्रूर वाटल. असेही लोकं असतील तर त्या मुक्याप्राण्याला कश्याला नाव ठेवायची.

http://www.envfor.nic.in/legis/awbi/awbi01.pdf हे वाचून घ्या.

येथील क्रूर प्रतिसाद वाचून पहिले काही दिवस अतिशय त्रास झाला. येथील लोक्स घरी येऊन कुत्रे मारून टाकतील अशी भीती वाटली. कुत्र्यांबद्दल माहिती, बीएम सीचे रूल्स वगैरे लिहि ण्याचे पण मनात आले होते पन त्याचा परीणाम म्हणून येथील मानसिकतेत काही बदल होईल असे नाही. तेव्हा ते सोडून दिले.

मग माझी सटकली लगेच विंडो ग्लास बंद करुन त्यांचे मुंडके अडकवले आणि फिरवला त्याला तसाच २-३ किमी .>> ह्या घटनेतला कुत्रा मेला का? काल हा प्रतिसाद वाचल्यवरही प्रचंड कसे तरी झाले आणि भीती वाटली.
I was seriously traumatized. my sympathies for the dog owner. proper thing to do after such abuse is to take the dog to a vet for a check up. his neck bones must have been hurt. This is downright horrible.

मग माझी सटकली लगेच विंडो ग्लास बंद करुन त्यांचे मुंडके अडकवले आणि फिरवला त्याला तसाच २-३ किमी . >>> हे क्रूर वाटलं.
------- Sad हा उपाय नाही आवडला...

येथील क्रूर प्रतिसाद वाचून पहिले काही दिवस अतिशय त्रास झाला. येथील लोक्स घरी येऊन कुत्रे मारून टाकतील अशी भीती वाटली. <<<
या बाफबद्दल आहे का हे? तसे असेल तर एक वरची क्रूर घटना सोडली तर इतकं पॅनिक होण्यासारखं इथे कोणीही काहीही म्हणत नाहीये. ती घटना सोडता कुणी इथे क्रूर उपाययोजना किंवा तत्सम काही सुचवलेलेही नाहीये.
लोकांच्या घरात शिरून त्यांचे कुत्रे मारून टाकणे वगैरे असली मानसिकता इथे कुणाचीही नाहीये.
कुत्रेप्रेमी नसतात ते सगळे कुत्रेद्वेषीच असतात असे नाही.
कुत्रे असलेल्यांच्या घरीच जाणे टाळणारे लोक आहेत. तेव्हा तुम्ही एकदम निवांत रहा. कोणी येत नाही तुमच्याकडे.
कुत्रे न आवडणे हा गुन्हा नाही. कुत्र्याची भिती वाटणे हा तर अजिबात गुन्हा नाही. या दोन्ही गोष्टींमुळे तुम्ही लोकांना कुत्रेद्वेषी म्हणून शकत नाही.
बहुतेक कुत्रेप्रेमी लगेच टोकाला जातात या बाबतीत.

he ase karayachech asel tar kutryachya bejababdar malakalaa karayala have hote. kutryala nahi.

I recently adopted a dog from a local dog rescue. She is the best thing that happened to us. Such unconditional and just love for her family. She is an excellent guard dog also. One holiday night, some hooligans rampaging through the neighborhood targeted our house. They rang door bell and banged on door, Leela sprang up from her bed with blanket still on her back, and ran to door and barked loud. We rushed downstairs to see the retreating vandals. After she made sure all is safe, she sat down and accepted our praise. She was highly satisfied with her work too. It is a very simple incident, but the way she carried herself assured us that she has adopted us as her family. And just looking at her, playing with her gives me deep satisfaction. She makes us happy, & safe in our own home!

In India, the problem of stray dogs is severe, and I agree it should be addressed With strictest measure possible. After all dogs can't fix their own situation but we can!
But at the same time, the reactions to kill,shoot,torture dogs sound as ridiculous as trying to kill,shoot,torture a badly behaved child.

YES, I AM A PROUD DOG LOVER
(I am a proud marathi woman too too. Wink just can't type in marathi on phone. Sorry)

बहुतेक कुत्रेप्रेमी लगेच टोकाला जातात या बाबतीत>> याबाबतीत अनुमोदन.

पहाटेचं वॉकला जाणंसुद्धा या कुत्र्यांनी आणी त्यांच्या मालकांनी असह्य करून ठेवलं आहे. जरा कुठे चालायाला निघालं की आलेच भाव्भाव करत.

vandana, there are two problematic areas as far as dog-situation in India is considered.
One is of stray dogs and other is of dog owners who disrespect/disregard everybody else's convenience, dislike for dogs, etc and and such dog owners become a plain civic nuisance...
If you read the whole discussion, you will realize that we are for some kind of code of conduct to be enforced on the owners - not harming pet dogs...

केअश्वी आणि कि कु दोघांशीही सहमत. किकुंच्या वागण्याशी नव्हे. किकुंच वागण नक्कीच क्रूर वाटतंय. पण त्याचं म्हणण पण बरोबर आहे. कुत्रा खिडकीतून डोक आत घालून चावला असता तर ? मालक नुसताच बघत का राहिला ?. ताबडतोब स्वताच्या कुत्र्याला आवरले का नाही? नाहीतर कीकू असे वागलेच नसते ना ?
पण कीकू गाडीच दार बंद करून त्याला असा पद्धतीने घुमवलत हे जरा अतीच वाटतंय Sad

कुत्रा खिडकीतून डोक आत घालून चावला असता तर ? मालक नुसताच बघत का राहिला ?. ताबडतोब स्वताच्या कुत्र्याला आवरले का नाही? <<
कुत्रेप्रेमींनी, कुत्रेमालकांनी या आणि कुत्रेमालकांच्या एकूण अ‍ॅटिट्यूडबद्दल उत्तर द्यावे.
आणि मग इथे क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्सच्या नियमांची पत्रके वाटावीत.

इथले अनेक जण श्वानद्वेष्टे नाहीत पण श्वानमालकांच्या अ‍ॅटिट्यूडमुळे श्वानमालकद्वेष्टे बनण्याची शक्यता आहे.

Varada, I do wholeheartedly agree with you that a code of conduct be enforced for dog owners.
My family and I take our responsibility as dog owners very seriously and make sure no one ever feels uncomfortable or is inconvenienced in any situation concerning our dog.

वंदना, Dogowners' Ethics हा प्रकार भारतात जवळजवळ अस्तित्वातच नाही असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे हे तर तुम्हाला मान्य असेलच ना? (सन्माननीय अपवाद वगळता!)

अमा, खालिल प्रश्नांची उत्तरे दे :

१. तुम्ही कुत्र्यांना फिरवायला नेता तेव्हा त्यांनी केलेली घाण लगेच उचलून कचराकुंडीत टाकता का?
२. लिफ्टमध्ये कोणी कुत्र्यांना घाबरणारं असेल तरीही दामटून त्याच लिफ्टमध्ये दोन दांडगे कुत्रे घुसवता का?
३. कुत्र्यांना बघून कोणी घाबरलं की फिस्स करून हसता का? (मागे तुझ्या एका पोस्टीत असा उल्लेख होता). मला झुरळांची भिती वाटत नाही म्हणून तुझ्या अंगावर चार झुरळं सोडली तर चालतील ना?

महामूर्ख आणि बिन्डोक मेंटालिटी असलेले कुत्रे-मालक आहेत. आणि आमची तक्रार त्यांच्या विरुद्ध आहे. उगाच वेड पांघरून पेडगावला जायचा प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा आहे. अन्यथा नुसत्या फुसकुल्या सोडून पळून जाण्याचा मार्ग तुला अवलंबायचा असल्यास आतापर्यंत केलेस तसंच करशीलच.

कुत्रे पाळणे म्हणजे नक्की काय कमिटमेंट असते हे तुझ्या लक्षात आलं आहे की नाही हे जरा समजू दे. आणि भूतदया वगैरे काही नाही. तुमची पण सेफ वाटण्याची गरज, भावनिक गरज असते म्हणून कुत्री पाळता. आणि त्यांना टीचभर जागेत रहायला लावून त्यांच्यावर अन्याय करता.

Dogowners' Ethics हा प्रकार भारतात जवळजवळ अस्तित्वातच नाही असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे हे तर तुम्हाला मान्य असेलच ना? >>> +१

माझी पोस्ट टाकल्यावर हे वाचलं.

अमा, नेहमी तुमचे प्रतिसाद आवडतात पण आत्ताचा लेटेस्ट प्रतिसाद वाचुन 'काहीही' असं झालं आणि फिस्स्कन हसायला आलं....

सिरिअसली??????????????
इथे लिहिणारे आयडी लाडावलेली कुत्रे नाहीत तर माणसं आहेत त्यामुळे ते काही उगाचच कोणाच्या वाटेला (कुत्र्याच्या देखील) जाणार नाहीत. यदा कदाचित गेलेच तर आमचे जवळचे आमच्याकडे लाडाने कौतुकाने वगैरे बघनार ना आणि घरी येऊन कुत्र्याला मारणार वगैरे तर नाहीत्च नाही.

या पानावरच्या नीरजा आणि मामीच्या सगळ्या पोस्टींनी + करोडो!

काही लोकांच्या अति कुत्रंप्रेमामुळे मी कुत्रंद्वेष्टी बनण्याच्या मार्गावर आहे.

उत्तरं काहीही मिळणार नाहीयेत मामे...
तू, मी आणि या धाग्यावरचे सर्व कुत्रेद्वेष्टे, अतिरेकी वगैरे रंगांनी रंगवले जाणार....

आमचे ओळखीचे एक जण एका सोसायटीचे चेअरमन होते. त्यांनी लोकांच्या सांगण्यावरून कुत्री मांजरं पाळणा-यांसाठी एक छापील आचारसंहीता काढून प्रत्येक इमारतीच्या एंट्रस मधे लावली. दोनच दिवसात प्राणीमित्र कि कुठल्याशा संघटनेचे लोक एफआयरची कॉपी घेऊन चौकशीसाठी आले. पोलीस पण आले. पोलिसांना भूमिका पटली पण संस्थावाले ऐकायला तयार होईनात. शेवटी कोर्ट, वकील सगळं झाल्यावर प्रकरण शांत झालं. तक्रार कुणी केली हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहीलं. लोकांना सांगणं हा पण गुन्हाच झालेला आहे. आधीच्या पोस्टमधे सांगितलेला उपाय या सोसायटीत प्रत्यक्षात आणला होता. त्याचा परिणाम बरा झाला. एका आजीबाईने कुत्र्याला लिफ्टमधून नू दिलं नाही म्हणून सोसायटीच्या पदाधिका-यांना कोर्टाकडून जबरी दंड ठोठावला होता. अर्थात त्या आजीबाईंची परिस्थिती वाईट होती आणि त्यांना सोबतीची गरज होती जी कुत्रा पूर्ण करत होता. असतं एकेकाचं श्वानप्रेम.

पण या श्वानप्रेमींनी कुत्र्याला चांगल्या सवयी सुद्धा लावायला पाहीजेत,
खास करून कुत्र्याने ए आई म्हणायचं की बाबा हे सर्वात आधी ठरवून घेतलं पाहीजे. त्यानंतर संस्कारवर्गात घातलं पाहीजे. तज्ञांचे सल्ले घेतले पाहीजे असं वाटतं..

कुत्रे न आवडणे हा गुन्हा नाही. कुत्र्याची भिती वाटणे हा तर अजिबात गुन्हा नाही<<< Lol

प्रतिसादाला अनुमोदन

आयुष्यात परक्याच्या मर्जीनुसार वागावे लागू शकते हा जीवनावश्यक धडा तुम्हाला देण्याचाच श्वानमालकाचा हेतू असतो. त्याबद्दल त्या/तिचे आभार मानावेत. श्वानास अहो म्हणूनच संबोधावे.

. तुम्ही कुत्र्यांना फिरवायला नेता तेव्हा त्यांनी केलेली घाण लगेच उचलून कचराकुंडीत टाकता का?
>> yes. always. I carry a dog walk bag with a torch, a waste paper and cash.

२. लिफ्टमध्ये कोणी कुत्र्यांना घाबरणारं असेल तरीही दामटून त्याच लिफ्टमध्ये दोन दांडगे कुत्रे घुसवता का?
>> we go through a service lift only and our attempt is always to stay away from humans. Many times when the service lift is not working we have been thrown out of the human lifts. we then walk out and walk down the stairs

३. कुत्र्यांना बघून कोणी घाबरलं की फिस्स करून हसता का? (मागे तुझ्या एका पोस्टीत असा उल्लेख होता). मला झुरळांची भिती वाटत नाही म्हणून तुझ्या अंगावर चार झुरळं सोडली तर चालतील ना?
>> I have never laughed at people who get scared nor I have posted such stuff. My attempt is always to ignore the humans and stay out of there way. for that we walk on designated levels in society. and at times when other people are not there or are less. we never go on p3 which is for kids and elderly people.

I am a minority here I know but I was traumatized by the talk of killing dogs. jitki tumachi ghruna khari titke maajhe bheeti aani frustration pan. I have absolutely no interest in labeling any of you. carry on.

fiss kn tar tumhi hasat aahe.

श्वानास अहो म्हणूनच संबोधावे. >> ठीक आहे.

एका भूभूचे नाव मालकांनी लाडाने वि४वंत ठेवले आहे. असं नाव ठेवल्यावर एकेरी संबोधन शक्यच नाही. Happy

Pages