ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा कुठलेही नियम देणार नाहीत>>> मॅडम प्लीज माझी पोस्ट वाचून घ्या. बीएमसीच्या नियमांची लिस्ट मजकडे हार्ड कॉपी आहे. ती उतरवायची तर वेळ लागेल. वीकांताला लिहीन असे लिहीले आहे. साडेआठ ते साडेसहा हपिसातून हे सर्व नाही करता येत.

मी अतिरेकी कुत्रा प्रेमी नाही. येथील द्वेषी लोकांना त्रास झालेला आहे तो त्यांनी व्यक्त केला आहे. मोनालिपच्या मुलाची मी भेटल्यावर चौकशी ही केलेली आहे. टीशरटचे पैसे देताना भेटलो होतो. मला स्वतःला कुत्रा चावलेला आहे. व मी तीन इंजेक्षने दंडात घेतलेली आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ची मिळतात. ती ही ८२- ८३ मधील कथा.

आता चौकशी केली म्हनजे उपकार नाही केले असे पोस्ट येइल का? तर बघुया.

माझ्या बारक्य साइजच्या फीमेल कुत्र्याला सोसायटीतील बघिरा नावाचा मोठा कुत्रा भयंकर चावला आहेत हा एका व्हेट चाच कुत्रा आहे. मेल आणि अ‍ॅग्रेसिव आहे. त्याची देखील मला भीतीवाट्ते. पण मग आम्ही ते दोघे एकमेकांना भेट्नर नाहीत असे टायमिन्ग अ‍ॅडजस्ट केले आहे.

जिज्ञासा जे म्हणतेय ते मामीने लिहिलेल्या पोस्टबद्दल आहे आणि तिचा अमा/ मामी यामधे गोंधळ झाला असावा असा माझा समज झाला असल्याने ते मी लिहिले. तुम्ही नेहमीप्रमाणे दुखवल्या गेल्या असालच त्यामुळे साष्टांग नमस्कार करून तुमची क्षमा मागते. ओके?

आमच्या एक परीचयाचे आहेत, त्यांची मुले परदेशात असतात. त्यांनी एक जर्मन शेफर्ड पाळलेला आहे. खुप छान आहे हा भु भु माणसाची भाषाही समजतो असे वाटते. महिन्यातुन एकदा वगैरे भुंकतो, नाहीतर शांत आहे. मी ही कधी गेलो त्यांच्याकडे तर खेळून घेतो त्याचे लाड करतो. (मग मी माझ्या घरी आणि तो त्याच्या.)
त्याच्या साठी ३-बी.एच.के फ्लॅट मधली एक रूम आहे विथ ए.सी. त्याच्या लसी डॉग फूड जर्मनी हून येतात. त्या भुभु सोबत प्रवास करता यावा म्हणून एक नवी गाडी (तवेरा) घेतली आहे. Happy भारी थाट आहे ह्या भुभु चा.

जिज्ञासा जे म्हणतेय ते मामीने लिहिलेल्या पोस्टबद्दल आहे आणि तिचा अमा/ मामी यामधे गोंधळ झाला असावा असा माझा समज झाला असल्याने ते मी लिहिले. तुम्ही नेहमीप्रमाणे दुखवल्या गेल्या असालच त्यामुळे साष्टांग नमस्कार करून तुमची क्षमा मागते. ओके?>> मी काही ही न म्हणता तुम्ही असे का लिहीता आहात. नेहमी प्रमाणे का क्या मतलब? इतकी आपली इंटर अ‍ॅक्षन नाही.

>>हा धागा आणि तो लेख एकमेकांशी असंबद्ध आहेत असे मला वाटत आहे. <<
बेफी हा धागा व त्यावरील प्रतिक्रिया हे सुसंबद्ध आहेत असे आपल्याला वाटते का? जेव्हा चर्चा होतात त्यावेळी मूळ विषय भरकटला जातो.चर्चेतील काही प्रतिक्रियांशी तरी तो लेख सुसंबद्ध आहे असे मला वाटते. अर्थात हे सगळ्यांनाच वाटेल असे नाही.

तुम्ही नेहमीप्रमाणे दुखवल्या गेल्या असालच त्यामुळे साष्टांग नमस्कार करून तुमची क्षमा मागते. ओके?>>>>>>>> काहिहि. Sad किती अ‍ॅरोगंट पोस्ट आहे. (नेहमीप्रमाणेच )

तुम्ही नेहमीप्रमाणे दुखवल्या गेल्या असालच त्यामुळे साष्टांग नमस्कार करून तुमची क्षमा मागते. ओके?>>>>>>>> काहिहि. अरेरे किती अ‍ॅरोगंट पोस्ट आहे. (नेहमीप्रमाणेच )+१०००००००००

हा धागा आणि तो लेख एकमेकांशी असंबद्ध आहेत असे मला वाटत आहे. >>

बेफिकीर, नशीब अजून घाटपांड्यांनी या धाग्यावर अं.नि.स हा विषय आणलेला नाही!

<< ती चूकीची आहे असे तुमचे मत असू शकते, त्याचे नसू शकते.<<
कुत्रे न आवडणे म्हणजे कुत्रेद्वेष असं म्हणायचंय का म्हणजे? >>>

असं मी म्हंटलय ? Uhoh

<< मग कुत्रे न आवडणे हा ही गुन्हा आहे हे पण कुत्रेप्रेमीमालकांचे मत असेलच. >>>
<<पण कुत्रेप्रेमीमालकांना वाटते म्हणून आम्ही स्वतःला आमच्यामते चुकीची लेबले का बरे लावून घ्यावीत?>>

स्वतःचीच मते दुसर्‍यांच्या नावावर खपवल्यासारख वाक्य आहे हे.

----------

<< <<मी ईथे माणूस व ईतर प्राणी समान आहेत ह्या दृष्टीकोनातून बोलतो आहे.<<<
पण हा तुझा किंवा कुत्रेप्रेमींचा दृष्टीकोन झाला. तो तसाच असणे कंपलसरी आहे का? कुठल्या नोटीस अथवा कायद्याद्वारे? >> डिड आय सेड दॅट ?>>>>

<< डिड आय सेड दॅट ?<< अरेच्या कुत्रे आणि माणसे समान आहेत हा तुझा दृष्टिकोन आहे हे तूच तर म्हणालास ना. पण इतरांच्या मते ते समान नसतील तर?>>> कंपलसरी आहे असं कोण म्हणालय ? Uhoh

-------------

अमा व बर्‍याच इतरांच्या पोस्टस् ना अनुमोदन.

आधी बाफचा सूर कुत्राद्वेष इतकाच वाटला होता, आता कांगावखोरही आहे.

---

इब्लीस, तुमचा मेल परत पाठवा, वेळ असल्यास जरूर उत्तर देईन.

<< अभ्यास करून किती लोक कुत्रा किंवा पाळीव प्राणी पाळतात ते मला ठाऊक नाही. हौसेखातर पाळायला आणायचा अन मग त्या जिवाचे हाल करायचे हे मी अनेक घरांत पाहिलेलं आहे. शेजारच्या बंगल्यात आहे म्हणून आणलेली एक खरीच प्रेमळ अन गोड डॉबरमन बिच या गाढवांनी दिवस रात्र बांधून ठेवल्याने अक्षरशः वेडी झालेली. तिला नेऊन कुठेतरी खेड्यातल्या शेतात टाकून आले. जीव जळाला माझा ते पाहून. >> बरं

<<दुसरी गोष्ट मला एक समजत नाही. की प्रेम करण्याची लिमिट आपण पाळतो का? >> लिमिटस् व्हेरी पर्सन टू पर्सन.

<<तो प्राणी नेहेमी तुमच्या सोबत असतो, तुमचा जिवलग मित्र आहे वगैरे ठीक. पण आपल्या बिछान्यात झोपायला अन आपल्या ताटात जेवायला घालणार्‍यांचा वेडेपणा मला समजतच नाही.>> मलाही नाही. पण मी दुसर्‍याचा वेडेपणा समजून घ्यायलाही जात नाही. मरेना का.

<< कुत्रे कितीही हेल्दी असले तरी त्याचे केस गळत असतात. स्किन एक्स्फोलिएट होत असते. घाम, लाळेसारखे बायोलॉजिकल फ्लुइड्स एक्स्चेंज होत रहातात.

धिस इस सिंप्ली नॉट हेल्दी. >>

बिग हम्बग.... धादांत खोटं आहे हे.

माणसाच्याही शरीरातून असेच फ्लूईडस् एक्स्ट्रॅक्ट होत असतात. म्हणून तर संसर्गजन्य रोगात संपर्क टाळतात. कुत्र्याच्या बरोबर राहिल्याने कोणतेही रोग होत नाहीत (एलर्जी असणे वेगळे) माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून आणि इतर अनेक कुत्रे मालकांशी बोलून व अभ्यास करूनच हे सांगतोय.

<<त्या प्राण्याला ज्या व्हायरस जंतूंनी आजार होतात, ते आपल्यात पसरू शकतात, त्याला ज्या जंतूंनी काहीच होत नाही, त्यामुळे तो हेल्दी असतो, असे कमेन्साल्स, आपल्यासाठी पॅथोजेनिक असू शकतात. >>

फॉर एक्झाम्पल ?

<<एका वाटीतून श्रीखंड चाटून खाऊ घालणार आहात का लाडक्या बाळाला? असेही पाहिलेले आहेत. पुन्हा, सिंप्ली नॉट हेल्दी. २ लशी दिल्या म्हणजे झाले, असे नसते. >> बरं

<<ब्रिटीश स्टाईल पाहिजे त्यासाठी. सेपरेट केनेल ठेवा. घरात एका लिमिटपलिकडे त्याला फिरायला एंट्री देऊ नका. त्याचे खाणेपिणे वेगळे ठेवा. त्याला अंगावर पाय ठेऊ द्यायचे असेल, तर त्यासाठी वेगळा पोशाख ठेवा, जो स्वतःच्या जेवणाआधी, झोपायला जाण्याआधी बदला इ. >> हे जे तुम्ही सांगताय त्या चांगल्याच सवयी आहेत. पण फक्त त्याच चांगल्या आहेत असं नाही.

<<आणि जर त्या बाकावर दुसर्‍या व्यक्तीसाठी बसण्यास जागा असतांना तिथे कोणतीही व्यक्ती बसलेली नसतांना जर त्यांना बसता येत नसेल तर ते त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचं अतिक्रमण नाही का?>>

तुम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अर्थ समजला नाहीये.

<<तुमच्या कुत्र्याला कायद्याने काय हक्क दिले आहेत ते सांगा म्हंटलं तर तुमची आळीमिळी. >> मी सुमेधा यांना प्रश्न विचारले आहेत त्या संदर्भाने बोलतो आहे. आणि जर तुम्हाला कायद्याने कुत्र्याला (तुमच्या हा शब्द मी मुद्दाम वगळतो आहे कारण माझ्याकडे कुत्रा नाही आहे) काय हक्क दिलेले आहेत याची माहिती हवी असेल तर माहिती कायद्याअंतर्गत योग्य ठिकाणी अर्ज करा.

<<तुमच्या ह्या अनाठायी भूतदयेबद्दलच्या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी एक छोटी चाचणी सांगतो. विमान, रेल्वे किंवा बसचे दोन तिकिटं रिझर्व करा, एक तुमच्यासाठी आणि दुसरं तुमच्या कुत्र्यासाठी. आणि कंडक्टरला, विमानतळ ऑथोरिटीजना समजावून पहा ह्याने तिकिट काढले आहे आणि तुमच्या बाकावर कुत्रांनी बसू नये असा बोर्ड नाहीये. >>

फॉर दॅट मॅटर, अश्या प्रत्येक वाहतूक व्यवस्थेला स्वतःचे नियम आहेत.

बिग हम्बग.... धादांत खोटं आहे हे.
<<
याच्यात खोटं काय आहे?
स्किन, हेअर एक्स्फोलिएशन होत नाही, वा फ्लुईडस बाहेर येत नाहीत हे म्हणायचंय तुम्हाला?

हास्यास्पद लिहू नका.

"अभ्यास" असेल तर शास्त्रिय लिंका द्या. कुत्री मालकांचे 'अनुभव' नका सांगू मला.

>>फॉर एक्झाम्पल ?<<
परत, "अभ्यास" करा. Happy

अमित,

उत्सुकता म्हणून मला तुमची मते समजून घ्यावीशी वाटत आहेत.

१. सुमेधा ह्यांनी त्या बाकावरील कुत्र्याला हटवणार नाही असा स्टँड कुत्रेमालकाने घेतल्यावर काय करणे अपेक्षित होते?

२. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय?

३. 'हे तुमचे मत, ते इतरांचे असू शकत नाही' असे म्हणताना त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचेही मत कृपया द्यावेत.

<< धिस इस सिंप्ली नॉट हेल्दी. >>
हे तुमचं वाक्य आहे ना, त्याला म्हणतोय मी खोटं. माणसांच्या अंगातून उत्सर्जन होतं ना, तसच कुत्र्यांच्याही होतं. मग दोघेही नॉट हेल्दीच की. कउत्रे पाळणे अनहेल्दी असतं, कुत्रे पाळल्याने रोगराई पसरते हाच मुद्दा आहे ना तुमचा ? सिद्ध करा तो.

<< स्किन, हेअर एक्स्फोलिएशन होत नाही, वा फ्लुईडस बाहेर येत नाहीत हे म्हणायचंय तुम्हाला?>>

Rofl
<माणसाच्याही शरीरातून असेच फ्लूईडस् एक्स्ट्रॅक्ट होत असतात. > हे माझं वरच वाक्य वाचलं नाही का तुम्ही ?

<< "अभ्यास" असेल तर शास्त्रिय लिंका द्या. कुत्री मालकांचे 'अनुभव' नका सांगू मला.>> मुद्दा तुम्ही मांडलाय, तुम्हाला सिद्ध करता येत नसेल तर सांगा तसं निसंकोचपणे.

<< परत, "अभ्यास" करा.>> जबाबदारी टाळलात परत ? Proud

<< <<त्या प्राण्याला ज्या व्हायरस जंतूंनी आजार होतात, ते आपल्यात पसरू शकतात, त्याला ज्या जंतूंनी काहीच होत नाही, त्यामुळे तो हेल्दी असतो, असे कमेन्साल्स, आपल्यासाठी पॅथोजेनिक असू शकतात. >>

हे जरतर वालं वाक्य तुमचंच आहे ना ? सांगा बरं कुत्रा पाळल्याने असे कोनकोणते कमेन्साल्स पसरलेत कुत्रे मालकांत ?

भूषण, परत एकदा, चांगल्या प्रतिसादाबद्दल अभिनंदन.

<< १. सुमेधा ह्यांनी त्या बाकावरील कुत्र्याला हटवणार नाही असा स्टँड कुत्रेमालकाने घेतल्यावर काय करणे अपेक्षित होते? >>

बरेच काही करता येण्यासारखे आहे. फक्त ह्याकरता सुमेधाव्ही यांनी त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मी अजून एक दोन दिवस वाट पाहेन नाहितर बर्‍याच पॉसिबिलीटीज गृहीत धरून सोल्यूशन काढावे लागेल

<<२. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय?>> रेफरन्स प्लीज.

<<३. 'हे तुमचे मत, ते इतरांचे असू शकत नाही' असे म्हणताना त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचेही मत कृपया द्यावेत.>>
सॉरी, पण इथे माझी मत मांडली तर साईट बरखास्त करावी लागेल. प्रत्यक्ष संभाषणात बोलता येतील. तसेही माझे मत ईथे महत्वाचे नाही. प्रॉब्लेम सुमेधाव्ही यांना आहे.

तसेही, ह्या बाफवर मुद्देसूद चर्चा होण्यापेक्षा, इतरच शरसंधान चालू आहे, त्यामुले मी फक्त मला जितके मुद्दे मांडायचे आहेत त्याविषयीच बोलेन.

अमित,

रेफरन्स देत आहे:

>>> बागुलबुवा | 1 August, 2014 - 18:40

<<आणि जर त्या बाकावर दुसर्‍या व्यक्तीसाठी बसण्यास जागा असतांना तिथे कोणतीही व्यक्ती बसलेली नसतांना जर त्यांना बसता येत नसेल तर ते त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचं अतिक्रमण नाही का?>>

तुम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अर्थ समजला नाहीये.<<<

इथे एक लिस्ट आहे कुत्र्यांमुळे होणार्या विविध रोगांची.
शक्यतो विकीपिडियावरच्या लिंका द्यायच्या नाहीत असे माझे मत आहे पण याखेरिज इतर लिंका जरा कठिण आणि वैद्यकीय भाषेत असल्याने ही लिंक देतेय.

http://en.m.wikipedia.org/wiki/List_of_dog_diseases

ता क - मी कुत्राद्वेष्टी किंवा प्रेमी नाही .
पण अजून चार पाच वर्षांनी कुत्रा पाळायचा प्लॅन आहे आणि त्यादृष्टीने बर्‍यापैकी अभ्यास करूनच कुत्रे पाळणार आहे.

हो.
ही लिंक कुत्र्यांना होणार्या आजारांची आहे.

त्यातले पहिले चार मुद्दे - रेबिज, व्हायरल, बॅक्टेरियल, फन्गल असे आजार संसर्गजन्य आहेत.

तुमच्या कुत्र्यांचे कोणते खास पॅथोजेन्स या प्रश्नाचे उत्तर या लिंकेत आहे.

निकटच्या सहवासामुळे हे आजार माणसाला ट्रान्समिट होऊ शकतात.
विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि डायबेटिस किंवा इतर कारणांनी प्रतिकारशक्ती कमी असणारे लोक.

आता यांपैकी किती आजारांचे व्हॅक्सिनेशन आपण आपल्या कुत्र्यासाठी करू शकतो हे एकदा शोधून देते.

बागुलबुवा,
तुम्ही काही एक अर्थबोध नसलेले एका वाक्यातली ऊत्तरं शाळेत असतांना लिहिली असती तर कदाचित मास्तरांनी वरच्या ईयत्तेत ढकलण्यासाठी तुम्हाला अर्धा पाव का होईना गूण दिले असते. ईथे तुम्हाला शून्य मार्क देऊन मायबोलीवर वादविवाद करण्याचे तुमचे लायसन्स रद्दबातल करावे अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे.

फॉर दॅट मॅटर, अश्या प्रत्येक वाहतूक व्यवस्थेला स्वतःचे नियम आहेत. >> हो आणि ते माणसांसाठी आहेत कुत्र्यांसाठी नाहीत. कुत्र्यांना नियम वाचता आले असते तर त्यांनी तुमच्या सारख्यांपेक्षा कसोशीने ते पाळले असते.
तुमच्या कुत्र्याला कायद्याने कुठले अधिकार प्राप्त आहेत ते सांगा मग बाकीचे ज्ञानकण ऊधळा.

तुम्हाला जर एका वाक्यात ऊत्तरं द्यायची असतील तर एक सांगा,
लग्नसमारंभात पूर्ण परिवाराला आमंत्रण आलेले असतांना तुम्ही तुमच्या कुत्र्याला तुमच्याबरोबर पंगतीत नेऊन बसवता का?
स्टेजवर फोटो काढायला नेता का?
का माझ्या कुत्र्याला आंत्रण दिले तरच मी येणार नाही तर येणार नाही असं म्हणता?

वाटलच भूषण,

मी व्यक्तिगत स्वातंत्र्य असा शब्दप्रयोग केला होता. चमनच्या एका पोस्टच्या संदर्भात.

<<माझ्या खांद्यावर तुमचे पाय ठेऊ नयेत, माझ्या अंगावर लाळ गाळू नये, माझ्या गालांची पापी घेऊ नये, माझ्या मांडीवर येवून बसू नये, मला चाटू नये अश्या नोटीशी लाऊन फिरता का तुम्ही?
मग रस्त्यावर चालणार्‍या कुत्र्याने सोडा तुमच्यासारख्या माणूसप्राणी असणार्‍या, रोज लाईफबॉय लाऊन आंघोळ करणार्‍या एखाद्या भिकार्‍याने 'नोटीस कुठाय दाखव' म्हणत वरचे सगळे ऊपद्व्याप केले तर तुमची भूतदया ऊफाळून येईल की राग? सिरियसली विचारतो<<>>

ह्यावरच माझं उत्तर होतं <<@ चमन, तुम्ही दिलेल उदाहरण हे व्यक्तिगत स्वातंत्र्यावरच अतिक्रमण ठरतय<<>>

होप इट्स क्लीअर

@ साती ही कुत्र्याला "होऊ शकणार्‍या" संसर्गजन्य रोगांची यादी आहे.

मूळ मुद्दा "कुत्रे पाळल्याने रोग होतात" असा आहे

<< बागुलबुवा,
तुम्ही काही एक अर्थबोध नसलेले एका वाक्यातली ऊत्तरं शाळेत असतांना लिहिली असती तर कदाचित मास्तरांनी वरच्या ईयत्तेत ढकलण्यासाठी तुम्हाला अर्धा पाव का होईना गूण दिले असते. ईथे तुम्हाला शून्य मार्क देऊन मायबोलीवर वादविवाद करण्याचे तुमचे लायसन्स रद्दबातल करावे अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे.>>

पर्सनल रीमार्क. इग्नोअर्ड

<<फॉर दॅट मॅटर, अश्या प्रत्येक वाहतूक व्यवस्थेला स्वतःचे नियम आहेत. >> हो आणि ते माणसांसाठी आहेत कुत्र्यांसाठी नाहीत. कुत्र्यांना नियम वाचता आले असते तर त्यांनी तुमच्या सारख्यांपेक्षा कसोशीने ते पाळले असते. >> Rofl पाळीव प्राण्यांची वाहतूक कशी करावी याबद्दलही आहेत.

<<तुमच्या कुत्र्याला कायद्याने कुठले अधिकार प्राप्त आहेत ते सांगा मग बाकीचे ज्ञानकण ऊधळा.>> का ?

<<तुम्हाला जर एका वाक्यात ऊत्तरं द्यायची असतील तर एक सांगा,
लग्नसमारंभात पूर्ण परिवाराला आमंत्रण आलेले असतांना तुम्ही तुमच्या कुत्र्याला तुमच्याबरोबर पंगतीत नेऊन बसवता का?
स्टेजवर फोटो काढायला नेता का?
का माझ्या कुत्र्याला आंत्रण दिले तरच मी येणार नाही तर येणार नाही असं म्हणता?>>

मुळात तुमच्या एकंदरीत बुद्ध्यांकाविषयीच मला आता शंका येऊ लागली आहे. (आय अ‍ॅग्री, ईट्स पर्सनल)

आता मी ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांच एकदमच उत्तर देऊन टाकतो.

एखादा कुत्रामालक अश्या प्रसंगी काय करतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. वेगवेगळ्या कुत्रेमालकांची उत्तरे वेगवेगळी असू शकतात.

बादवे तुम्हाला हा प्रश्न का पडला ? Wink

अजिबात कठीण नाहीये साती. मुळात ह्या दोन मुद्द्यातला फरक ओळखण्याइतकी बुद्धीमता तुमच्याकडे नक्केच आहे.

उथले सो कॉल्ड डॉक्टर "कुत्रे पाळल्याने रोगराई पसरते" असले बिनबुडाचे विधान करतो आणि तुम्ही त्याचे समर्थन म्हणून "कुत्र्याना होणार्‍या आजाराची लिस्ट" टाकता. आणि वर हे आजार माणसालाही होऊ शकतात ही मखलाशीही ...

माणसाला होणार्‍या संसर्गजन्य आजाराचीही अशेच लिस्ट असेलच. मग माणसानेही माण्साबरोबर राहू नये ना ?

<<तुमच्या कुत्र्याला कायद्याने कुठले अधिकार प्राप्त आहेत ते सांगा मग बाकीचे ज्ञानकण ऊधळा.>> का ?
म्हणजे तुम्ही आम्ही नागरिकशास्त्र काय टाईम पास म्हणून शिकलो? नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार शिकलो आणि त्याप्रमाणे वागण्याची प्रतिज्ञा घेतली आहे ना. तीही विसरला असल्यास तुमच्यासाठी त्यातला काही निवडक भाग ईथे देत आहे

सारे भारतीय माझे बांधव आहेत। मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझं सौख्य सामावले आहे।

असं सोयीस्कर रित्या 'वैयक्तिक प्रश्न', 'पर्सनल रिमार्क' म्हणत शेपटी पायात घालणे हे ऊत्तरं नसल्याचं स्पष्टं लक्षण आहे (तुमचं कुत्रप्रेम बघता हा 'शेपटी पायात घालणे' वाक्प्रचार तुम्हाला आजिबात ऑफेंडिंग वाटणार नाही ह्याची मला खात्री आहे) Wink

बादवे तुम्हाला हा प्रश्न का पडला ? >> जर तुम्ही तुमच्या कुत्र्याला अश्या प्रसंगी तुमच्या बरोबर नेत नसाल, पंगतीला बसवत नसाल तर तो ह्या सोसायटीचा एक गौण मेंबर आहे असे तुम्ही स्वतःच मान्य केले आहे. समाजातल्या माणूस प्राण्यांचा कन्वेनियन्स कुत्र्यापेक्षा मोठा आहे हे ही तुम्ही कुत्राला लग्न समरंभाला न नेऊन सिद्ध केले आहेत. मग ओळखीच्या माणसांमध्ये 'शेपटी घालणे' आणि अनोळखी माणासांमध्ये कुत्र्याला घेऊन अरेरावी करणे हे दुतोंडी वागणे(मराठीत 'हिप्पोक्रेटिक') झाले.

सुमेधा
आज टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने
ह्या बाफचं टायटल 'ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?' बदलून 'श्वानप्रेमींचे डो़के ठिकाणावर आहे काय' असं खडसावून विचारल्यासारखं करा.

ईंग्रजाचा दंडुका गेला आणि आता ह्यांच्या भितीखाली रहायची वेळ आली आहे. ही मग्रुरी मोडून काढायलाच हवी.

Pages